नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

Date:

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात जणांचा परतीचा प्रवास सुरू, बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती

पुणे : नेपाळमधील महापूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नागरिकांबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या ताज्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील आठ नागरिक सुरक्षित आहेत, तर रहाटणी येथील जितेंद्र प्रमोद पाटील यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्या शोधासाठी मंत्रालय नियंत्रण कक्षासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे.

स्मिता पवार मुंबईत सुखरूप

नेपाळमध्ये अडकलेल्या स्मिता पवार या मुंबईत सुखरूप पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षित परतीची अधिकृत नोंद झाली आहे.

सुनीता पाटील, वंदना बहिरट, मेघना जोशी, उत्तम भारती, भारती मॅडम, संगीता लाडके आणि अनिल लाडके हे सात जण कैलास पर्वत परिसरात सुखरूप आहेत. त्यांचा परतीचा प्रवास सुरू असून ते नातेवाईक तसेच पुणे जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहेत.

रहाटणीतील एकजण अद्याप बेपत्ता

मात्र रहाटणी येथील जितेंद्र प्रमोद पाटील यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही. जिल्हा प्रशासनाच्या 30 ऑगस्टच्या अहवालात त्यांची नोंद ‘मिसिंग’ अशी करण्यात आली आहे.

त्यांच्याबाबतची माहिती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली असून मंत्रालय नियंत्रण कक्षाने ती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी यंत्रणा कार्यरत

कालच्या उपलब्ध माहितीनुसार नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले होते. राज्यातील नागरिकांशी संपर्क साधणे, त्यांचा सुरक्षित प्रवास निश्चित करणे आणि आवश्यकतेनुसार वाहतुकीची व्यवस्था करणे यावर भर देण्यात आला होता.

आज पुणे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली स्वतंत्र यादी या प्रयत्नांमधील पुणे जिल्ह्याची ताजी स्थिती स्पष्ट करते.

नेपाळमध्ये आणखी पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा पर्यटक अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री 1077 किंवा 020-26123371 / 9370960061 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...

CJPच्या तीन मागण्या अद्याप अपूर्ण; 5 सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा मोर्चा

विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासह पीडित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी;...