हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आयोजित अमनोरा- पीवायसी एचटीबीए कप जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : मिहिका पाठक, शौर्या रोळे, सोयरा शेलार यांनी हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उदघाटन पीवायसीचे शेखर नानिवडेकर, एचटीबीएचे अध्यक्ष अविनाश जाधव, कॉर्पोरेट ॲथलीटसचे संस्थापक अभिजित चांदगुडे , पीवायी हिंदू जिमखान्याचे सचिव सारंग लागू, तन्मयी आगाशे, विजय कोकमठणकर यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेतील पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत मिहिकने अदिती गिरीवर २१-१०, २२-२०, २१-१७ असा, तर शौर्याने वीरा पानसेवर २१-१२, २१-१० असा विजय मिळवला. यानंतर सोयराने रेमा घागवर २१-५, २१-६ अशी, तर समीक्षा दोडकेने पलक धनगरवर २४-२२, २१-१८ अशी मात केली.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पार्थ देशपांडेने शैलेश स्वामीवर २१-१५, २१-१३ अशी, विपूल अन्वेकरने जतिन ठक्करवर २१-१६ १७-२१, २१-१८ अशी, तर शौनक कुलकर्णीने हिमांशी हरदेववर २१-१९, २१-१३ अशी मात केली. जयंत कुलकर्णीने श्रीवांश जाजूवर २१-१६, २१-११ असा, प्रणव गावडेने अविष्का मसालवर २१-१४, २१-८ असा, तर अथर्व खिस्तीने कीर्तन सेरालतानवर २१-१६, २१-१३ असा विजय मिळवला.
निकाल – पहिली फेरी –
११ वर्षांखालील मुले – एस. तिरुवेंकटेश्वरण वि. वि. अनय पाटील २१-१९, २१-११; बुर्हनुद्दीन अगशिवाला वि. वि. आदित्य करंबेलकर २१-९, २१-८; शांतनू चिरपुटकर वि. वि. धरसज सिंग २१-१७, २२-२०, अद्विक बाफना वि. वि. आदित्य पुरी २१-६, २१-६; मिहिर खरे वि. वि. हृधान मोडक २१-१३, २१-१७, सिद्धान्त धामा वि. वि. आर्यांश लोंढे १८-२१, २१-१७, २१-१४.
१७ वर्षांखालील मुले – अवधूत कदम वि. वि. अर्णव केदारी २१-२, २१-५; नितीन एस. वि. वि. अतुल्यायात्री अभ्यंकर २१-४, २१-६; ऋग्वेद भोसले वि. वि. रेहान सय्यद २१-११, २१-१६; अक्षर झोपे वि. वि. अर्णव बाफना २१-१६, २१-१८; कृष्णनील गोरे वि. वि. सारांश पांडे २१-१३, २१-९; तनीष्क अदे वि. वि. अथर्व काळे २१-१३, २१-५; कपिल जगदाळे वि. वि. श्रेयस लागू २१-६, २१-८; अजिंक्य जोशी वि. वि. श्रीरंग जाखडे २१-१८, २१-१६; अनुराग साठे वि. वि. वेदांत जोशी २१-८, २१-१६; सलील मानेरी वि. वि. पार्थ घाडगे २१-१२, २१-१२; नील गोएल वि. वि. शर्व पाटणकर २०-२२, २२-२०, २१-१७; नंदन मुथा वि. वि. अर्णव गोगटे २१-२, २१-४; चिन्मय फणसे वि. वि. आगस्थ्य गुप्ते २१-९, २१-७; ओजस जोशी वि. वि. इशान लागू २१-१२, २२-२०; अद्वैत अभ्यंकर वि. वि. आर्या बाकरे २१-६, २१-३.
१३ वर्षांखालील मुली – ईशान्वी अंभोरे वि. वि. किमया धारमिक १४-२१, २१-१६, २१-१९; शार्वी कुलकर्णी वि. वि. आराध्या कोयते २१-८, २१-८; प्रिशा पटवर्धन वि. वि. शान्वी सिनागरे २१-१२, २१-११; आद्या गाडगीळ पुढे चाल वि. सिद्धी दांडेकर; अहाना टिग्गा वि. वि. आध्या शिंदे २१-१९, १६-२१, २२-२०; जीविका पाटील वि. वि. अंजनी वाळवेकर २१-९, २१-४.
१३ वर्षांखालील मुले – प्रथमेश जगदाळे वि. वि. एस. थिरुवेंकटेश्वरण २१-६, २१-४; ईशान ठकार वि. वि.कबीर कुलकर्णी २१-१८, २१-१७; ऋषभ मराठे वि. वि. प्रणीत भंडारी २१-१२, २१-१२; आरुष सापळे वि. वि. अदित कानेटकर २१-१५, २१-७; वेदांत मोरे वि. वि. इशान रॉय १३-२१, २३-२१, २१-१९; शौर्या खरात वि. वि. अनुज भोसले २१-१५, २१-१५; शौर्या रानखांब वि. वि. वरद निपसे २१-११, २१-११; अनय इंगळहळीकर वि. वि. यशास मोर २१-१५, २३-२१; अवधूत कुंभार वि. वि. सिद्धेश वंकुद्रे २१-८, २१-९, स्वराज सोनावणे वि. वि. आरोह गोगटे २१-१७, २१-२.