पुणे-कोथरूड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली आहे. 5 जानेवारी रोजी साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने शरदवर किमान तीन गोळ्या झाडल्या. त्यांना सह्याद्री रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली आहे.
दरम्यान शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्वाती मोहोळ पुणे शहर भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी एका वाहनातून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 पिस्तूल, 3 मॅगझिन जप्त करण्यात आले. पोलीस आरोपीची चौकशी करण्यात व्यस्त आहेत.
शरद मोहोळने शुक्रवारी त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, शरद मोहोळसोबत सावलीप्रमाणे चालणाऱ्या त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
शरद मोहोळ याच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडल्या. मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर दोन जणांनी रस्त्यावर गोळीबार केला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले. या दोघांचे शरद मोहोळसोबत वैमनस्य होते. यामुळे हल्ला झाल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.