पुणे-मातोश्री फाउंडेशन , महम्मवाडी रोड, हडपसर , पुणे येथे दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी शैक्षणिक इमारतीच्या भूमीपूजनाचा समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले तसेच महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे , भवन विभागाचे युवराज देशमुख दक्षता विभागाचे दिनेश गिरोला तसेच उद्योगपती जयंत येरावडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत असताना विद्यार्थ्यांच्या मानवी भागांक, बुद्ध्यांक व भावनिकता या निकषावर आधारित “मातोश्री फाउंडेशनच्या “अंतर्गत ज्ञान दानाचे मार्गदर्शन केले जाते. असे मत त्यांनी मांडले. तसेच
शैक्षणिक इमारतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासास मदत होईल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमप्रसंगी मातोश्री फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल ससाणे, सचिव डॉ. अपर्णा ससाणे व संस्थेचे, विश्वस्त निवृत्ती पिंगळे व शितल टिळेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नगरसेवक मा.श्री.योगेश ससाणे यांनी भूषविले. त्याचबरोबर ससाणे एज्युकेशन संस्थेचे चेअरमन मा. श्री. निलेश ससाणे, व
सन्मित्र सहकारी बँकेचे संचालक तुकाराम ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल सोनवणे आणि राजश्री चौधरी यांनी केले. शाळा समन्वयक आफरीन सय्यद , अंबिका डोमगांवकर यांचे सहकार्य लाभले. इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा चव्हाण यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.