सिमेवरील जवानांसाठी पुणेकरांकडून ४०० किलो तिळगूळ 

Date:

पुणे ः भारताच्या सीमेवर प्राण पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून सुमारे ४०० किलो तिळगूळ देशाच्या सरहद्दीवर सैनिकांना पाठविण्यात आला. भारत माता की जय… अशा घोषणा देऊन सैनिकांप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करीत गणरायाच्या मंदिरात तिळगूळाचे पूजन करण्यात आले.  हा आपुलकीचा ठेवा सैनिकांपर्यंत पोहोचवून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवच जणू पुणेकरांना करुन दिली.  
सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांच्यावतीने सोमवार पेठेतील त्रिशुंड्या गणपती येथे  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ लेखिका डाॅ. कांचनगंगा गंधे, नूमवि प्रशालेचे माजी मुख्याध्यापक रमेश परचुरे, शाहीर हेमंत मावळे, शिरीष मोहिते, मिलिंद मुजुमदार, रत्नाकर दिवाकर, मुकुंद जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सचिन पवार, संगीता मावळे, सुशील भिसे, सूरज गावडे, अभिजीत रेणुकदास यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, एखादा उपक्रम हाती घेतला तर त्यामध्ये सातत्य हवे असते. हे सातत्य सैनिक मित्र परिवारामध्ये दिसते. देशवासियांचे हे प्रेम आणि तिळगूळ पाहून सैनिकांना सिमेवर लढण्याचे बळ नक्की मिळत असेल. सैनिकांच्या कुटुंबांच्या मागे सैनिक मित्र परिवारासारख्या संस्थांनी ठामपणे उभे रहायला हवे. त्यामुळे सैनिकांमध्ये भारतीयांविषयी असलेला आत्मविश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी सांगितले.
सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ म्हणाले,  समाजामध्ये एकतेचा संदेश देण्याचा आणि देशाप्रती प्रेम जागृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून सण-उत्सव सैनिकांसोबत साजरे करावे, या संकल्पनेतून मकरसंक्रांतीचा उपक्रम सुरु झाला होता. शाहीर हेमंत मावळे यांनी प्रास्ताविक केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...