महाराष्ट्र पर्यटन विकास महामडळ दरवर्षीप्रमाणे 27 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिन 2024 साजरा करत असुन युनायटेड नेशन टुरिझम (UN TOURISM) यांचेव्दारे सन 2024 करीता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Theme) “Tourism & Peace ” हे घोषित करण्यात आले आहे.
यावर्षी जॉर्जियाची राजधानी तीबीलीसी येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल. जो विकासाचा महत्वाचा आधारस्तंभ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या घोषवाक्यानुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. सदर जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याव्दारे विविध उपक्रमांतुन साजरा केला जातो.
मा. व्यवस्थापकिय संचालक श्री. मनोजकुमार सुर्यवंशी सर यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या परिचलन करीत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, कलाग्राम इ. ठिकाणी दि. 27 सप्टेंबर 2024 रोजीच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत “पर्यटन दिन” साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यटन दिनी एमटीडीसी प्रादेशिक कार्यालयामार्फंत प्रादेशिक व्यवस्थापकांनी जिल्हयाच्या मा. पालकमंत्री, मा. विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी यांना तसेच नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना उदा. टुर ऑपरेटर्स, सहल आयोजक, टुर्स असोसिएटस, हॉटेलियर्स, निवास न्याहरी इ. लोकांना निमंत्रित करुन परिसंवादाचे आयोजन सकाळी 10.00 ते दुपारी 1.30 पर्यंत करण्यात येणार आहे. परिसंवादामध्ये यावर्षीच्या घोषवाक्यप्रमाणे (Tourism & Peace) कार्यक्रमाची रुपरेखा आखण्यात आली आहे. यासाठी पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, पर्यटन उद्योजक, विद्यार्थी इ. यांना निमंत्रित करण्यात यावे. विभागातील महाविद्यालयांमध्ये Tourism & Peace या विषयावर प्रादेशिक व्यवस्थापक अथवा तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान ठेवण्यात येणार आहे. याबाबत महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल सर मार्गदर्शन करीत आहेत.
“Tourism & Peace” या घोषवाक्याशी अधीन राहुन प्रत्येक प्रादेशिक विभागातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सहभागी करुन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणारआहे. या स्पर्धेसाठी पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश, माझ्या स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन : शांततेचे दुत आणि प्रतिक हे विषय निश्चित करण्यात आलेले आहेत.
निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार येणार असुन मोठया प्रमाणावर पारितोषिके देण्यात येणार आहेत. पारितोषिकांचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
अनु. क्र. पारितोषिक पारितोषिकाचे स्वरुप
1प्रथम पारितोषिक पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 2 रात्री व 3 दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह.
(संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितीतील पर्यटक निवासांत)
2व्दित्तीय पारितोषिक पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 1 रात्र 2 दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह
(संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितीतील पर्यटक निवासांत)
3तृतीय पारितोषिक जवळच्या पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 1 दिवस राहण्याची व्यवस्था + दुपारचे जेवण + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्या साधुन आपण “Tourism & Peace” या घोषवाक्याशी अधीन राहुन विभागातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठीही सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येणार असुन पहील्या 3 क्रमांकांना उपरोक्त प्रमाणे पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीच्या पर्यटक निवासांच्या माहितीपत्रकांचे विमोचन :
महामंडळाने नुकतेच छापलेले, आपल्या अखत्यारीतील येणाऱ्या पर्यटक निवासांच्या माहितीपत्रकांचे / प्रसिध्दीपत्रकांचे विमोचन प्रादेशिक स्तरावर परिसंवादामध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे..
या निमित्ताने सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटक निवास / उपहारगृह, कलाग्राम, बोट क्लब्स, कलाग्राम इ. यांच्या प्रवेशव्दारावर जागतिक पर्यटन दिनाचा इको फ्रेंडली Banner लावण्यात येणार असुन महामंडळाच्या व्यवस्थापकांव्दारे या दिवशी पर्यटक निवासात वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांचे पुष्प देऊन जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देत स्वागत करण्यात येणार आहे. पर्यटक निसासामध्ये सदर दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपारिक खेळांचे आयोजन आलेले आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधन सर्व उपहारगृहांमध्ये त्या त्या विभागातील स्थानिक विशेष पदार्थं तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटक निसावांत वास्तव्यास आलेल्या पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालण्यात येणार असुन अतिथी पर्यटकांना निवासासभोवताली असलेल्या नजीकच्या सुरक्षित पर्यावरणपुरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नेचार Walk इ. चा मनमुराद आस्वाद देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. “जागतिक पर्यटन दिन” हा पर्यटनाशी पुरेपुर निगडीत राहील व नियोजित उपक्रमांव्दारे पर्यटनवाढ वृध्दिंगत होवुन राष्ट्रास व राज्यास नक्कीच हातभार लागेल, या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे.
कोसळणारा पाऊस, आल्हाददायक कानात शिळ घालणारा वारा आणि दाट धुक्याच्या दुलईमध्ये चिंब भिजत निसर्गाचा आनंद घेण्याचे हे गुलाबी क्षण यादगार करण्यासाठी पर्यटकांची चढाओढ सुरु आहे. आपणही या अनोख्या वातावरणामध्ये वर्षा पर्यटनाचा, धुक्याच्या आणि उबदार थंडीच्या साथीने आनंद घ्यावा, आणि महामंडळाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयेजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेवुन पर्यटनाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी केले आहे.
श्री. दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ…