Home Blog Page 707

जमात-ए-इस्लामी हिंद (JIH) महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू


पुणे : जमात-ए-इस्लामी हिंद (JIH) महिला विभाग, पुणेतर्फे ‘नैतिकता म्हणजे स्वातंत्र्यता’ ही एक महिन्याची राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे. पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जमात-ए-इस्लामी हिंद पुणे महिला विभागाच्या शहरप्रमुख असिया शेख म्हणाल्या, “या मोहिमेचे उद्दिष्ट लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना खऱ्या स्वातंत्र्याबद्दल माहिती देणे, तसेच ते नैतिकतेशी कसे जोडलेले आहे हे समजावून सांगणे, हे आहे.”

देशातील महिलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या घटनांबद्दल खेद व्यक्त करताना शेख म्हणाल्या, “समाजात हा गैरसमज आहे की नैतिकतेमुळे स्वातंत्र्यावर गदा येते. प्रत्यक्षात, याचे उलट आहे. जेव्हा आपण काही नैतिक नियमांचे पालन करु, आपले नैतिक चारित्र्य विकसित करु, तेव्हा आपल्या महिला सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता व आत्मविश्वास अनुभवतील. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचे मुख्य कारण म्हणजे नैतिक मुल्यांची घट. कोलकात्यातील आर.जी. कार रुग्णालयात एका महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि खून, बिहारच्या गोपालपुर येथील १४ वर्षीय दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार आणि खून, उत्तराखंडच्या उधमसिंह नगर येथे एका मुस्लिम नर्सवर बलात्कार आणि हत्या, आणि महाराष्ट्रातील बदलापूर शाळेतील दोन किंडरगार्डन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी हे सिद्ध केले आहे की देशात महिलांप्रती असलेल्या मानसिकतेवर आणि वर्तनावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.”

JIH पुणे महिला विभागाच्या PR सचिव आयेशा वसीम म्हणाल्या, “महिलांवरील हिंसाचाराची मानसिकता साथीच्या रोगासारखी पसरली आहे, ज्यामुळे आपल्या देशाचा नैतिक पायाच उद्ध्वस्त होत आहे. या समस्येचे मुळ कारण म्हणजे अमर्यादित स्वातंत्र्याच्या नावाखाली नैतिक मुल्यांचे पतन होय. समाजातील नैतिक मुल्यांचा अभाव, महिलांकडे भोगवस्तू म्हणून पाहणे, लैंगिक शोषण, अश्लीलता, विवाहबाह्य संबंध, मद्यपान व अमली पदार्थांचा वाढता वापर, यामुळे महिलांचा छळ आणि शोषण होते. तसेच, लैंगिक रोगांचा प्रसार, गर्भपात, लैंगिक हिंसा आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांसह, कमकुवत कौटुंबिक व्यवस्था, वाढती अश्लीलता आणि माणसाचे नैतिक अधःपतन, हे सर्व समाजाचा मुलभूत पायाच उद्ध्वस्त करत आहेत.”

JIH पुणे महिला विभागाच्या मिडिया सचिव मिनाज शेख यांनी सांगितले की, “राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) आणि राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) च्या आकडेवारीनुसार महिलांवरील गुन्ह्यांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. या अहवालांमध्ये केवळ नोंदवलेल्या घटनांचा समावेश आहे; बिना नोंद घटना किती हे कोणालाच माहित नाही. महिलांना न्याय मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो? या मोहिमेचा उद्देश, लोकांना हा संदेश देणे आहे की महिलांना सर्व प्रकारच्या शोषण व गुन्ह्यांपासून सुरक्षा मिळवून देणे, म्हणजेच खरे स्वातंत्र्य  हे केवळ नैतिक आणि न्यायपूर्ण समाज निर्माण केल्यानेच मिळू शकते, जिथे जात, पंथ, रंग, लिंग, धर्म किंवा प्रदेशाच्या आधारावर कोणताही भेदभाव होत नाही.”

‘नैतिकता हेच स्वातंत्र्य’ या मोहिमेबद्दल माहिती देताना, नाजिमा शेख म्हणाल्या, “या मोहिमेदरम्यान, शिक्षक, समुपदेशक, वकील, धार्मिक विद्वान, नेते आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्याने राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि स्थानिक स्तरांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. खरे स्वातंत्र्य आणि नैतिक मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना आणि तरुणांना करून देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील. नैतिक मूल्ये सार्वजनिक चर्चेत आणण्यासाठी विविध धर्मांच्या विद्वानांना सामील करून विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.” पत्रकार परिषदेला कोंढवा युनिट प्रमुख स्वालेहा शेरकर उपस्थित होत्या.

मातोश्री फाउंडेशन संस्थेच्या शैक्षणिक इमारतीचे भव्य भूमीपूजन समारंभ !

पुणे-मातोश्री फाउंडेशन , महम्मवाडी रोड, हडपसर , पुणे येथे दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी शैक्षणिक इमारतीच्या भूमीपूजनाचा समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले तसेच महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे , भवन विभागाचे युवराज देशमुख दक्षता विभागाचे दिनेश गिरोला तसेच उद्योगपती जयंत येरावडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत असताना विद्यार्थ्यांच्या मानवी भागांक, बुद्ध्यांक व भावनिकता या निकषावर आधारित “मातोश्री फाउंडेशनच्या “अंतर्गत ज्ञान दानाचे मार्गदर्शन केले जाते. असे मत त्यांनी मांडले. तसेच
शैक्षणिक इमारतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासास मदत होईल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमप्रसंगी मातोश्री फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल ससाणे, सचिव डॉ. अपर्णा ससाणे व संस्थेचे, विश्वस्त निवृत्ती पिंगळे व शितल टिळेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नगरसेवक मा.श्री.योगेश ससाणे यांनी भूषविले. त्याचबरोबर ससाणे एज्युकेशन संस्थेचे चेअरमन मा. श्री. निलेश ससाणे, व
सन्मित्र सहकारी बँकेचे संचालक तुकाराम ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल सोनवणे आणि राजश्री चौधरी यांनी केले. शाळा समन्वयक आफरीन सय्यद , अंबिका डोमगांवकर यांचे सहकार्य लाभले. इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा चव्हाण यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार पित्याला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा

– दुर्मिळ प्रकरणात न्यायालयाने सुनावली जामीनदारालाच शिक्षा
 – गुंतवणूक साठी दिलेले पाच लाख परत न केल्याने ठोठावला कारावास व दंड

पुणे : गुंतवणुकीतून परतावा मिळावा यासाठी दिलेले पाच लाख रुपये तीन महिन्याच्या मुदतीनंतर परत दिले नाहीत. तसेच त्या पैशाला तारण म्हणून जामीनदाराने दिलेले चेकही बाऊन्स झाले. या प्रकरणात न्यायालयाने मुलाच्या पैशासाठी जामीनदार राहिलेल्या पित्याला 5 लाखाला अठरा टक्के व्याजदराने महिन्याच्या आत 10 लाख भरपाई सह एक वर्षाचा कारावास सुनावला आहे. पैसे वेळेत न दिल्यास आणखी तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आर्थिक गैरव्यवाहार प्रकरणात न्यायालयाने आरोपीबरोबरच जामीनदाराला तितकेच जबाबदार धरत ही दुर्मिळ मात्र महत्वाची शिक्षा सुनावली आहे.

 याप्रकरणी ऍड. निखिल मलाणी यांनी विधीज्ञ नागेश आर. रणदिवे यांच्यामार्फत आरोपी रामदास बाजीराव पासलकर व त्याचा मुलगा अभिजित रामदास पासलकर (रा. विजय पार्क, सिमसागर सोसायटी, सुखसागर नगर, कात्रज) या दोघा बापलेकांविरुद्ध न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयात अपील केले होते.

ऍड. निखिल आणि आरोपी अभिजित यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अभिजित हा गुंतवणूक सल्लागार आहे. त्याने फिर्यादी निखिल यांना महिन्याला ६.५ टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवत त्यांच्याकडून 2019 मध्ये पाच लाख घेतले होते. तसेच ही रक्कम तीन महिन्यात परत देण्याचे मान्य केले. याबाबत फिर्यादी यांनी त्यांच्यासोबत समझोता करारनामा केला होता. त्यामध्ये पैशाला जामीनदार आरोपी अभिजित याचे वडील रामदास हे होते. काही महिने त्याने परतावा दिला आणि नंतर दिला नाही. वर्षभरानंतर पाच लाखही दिले नाहीत.

