पुणे-गुजराती, मारवाडी महाराष्ट्रात आलेच कशाला? कोणीही येते आमच्या जमीन घेते. पण मराठी माणसाचं काय? मराठीचे काय? दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही एकमेकांना मान दिला नाही. तुम्ही एकमेकांसमोर अद्या पद्या शेळ्या मेंढ्या अशा नावाने हाक मारत राहिला. पष्प्या आलाय. अंड्या आलाय. हे तुम्ही ऑन स्टेज लोकांसमोर बोलता, तर तुमची कोणीही किंमत करणार नाही, असा खोचक सल्ला राज ठाकरे यांनी कलाकारांना दिला.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय नाट्य संमेलन सुरू आहे. मुलाखतकार दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावंर आपले मत मांडले.
जातीपातीचं राजकारण घडवलं जातंय
राज ठाकरे म्हणाले की, मराठा विरुद्ध ओबीसी हे चित्र. जातीपातीचं राजकारण घडत नाही, हे घडवल जातंय. हे आपण कधी समजून घेणार आहोत की नाही. महाराष्ट्रातील राजकारण व सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचे काम राज्यात सुरु आहे. असा हल्लाबोल देखील राज ठाकरे यांनी केला.
तुम्ही वाईट घेऊ नका. मला एक गोष्ट सांगायची आहे. बाहेरच्या राज्याच्या कलावंताना भेटतो. त्यात मला काही चुका दिसतात. माझ्यावर विश्वास ठेवा. मी मराठी कलावंतांची बैठक बोलावणार होतो. आज सर्व कलावंत इथे आहे. मी जे बोलतो ते कृपा करून ऐका. पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही. तुम्ही एकमेकांसमोर अद्या पद्या शेळ्या मेंढ्या अशा नावाने हाक मारत राहिला. पष्प्या आलाय. अंड्या आलाय. हे तुम्ही ऑन स्टेज लोकांसमोर बोलता, असे राज ठाकरे म्हणाल
आज मराठी चित्रपटक्षेत्रात पाहिलं तर स्टार नाही. कलावंत आहेत. मराठी सिनेमाला स्टार नाही. तामिळ तेलगू घ्या तिथे स्टार आहे. महाराष्ट्रात स्टार होते. आजही अनेक कलावंतात सर्व गुण आहेत. आपण एकमेकांना पब्लिकमध्ये शॉर्टफॉर्म नावाने हाक मारतात. अंड्या काय पचक्या काय. तुम्ही तुमचा मान राखला नाही तर लोक तुम्हाला का मान देतील, असा सवाल राज ठाकरेंनी केला
मराठ्यांचा इतिहास पाहिला तर नाटक ते अटोक असा आहे. अटकेपार झेंडे रोवले आपण. महाराष्ट्रातील मराठी माणूस इतिहास विसरत चालला आहे. टेलिव्हिजनमधून पाहत राहणं, मोबाईल फोन आणि रिल्समध्ये सर्वच अडकले आहेत. तुम्ही राज्यकर्ते होता. हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो आपण. या देशाचा पंतप्रधान मराठा साम्राज्याने बसवला. एवढा इतिहास असतानाही आपण ते गमावून बसलो आहोत. आपल्या हातून सर्व गोष्टी जात आहे. जातीपातीत भांडत आहोत. जातपात राजकारणापर्यंत राहिली नाही ती नाटकात आलीय. शाळा कॉलेजात आली असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
कलावंत नसते तर देशात अराजकता निर्माण झाली असती. कलावंत नसते, कवी, चित्रपट कलाकार ही मंडळी जर नसती तर राज्यात कधीच अराजकता निर्माण झाली असती. या कलावंतामध्ये लोक गुंतून पडला त्यामुळे कलावंताचा मोठा वाटा आहे.
सत्ता असो नसो कलावंतांच्या पाठिशी तुम्ही उभे राहतात. त्यामागचे मर्म काय आहे. तुमच्याकडेच कलावंत का येतात. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मला माहित नाही. कलावंत माझ्याकडे का येतात. फक्त एवढंच सांगतो की, कलावंतांच्या बाबतीत माझ्या जाणीवा जाग्या आहेत. कलावंत माझ्याकडे आला तर मी त्याच्या चपलेत पाय घालून बघतो. कलावंतांची परिस्थिती काय होईल, याची जाणीव मला आहे. म्हणून कलावंत माझ्याकडे येत असतील. पण कलावंतांनी सरकारकडे देखील जावं. कारण तुमच्याच पैशातून ते सरकार चालते.
लता मंगेशकर आणि राज ठाकरे यांचे नाते कसे? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, लता मंगेशकर यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. लतादीदींवरील एका पुस्तकाचं काम चालू आहे. मी त्यांचा पहिला कार्यक्रम घेतला होता. तो क्षण मला आजही आठवतो. लतादीदींसोबत माझे खूप वेगळे संबंध होतो. ते खासगी आहेत. ते असे जाहीरपणे सांगता येणार नाही. वेगळं नातं होतं एवढंच सांगतो.