पुणे (विशेष प्रतिनिधी): लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी शिवाजी नगर मतदारसंघातील आनंद यशोदा सोसायटीस भेट देऊन चर्चा केली. लाडकी बहीण योजने अंतर्गत पैसे मिळाल्यामुळे सर्व बहिणींना अत्यानंद होत होता. मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची योजना खरच सर्व महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे ,न भूतो न भविष्य अशी ही योजना आमच्या उज्वल भवितव्यासाठी फायदेशीर ठरणार आहे अशी प्रतिक्रिया लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी क्रांती सोनवणे यांनी व्यक्त केली. या पैशाचा उपयोग आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबाच्या आरोग्यासाठी करणार आहे अशी माहिती अनेक लाभार्थीने दिली ही योजना झाल्यानंतर आमच्या मनात या योजनेचे पैसे मिळतील की नाही? अशी शंका होती परंतु महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थाने बहिणीच्या उज्वल भवितव्याची चिंता करून त्यांना आर्थिक सहाय्य केलं याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार लाभार्थ्यांनी व्यक्त केले. या योजनेची माहिती स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आम्हाला दिली आणि हे पैसे आमच्या खात्यात जमा झाले. कुटुंबाला लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी आणि सणासुदीची खरेदी आम्ही या पैशातून केली असेही लाभार्थ्यांनी सांगितले. अनेक लाडकी बहीण लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
छाया बनसोडे,सुप्रिया लोंढे,क्रांती कांबळे,पुनम वंजारी,मीरा चव्हाण,रेणुका खरात,शेलार ताई,अस्मिता वंजारी,सुशीला बाबर,पल्लवी वंजारी,शुभांगी शिंदे,भंवरीदेवी चौधरी,वैशाली शेलार,शीला चव्हाण,सुरेखा चव्हाण,सुनीता मोरे,सिद्धी वंजारी या लाडकी बहीण लाभार्थिंशी विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी संवाद साधला.या प्रसंगी शिवसेना पुणे शहर समन्वयक धनंजय जाधव उपस्थीत होते.