Home Blog Page 569

आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली. त्यामुळे शिंदेच हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतीलविधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. निवडणूक निकालानंतर महायुतीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण हे ठरवतील. 75 टक्के सर्व्हे आमच्या बाजूने आहेत. आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली. त्यामुळे शिंदेच हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे. यासंबंधी नितीश कुमार यांचे उदाहरण पाहता येईल. वरिष्ठ नेते यासंबंधी योग्य तो निर्णय घेतील. पण एकनाथ शिंदे ज्या भावनेने काम करतात ते जनतेला आवडले अशी सर्वसामान्यांची भावना आहे.एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही त्याला बांधिल आहोत. ते जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबुतीने राहू, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे .

संजय शिरसाट यांनी मंगळवारी सकाळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात पत्रकाराने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेनेच्या संभाव्य युतीविषयी प्रश्न केला. त्याला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी यासंबंधीचा कोणताही निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील असे स्पष्ट केले. शरद पवार यांच्यासोबत जायचे की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतली. आम्हाला त्यावर भाष्य करता येणार नाही.

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मतदान यंत्रामध्ये बंद झाल्यानंतर आता राज्यात कुणाची सत्ता येणार? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य युतीचे संकेत दिलेत. यामुळे निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.संजय शिरसाट यांनी तत्पूर्वी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना कथित व्होट जिहादवर भाष्य केले. विरोधी पक्षांचा व्होट जिहाद सुरू होता. याऊलट आम्ही धर्मयुद्ध लढत होतो. आमचे धर्मयुद्ध सक्सेस झाले. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है आदी घोषणा प्रचंड यशस्वी झाल्या. हिंदू बांधवांसह सर्वच जातीधर्माच्या लोकांनी महायुतीला पसंती दर्शवली. त्यामुळे या निवडणुकीत आमचाच विजय होईल हे निश्चित आहे. सरकारच्या योजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी या सर्व बाबी आमच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे मतांची वाढलेल्या टक्क्याचा कौल महायुतीच्याच बाजूने असेल आमचा दावा आहे, असे ते म्हणाले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सौरभ धानोरकर

पुणे – फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. सौरभ धानोरकर यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती मान्य केल्याची घोषणा केली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून ती २१ नोव्हेंबरपासून अमलात येणार आहे.

श्री. धानोरकर १९८३ पासून विविध भूमिकांद्वारे कंपनीशी संबंधित असून २०१२ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. ते चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांनी २ कोटी रुपयांच्या पाइप उत्पादन कंपनीचे विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या मोठ्या पेट्रोकेमिकल्स व प्लॅस्टिक प्रोसेसिंग कंपनीत विस्तार करण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. २०१६ मध्ये ते व्यवस्थापकीय संचालक पदावरून निवृत्त झाले आणि गेल्या आठ वर्षांपासून नॉन- एक्झक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत.

कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रकाश छाब्रिया यांनी नेतृत्वबदलाचे महत्त्व अधोरेखित करत अकाउंटिंग, वित्त, व्यावसायिक, धोरण, विपणन आणि व्यवस्थापन विभागातील श्री. धानोरकर यांच्या कौशल्याची प्रशंसा केली. त्यांनी श्री. धानोरकर यांच्या फिनोलेक्सला विकास व नफ्याच्या नव्या पातळीवर नेण्याच्या क्षमतेविषयी विश्वास व्यक्त केला. त्यांचा ग्राहककेंद्री दृष्टीकोन, विकासावर भर देण्याचे धोरण आणि कंपनीच्या मूल्यांप्रती असलेली बांधिलकी यांमुळे त्यांचे नेतृत्व नवे मापदंड प्रस्थापित करताना पाहाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

२४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नॉमिनेशन आणि रेम्युनरेशन समितीने केलेल्या शिफारसीचा विचार करून श्री. सौरभ धानोरकर यांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील नियुक्तीला मान्यता देण्यात आली. ही नियुक्ती २१ नोव्हेंबर २०२४ पासून अमलात येणार असून त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता स्टॉक एक्सचेंजसह करण्यात आली आहे. श्री. अजित वेंकटरामन २० नोव्हेंबर २०२४ अखेरीस व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार होणार आहेत.

महाराष्ट्राच्या 288 जागांसाठी 58% मतदान: 23 तारखेला नव्या राजकीय समीकरणांचा होणार उदय ….

पुणे-आज 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर मतदान झाले. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांनाही बहुमतासाठी आवश्यक 145 जागा मिळवणे आवश्यक आहे.मात्र त्या दोघानाही कठीण असल्याचे अनेकांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिंदे सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. सरकार स्थापन झाल्यानंतर ती वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.लाडकी बहिण योजना मतांमध्ये कशा पद्धतीने परावर्तीत होईल ते पाहणे रंजक ठरणार आहे.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. याच योजनेच्या जोरावर तिथे विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले सरकार आल्यास महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिले आहे.

भाजपला जास्तीत जास्त 80-90 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविला जातो आहे . 2019 मध्ये भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या.म्हणजे १० ते १५ जागांवर भाजप मायनस होणार आहे. तर काँग्रेस 58-60 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते असे अनेकांना वाटते आहे . गेल्या निवडणुकीत त्यांना 44 जागा मिळाल्या होत्या.म्हणजे १० ते १२ जागा कॉंग्रेस प्लस मध्ये जाणार आहे . निवडणुकीत शरद पवारांची जादू काम करत असल्याचे दिसते. त्यांचा पक्ष NCP (SP), ज्याने 86 उमेदवार उभे केले आहेत, ते 50-55 जागा जिंकू शकतात असाही अंदाज वर्तविला जातो आहे.

या निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मते कापतील. त्यांचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे. ते केवळ मते कापण्याचे काम करतात आणि त्यांना मोठ्या मुश्किलीने 4 जागा मिळू शकतील.’अजित पवार महायुतीचा भाग असला तरी अनेकवेळा त्यांनी जुन्या मित्रपक्षांचे गुणगान किंवा सहकारी पक्षांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावत असल्याने त्यांचे किती उमेदवार विजयी होतील हा प्रश्न आहे. अजित पवारांचे 10-15 पेक्षा जास्त उमेदवार विजयी होणार नाही असे दिसते. अजित पवार आज नाही तर उद्या शरद पवारांकडे परत जातील असाही अनेकांचा कयास आहे.

शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव गट) 30-35 जागा जिंकून बरोबरीत राहू शकतात असे अनेकांचे मत आहे . अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसाठी कमकुवत दुवा ठरत आहे. ते केवळ 15-20 जागा जिंकण्याची शक्यता आहे. लहान पक्ष आणि अपक्षांना 20 ते 25 जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत अपक्ष किंगमेकर बनू शकतात असे काहीजण सांगत आहेत. महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव) यांच्या आघाडीला महायुतीपेक्षा 10 जागा जास्त मिळू शकतात. या आघाडीला बहुमत मिळण्याचीही शक्यता आहे.’दोन्ही आघाड्या बहुमतात कमी पडल्या, तर मात्र अपक्ष आमदार, मनसेचे असले २/३ तर ते प्रकाश आंबेडकरांचा एखादा आमदार असे सरकार स्थापन करण्यास मदत करतील. 1995 मध्ये प्रथमच 45 अपक्ष उमेदवार महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते आणि ते सर्व सरकारमध्ये सामील झाले. तीच गोष्ट पुन्हा दिसू शकेल फक्त आकड्यांचा खेळ बदललेला दिसेल असा हि अंदाज आहे.

राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान

0

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :अहमदनगर – ६१.९५टक्के,अकोला – ५६.१६ टक्के,अमरावती -५८.४८ टक्के, औरंगाबाद- ६०.८३ टक्के, बीड – ६०.६२ टक्के, भंडारा- ६५.८८ टक्के, बुलढाणा-६२.८४ टक्के, चंद्रपूर- ६४.४८ टक्के,धुळे – ५९.७५ टक्के, गडचिरोली-६९.६३ टक्के, गोंदिया -६५.०९ टक्के, हिंगोली – ६१.१८ टक्के, जळगाव – ५४.६९ टक्के, जालना- ६४.१७ टक्के, कोल्हापूर- ६७.९७ टक्के,लातूर _ ६१.४३ टक्के, मुंबई शहर- ४९.०७ टक्के, मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,नागपूर – ५६.०६ टक्के,नांदेड – ५५.८८ टक्के, नंदुरबार- ६३.७२ टक्के,नाशिक -५९.८५ टक्के, उस्मानाबाद- ५८.५९ टक्के, पालघर- ५९.३१ टक्के, परभणी- ६२.७३ टक्के,पुणे – ५४.०९ टक्के,रायगड – ६१.०१ टक्के, रत्नागिरी- ६०.३५ टक्के,सांगली – ६३.२८ टक्के,सातारा – ६४.१६ टक्के, सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,सोलापूर -५७.०९ टक्के,ठाणे – ४९.७६ टक्के, वर्धा – ६३.५० टक्के,वाशिम -५७.४२ टक्के,यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

मतदान करणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य;जनतेने सुट्टीचा गैरफायदा घेऊ नये – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

पुणे दि.२०: विधानसभा निवडणूक २०२४च्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची लोकांनी जाण ठेवावी आणि आपला अधिकार बजवावा. लोकशाहीत सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं, असं आवाहन शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. तसेच यावेळी मतदान करण्यासाठी मतदारांची लोकसभेपेक्षा अधिक गर्दी दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी, शिवसेनेचे धनंजय जाधव, राजू विटकर, युवराज शिंगाडे, संजय तुरेकर, सागर कांबळे, भाजपचे संदीप काळे, मंदार देवभानकर, दिलीप शेळके, भाऊराज शेळके, शिवसेना महिला आघाडीच्या अक्षता धुमाळ, सुदर्शना त्रिगुणाईत, सुरेखा पाटील,सुवर्णा शिंदे, संजीवनी विजापूरे उपस्थित होते.

