मुंबई, 9th सप्टेंबर, 2024: 2024 मध्ये सोन्याचा पसंतीचा मालमत्ता वर्ग म्हणून चमकत राहील असे एंजेल वन लि.चे संशोधनात आढळले असून, त्यामुळे गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओमध्ये 10% गुंतवणूक सोन्यात वाढवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. फिनटेक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या एंजेल वनने मौल्यवान धातूवर एक विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देते, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात पसंतीचा भागीदार म्हणून त्याचे स्थान मजबूत होते.
एंजल वन लिमिटेडच्या नॉन–एग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे उप उपाध्यक्ष – संशोधन प्रथमेश मल्ल्या म्हणाले की, “आमच्या गुंतवणूकदारांना प्रगत संशोधन उपलब्ध करून देण्यास एंजेल वन वचनबद्ध आहे. त्याद्वारे त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेता येतात आणि पुढे राहता येते. सोन्याचे नेहमी आहे आपल्या भारतीय समाजाशी भावनिक नाते आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, महागाई आणि चलनातील चढउतार यावर सोने हा उत्तम हेजिंग उपाय आहे. आमचा ठाम विश्वास आहे की हा अभ्यास गुंतवणूकदारांना त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात, विशेषतः आर्थिक अनिश्चिततेच्या काळात एक साधन म्हणून मदत करेल.”
अभ्यासाचे काही अतिरिक्त निष्कर्ष जे सोन्यासाठी सुवर्ण युगाची पुष्टी करतात:
● YTD 23 ऑगस्ट 2024 पर्यंत, स्पॉट गोल्डच्या किमती सुमारे 22 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि MCX गोल्ड फ्युचर्स सुमारे 14 टक्क्यांनी वाढले आहेत. 2024 मध्ये सोन्याच्या किमतीतील दुहेरी अंकातील वाढ हे स्पष्ट संकेत आहे की मालमत्ता वर्ग म्हणून मौल्यवान धातू जगभरातील गुंतवणूकदारांसाठी आवडीचा घटक आहे.
● ऐतिहासिकदृष्ट्या, हे लक्षात आले आहे की केंद्रीय बँक पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून सोन्याचे वाटप करण्यामागील प्रमुख मार्गदर्शक तत्त्व सुरक्षा, तरलता आणि परतावा या तीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केले गेले आहे.
● 2000 च्या डेटा मालिकेनुसार यंदा 2024 च्या पहिल्या तिमाहीत जागतिक अधिकृत सोन्याचा साठा निव्वळ 290t ने वाढला, हे पहिल्या तिमाहीतील सर्वाधिक प्रमाण आहे. 2023 (286t) मध्ये सेट केलेल्या मागील Q1 रेकॉर्डपेक्षा यंदा 1% वाढ झाली आहे आणि पाच वर्षांच्या तिमाही सरासरी (171t) पेक्षा 69% जास्त साठा आहे. यावरून जागतिक मध्यवर्ती बँकांचे 2024 मध्ये सोन्याचे संचयन करण्यात आलेले आणि त्याचे स्वारस्य स्पष्टपणे दिसून येते.
● ईटीएफ होल्डिंग्सच्या निव्वळ वाढीमध्ये दिसलेली गुंतवणूक मागणी हे देखील सूचित करते की महामारी नियंत्रणात असली तरीही सोने जास्त काळ चमकेल.
2024 मध्ये आधीच दुहेरी अंकी नफ्यामुळे, सोन्याच्या किमती आणखी वाढवणारी महत्त्वाची घटना अमेरिकेतील व्याजदर कपातीपासून सुरू होणारी घटना आणि अमेरिकेच्या निवडणूक निकालासह जपानमधील पुढील व्याजदरांच्या प्रक्षेपणाच्या संयोजनातून बाहेर येईल. एंजेल वन त्यांच्या क्लायंटसाठी संशोधनावर आधारित सल्ला देण्यात आघाडीवर आहे. एंजेल वन 2024 साठी सोन्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोन्याच्या किमतींचा तक्ता रचना सूचित करतो की, पुढे $2800/औंस पर्यंत किंमत जाईल. $2300/औंसच्या आसपासची किंमत असेल तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सोने घेण्यास उत्तम संधी आहे. MCX वरील किंमतीनुसार सुमारे रु.68000/10 gms वर किंमत असताना सोने खरेदी केले जाऊ शकते. 2024 च्या अखेरीस रु. 78000/10 gms पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. जागतिक आऊटपुट कमी होणे आणि अर्थव्यवस्था सर्वात अपेक्षेपेक्षा अधिक मंदीत असताना, मालमत्ता वर्ग म्हणून सोने हा जगभरातील गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षित पर्याय आहे.