   यावेळी फिर्यादि यांना अभिजित आणि त्याचे वडील रामदास पासलकर यांनी दिलेले चेक बाऊन्स झाले. फिर्यादी यांनी त्याचे सर्व रेकॉर्ड तयार केले. याप्रकरणी निखिल यांनी दोघा बापलेकाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात फिर्यादी यांनी सर्व कागदपत्रे सादर केली. न्यायालयाने सर्व बाबी विचारात घेता तसेच अभिलेखावर दाखल केलेली कागदपत्रे, अभिलेखावर आलेला पुरावा, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद विचारात घेता न्यायालयाने जामीनदार यांचा चेक बाऊन्स झाल्याने आदेश पारित केला आहे.

आरोपी रामदास बाजीराव पासलकर यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २५५ (२) नुसार गुन्हा कलम १३८ पराक्रम्य संलेख अधिनियम, १८८१ नुसार दोषी मिळून आल्याने त्यांना एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीचा जामीन जप्त करण्यात येत आहे. आरोपीने फिर्यादीला फौजदारी प्रक्रिया सहिंता, १९७३ चे कलम ३५७ (३) नुसार नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये आजपासून एक महिन्यात द्यावी. आरोपीने नुकसान भरपाई देण्यास कसूर केल्यास त्याला आणखीन तीन महिन्याचा साधा कारावयास देण्यात येत आहे असा आदेश दिला.

 नुकसान भरपाईची रक्कम आरोपीने न्यायालयात जमा केल्यास अपीलाचा कालावधी संपल्यानंतर ही रक्कम फिर्यादीला देण्यात यावी. तसेच अपील दाखल झाल्यास अपीलाचा निकाल लागेपर्यंत रक्कम फिर्यादीला देण्यात येवू नये. अपील दाखल न झाल्यास फिर्यादीने दाखल केलेली सर्व मूळ कागदपत्र अपील मुदतीनंतर फिर्यादीला परत देण्यात यावीअसेही म्हटले आहे.

 आरोपीला कलम ४२८ फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार आरोपीस जर चौकशी किंवा चाचणी या दरम्यान तुरुंगात असेल तर तेवढे दिवस शिक्षेतून वगळण्यात यावे, असे आदेश प्रथमवर्ग सह न्यायदंडाधिकारी, डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांनी दिले.

जामीनदारावरही तितकीच जबाबदारीआपल्याकडे पैसे बुडवणाऱ्या विरोधात शिक्षा झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र हे उदाहरण मध्ये जामीनदारही त्या पैशाला तितकाच जबाबदार असल्याचे धरत शिक्षा सूनवल्याने इतरांपेक्षा वेगळे ठरले आहे. त्यामुळे कोणालाही जामीनदार होताना नागरिकांनी मूळ व्यक्तीबरोबच त्याचीही तितकीच जबाबदारी असल्याचे न्यायालयाने या निकालाद्वारे स्पष्ट केले आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन..

महाराष्ट्र पर्यटन विकास महामडळ दरवर्षीप्रमाणे 27 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिन 2024 साजरा करत असुन युनायटेड नेशन टुरिझम (UN TOURISM) यांचेव्दारे सन 2024 करीता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Theme) “Tourism & Peace ” हे घोषित करण्यात आले आहे.
यावर्षी जॉर्जियाची राजधानी तीबीलीसी येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल. जो विकासाचा महत्वाचा आधारस्तंभ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या घोषवाक्यानुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. सदर जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याव्दारे विविध उपक्रमांतुन साजरा केला जातो.
मा. व्यवस्थापकिय संचालक श्री. मनोजकुमार सुर्यवंशी सर यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या परिचलन करीत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, कलाग्राम इ. ठिकाणी दि. 27 सप्टेंबर 2024 रोजीच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत “पर्यटन दिन” साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यटन दिनी एमटीडीसी प्रादेशिक कार्यालयामार्फंत प्रादेशिक व्यवस्थापकांनी जिल्हयाच्या मा. पालकमंत्री, मा. विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी यांना तसेच नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना उदा. टुर ऑपरेटर्स, सहल आयोजक, टुर्स असोसिएटस, हॉटेलियर्स, निवास न्याहरी इ. लोकांना निमंत्रित करुन परिसंवादाचे आयोजन सकाळी 10.00 ते दुपारी 1.30 पर्यंत करण्यात येणार आहे. परिसंवादामध्ये यावर्षीच्या घोषवाक्यप्रमाणे (Tourism & Peace) कार्यक्रमाची रुपरेखा आखण्यात आली आहे. यासाठी पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, पर्यटन उद्योजक, विद्यार्थी इ. यांना निमंत्रित करण्यात यावे. विभागातील महाविद्यालयांमध्ये Tourism & Peace या विषयावर प्रादेशिक व्यवस्थापक अथवा तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान ठेवण्यात येणार आहे. याबाबत महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल सर मार्गदर्शन करीत आहेत.
“Tourism & Peace” या घोषवाक्याशी अधीन राहुन प्रत्येक प्रादेशिक विभागातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सहभागी करुन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणारआहे. या स्पर्धेसाठी पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश, माझ्या स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन : शांततेचे दुत आणि प्रतिक हे विषय निश्चित करण्यात आलेले आहेत.
निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार येणार असुन मोठया प्रमाणावर पारितोषिके देण्यात येणार आहेत. पारितोषिकांचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
अनु. क्र. पारितोषिक पारितोषिकाचे स्वरुप

1प्रथम पारितोषिक पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 2 रात्री व 3 दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह.
(संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितीतील पर्यटक निवासांत)

2व्दित्तीय पारितोषिक पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 1 रात्र 2 दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह
(संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितीतील पर्यटक निवासांत)

3तृतीय पारितोषिक जवळच्या पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 1 दिवस राहण्याची व्यवस्था + दुपारचे जेवण + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्या साधुन आपण “Tourism & Peace” या घोषवाक्याशी अधीन राहुन विभागातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठीही सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येणार असुन पहील्या 3 क्रमांकांना उपरोक्त प्रमाणे पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीच्या पर्यटक निवासांच्या माहितीपत्रकांचे विमोचन :
महामंडळाने नुकतेच छापलेले, आपल्या अखत्यारीतील येणाऱ्या पर्यटक निवासांच्या माहितीपत्रकांचे / प्रसिध्दीपत्रकांचे विमोचन प्रादेशिक स्तरावर परिसंवादामध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे..
या निमित्ताने सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटक निवास / उपहारगृह, कलाग्राम, बोट क्लब्स, कलाग्राम इ. यांच्या प्रवेशव्दारावर जागतिक पर्यटन दिनाचा इको फ्रेंडली Banner लावण्यात येणार असुन महामंडळाच्या व्यवस्थापकांव्दारे या दिवशी पर्यटक निवासात वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांचे पुष्प देऊन जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देत स्वागत करण्यात येणार आहे. पर्यटक निसासामध्ये सदर दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपारिक खेळांचे आयोजन आलेले आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधन सर्व उपहारगृहांमध्ये त्या त्या विभागातील स्थानिक विशेष पदार्थं तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटक निसावांत वास्तव्यास आलेल्या पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालण्यात येणार असुन अतिथी पर्यटकांना निवासासभोवताली असलेल्या नजीकच्या सुरक्षित पर्यावरणपुरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नेचार Walk इ. चा मनमुराद आस्वाद देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. “जागतिक पर्यटन दिन” हा पर्यटनाशी पुरेपुर निगडीत राहील व नियोजित उपक्रमांव्दारे पर्यटनवाढ वृध्दिंगत होवुन राष्ट्रास व राज्यास नक्कीच हातभार लागेल, या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे.
कोसळणारा पाऊस, आल्हाददायक कानात शिळ घालणारा वारा आणि दाट धुक्याच्या दुलईमध्ये चिंब भिजत निसर्गाचा आनंद घेण्याचे हे गुलाबी क्षण यादगार करण्यासाठी पर्यटकांची चढाओढ सुरु आहे. आपणही या अनोख्या वातावरणामध्ये वर्षा पर्यटनाचा, धुक्याच्या आणि उबदार थंडीच्या साथीने आनंद घ्यावा, आणि महामंडळाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयेजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेवुन पर्यटनाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी केले आहे.

श्री. दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ…

आळंदी नगरपरिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामास अधिकचा निधी दिला जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आळंदी परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुणे, दि. १२: आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ४ च्या नवीन इमारतीच्या बांधकामाला अधिकचा निधी दिला जाईल, असे सांगून अधिकच्या निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

शाळा क्रमांक ४ च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी श्री. पवार बोलत होते. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, शिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नगरपरिषद शाळा क्रमांक ४ येथील मनुष्यबळाची कमतरता अन्य ठिकाणच्या जास्तीच्या पदातून भरून काढली जाईल. या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे सांगून नवीन इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

ते पुढे म्हणाले, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांचे विचार सर्व जाती धर्माला, वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाणारे आहेत. जिल्ह्यात अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक आणि स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची सर्वांनीच दक्षता घ्यावी.

शासनातर्फे गोरगरीब वर्गासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली असून राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यासारख्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील कर्करोग जनजागृती कार्यक्रम समारंभ प्रसंगी बोलताना श्री. पवार म्हणाले या रुग्णालयामार्फत आळंदी शहरात कर्करोग जनजागृती आणि सर्वेक्षण अतिशय चांगल्या प्रकारे राबविले जात आहे. शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबविली जात असून समाजातील गोर गरीब रुग्णांवर या हॉस्पिटल मध्ये उपचार केले जातात. या रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० कोटी रुपयांची मदत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय देशमुख, विश्वस्त मुकुंद देशपांडे आदी उपस्थित होते.

विविध विकास कामांचे भूमिपूजन
श्री. पवार यांच्या हस्ते आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक ४ इमारत बांधकाम, आळंदी मरकळ रस्त्याचे भूमिपूजन, इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच चाकण येथील उप जिल्हा रुग्णालय आणि अधिकारी कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन करण्यात आले.

जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती

पुणे –
भारतातील प्रसिध्द आध्यात्मिक कथाकार आणि भजन गायिका जया किशोरी यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट देऊन बाप्पाची आरती केली. यावेळी उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन व भाविक उपस्थित होते.‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या दर्शनासाठी हजारो भक्तांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत आहेत. रात्री आठ वाजता बाप्पाची आरती असते. यावर्षी ट्रस्टने बाप्पाची रात्रीची आरती प्रामुख्याने आधात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा हस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी आध्यात्मिक कथाकार तथा प्रसिद्ध भजन गायिका जया किशोरी यांच्या हस्ते बाप्पाची आरती झाली. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी किशोरी यांचे मोदकाची प्रतिकृती देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपतीच्या आरतीचा मान दिल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले. दरम्यान आरती कार्यक्रमाआधी ढोल-ताशा पथकाने केलेल्या वादनाचाही जया किशोरी यांनी आनंद घेतला आणि त्या अक्षरशः त्यात दंग होऊन गेल्या होत्या.

जुना ट्रक भंगारात काढून नवा ई-ट्रक घेण्यासाठी जादा प्रोत्साहन:भारतात ईव्ही वाहतुकीत होणार वाढ

0

नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अवजड उद्योग मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारून प्रधान मंत्री ई-ड्राईव्ह अर्थात ‘प्रधान मंत्री इलेक्ट्रिक ड्राईव्ह रीवोल्युशन इन इनोवेटिव्ह व्हेईकल एनहान्समेंट योजने’ला मंजुरी दिली आहे. यामुळे देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वाहतुकीसाठी वापर वाढण्याला प्रोत्साहन मिळणार आहे. योजनेत दोन वर्षांसाठी 10,900 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

***

आशिया प्रशांत क्षेत्रात विमान वाहतूक सुरक्षा, स्थैर्य आणि सुरक्षेला चालना देणारे  दिल्ली घोषणापत्र  स्वीकारण्याची  पंतप्रधान करणार घोषणा

0

नवी दिल्ली:

तप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम  येथे दुपारी 4 वाजता नागरी विमान वाहतुकीवरील  दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत .  यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.

पंतप्रधान सर्व सदस्य देशांद्वारे “दिल्ली घोषणापत्र ” स्वीकारल्याची घोषणा देखील करतील, जे या प्रदेशाच्या विमान वाहतूक क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्याच्या दिशेने एक दूरदर्शी पथदर्शक आराखडा  आहे.

ही परिषद आणि दिल्ली घोषणापत्राचा स्वीकार हे  आशिया प्रशांत नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षितता, सुरक्षा आणि स्थैर्य  वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून यातून या प्रदेशातील देशांमधील सहकार्याची भावना अधोरेखित करते.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक  संघटनेच्या सहकार्याने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नागरी विमान वाहतुकीवरील  आशिया-प्रशांत  मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन केले असून संपूर्ण आशिया-प्रशांत  प्रदेशातील परिवहन आणि विमान वाहतूक मंत्री, नियामक संस्था आणि उद्योग तज्ञ यानिमित्ताने एकत्र येतील. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्य वाढवताना पायाभूत सुविधांचा विकास, स्थैर्य  आणि कार्यबल विकास यासारख्या प्रमुख आव्हानांवर तोडगा काढण्यावर  परिषदेत भर दिला जाईल.

