Home Blog Page 713

अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर,देशात कमी झाली -जयंत पाटील

मोठ्या पवारांच्या मनात काय आहे? हे ओळखणे अवघड आहे. मात्र, अजित पवार यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे यांच्या मनात काय आहे, ते मला ओळखता येते व माहितीही आहे, आणि काय होणार आहे हेही ठाऊक आहे ; पण ते मी सांगणार नाही.

अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासार्हता कमी झाली असल्याचा दावा राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.त्यामुळे ते त्यांना आता तुम्ही थोडसं दुर ऊभं राहा म्हणू शकतील. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. आता तुम्ही वेगळी निवडणुक लढवा असंही सांगतील अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली.पाटील म्हणाले, महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांनी तात्पुरते वेगळं व्हावं वेगळं लढावं असं कदाचित त्यांना सांगितलं जाऊ शकतं. अजित पवारांना सोबत घेतल्याने त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे. निवडणुक झाल्यानंतर आपण परत बरोबर येऊ, असे सांगितले जाऊ शकते.

पुणे -आज मागणी नसलेल्या रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात खर्च अनावश्यक सुरू आहे. पाण्याचे प्रश्न महत्वाचे असून राज्यात काही भागात पाणी कमी तर काही जागी जास्त आहे. अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणे आवश्यक आहे. नाशिक, धुळे मधून काही पाणी गुजरातला जात आहे ते आपल्या हक्काचे आहे ते वळवले पाहिजे. सरकारने लक्ष्य देऊन विदर्भातील पाण्याचा प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित ‘ महाराष्ट्र व्हिजन २०५० ‘ विषयावर वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते.

प्रश्न- पवारसाहेबांनी त्यागाची भूमिका घेतल्याने अजितदादांनी बंडाची भूमिका घेतली काय ? उत्तर – नाही , तुम्ही बसून प्रश्न विचार .. तुम्ही उभे राहून प्रश्न विचारल्याने प्रश्न वाढलेला आहे .. असे म्हणत हसत जयंत पाटलांनी दिली बगल


जयंत पाटील म्हणाले, अलीकडे राजकारणी केवळ पुढील निवडणुकी पुरते पाहत आहे हे दिसून येत आहे. राज्यासमोर अनेक आव्हाने सध्या आहे. देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र अग्रेसर होते. रोजगारासाठी प्राधान्य काँग्रेस काळापासुन प्रोत्साहन दिले गेले. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र पूर्वी महत्वाचे स्थान होते पण आज अनेक ठिकाणी बंदरे, विमानतळे अशी दळणवळण सुविधा निर्माण झाली. त्यामुळे परिस्थिती बदलली असून गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय गुंतवणूकदारस निर्माण झाले.देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे महत्वाचे आहे. गुंतवणूक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी सर्व समाज गुण्या गोविंदाने राहिली पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिला पाहिजे तर गुंतवणूक येते पण सध्या तसे वातावरण नाही.
काहीजण धार्मिक गोष्टी बोलून भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन गुंतवणूक होणारी ठिकाणे निवडून तेथे रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना प्रोत्साहन दिले तर मोठ्या शहरावरील पायाभूत सुविधा ताण निर्माण होणार नाही. स्वतंत्र जागी ग्रोथ सेंटर, कॉरिडॉर निर्माण केले तर मराठवाडा, विदर्भ परिसरात नवे रोजगार निर्माण होऊन सदर भागाचा विकास होईल. धर्म निरपेक्ष संस्कार नवीन पिढीला दिले तर जागतिक पातळीवर आपण आगामी काळात पुढे जाऊ.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बाबत असंख्य शाळा निर्माण झाल्या आहे. आता त्याच्या शिक्षण आणि पायाभूत सुविधा बाबत गुणात्मक दर्जा संदर्भात विचार करणे गरजेचे आहे. शाळांच्या शिक्षकाचे प्रशिक्षण आणि दर्जा यातून चांगली पिढी निर्माण होईल. उद्याच्या निवडणुकीकडे केवळ न पाहता जनतेने दीर्घकालीन महाराष्ट्र हिताचा विचार निवडणुकीत करावा. तात्पुरते स्वप्न दाखवणारा योजना पेक्षा दीर्घकालीन परिणामकारक काम महत्वाचे आहे. सरसकट पैसे वाटप हे केवळ दोन महिने आहे. ज्या महिलेस पैशाची खरचं गरज आहे त्यांना मदत दिली पाहिजे. तात्कालिक स्वप्न दाखवणाऱ्या लोकांना जनतेने घरी पाठवले पाहिजे.

पीसीसीसोईआर मध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ स्पर्धेला प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि. ०९ सप्टेंबर २०२४) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल तर्फे आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही स्पर्धा प्रेरित करते.
या स्पर्धेमध्ये ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी तीस संघांची पुढच्या फेरीसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सामाजिक समस्यांचे तांत्रिक दृष्टिकोनातून निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
विविध नामांकित कंपन्यातील तज्ज्ञ, अनुभवी परीक्षक डॉ. बी. सत्यनारायण, श्रीकांत सावलकर, राहुल शेलार, ललित पाटील, दीपक रसाळ व जयवंत देवरे यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बी. सत्यनारायण यांनी तरुणांना संशोधनाचे महत्त्व सांगून प्रोत्साहित केले. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख डॉ. अर्चना चौगुले, विजयलक्ष्मी कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शिवगंगा गव्हाणे आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गंगा नेबुला सोसायटीच्या वतीने गणेशोत्सव उत्साहात

पुणे-विमान नगर येथील गंगा नेब्युला सोसायटीमध्ये गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला असून हा वार्षिक उत्सव रहिवाशांना अनोख्या आणि प्रेमळ पद्धतीने एकत्र आणून त्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे. दरवर्षी हा उत्सव अत्यंत उत्साहात रहिवाशांमध्ये प्रचलित असलेल्या उत्सवाच्या मूडसह आणि गणेशोत्सव उत्सवादरम्यान सामुदायिक बंधनाच्या जबरदस्त भावनेसह होतो.

या उत्सवाची सुरुवात एका भव्य मिरवणुकीने झाली जिथे सुंदर रचलेल्या गणेशाची मूर्ती सोसायटीच्या रस्त्यावरून आनंदी रहिवासी आणि पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.  रहिवासी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये भाग घेतात आणि सभासदांनी प्रार्थना करून आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद घेत दररोज आरत्या केल्या जातात.

सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य सादरीकरण आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि संपूर्ण रहिवासी, विशेषतः लहान मुले मोठ्या उत्साहाने या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. गणपतीला धुर्वा अर्पण करण्याचे महत्त्व सांगणाऱ्या सोसायटीच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या स्किटने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  याव्यतिरिक्त, सोसायटी पर्यावरणास अनुकूल उत्सवांना प्रोत्साहन देते, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शाश्वत पद्धतींचा प्रचार करते.

गणेशोत्सव उत्सव केवळ तेथील रहिवाशांमधील बंध दृढ करत नाही तर समाजाने एकत्र येण्यासाठी त्यांची श्रद्धा, संस्कृती आणि चांगल्या समाजासाठी बांधिलकी जपण्याचे एक सुंदर उदाहरण देखील आहे.

‘सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी’नगररोड मध्ये चिकुनगुनियाच्या गंभीरसंसर्गातून ५ वर्षांचा मुलगा झाला बरा

जीवघेणा मेंदू संसर्ग आणि अवयवांची कार्यक्षमता कमी झाली पण या लहान मुलानेमिळवला अद्भूत विजय

पुणे सप्टेंबर२०२४  चिकनगुनियाच्या गंभीर मेंदू संसर्गामुळे (एन्सेफलायटीस )झालेल्या आणि त्यातून अनेक अवयवांची कार्यक्षमता कमी होऊ लागलेल्या एका पाच वर्षांच्यामुलावर पुण्यातील ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी’ नगररोड येथे यशस्वीपणे उपचार करण्यातआले. अगदी जिवावर बेतलेल्या दुखण्यातून हा मुलगा आता बरा झाला असून त्यालारुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अवघड आजारातुन त्याच्या प्रकृती ची उत्तम सुधारणा झाली.

सुरुवातीला १८ ऑगस्ट २०२४ रोजी चंदननगर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद शेलारयांनी मुलाला तपासले होते. त्यावेळी मुलाला खूप ताप येत होता; परंतु या मुलाला नंतरफिट्स येऊ लागल्या, त्यामुळे त्याला तातडीने नगररोड सह्याद्रि हॉस्पिटल्समॉमस्टोरी येथील पीआयसीयूमध्ये विशेष उपचार घेण्यासाठी हलविण्यात आले.

रुग्णालयात पोहोचल्यावर या मुलाला फिट्स येऊ लागल्या आणि डोळ्यांतील बाहुलीचे असमान प्रमाण झालेमेंदुचे प्रेशर वाढणे अशी मेंदूमध्ये गंभीर संसर्ग झाल्याची चिन्हेत्याच्यात दिसू लागली. आमच्या लक्षात आलेकी अस्थिर श्वासोच्छवास आणि सततफिट्स येणे यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याच्यावर तातडीने व्हेंटिलेटरद्वारेउपचार करणे आवश्यक होते. ईईजी मॉनिटरिंगमध्ये दिसून आले की मुलालासतत येत असलेल्या फिट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यकआहे. मात्र मेंदूमध्ये त्या सतत फिट दिसून आल्या. त्यामुळेया फिट्सवर आणि मेंदूच्या वाढलेल्या दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुलाला सततऔषधे देण्यास सुरुवात करण्यात आली. हळूहळू ईईजी नॉर्मल होऊ लागला. हे असेत्वरीत उपचार केले नसतेतर मेंदू ची कार्यक्षमता कमी होण्याचा गंभीर धोका होता,” असे ‘सह्याद्रिहॉस्पिटल्स मॉमस्टोरी’नगररोड चे ज्येष्ठ बालरोग अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. सागर लाड म्हणाले.

सुरुवातीला मुलाच्या वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचेआढळून आले होते. त्याचे यकृत निकामी होऊ लागले होते. चिकनगुनियाचा संसर्गअसलेल्या ३ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांमध्ये ही स्थिती उद्भवते. अशा वेळी यकृताच्यापुनरुज्जीवनासाठी तातडीच्या औषधांची आवश्यकता असते. त्याचबरोबर मुलाच्यारक्तातील प्लेटलेट्सची व पांढऱ्या रक्तपेशींची संख्या खूपच कमी झाली होती. त्यामुळेत्याच्यावरील उपचार जटिल झाले होते. त्याला रक्त आणि प्लेटलेट्स चढविण्यातआले. त्याचा रक्तदाब खूपच कमी झाला होता. तो सामान्य पातळीवर आणण्यासाठीऔषधे आवश्यक होती. ‘रिअल-टाइम पीसीआर’ चाचणी केल्यावर मुलालाचिकनगुनियाचा गंभीर संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. चाचण्या व उपचार चालूअसतानाच त्याची परिस्थिती आणखी बिघडली. त्याला ‘हिमोफॅगोसाइटिकलिम्फोहिस्टियोसाइटोसिस’ झाला. ही एक अशी दुर्मिळ आणि धोकादायक स्थितीअसतेज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच अवयवांना इजा करू लागते. या अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी‘इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन’ आणि स्टिरॉइड्स द्यावे लागतात,” असे स्पष्टीकरण डॉ. सागर लाड यांनी दिले.

सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी नगररोड येथील निओनॅटोलॉजी व पेडियाट्रिक्स या विभागाचे संचालक डॉ. प्रदीप सूर्यवंशी म्हणालेया मुलाच्या प्रकृतीवर सतत बारकाईने देखरेख ठेवत आणि विविध प्रकारचे उपचार करीत डॉक्टरांनी संसर्गाची गुंतागुंतहाताळली. मुलाचा मेंदू आणि इतर अवयवांवर त्यांनी विपरीत परिणाम होऊ दिले नाहीत. या मुलाच्या मेंदूच्या ‘एमआरआय’च्या स्कॅनमध्ये एन्सेफलायटीसची लक्षणे ठळकपणे आढळून आली. चिकुनगुनियामुळे उद्भवू शकणारी ही एक गंभीर व असामान्य स्थिती असते.

रुग्णालयात १४ दिवस उपचार घेतल्यावर मुलाच्या प्रकृतीत उल्लेखनीय प्रगती झाली .१० दिवसा नंतर व्हेंटिलेटरची आवश्यकता नाहीअसे ठरविण्यात आले.”त्याची प्रकृती चिंताजनक झाली होतीआता मात्र त्याच्या हालचाली व त्याचे विचार हे सुरळीत झाले आहेत. तो आता त्याच्या सभोवतालच्या जगाशी चांगला संवाद साधत आहे,” डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

दि. १ सप्टेंबर रोजी मुलाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर झाली असून त्याच्या न्यूरोलॉजिकल समस्या कमी झाल्या आहेत.

रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार डॉ प्रतीक कटारिया म्हणाले, “सह्याद्रितील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या अतीव काळजीबद्दल रुग्ण मुलाच्या कुटुंबियांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.”

‘सह्याद्रि’तील अनेक विभागांतील तज्ज्ञांनी एकत्रित प्रयत्न करून या मुलाला जीवनमिळवून दिले. या पथकामध्ये डॉ. प्रतिक कटारिया, डॉ. प्रीती लाड, डॉ. सुष्मितानिमगड्डा, डॉ. निकिता मानकर, डॉ. ऐश्वर्या दलाल, डॉ. प्रांजली फुलारी, डॉ. नेहाकुंटूरकर आणि डॉ. दिनेश ठाकरे, तसेच बाल यकृत तज्ज्ञ डॉ. स्नेहवर्धन पांडे आणिबालरक्तरोग तज्ञ डॉ. कन्नन यांचा समावेश होता.

चिकुनगुनिया हा लहान मुलांमध्ये फारसा गंभीर आजार मानला जात नाहीपरंतुपुण्यातील सध्याच्या परिस्थितीत आम्ही चिकुनगुनियाचा अत्यंत गुंतागुंतीचा संसर्गपाहत आहोत. विशेषत: लहान मुलांमध्ये मेंदूवर परिणाम होऊन फिट्स येणेशुद्ध हरपूलागणे आणि अगदी कोमामध्ये जाणे हेही आढळून येत आहे. लवकर निदान नझाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. बहुधा विषाणूंच्या विषाणूजन्य घटकातीलबदलामुळे हे झाले असावे,” असे डॉ. सागर लाड म्हणाले.

“भारतातील आरोग्यविषयक स्थिती (पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ) 2022-23” जारी

0


हे वार्षिक प्रकाशन हा एनएचएम मधील मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांबाबत अत्यावश्यक माहिती पुरवणारा महत्वपूर्ण दस्तावेज असून धोरण आखणी, प्रक्रिया सुधारणा आणि समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे : केंद्रीय आरोग्य सचिव

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2024

केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज नवी दिल्ली येथे “भारतातील आरोग्यविषयक स्थिती (पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ) 2022-23” जारी केले ,जे यापूर्वी “ग्रामीण आरोग्यविषयक  आकडेवारी” म्हणून ओळखले जाणारे वार्षिक प्रकाशन आहे. 1992 पासून ते प्रकाशित केले जात आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम ) विविध पैलूंवर विश्वासार्ह आणि खरी  माहिती देणारा हा दस्तावेज असल्याचे अधोरेखित करत  अपूर्व चंद्रा म्हणाले की, “हे वार्षिक प्रकाशन एनएचएम  मधील मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांबाबत  अत्यावश्यक  माहिती पुरवणारा महत्वपूर्ण  दस्तावेज  असून धोरण आखणी , प्रक्रिया सुधारणा आणि समस्या सोडवण्यासाठी  उपयुक्त आहे.

ते पुढे म्हणाले की हा दस्तावेज  मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि कमतरता यासंबंधी सर्व राज्यांमधील  विश्लेषण उपलब्ध करून देतो. राज्यांच्या गरजा, त्यांची  प्राधान्य क्षेत्र तसेच  धोरणे आणि लक्ष्यित मोहिमा आखण्यासाठी हा डेटा अत्यंत उपयुक्त आहे असे ते म्हणाले.ही आरोग्यविषयक आकडेवारी राज्यांच्या कामगिरीची विविध निकषांवर तुलना करण्यात मदत करते असे त्यांनी अधोरेखित केले.

आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) पोर्टलला प्रजनन  आणि बाल आरोग्य (RCH) तसेच  मंत्रालयाच्या इतर पोर्टल्सबरोबर  जोडण्याची गरज केंद्रीय आरोग्य सचिवांनी व्यक्त केली जेणेकरुन आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार कमी होईल आणि डेटा वेळेवर अपलोड होईल आणि त्याचे काळजीपूर्वक विश्लेषण देखील सुनिश्चित होईल.

पार्श्वभूमी

1992 पासून, या प्रकाशनाने आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाबाबत 31 मार्च पर्यंतची सविस्तर वार्षिक आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. ही आकडेवारी  आरोग्य क्षेत्रातील हितधारकांसाठी महत्त्वपूर्ण असून त्यांना  देशभरातील आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचे प्रभावी नियोजन, देखरेख आणि व्यवस्थापन करण्यास  मदत करते.

याची  रचना दोन भागात केली आहे:

भाग 1 मध्ये स्पष्टतेसाठी नकाशे आणि तक्ते यांसारख्या दृश्य  साधनांचा  वापर करून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील माहितीसह  भारताच्या आरोग्य सेवा व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली आहे.

भाग 2 नऊ विभागांमध्ये विभागलेला असून त्यात  आरोग्य सुविधा, मनुष्यबळ आणि लोकसंख्याशास्त्रीय निर्देशकांवरील सखोल डेटा उपलब्ध आहे.

प्रकाशनात समाविष्ट असलेली माहिती धोरणकर्ते, आरोग्य प्रशासक आणि नियोजकांना आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळाचे  वितरण आणि पर्याप्तता याचे मूल्यांकन करण्यास सक्षम बनवते.

एकूणच,आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा विकास सर्व लोकसंख्या गटांच्या विशिष्ट आवश्यकतांशी सुसंगत आहे याची खातरजमा करण्यासाठी हे प्रकाशन  एक आवश्यक संसाधन सामग्री असून  देशभरातील अधिक लवचिक आणि प्रतिसादात्मक  आरोग्य सेवा व्यवस्थेत मोठे  योगदान देते.

31 मार्च 2023 पर्यंत, देशात एकूण 1,69,615 उपकेंद्रे (SC), 31,882 प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), 6,359 सामुदायिक आरोग्य केंद्रे (CHC), 1,340 उपविभागीय आणि जिल्हा रुग्णालये (SDHs), 714 जिल्हा रुग्णालये (DHs), आणि 362 वैद्यकीय महाविद्यालये (MC) ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात आरोग्य सेवा प्रदान करत आहेत.

या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये 2,39,911 आरोग्य कर्मचारी (पुरुष + महिला) उपकेंद्रात, PHC मध्ये 40,583 डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात, 26,280 विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी सामुदायिक आरोग्य केंद्रात तर 45,027 डॉक्टर आणि विशेषज्ञ उपविभागीय किंवा जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 47,932 परिचारिका, सामुदायिक आरोग्य केंद्रात मध्ये 51,059 परिचारिक कर्मचारी तर उपविभागीय किंवा जिल्हा रुग्णालयात 1,35,793 चिकित्सा सहाय्यक कर्मचारी कार्यरत आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटवरील दस्तऐवज विभागांतर्गत “हेल्थ डायनॅमिक्स ऑफ इंडिया (पायाभूत सुविधा आणि मानव संसाधन) 2022-23” हा अहवाल पुढील लिंकचा वापर करून पाहता येईल : https://mohfw.gov.in/.

अहवालाच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये या बाबी समाविष्ट आहेत :

  1. तुलनात्मक विश्लेषण : हे प्रकाशन 2005 आणि 2023 या दोन वर्षातील  आरोग्य पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची तुलनात्मक माहिती प्रदान करते, आणि 2022 ते 2023 या काळातील प्रगती आणि तफावत अधोरेखित करते.
  2. जिल्हा-निहाय माहिती : उपकेंद्रे (SC), प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC), उप-जिल्हा रुग्णालये (SDHs), जिल्हा रुग्णालये (DHs) आणि वैद्यकीय महाविद्यालये यांच्यासह आरोग्य सुविधांचे जिल्हा-स्तरीय तपशील पुरवते.
  3. ग्रामीण, शहरी आणि आदिवासी क्षेत्र केंद्रित : ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा तपशील तसेच धोरण नियोजनासाठी लक्ष्यित अंतर्दृष्टी प्रदान करते.
  4. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वर्गीकरण: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वर्गीकरण लक्ष्यित उपचार प्रणालीत मदत करणाऱ्या मुख्य आरोग्य सेवा कामगिरी मूल्यांकनाच्या आधारे केले जाते.
  5. वापरकर्ता-अनुकूल ठळक मुद्दे : द्रुत संदर्भासाठी प्रमुख निष्कर्ष प्रारंभीच सारांशित केले आहेत.
  6. भागधारकांसाठी मार्गदर्शन : पायाभूत सुविधा आणि मानवी संसाधनांमधील अंतर आणि कमतरता ओळखून आरोग्यसेवा नियोजन आणि व्यवस्थापनासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून कार्य करते.

