सत्तेत जाताच मग्रुरी:फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; म्हणाले- कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन

Date:

सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा!


मुंबईईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना ‘बॉम्ब टाकून, घरात घुसून मारण्याची’ धमकी दिल्यावरून शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून, त्यांनी पोलिस आयुक्तांकडे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांवरच खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे.

“कॅमेरा बंद कर, नाहीतर मारून पाठवीन!”

खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत ‘माझ्या विरोधात आंदोलन केले तर बॉम्ब टाकेन’ असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावर स्पष्टीकरण विचारण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर पाटील संतापले. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच आपला तोल गमावला आणि पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. संतापाच्या भरात पाटील म्हणाले: “अरे भाई, बस झालं ना आता! किती अति करताय? बंद करा कॅमेरा. मी खासदार आहे हे विसरून जाईन. इज्जत करतोय तर इज्जत राखा. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय, आणि तुम्ही असे वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा!” सत्तेत आल्यावर एका विद्यमान खासदाराचा असा तोल ढळणे आणि थेट पत्रकारांना शिवीगाळ करत धमकावणे, यावरून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संजय दिना पाटील यांच्या या जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पाटलांवर कठोर कारवाई करत अटकेची मागणी केली आहे. पत्रात राऊत म्हणाले, “पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यापूर्वी मोदींना 100 वेळा विचार करावा लागतो, पण हे महाशय थेट बॉम्ब टाकण्याची भाषा करत आहेत. जर त्यांच्याकडे बॉम्ब आहेत, तर ते घरात बनवलेत की दहशतवाद्यांनी दिले? हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा असून याची एटीएसने (ATS) चौकशी करावी आणि त्यांच्यावर ‘यूएपीए’ (UAPA) सारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा.”

ते पुढे म्हणाले, “पाटील यांनी ‘मी याआधी पाच लोकांना मारले आहे’ असा दावा केला आहे. या दाव्याची स्वतंत्र चौकशी करून सत्यता तपासावी आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा.” पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई न केल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. भविष्यात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास त्याची नैतिक जबाबदारी खासदार पाटील यांच्यावरच राहील, असेही त्यांनी नमूद केले.

संजय राऊत यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज्यात आम्ही कुणाचेही घर बॉम्बने उडवून देऊ देणार नाही. पोकळ धमक्यांना कोणीही घाबरण्याचे कारण नाही. जर कोणी अशा धमक्या देत असेल, तर त्याला पोलिस योग्य ते उत्तर देतील.”दुसरीकडे, आपल्या विधानावर सारवासारव करताना संजय दिना पाटील म्हणाले होते की, “माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मी ‘जन्मायच्या अगोदर असं एकदा झालं होतं, तेव्हा ५ लोक मेले होते’ असे म्हणालो होतो. मी कोणाला का मारेल?” मात्र, हे स्पष्टीकरण देतानाच त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याने या प्रकरणाने आता आणखीच गंभीर वळण घेतले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...