पुणे महापालिकेतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळली

पुणे:पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्यात आली आहेत. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.आता दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असून या दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन होणार आहे. या दोन्ही गावांकडून अनेकवेळा याबाबींचा विरोध दर्शवण्यात आला होता. यासाठी गावकर्यांनी आंदोलन देखील केली.मात्र आता राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यात या दोन्ही गावांचा उल्लेख नगर परिषद म्हणून करण्यात यावा, असं म्हटलं आहे. याच बाबत आता स्थानिक नागरिक काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिसूचनेत काय म्हटलं आहे?

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की, ”महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ यांच्या कलम ३ चे पोट-कलम (३) चे खंड (अ) मध्ये प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक अ-मध्ये उप विभाग येथे शासन उद्घोषणा क्रमांक पीएमसी- २०२२/प्र.क्र.४६८/नवि-२२, दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी प्रसिध्द केली असून महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करण्याचा आणि वगळलेल्या क्षेत्रासाठी नगरपरिषद स्थापन करण्याचा आपला इरादा जाहीर केला होता.”यात पुढे म्हटलं आहे की, ”अधिसूचनेच्या अनुषंगाने त्यामध्ये नमुद कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे. भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३ थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेता पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करणे क्रमप्राप्त आहे. आता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा ५९) यांच्या कलम ३ चे पोट-कलम (३) चे खंड (अ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा व त्यांबाबतीत समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका यांच्याशी सल्लामसलत करून व उक्त कलम ३ चे पोट-कलम (४) नुसार आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी केल्यानंतर, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र पुणे महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे.”

आता ७० वर्षांवरील सर्वांसाठी आयुष्मान कार्ड बनणार

0

नवी दिल्ली:आता ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

https://x.com/ANI/status/1833881505925321109?t=7rY02OrWHHceAS_B0IOghw&s=19

या निर्णयामुळे १२.३ कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे. याचा फायदा ६.५ कोटी वृद्धांना होणार आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ही एक नवीन श्रेणी असेल. या अंतर्गत सरकार ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधेसह आरोग्य विमा देणार आहे.

“७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज असेल. एकूण १२.३ कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. हे शेयर्ड आरोग्य कवच असेल, असंही मंत्री अश्विन वैष्णव म्हणाले.

लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक स्थैर्य मिळाले! नीलम गोऱ्हे यांच्याशी बोलतांना लाभार्थी बहिणींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया.

पुणे (विशेष प्रतिनिधी): लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी शिवाजी नगर मतदारसंघातील आनंद यशोदा सोसायटीस भेट देऊन चर्चा केली. लाडकी बहीण योजने अंतर्गत पैसे मिळाल्यामुळे सर्व बहिणींना अत्यानंद होत होता. मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची योजना खरच सर्व महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे ,न भूतो न भविष्य अशी ही योजना आमच्या उज्वल भवितव्यासाठी फायदेशीर ठरणार आहे अशी प्रतिक्रिया लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी क्रांती सोनवणे यांनी व्यक्त केली. या पैशाचा उपयोग आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबाच्या आरोग्यासाठी करणार आहे अशी माहिती अनेक लाभार्थीने दिली ही योजना झाल्यानंतर आमच्या मनात या योजनेचे पैसे मिळतील की नाही? अशी शंका होती परंतु महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थाने बहिणीच्या उज्वल भवितव्याची चिंता करून त्यांना आर्थिक सहाय्य केलं याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार लाभार्थ्यांनी व्यक्त केले. या योजनेची माहिती स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आम्हाला दिली आणि हे पैसे आमच्या खात्यात जमा झाले. कुटुंबाला लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी आणि सणासुदीची खरेदी आम्ही या पैशातून केली असेही लाभार्थ्यांनी सांगितले. अनेक लाडकी बहीण लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
छाया बनसोडे,सुप्रिया लोंढे,क्रांती कांबळे,पुनम वंजारी,मीरा चव्हाण,रेणुका खरात,शेलार ताई,अस्मिता वंजारी,सुशीला बाबर,पल्लवी वंजारी,शुभांगी शिंदे,भंवरीदेवी चौधरी,वैशाली शेलार,शीला चव्हाण,सुरेखा चव्हाण,सुनीता मोरे,सिद्धी वंजारी या लाडकी बहीण लाभार्थिंशी विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी संवाद साधला.या प्रसंगी शिवसेना पुणे शहर समन्वयक धनंजय जाधव उपस्थीत होते.

‘दगडूशेठ’ गणपती ला ३५१ किलोचा बुंदीचा मोदक अर्पण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या १३२ व्या वर्षी प्रभात फरसाण हाऊसच्या मालाणी परिवार तर्फे ३५१ किलो बुंदीचा मोदक श्रीं ना अर्पण करण्यात आला. श्रीं समोर नैवेद्य दाखवून हा मोदक प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात आला.

मालाणी परिवारातर्फे दरवर्षी हा मोदक अर्पण केला. साजूक तूप, केसर, मोतीचूर, ड्रायफ्रूट वापरुन हा मोदक साकारण्यात आला होता. तसेच दिवसभरात राजकीय, शैक्षणिक, प्रशसकीय, सामाजिक क्षेत्रातल मान्यवरांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यामध्ये थायलंड येथील गणेशभक्त, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. शां.ब.मुजुमदार, खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी खासदार मनोज कोटक, भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.

आरक्षणावरील राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास; फडणवीस-शिंदेंनी अभ्यास करून बोलावे.

राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवणारे खलनायक देवेंद्र फडणवीसच; मराठा, धनगर, आदिवासी समाजाची फडणवीसांकडून फसवणूक.

मुंबई, दि. ११ सप्टेंबर
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही. आरक्षणाला RSS चाच विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे अशी जाहीर वक्तव्ये केलेली आहे. त्यामुळे भाजपाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या एका विधानाची मोडतोड करुन भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. वास्तविक पाहता आरक्षणाला विरोध हा भारतीय जनता पक्षच करत आलेला आहे. “माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे, मी आरक्षण विरोधी नाही, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे”, ही भुमिका असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. देशातील सर्व समाज घटकांना न्याय मिळावा यासाठी जातनिहाय जनगणना करावी व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवावी हीच काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची भूमिका आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे, त्यामुळे आरक्षणविरोधी कोण आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही.
राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवणारे खलनायक देवेंद्र फडणवीसच आहेत. मराठा, धनगर, आदिवासी समाजासह इतर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन देवेंद्र फडणवीस यांनी या समाजाची फसवणूक केलेली आहे. केंद्रातील भाजपा सरकारने सचिव पदावर थेट भरती करुन एकाच विशिष्ट जातीतील समाजाच्या तरुण तरुणींची थेट सचिव पदावर भरती केली होती, हा सुद्धा आरक्षण संपवण्याचाच एक प्रकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व त्यांनी दिलेल्या संविधानाचा सर्वात जास्त अपमान हा भाजपानेच केला आहे त्यामुळे आरक्षण, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलण्याचा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना काहीही अधिकारी नाही, असे नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करत बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष व चिन्हही चोरले, मोदी-शाह यांचे ते हस्तक आहेत. भाजपा जे सांगेल तेवढेच ते बोलू शकतात, त्यांनी आरक्षण व राहुल गांधी यांच्यावर बोलू नये. शिंदे यांनी आधी आरक्षणाचा अभ्यास करावा, आरएसएस, मोहन भागवत व भाजपाची आरक्षणाबद्दलच्या भूमिकेचा अभ्यास करावा व बोलावे. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी परदेशात भारताची बदनामी करत आहेत हा आरोपही अत्यंत चुकीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पदेशात भारताबद्दल काय काय बोलले त्याचे व्हिडीओ यु ट्यूब व सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा नीट अभ्यास करावा मग बोलावे, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला.

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात 15 जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 प्रदान

0


महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील आशा वामनराव बावणे फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार 2024 ने सन्मानित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना  वर्ष  2024 साठीचे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  अनुप्रिया पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. एकूण 15 परिचारिकांना   समाजाप्रति त्यांच्या उल्लेखनीय कर्तव्यनिष्ठेबद्दल सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सार्वजनिक आरोग्य परिचारिका आशा वामनराव बावणे  या वर्ष 2024 च्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारप्राप्त व्यक्तींपैकी एक आहेत. आशा बावणे या चंद्रपूर मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कार्यरत असून या सेवेत  त्यांचा 28 वर्षांचा अनुभव असून यापैकी  20 वर्षे त्यांनी आदिवासी भागात काम केले आहे. अनेक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून अनेक CNE कार्यक्रमांना देखील त्या उपस्थित राहिल्या आहेत. विशेषत: कोविडच्या काळात लसीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. अतिसाराच्या प्रादुर्भावादरम्यान तसेच प्रामुख्याने  हज यात्रेकरुंच्या लसीकरणाशी संबंधित त्यांनी केलेल्या कार्याचे  प्रशस्तीपत्रात कौतुक करण्यात आले आहे.

परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून 1973 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची स्थापना केली.

नोंदणीकृत सहाय्यक परिचारिका आणि दाई , नोंदणीकृत परिचारिका आणि दाई आणि नोंदणीकृत महिला अभ्यागत या श्रेणीमध्ये एकूण 15 पुरस्कार देण्यात आले. केंद्र, राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत उत्कृष्ट नर्सिंग कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. रूग्णालय किंवा समुदाय संस्था शैक्षणिक किंवा प्रशासकीय संस्थांमध्ये  नियमित नोकरीत  असलेली परिचारिका राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र आहे. प्रशस्तीपत्र , 1,00,000/- रुपये रोख आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या  देशभरातील अन्य परिचारिका खालीलप्रमाणे आहेत:

S. NoCategoryStateName
1ANMAndaman & Nicobar IslandsMs Sheela Mondal
2ANMArunachal PradeshMs Iken Lollen
3ANMPuducherryMs Vidjeyacoumary V
4ANMSikkimMs Januka Pandey
5ANMWest BengalMs Anindita Pramanik
6LHVManipurMs Brahmacharimayum Amusana Devi
7NurseDelhiMajor Gen Ignatius Delos Flora
8NurseDelhiMs Prem Rose Suri
9NurseJammu & KashmirDr Tabasum Irshad Handoo
10NurseKarnatakaDr Nagarajaiah
11NurseLakshadweepMs Shamshad Beegum A
12NurseMaharashtraMs Asha Womanrao Bawane
13NurseMizoramMs H Mankimi
14NurseOdishaMs Sanjunta Sethi
15NurseRajasthanMr Radhey Lal Sharma

शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम पर्याय सुचवावा,पुढील 50 वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रस्ताव पाठवा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

0

मुंबई, दि. 11 :- पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना स्वत: भेट द्यावी. भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम व्यवहार्य पर्याय सुचवावा. या गावांची पुढील 50 वर्षांची गरज लक्षात घेऊन गावांची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणीयोजनांचा परिपूर्ण प्रस्ताव अंदापत्रकासह राज्य शासनाकडे तातडीने पाठवावा. शासन त्यास त्वरेने प्रशासकीय मान्यता देईल. त्यानंतर निविदाप्रक्रिया राबवून या योजनांचा काम तातडीने मार्गी लावण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांनी अनुषंगिक कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी, इंदापूर तालुक्यातील बोरी या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नवीन प्रस्ताव तयार करताना धरणातून बंद पाईपद्वारे पाणी आणणे किंवा नवीन साठवणतलाव बांधणे यासारख्या पर्यायांचाही विचार करावा. त्यांची व्यावहार्यताही तपासून घ्यावी. सध्याच्या अस्तित्वातील साठवण तलावाची दुरुस्ती, अशुद्ध पाणी गुरुत्वनलिका, अशुद्ध पाणी उद्धरणनलिका, पंपिंग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र, अस्तित्वातील जल शुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती, शुद्ध पाणी ऊर्ध्वनलिका, उंच जलकुंभ, संतुलनटाकी, वितरण व्यवस्था, सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक स्त्रोतांचा वापर, तसेच इतर अनुषंगिक कामांचा नव्या योजनेत समावेश करून, अंदाजपत्रकासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा. या प्रस्तावाचा शासनस्तरावर अभ्यास करुन त्यास तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. जिल्ह्यातील गावांच्या पाणीयोजनांचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे
नव्या, पक्क्या साठवण तलावास मंजूरी

बारामती तालुक्यातील मौजे कांबळेश्वर येथील मातीच्या साठवण तलावातून कांबळेश्वर-शिरवली-शिरष्णे-लाटे-माळेवाडी या पाच गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या साठवण तलावाचे बांधकाम जीर्ण झाले असल्याने मोठ्या प्रमाणावर गळती होते. या साठवण तलावाचे बांधकाम नव्याने आणि पक्क्या स्वरुपात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.

अहमदनगर जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील
चार गावांच्या नळयोजनांना सुधारीत मान्यता

अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील मौजे भावडी आणि टाकळी लोणार या दोन गावांतील, अकोले तालुक्यातील मौजे माळेगाव आणि कर्जत तालुक्यातील शिंपोरा या गावातील जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.