या कार्यक्रमाला आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालक (राष्ट्रीय आरोग्य मिशन) आराधना पटनायक तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोऱ्हाडे जागे व्हा … धुरीकरण मशीन घेऊन अमोल बालवडकर महापालिकेत

  • झोपेचे सोंग’ घेणाऱ्या प्रशासनाला केले जागे

-डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरिया प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी

पुणे- 9 सप्टेंबर:

पुणे शहरात डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरियाची साथ सुरू आहे. कोथरूड भागामध्ये या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पुणे पालिकेकडून या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य प्रकारे काळजी घेत घेतली जात नसल्यामुळे ‘झोपेचे सोंग’ घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर सोमवारी चक्क महापालिकेत धुरीकरण मशीन घेऊन आले. महापालिका परिसरात धुरीकरण करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आता तरी प्रशासन जागे होऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेईल अशा संतापजनक भावना अमोल बालवडकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

कोथरूड परिसरात डेंगू, मलेरिया, झिका,चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याभरापासून वाढला आहे. याबाबत पालिकेकडून योग्य उपाय योजना केल्या जात नसल्यामुळे सोमवार ( दि.9) महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोऱ्हाडे यांची अमोल बालवडकर यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी रुग्णांना आरोग्य सेवेमध्ये होत असलेल्या गैरसोयीबाबत चर्चा केली. त्यापूर्वी त्यांनी महापालिका परिसरात धुरीकरण करून पालिकेच्या निष्काळजी कारभाराचा निषेध देखील केला.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती घेतली जाते . मात्र त्यानंतर या आजारांना आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. यामुळे सोसायटी, बैठी घरे, गृहसंकुल यामध्ये या रोगांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तपासणी मोहीम करणे,नागरिकांना नोटिसा बजावणे. एवढेच सोपस्कार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पार पाडले जातात. मात्र त्यानंतर या नागरिकांना आरोग्य उपचार वेळेत मिळतात का ? याबद्दल कोणतीही उपाययोजना महापालिकेकडे नाही. कोथरूड, पाषाण,बाणेर या परिसरामध्ये घरटी एक रुग्ण आढळून येत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्येष्ठ रुग्ण, लहान मुले यांना हे आजार झाल्यामुळे कुटुंबांना दवाखान्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. मात्र वेळेत उपचार मिळत नाही. कोथरूड परिसरात पालिकेचे एकही रुग्णालय नसल्यामुळे येथे नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात, ज्याचा खर्च परवडण्यासारखा नाही. याबाबत वारंवार प्रशासनाला सांगून देखील बांधून पूर्ण असलेले पालिकेचे रुग्णालय अद्यापही सुरू करता आलेले नाही. प्रशासनाला ही विदारक परिस्थिती लक्षात आणून देण्यासाठी आज फॉगिंग मशीन घेऊन पालिका परिसराचे धुरीकरण केले. जेणेकरून नागरिकांच्या संतप्त भावना प्रशासनापर्यंत पोहोचतील असे अमोल बालवडकर म्हणाले यावेळी अमोल बालवडकर फाउंडेशनचे सदस्य तसेच कोथरूड परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोथरूड परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात डेंगू, मलेरिया ,झीका, चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक रुग्ण उपचार मिळत नसल्यामुळे तक्रारी करतात. यासाठी स्वखर्चाने गेल्या पंधरा दिवसापासून कोथरूड परिसरातील अनेक सोसायटी,बैठी घरे, व्यावसायिक आस्थापना यांच्या परिसरात धुरीकरण सुरू केले आहे. दिवसभरात अनेकांचे कॉल या धुरीकरणासाठी येतात. रुग्णांची संख्या, त्यांना मिळत नसलेले उपचार त्यामुळे होणारी नागरिकांची फरपट प्रशासनाने गांभीर्याने घेतली पाहिज

करीष्मा चौक ते पौड फाटा मद्यधुंद टेम्पो चालकाने अनेकांना उडविले: महिलेचा मृत्यू, पती गंभीर

पुणे-मद्यधुंद टेम्पो चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून 6 वाहनांना धडक दिली. एवढेच नाही तर दुचाकीवर वळण घेत असलेल्या एका दाम्पत्यालाही टेम्पो चालकाने जोरदार भीषण धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सहप्रवाशी महिलेचा मृत्यू झाला आहे.
गीतांजली श्रीकांत अमराळे (वय ३५, रा. शास्त्रीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत त्यांचे पती श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक आशिष अनंत पवार (वय २६, रा. गणपती माथा, वारजे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रोडवरील करिश्मा चौकाकडून पौड फाट्याकडे टेम्पो भरधाव वेगाने जात होता. त्याने करिश्मा चौकाजवळ एका वाहनाला धडक दिली. त्यावेळी तेथील बाल तरुण मंडळाची आरती सुरु होती. तेथे जमलेल्या लोकांंच्या शेजारुन तो टेम्पो तसाच भरधाव वेगाने पुढे निघून गेला. पुढे त्याने सिग्नलला रिक्षा, चारचाकी, दोन ते तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यामुळे काही जण जखमी झाले. त्याचवेळी पौड फाटा चौकात दुचाकीस्वार श्रीकांत अमराळे हे पौड रोड वरुन कर्वेरोडला वळत होते. त्यावेळी टेम्पो चालक आशिषने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. त्यामुळे श्रीकांत यांची पत्नी गीतांजली अमराळे गंभीर जखमी झाल्या.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील एरंडवणा मित्र मंडळ, बाल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळाचे कार्यकर्ते धावून आले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वी गीतांजली अमराळे यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. श्रीकांत अमराळे हे मनसेचे कार्यकर्ते असून शास्त्रीनगरमधील संगम मित्र मंडळाचे ते पदाधिकारीही आहेत. गौरीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी ते पत्नीबरोबर जात असताना अपघात झाला. त्यामुळे गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी

लोकशाही दिनामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

पुणे,दि.०९ :- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक व्हावी या हेतूने विविध पातळीवर लोकशाही दिन आयोजित करण्यात येऊन नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यात येतात. विभागीय लोकशाही दिनामधे दाखल प्रकरणांवर सुनावणी घेऊन दिलेल्या आदेशाचे प्रशासनाने काटेकोरपणे व त्वरित पालन करुन तक्रारी तातडीने सोडवाव्या अन्यथा त्याची गंभीर दखल घेण्यात येईल असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात विभागीय स्तरावरील लोकशाही दिनातील प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, नगर पालिका प्रशासन उपायुक्त पूनम मेहता, करमणूक कर उपायुक्त निलीमा धायगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक मुख्य अभियंता आर.वाय.पाटील यावेळी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या तीन प्रकरणांवर यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. अर्जदारांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या समस्यांसाठी नागरिकांना विभागीय लोकशाही दिनात यावे लागते हे योग्य नसून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि संबधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या तक्रारी सोडवाव्यात, असे डॉ.पुलकुंडवार यांनी सांगितले. जनतेच्या तक्रारी सोडवण्यामध्ये टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरुन प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सूचित केले. यावेळी विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

टेबल टेनिस स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल ला १३ पदके६ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदकांवर नावे कोरली

पुणे, 9 सप्टेंबरः बालेवाडी स्टेडियम येथे संपन्न झालेल्या जिल्हा परिषद मुळशी तालुका शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल ने ६ सुवर्ण, ४ रौप्य तर ३ कांस्य असे एकूण १३ पदके पटकावले. या स्कूलचा विजय त्यांच्या समर्पण, कौशल्य आणि चिकाटीला अधोरित करतो. या स्पर्धेतून शालेय स्तरावरील उत्कृष्ट प्रतिभांचा समावेश आहे. स्कूलचा सुवर्णपदकाचा प्रवास त्यांच्या लढती आणि चुरशीच्या स्पर्धेमुळे झाला. अपवादात्मक तंत्र आणि धोरणात्मक पराक्रमाचे प्रदर्शन करत स्कूल ने या स्पर्धेत उल्लेखनीय संयम आणि दृढनिश्चयाने नेव्हिगेट केले.
ही स्पर्धा १४ व १९ वर्षाखालील मुले व मुलींंमध्ये संपन्न झाली. यात १४ वर्षाखालील मुलींमध्ये मोली गुप्ता, मार्दवी अकीवटे, ध्रिती जैन यांनी सुवर्णपदक मिळविले. १४ वर्षाखालील मुलींच्या फायनलमध्ये धृती जैन ध्रुव ग्लोबल स्कूलची महत्वाची खेळाडू होती आणि तिने २ सामने जिंकले.
तसेच १९ वर्षाखालील मुलींमध्ये काव्या राठोड, निओराह माम, अवंती किर्लोस्कर यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. काव्या ही ध्रुव ग्लोबल स्कूलची स्टार खेळाडू होती. तीने एकेरी राऊड जिंकून अंडर १९ फायनलमध्ये विजय निश्चित केले. तीने प्रतिस्पर्धी ११—८, ९—११, ११—७ असा सहज पराभव केला. हिची कामगिरी काही कमी नव्हती. सुरूवातीपासूनच तिने चपळता, अचूकता आणि सामरिक बुद्धिमत्तेचे मिश्रण प्रदर्शित केले ज्यामुळे तिला तिच्या प्रतिस्पर्ध्यापासून वेगळे केले.
तसेच १९ वर्षा खालील मुलांमध्ये अथर्व माम, यश राठी, रिशीत खरे, अग्नीव घोशाल यांना रौप्य पदक मिळाले .१४ वर्षाखालील मुलांमध्ये रियांश अग्रवाल, अर्जुन जैन, स्वरूप घनवट यांना कांस्यपदक मिळाले.
त्यांच्या सादरीकरणाला उत्कृृष्ट दाद मिळाली. त्यांच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्यात.
प्रशिक्षक नचिकेत देशपांडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

सोन्यातील गुंतवणुकीचा वाटा पोर्टफोलिओच्या 10% वाढवता येऊ शकतो : एंजेल वन

मुंबई, 9th सप्टेंबर, 2024: 2024 मध्ये सोन्याचा पसंतीचा मालमत्ता वर्ग म्हणून चमकत राहील असे एंजेल वन लि.चे संशोधनात आढळले असून, त्यामुळे गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओमध्ये 10% गुंतवणूक सोन्यात वाढवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. फिनटेक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या एंजेल वनने मौल्यवान धातूवर एक विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देते, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात पसंतीचा भागीदार म्हणून त्याचे स्थान मजबूत होते.

एंजल वन लिमिटेडच्या नॉनएग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे उप उपाध्यक्ष – संशोधन प्रथमेश मल्ल्या म्हणाले की“आमच्या गुंतवणूकदारांना प्रगत संशोधन उपलब्ध करून देण्यास एंजेल वन वचनबद्ध आहे. त्याद्वारे त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेता येतात आणि पुढे राहता येते. सोन्याचे नेहमी आहे आपल्या भारतीय समाजाशी भावनिक नाते आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, महागाई आणि चलनातील चढउतार यावर सोने हा उत्तम हेजिंग उपाय आहे. आमचा ठाम विश्वास आहे की हा अभ्यास गुंतवणूकदारांना त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात, विशेषतः आर्थिक अनिश्चिततेच्या काळात एक साधन म्हणून मदत करेल.”

अभ्यासाचे काही अतिरिक्त निष्कर्ष जे सोन्यासाठी सुवर्ण युगाची पुष्टी करतात:

●        YTD 23 ऑगस्ट 2024 पर्यंत, स्पॉट गोल्डच्या किमती सुमारे 22 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि MCX गोल्ड फ्युचर्स सुमारे 14 टक्क्यांनी वाढले आहेत. 2024 मध्ये सोन्याच्या किमतीतील दुहेरी अंकातील वाढ हे स्पष्ट संकेत आहे की मालमत्ता वर्ग म्हणून मौल्यवान धातू जगभरातील गुंतवणूकदारांसाठी आवडीचा घटक आहे.

●        ऐतिहासिकदृष्ट्या, हे लक्षात आले आहे की केंद्रीय बँक पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून सोन्याचे वाटप करण्यामागील प्रमुख मार्गदर्शक तत्त्व सुरक्षा, तरलता आणि परतावा या तीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केले गेले आहे.

●        2000 च्या डेटा मालिकेनुसार यंदा 2024 च्या पहिल्या तिमाहीत जागतिक अधिकृत सोन्याचा साठा निव्वळ 290t ने वाढला, हे पहिल्या तिमाहीतील सर्वाधिक प्रमाण आहे. 2023 (286t) मध्ये सेट केलेल्या मागील Q1 रेकॉर्डपेक्षा यंदा 1% वाढ झाली आहे आणि पाच वर्षांच्या तिमाही सरासरी (171t) पेक्षा 69% जास्त साठा आहे. यावरून जागतिक मध्यवर्ती बँकांचे 2024 मध्ये सोन्याचे संचयन करण्यात आलेले आणि त्याचे स्वारस्य स्पष्टपणे दिसून येते.

●        ईटीएफ होल्डिंग्सच्या निव्वळ वाढीमध्ये दिसलेली गुंतवणूक मागणी हे देखील सूचित करते की महामारी नियंत्रणात असली तरीही सोने जास्त काळ चमकेल.

2024 मध्ये आधीच दुहेरी अंकी नफ्यामुळे, सोन्याच्या किमती आणखी वाढवणारी महत्त्वाची घटना अमेरिकेतील व्याजदर कपातीपासून सुरू होणारी घटना आणि अमेरिकेच्या निवडणूक निकालासह जपानमधील पुढील व्याजदरांच्या प्रक्षेपणाच्या संयोजनातून बाहेर येईल. एंजेल वन त्यांच्या क्लायंटसाठी संशोधनावर आधारित सल्ला देण्यात आघाडीवर आहे. एंजेल वन 2024 साठी सोन्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोन्याच्या किमतींचा तक्ता रचना सूचित करतो की, पुढे $2800/औंस पर्यंत किंमत जाईल. $2300/औंसच्या आसपासची किंमत असेल तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सोने घेण्यास उत्तम संधी आहे. MCX वरील किंमतीनुसार सुमारे रु.68000/10 gms वर किंमत असताना सोने खरेदी केले जाऊ शकते. 2024 च्या अखेरीस रु. 78000/10 gms पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. जागतिक आऊटपुट कमी होणे आणि अर्थव्यवस्था सर्वात अपेक्षेपेक्षा अधिक मंदीत असताना, मालमत्ता वर्ग म्हणून सोने हा जगभरातील गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षित पर्याय आहे.

मुथूट मायक्रोफिनचा जॉब फेअर देशभरात …

रोजगार आणि युवकांच्या कौशल्याला चालना देण्यासाठी 1500+ नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट

कोची, 09 सप्टेंबर, 2024: रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नात, मुथूट मायक्रोफिन (NSE: MUTHOOTMF BSE: 544055) ने 13 राज्यांमध्ये 29 ठिकाणी एक विशेष रोजगार मेळावा सुरू केला आहे. या आघाडीच्या मायक्रोफायनान्स कंपनीने बेरोजगारीचा दर कमी करून तसेच देशव्यापी आर्थिक विकासाला चालना देऊन स्थानिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून या उपक्रमाची घोषणा केली.

मुथूट मायक्रोफिनने बिहारउत्तर प्रदेशपंजाबहरियाणाकेरळमहाराष्ट्रओडिशा आणि राजस्थान यासह अनेक प्रमुख राज्यांमध्ये यशस्वीरित्या रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. इव्हेंटला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून रोजगाराच्या शोधात असलेल्या 3,000 हून अधिक तरुणांनी यात सहभाग घेतला. एकाच व्यासपीठावर त्यांना थेट कनेक्ट आणि संवाद साधण्यास सक्षम करण्यात आले.

या उपक्रमाद्वारे, रिलेशनशिप ऑफिसर, फील्ड ऑफिसर, ब्रँच रिलेशनशिप मॅनेजर आणि ब्रँच क्रेडिट मॅनेजर यासह ऑपरेशन्समधील विविध भूमिकांसाठी 1500+ व्यक्तींना नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे. या संधी नवीन पदवीधर, अनुभवी व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी खुल्या आहेत. निवडलेल्या उमेदवारांना त्याच दिवशी ऑफर लेटर्स प्राप्त होतील, ज्यायोगे औपचारिक कर्मचारी वर्गात ते लवकर समाविष्ट होतील.

मुथूट मायक्रोफिनचे सीईओ श्रीसदफ सईद म्हणाले, “आमचा जॉब फेअर म्हणजे केवळ भरती मोहीम नाहीतर ग्रामीण भारताला सक्षम बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा तो पुरावा आहेअर्थसंकल्प 2024-25 च्या ‘विकसित भारत’ उपक्रमांतर्गत प्राधान्यक्रमांशी सुसंगत आहेज्यात रोजगार आणि कौशल्यावर भर आहेमुथूट मायक्रोफिन नवीन प्रतिभा संपादन करण्यासाठी आणि औपचारिक रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांच्या पॅकेज योजनांचा लाभ घेतला जात आहेहा उपक्रम आम्हाला नवनवीन माणसांना संधी देण्यासत्यांना प्रोत्साहन देण्यासाठीऔपचारिक रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांच्या कौशल्याला समर्थन देण्यास मदत करतो.

आपल्या ध्येय पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करताना मुथूट मायक्रोफिन सप्टेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये जॉब फेअर आयोजित करणार आहे. तिरुपूर, पुदुक्कोट्टई, इरोड, मानापराई, तिरुवरूर, चेंगलपट्टू, तिरुनेलवेली, तिरुवन्नमलाई येथे 9 सप्टेंबरला सुरुवात होईल, त्यानंतर 10 सप्टेंबर 2024 रोजी अरियालूर, वडालूर, विरुधुनगर, नागरकोइल येथे त्याचे आयोजन करण्यात येईल.

मुथूट मायक्रोफिनने येत्या काही महिन्यांत त्यांच्या रोजगार उपक्रमांचा अतिरिक्त राज्यांमध्ये विस्तार करण्याची योजना आखली आहे, बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आपली वचनबद्धता त्यांनी आणखी मजबूत केली आहे. रोजगार, शिक्षण आणि आर्थिक सशक्तीकरण याद्वारे समुदायांचे उत्थान करण्यासाठी हा रोजगार मेळावा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

वीजबिल:अभय योजनेतून ४६.७३ लाख ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

जागेची मालकी बदलली तरी वीजबिल थकबाकी भरणे अनिवार्य

पुणे, दि. ०९ सप्टेंबर २०२४: जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य आहे. ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेली घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर जागा थकबाकीमुक्त करण्याची संधी महावितरण अभय योजना २०२४ मध्ये उपलब्ध झाली आहे. यात पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७४ वीजग्राहकांना फायदा होणार असून मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे एकूण ७३ कोटी १४ लाख रुपये माफ होणार आहे.

थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७३ अकृषक ग्राहकांकडे सद्यस्थितीत ४७२ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यातील मूळ थकबाकीपोटी ३९८ कोटी ९९ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याजाचे ६९ कोटी व विलंब आकाराचे ५ कोटी ५ लाख असे एकूण ७४ कोटी ५ लाख रुपये माफ होणार आहेत.

वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन मालक किंवा ताबेदार यांच्याकडून थकबाकीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेली जागा थकबाकीमुक्त करण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे.

मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळणार आहे. तर मूळ थकबाकीची ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा व्याजमुक्त हप्त्यांत भरण्याची सोय आहे. या योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. फ्रेंचायझीमधील ग्राहकांना सुद्धा लागू असलेल्या या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा.

महावितरण अभय योजनेचे ठळक मुद्दे –

» घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक जागेसाठी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची संधी व मागणीप्रमाणे त्वरित नवीन वीजजोडणी

» मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट

» मूळ थकबाकीची ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा व्याजमुक्त हप्त्यांत भरण्याची सोय.

» दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार वीजग्राहकांना संधी

» महावितरण अभय योजना दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याचा अंदाज

पुणे -(कोंढावळे फाटा, वेल्हे)
राज्यात सध्या राजकीय हवा बदलत आहे. सध्या महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचारामुळे जनता त्रासलेली असून, महिला अत्याचार, छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर मंत्र्यांनी केलेली विधाने पाहून जनता प्रचंड अस्वस्थ आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे बोलताना केला.

सुप्रिया सुळे भोर येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी आमदार संग्राम थाेपटे उपस्थित हाेते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, संघर्षाच्या काळात काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष या सर्व पक्षांचे कार्यकर्ते लाेकसभा निवडणुकीवेळी माझ्या पाठीशी उभी राहिले. बारामती लाेकसभा प्रचाराची खरी सुरुवात भाेर येथील विराट सभेने झाली. त्यानंतर आपली गाडी निरंतर धावत राहिली. त्यातून वेगळा आत्मविश्वास सर्वांना मिळाला. लाेकसभा निवडणुकीवेळी वेगळ्या प्रकारचा माेहाेल हाेता. आपल्यासाेबत जे उभे राहिले त्यांची कामे प्राधान्याने हाेतील.

या प्रकरणी एखाद्याने विराेध केला असेल तर त्यांचाही सन्मान केला जाईल. लोकसभेची काेणतीही कटुता मनात न ठेवता मी पुढील 5 वर्ष काम करत राहणार आहे. मला वर्षभरापूर्वी टीका झाल्यानंतर वाईट वाटत होते. पण आता निकालानंतर मला त्याचे काहीही वाटत नाही. कारण, आपल्यावर जेवढी टीका केली जाईल, तेवढेच जास्त मते आपल्याला मिळतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मतदार खूप हुशार असून ते बारकाईने सर्व कामावर लक्ष्य देत असतात. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक, साेसायटी, सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, आमदार, खासदार, बँक असे सर्व माझ्याविरोधात हाेते. परंतु तरी देखील आपण निवडून आलाे. याचा अर्थ ताकद पदात नसून ती राज्यातील, देशातील मायबाप जनतेच्या हातात आहे. ती ताकद पदामध्ये जनता देत असते. अनेकजण यंदा विधानसभेला इच्छुक आहे. त्यांना माझे सांगणे आहे की, नेत्यामागे पडण्यापेक्षा जनतेसाेबत राहा ते तुम्हाला साथ देतील.

महाविकास आघाडीच्यावतीने भाेरची जागा ही काँग्रेस पक्ष ज्याला तिकिट देईल त्याच्या पाठीशी आम्ही आहे. विधानसभा निवडणुकीस ६० दिवसच राहिले आहेत. ऑक्टाेबरमध्ये हरियाणा साेबत महाराष्ट्राचे निवडणूक हाेणे अपेक्षित हाेते. परंतु निवडणुक आयाेगास थाेडा वेळ हवा हाेता. त्यामुळे त्यांनी वेळ वाढवून घेतला. मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले की, ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवडयात आचारसंहिता लागू हाेईल व १० ते १२ नाेव्हेंबर दरम्यान निवडणूक पार पडेल. कार्यकर्त्यांनी वाडीववस्तीवर जाऊन पक्षाचा प्रचार करणे महत्वाचे आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात सध्या राजकीय हवा बदलत आहे. सध्या महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचारामुळे जनता त्रासलेली असून, महिला अत्याचार, छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर मंत्र्यांनी केलेली विधाने पाहून जनता प्रचंड अस्वस्थ आहे. सरकारला वाटते सर्व नाती पैशानी जाेडली जातात. हे ५० खाेके, एकदम ओके सरकार असल्यामुळे त्यांना व्यवसाय व नात्यातील अंतरच समजले नाही हे दुर्देव आहे. पैसे नात्यात नसतात तर व्यवहारात असते व नात्यात प्रेम असते ते व्यवहारात नसते. महिलांना पैसे वाटप करण्यापेक्षा महिला सुरक्षा करणे महत्वाचे आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.

ॲङ मेहमूद प्राचा यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला धारेवर धरले

वक्फ बोर्डाचे दुरुस्ती विधेयक रद्द करा- ऑल इंडिया औकाफ ट्रस्टीज असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत मागणी

पुणे :  मुस्लिमांनी देणगी म्हणून दिलेल्या संपत्ती किंवा मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याचे काम ट्रस्टी व त्यावर गिराणी त्या-त्या राज्यातील वक्फ बोर्ड करतात. बोर्डचे कामकाज संसदेने पारित केलेल्या वक्फ कायदा १९९५च्या तरतुदीनुसार केले जाते. परंतु, २०१४ नंतर आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने जे मुस्लिम विरोधी कायदे व निर्णय घेतले यास ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड यांच्या चुकीच्या धोरणामुळे हि परिस्थिती समाजावर ओढावली आलेली आहे. वक्फ संस्था तसेच अनेक कायदेशीर बाबींबाबत प्रसारमाध्यमांद्वारे हेतूपुरस्सर गैरसमज पसरवित आहे. वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकातून मुस्लिमांच्या हक्काच्या वक्फ बोर्डाच्या मालमत्ता केंद्र सरकार हडप करण्याचा डाव आखत आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाचे दुरुस्ती विधेयक रद्द करण्यात यावे, असा सूर ल इंडिया औकाफ ट्रस्टीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वक्फ दुरुस्ती विधेयकावर झालेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला.

ऑल इंडिया औकाफ ट्रस्टीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वक्फ(दुरुस्ती) विधेयक २०२४ यावर पुण्यात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे जनरल सेक्रेटरी हजरत मौलाना फजलूर-रहिम मुजद्दिदी, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, अॅड. मेहमूद प्राचा,   मो. खालीद खान, जॉईंट सेक्रेटरी राज्यसभा, मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन, , मौलाना रजिन अशरफी, सुफियान पठाण, महेबूब सय्यद, मुनिसा बुशरा आबेदी, नझीर भाई तांबोळी, ॲङ एम. एम. सय्यद, डॉ. राही काझी, ॲङ अयुब ईलाही बख्श, डॉ. अन्वर हुसेन, डॉ. अझीमोदिन, विठ्ठल पवारराजे, राजेंद्र गायकवाड, आदींनी मार्गदर्शन केले.

वक्फ बोर्डाचे कामकाज संसदेने पारित केलेल्या वक्फ कायदा १९९५ च्या तरतुदीनुसार केले जाते. वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकातून मुस्लिमांच्या हक्काच्या वक्फ बोर्डाच्या मालमत्ता केंद्र सरकार हडप करण्याचा डाव आखत आहे. त्यामुळे वक्फ दुरुस्ती विद्येयकातील तरतुदी रद्द करण्यात यावे, असा सूर ऑल इंडिया औकाफ ट्रस्टीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने झालेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला.

मो. खालीद खान म्हणाले, वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेले आहेत. अनेक जमिनी इनाम म्हणून दिल्या गेल्या आहेत, शेती काही ठिकाणी केली जाते याशिवाय अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. एक ठिकाणी सीईओ नाहीत यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे, ही नवीन बिलाने होणार नाही. नविन विधेयक नविन दुरुस्तीने वक्फ बोर्ड कमकुवत करणारे ठरेल, आणि वक्फ च्या संपत्तीची संख्या लाखोंवरून काही हजारत येईल.

बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, केंद्रातील सरकार दलित, आदिवासी आणि मुस्लिम  विरोधी धोरणे राबवत आहे. वक्फ विधेयक त्याचाच एक भाग आहे. काही मुस्लिमांना सुद्धा सक्षम वक्फ बोर्ड नको आहे त्याचा फायदा भाजप उचलत आहे. वक्फ बोर्ड सक्षम आणि स्वतंत्र पाहिजे. तसेच सरकार विरोधात तुम्हाला सर्वांची साथ हवी असेल तर स्थानिक लोकांमध्ये जा, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत चर्चा करा, आज कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे मात्र एकही वक्ता मराठीत बोलला नाही अशी खंत यांनी व्यक्त केली.  

अॅड. मेहमूद प्राचा म्हणाले, वक्फ बोर्डात काही ठिकाणी गैरकारंभार होत आहे हे आपण मान्य केले पाहिजे. भ्रष्ट लोकांना दूर करण्यासाठी आपण सरकारची मदत घेत असतो, मात्र याचा अर्थ संपूर्ण कार्यभार सरकारने हाती घ्यावा असे होत नाही. बोर्ड सक्षम करण्यासाठी काही बदल आवश्यक असले तरी त्या बद्दलच्या सूचना मुस्लिम समाजाकडून सरकारने घ्यायला पाहिजे. आता सरकार संसदीय समिती नेमण्यास तयार झाले असले तरी त्या समितीचा निर्णय सरकारवर बंधनकारक असणार नाही यामुळे सदरील समिती हा फक्त दिखावा आहे. याच बरोबर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड हाताळत असलेल्या,  तीन तलाक, केसेस व बाबींमध्ये चुकीचे धोरणामुळे आजतागायत मुस्लीम समाजाती फरफट झाली आहे व त्यांना जबाबदार ठरवले

दरम्यान, आपला देश हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. प्रत्येक मुस्लिम नागरिकाला स्वत:ची मिळकत, मालमत्ता, दान केल्यानंतर दान केलेल्या व्यक्तिच्या इच्छेप्रमाणे त्याचा उपयोग न होता तो इतराने बनवलेल्या कायद्याप्रमाणे त्या मालमत्तेचा उपभोग होणे म्हणजे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे हे बिल भारतीय संविधानाच्या कलमाला छेद करणारे आहे म्हणून केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक रद्द करावे. विधेयक रद्द केले नाही, तर मुस्लिम समाज देशभर आंदोलन उभारेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष – सुफियान पठाण, जन. सेक्रेटरी महेबूब सय्यद, वजीरभाई मुलाणी-सातारा, हाफीज सद्दाम-सांगली, जे.के. मिस्त्री-सोलापूर, मुफ्ती जलल मोमीन-पुणे, मुबारक शेख, शेख जफर-बीड, जलिलभाई शेख-पिं.चिं., अलताफभाई सय्यद, साबीर सय्यद, रफिक सय्यद, साबीर शेख-तोपखाना, जमीर मोमीन, सुलेमान सय्यद यांनी यशस्वीरित्य केले. 

ऋषीतुल्य व्यक्तींच्या सन्मानाद्वारे सकारात्मक उर्जेची निर्मिती : ॲड. सुधाकरराव आव्हाड

ऋषी पंचमीनिमित्त सन्मान सोहळा : युवकांचा कोथरूड-रत्न पुरस्काराने गौरव
प्राचीन ललित कला प्रबोधिनी, समस्त ब्राह्मण सेवा संस्थेचा उपक्रम

पुणे : असंतोष, नकारात्मक वातावरण, कलुषित झालेली समाजमने अशा परिस्थितीत ऋषीतुल्य व्यक्तींचा सन्मान आणि युवा पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी दिलेला पुरस्कार यातून सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे. हीच भारतीय संस्कृती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुधाकरराव आव्हाड यांनी केले.
प्राचीन ललित कला प्रबोधिनी, पुणे आणि समस्त ब्राह्मण सेवा संस्था, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषी पंचमीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसेच कोथरूड-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड. आव्हाड बोलत होते. कोथरूडमधील शिवतीर्थ गणेश मंदिराच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ अभिनेते, साहित्यिक श्रीराम रानडे, प्राचीन ललित कला प्रबोधिनीचे प्रा. जयराम जोशी, समस्त ब्राह्मण सेवा संस्थेचे अजित फुलंब्रीकर, प्रफुल्ल सुभेदार मंचावर होते.
ज्येष्ठ संत-चित्रकार बाळकृष्ण वाडेकर, आकाशवाणी कलावंत श्याम पोरे, ज्येष्ठ एकपात्री कलावंत, साहित्यिक विश्वास पटवर्धन, ज्येष्ठ वास्तुविशारद, लेखक विवेक सिन्नरकर, शास्त्रीय गायिका विदुषी किशोरी जानोरीकर यांचा ऋषी पंचमीनिमित्त सन्मान करण्यात आला. तर कला क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल डॉ. आशुतोष जातेगावकर (बासरी वादक) व अद्वैत अभ्यंकर (तबला वादक) तसेच यश वाटारकर (बुद्धिबळ पटू) यांचा कोथरूड रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.
श्रीराम रानडे म्हणाले, साहित्य, संगीत, कला क्षेत्रातील गुरुजनांचा सन्मान तसेच युवा कलावंत व खेळाडूंचा गौरव हा स्तुत्य उपक्रम आहे. अशा उपक्रमांतून भारतीय संस्कृती जपली जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना शशिकांत सुतार म्हणाले, कोथरूड परिसरात अनेक कर्तृत्ववान व मान्यवर व्यक्ती यांचे वास्तव्य असल्याने या उपनगराला वैभव प्राप्त झाले आहे. कोथरूडच्या विकासाला कोथरूडकर नागरिकांची साथ व आशीर्वाद लाभले आहेत.
सत्काराला उत्तर देताना विश्वास पटवर्धन म्हणाले, आपण केलेल्या कार्याचा गौरव झाल्याने नवे बळ, नवी उर्जा, उत्साह आणि उमेद वाढते. यातूनच आम्ही कलाकार नागरिकांना तणावमुक्त ठेवण्यासाठी प्रोत्साहित होतो.
डॉ. आशुतोष जातेगावकर म्हणाले, कोथरूडरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याने भविष्यातील जबाबदारीची जाणीव झाली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
प्रा. जयराम जोशी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचीन ललित कला प्रबोधिनीच्या महिला सदस्यांनी ईशस्तवन तर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदिश शिरापूरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. आशुतोष जातेगावकर यांचे बासरीवादन तर अद्वैत अभ्यंकर यांचे एकल तबलावादन झाले.

फोटो मध्ये : प्राचीन ललित कला प्रबोधिनी, पुणे आणि समस्त ब्राह्मण सेवा संस्था, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषी पंचमीनिमित्त ऋषीतुल्य व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. विवेक सिन्नरकर, श्याम पोरे, बाळकृष्ण वाडेकर, किशोरी जानोरीकर, विश्वास पटवर्धन यांच्यासमवेत मान्यवर.