पुणे रात्री तीन वाजेच्या सुमारास भिडे ब्रिज (Bhide Bridge) परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याची पातळी अचानक वाढली. या ब्रिज खाली अंडा भुर्जी स्टॉलवर काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना पहाटे पाच वाजता उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अजय घाणेकर (25, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (21, रा, पूलाची वाडी, डेक्कन) शिवा जिदबहादुर परिहार (18, नेपाळी कामगार) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असूनदेखील त्या परिसरातील लाईट सुरु होत्या. प्रशासनाने तेथील लाईट बंद करणे अपेक्षित होते. रात्रीतून कधीच पाण्याचा विसर्ग केला जात नाही. सकाळी विसर्ग केला जातो. परिसरातील तीन मुले आपला स्टॉल वाहून जाईल या भीतीपोटी स्टॉल वाचवण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरु आहे, असे म्हटले जाते आहे.
नदी पात्रातील अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा शॉक लागल्याने अंत
Date: