जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी विहिरी, बोअरवेल महापालिकेकडे सुपूर्त. कराव्यात: संकट काळात टँकर ने वापरण्याचे पाणीही पुरवले पाहिजे
पुणे: शेकडो कोटीची सायकल ट्रॅक आणि अन्य बाबींवर खैराती सारखे पैसे उधळणाऱ्या महापालिकेने पाण्याचे टँकर मोफत पुरवावेत, बांधकामे थांबवावीत, वापरण्याचे पाणीही नागरिकांना घरोघरी लागते, तेही पुरवले पाहिजेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.दरवर्षी 15 जुलै पर्यंत नियमित स्वरूपात पाणीपुरवठा करणाऱ्या आणि त्यानंतर पावसावर अवलंबून असलेल्या महापालिकेने यंदा 15 जुनलाच मान टाकली आहे. हे नियोजनातील चुकांचे फलीत आहे की टँकर लॉबी साठी केले जात आहे असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत असून, खासगी टँकर चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
पाण्यासाठी पर्याय नसल्याने नागरिकांना अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेने टँकरच्या दरांवर नियंत्रण आणून निश्चित दर जाहीर करावेत तसेच पाणीटंचाईचा गैरफायदा घेणाऱ्या टँकरचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महापालिकेने पाण्याचे टँकर मोफत पुरवावेत..
Date:

