रोजगार आणि युवकांच्या कौशल्याला चालना देण्यासाठी 1500+ नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट
कोची, 09 सप्टेंबर, 2024: रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नात, मुथूट मायक्रोफिन (NSE: MUTHOOTMF BSE: 544055) ने 13 राज्यांमध्ये 29 ठिकाणी एक विशेष रोजगार मेळावा सुरू केला आहे. या आघाडीच्या मायक्रोफायनान्स कंपनीने बेरोजगारीचा दर कमी करून तसेच देशव्यापी आर्थिक विकासाला चालना देऊन स्थानिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून या उपक्रमाची घोषणा केली.
मुथूट मायक्रोफिनने बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान यासह अनेक प्रमुख राज्यांमध्ये यशस्वीरित्या रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. इव्हेंटला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून रोजगाराच्या शोधात असलेल्या 3,000 हून अधिक तरुणांनी यात सहभाग घेतला. एकाच व्यासपीठावर त्यांना थेट कनेक्ट आणि संवाद साधण्यास सक्षम करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे, रिलेशनशिप ऑफिसर, फील्ड ऑफिसर, ब्रँच रिलेशनशिप मॅनेजर आणि ब्रँच क्रेडिट मॅनेजर यासह ऑपरेशन्समधील विविध भूमिकांसाठी 1500+ व्यक्तींना नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे. या संधी नवीन पदवीधर, अनुभवी व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी खुल्या आहेत. निवडलेल्या उमेदवारांना त्याच दिवशी ऑफर लेटर्स प्राप्त होतील, ज्यायोगे औपचारिक कर्मचारी वर्गात ते लवकर समाविष्ट होतील.
मुथूट मायक्रोफिनचे सीईओ श्री. सदफ सईद म्हणाले, “आमचा जॉब फेअर म्हणजे केवळ भरती मोहीम नाही, तर ग्रामीण भारताला सक्षम बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा तो पुरावा आहे. अर्थसंकल्प 2024-25 च्या ‘विकसित भारत’ उपक्रमांतर्गत प्राधान्यक्रमांशी सुसंगत आहे, ज्यात रोजगार आणि कौशल्यावर भर आहे. मुथूट मायक्रोफिन नवीन प्रतिभा संपादन करण्यासाठी आणि औपचारिक रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांच्या पॅकेज योजनांचा लाभ घेतला जात आहे. हा उपक्रम आम्हाला नवनवीन माणसांना संधी देण्यास, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, औपचारिक रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांच्या कौशल्याला समर्थन देण्यास मदत करतो.”
आपल्या ध्येय पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करताना मुथूट मायक्रोफिन सप्टेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये जॉब फेअर आयोजित करणार आहे. तिरुपूर, पुदुक्कोट्टई, इरोड, मानापराई, तिरुवरूर, चेंगलपट्टू, तिरुनेलवेली, तिरुवन्नमलाई येथे 9 सप्टेंबरला सुरुवात होईल, त्यानंतर 10 सप्टेंबर 2024 रोजी अरियालूर, वडालूर, विरुधुनगर, नागरकोइल येथे त्याचे आयोजन करण्यात येईल.
मुथूट मायक्रोफिनने येत्या काही महिन्यांत त्यांच्या रोजगार उपक्रमांचा अतिरिक्त राज्यांमध्ये विस्तार करण्याची योजना आखली आहे, बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आपली वचनबद्धता त्यांनी आणखी मजबूत केली आहे. रोजगार, शिक्षण आणि आर्थिक सशक्तीकरण याद्वारे समुदायांचे उत्थान करण्यासाठी हा रोजगार मेळावा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.