जीवघेणा मेंदू संसर्ग आणि अवयवांची कार्यक्षमता कमी झाली पण या लहान मुलानेमिळवला अद्भूत विजय
पुणे, ९ सप्टेंबर, २०२४ — चिकनगुनियाच्या गंभीर मेंदू संसर्गामुळे (एन्सेफलायटीस )झालेल्या आणि त्यातून अनेक अवयवांची कार्यक्षमता कमी होऊ लागलेल्या एका पाच वर्षांच्यामुलावर पुण्यातील ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी’ नगररोड येथे यशस्वीपणे उपचार करण्यातआले. अगदी जिवावर बेतलेल्या दुखण्यातून हा मुलगा आता बरा झाला असून त्यालारुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अवघड आजारातुन त्याच्या प्रकृती ची उत्तम सुधारणा झाली.
सुरुवातीला १८ ऑगस्ट २०२४ रोजी चंदननगर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद शेलारयांनी मुलाला तपासले होते. त्यावेळी मुलाला खूप ताप येत होता; परंतु या मुलाला नंतरफिट्स येऊ लागल्या, त्यामुळे त्याला तातडीने नगररोड सह्याद्रि हॉस्पिटल्समॉमस्टोरी येथील पीआयसीयूमध्ये विशेष उपचार घेण्यासाठी हलविण्यात आले.
“रुग्णालयात पोहोचल्यावर या मुलाला फिट्स येऊ लागल्या आणि डोळ्यांतील बाहुलीचे असमान प्रमाण झाले, मेंदुचे प्रेशर वाढणे अशी मेंदूमध्ये गंभीर संसर्ग झाल्याची चिन्हेत्याच्यात दिसू लागली. आमच्या लक्षात आले, की अस्थिर श्वासोच्छवास आणि सततफिट्स येणे यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याच्यावर तातडीने व्हेंटिलेटरद्वारेउपचार करणे आवश्यक होते. ईईजी मॉनिटरिंगमध्ये दिसून आले की मुलालासतत येत असलेल्या फिट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यकआहे. मात्र मेंदूमध्ये त्या सतत फिट दिसून आल्या. त्यामुळेया फिट्सवर आणि मेंदूच्या वाढलेल्या दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुलाला सततऔषधे देण्यास सुरुवात करण्यात आली. हळूहळू ईईजी नॉर्मल होऊ लागला. हे असेत्वरीत उपचार केले नसते, तर मेंदू ची कार्यक्षमता कमी होण्याचा गंभीर धोका होता,” असे ‘सह्याद्रिहॉस्पिटल्स मॉमस्टोरी’नगररोड चे ज्येष्ठ बालरोग अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. सागर लाड म्हणाले.
“सुरुवातीला मुलाच्या वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचेआढळून आले होते. त्याचे यकृत निकामी होऊ लागले होते. चिकनगुनियाचा संसर्गअसलेल्या ३ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांमध्ये ही स्थिती उद्भवते. अशा वेळी यकृताच्यापुनरुज्जीवनासाठी तातडीच्या औषधांची आवश्यकता असते. त्याचबरोबर मुलाच्यारक्तातील प्लेटलेट्सची व पांढऱ्या रक्तपेशींची संख्या खूपच कमी झाली होती. त्यामुळेत्याच्यावरील उपचार जटिल झाले होते. त्याला रक्त आणि प्लेटलेट्स चढविण्यातआले. त्याचा रक्तदाब खूपच कमी झाला होता. तो सामान्य पातळीवर आणण्यासाठीऔषधे आवश्यक होती. ‘रिअल-टाइम पीसीआर’ चाचणी केल्यावर मुलालाचिकनगुनियाचा गंभीर संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. चाचण्या व उपचार चालूअसतानाच त्याची परिस्थिती आणखी बिघडली. त्याला ‘हिमोफॅगोसाइटिकलिम्फोहिस्टियोसाइटोसिस’ झाला. ही एक अशी दुर्मिळ आणि धोकादायक स्थितीअसते, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच अवयवांना इजा करू लागते. या अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी‘इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन’ आणि स्टिरॉइड्स द्यावे लागतात,” असे स्पष्टीकरण डॉ. सागर लाड यांनी दिले.
सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी नगररोड येथील निओनॅटोलॉजी व पेडियाट्रिक्स या विभागाचे संचालक डॉ. प्रदीप सूर्यवंशी म्हणाले, “या मुलाच्या प्रकृतीवर सतत बारकाईने देखरेख ठेवत आणि विविध प्रकारचे उपचार करीत डॉक्टरांनी संसर्गाची गुंतागुंतहाताळली. मुलाचा मेंदू आणि इतर अवयवांवर त्यांनी विपरीत परिणाम होऊ दिले नाहीत. या मुलाच्या मेंदूच्या ‘एमआरआय’च्या स्कॅनमध्ये एन्सेफलायटीसची लक्षणे ठळकपणे आढळून आली. चिकुनगुनियामुळे उद्भवू शकणारी ही एक गंभीर व असामान्य स्थिती असते.”
“रुग्णालयात १४ दिवस उपचार घेतल्यावर मुलाच्या प्रकृतीत उल्लेखनीय प्रगती झाली .१० दिवसा नंतर व्हेंटिलेटरची आवश्यकता नाही, असे ठरविण्यात आले.”त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती, आता मात्र त्याच्या हालचाली व त्याचे विचार हे सुरळीत झाले आहेत. तो आता त्याच्या सभोवतालच्या जगाशी चांगला संवाद साधत आहे,” डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
दि. १ सप्टेंबर रोजी मुलाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर झाली असून त्याच्या न्यूरोलॉजिकल समस्या कमी झाल्या आहेत.
रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार डॉ प्रतीक कटारिया म्हणाले, “सह्याद्रितील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या अतीव काळजीबद्दल रुग्ण मुलाच्या कुटुंबियांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.”
‘सह्याद्रि’तील अनेक विभागांतील तज्ज्ञांनी एकत्रित प्रयत्न करून या मुलाला जीवनमिळवून दिले. या पथकामध्ये डॉ. प्रतिक कटारिया, डॉ. प्रीती लाड, डॉ. सुष्मितानिमगड्डा, डॉ. निकिता मानकर, डॉ. ऐश्वर्या दलाल, डॉ. प्रांजली फुलारी, डॉ. नेहाकुंटूरकर आणि डॉ. दिनेश ठाकरे, तसेच बाल यकृत तज्ज्ञ डॉ. स्नेहवर्धन पांडे आणिबालरक्तरोग तज्ञ डॉ. कन्नन यांचा समावेश होता.
“चिकुनगुनिया हा लहान मुलांमध्ये फारसा गंभीर आजार मानला जात नाही; परंतुपुण्यातील सध्याच्या परिस्थितीत आम्ही चिकुनगुनियाचा अत्यंत गुंतागुंतीचा संसर्गपाहत आहोत. विशेषत: लहान मुलांमध्ये मेंदूवर परिणाम होऊन फिट्स येणे, शुद्ध हरपूलागणे आणि अगदी कोमामध्ये जाणे हेही आढळून येत आहे. लवकर निदान नझाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. बहुधा विषाणूंच्या विषाणूजन्य घटकातीलबदलामुळे हे झाले असावे,” असे डॉ. सागर लाड म्हणाले.