पुण्यात 3वाजेपर्यंत झाले एवढे मतदान -आणि जिल्हाधिकारी यांनी केले आवाहन

पुणे-

मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत Maharashtra 45.53 %

पुणे 41.70 %

-पर्वती 37.66%,

कोथरूड 37.80%,

खडकवासला 40.40 %,

कसबा 43.03%,

हडपसर 33.78%,

पुणे कॅन्टोन्मेंट 35.84%,

शिवाजी नगर 33.86%,

वडगाव शेरी 38.83 %

राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीत आज दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले.

खाली पाहा जिल्हानिहाय टक्केवारी

अहमदनगर – ४७.८५ टक्के, अकोला – ४४.४५ टक्के, अमरावती -४५.१३ टक्के, औरंगाबाद- ४७.०५टक्के, बीड – ४६.१५ टक्के, भंडारा- ५१.३२ टक्के, बुलढाणा-४७.४८ टक्के, चंद्रपूर- ४९.८७ टक्के, धुळे – ४७.६२ टक्के, गडचिरोली-६२.९९ टक्के, गोंदिया -५३.८८ टक्के, हिंगोली – ४९.६४टक्के, जळगाव – ४०.६२ टक्के, जालना- ५०.१४ टक्के, कोल्हापूर- ५४.०६ टक्के, लातूर _ ४८.३४ टक्के, मुंबई शहर- ३९.३४ टक्के, मुंबई उपनगर-४०.८९ टक्के, नागपूर – ४४.४५ टक्के, नांदेड – ४२.८७ टक्के, नंदुरबार- ५१.१६ टक्के, नाशिक -४६.८६ टक्के, उस्मानाबाद- ४५.८१ टक्के, पालघर- ४६.८२ टक्के, परभणी- ४८.८४ टक्के, पुणे – ४१.७० टक्के, रायगड – ४८.१३ टक्के, रत्नागिरी- ५०.०४टक्के, सांगली – ४८.३९ टक्के, सातारा – ४९.८२टक्के, सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के, सोलापूर -४३.४९ टक्के, ठाणे – ३८.९४ टक्के, वर्धा – ४९.६८ टक्के, वाशिम -४३.६७ टक्के, यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात वेबकास्टिंग कक्षाची यशस्वी कामगिरी

पुणे: येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत वेबकास्टिंग कक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. निवडणुकीची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी या कक्षाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. या कक्षाचे यशस्वी नेतृत्व नोडल अधिकारी वासुदेव कुटबेट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कुटबेट यांना मंडळ अधिकारी संदीप शिंदे यांनी सहकार्य केले, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुसंगत आणि प्रभावी ठरली.
निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह वेबकास्टिंग) सुनिश्चित करण्यात आले. मतदान केंद्रांवर होणाऱ्या सर्व गतिविधींचे अचूक आणि पारदर्शक निरीक्षण करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या गोंधळाची किंवा अनियमिततेची तात्काळ दखल घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. मतदान प्रक्रियेतील प्रत्येक छोट्या मोठ्या घटनांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग हे वेबकास्टिंग कक्षाच्या कार्यक्षमतेमुळे शक्य झाले.
या कक्षाने चुकता येणार नाहीत असे अचूक नियोजन केले होते. मतदान प्रक्रियेतील एकही घटक दुर्लक्षित न होईल याची काळजी घेतली गेली. स्थानिक प्रशासन व निवडणूक अधिकारी यांनी वेबकास्टिंग कक्षाच्या कार्याची विशेष प्रशंसा केली.
वेबकास्टिंग कक्षाच्या यशस्वी कामगिरीमुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह झाली, ज्यामुळे नागरिकांमध्ये निवडणुकीसाठी विश्वास निर्माण झाला.

पैसे वाटप सब झूट, तावडेंवरच झाला हल्ला-:अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम-जावेदची स्टोरी -फडणविसांच्या ट्वीस्टने दिवसभरातील घडामोडींचे चित्रच पालटवले

नागपूर -विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणून-बुजून आरोप लावण्यात आले आहेत. विनोद दोषी नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने असे आरोप होत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम-जावेदची स्टोरी आहे. मागून मारलेला दगड पुढे कसा लागला, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यावर आरोप होतात. त्यातलाच हा प्रकार आहे. विनोद तावडे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. कुठलाही पैसा, आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत. उलट विनोद तावडे आणि नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर हल्ला झाला आहे. उद्याचा दिसणारा पराभव कव्हर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या एकोसिस्टमने कव्हर फायरिंग केले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. विनोद तावडे या प्रकरणात दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही, वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणून-बुजून आरोप करण्यात आले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

10 किलोचा गोटा काचेच्या खिडकीवर मारला, तर ती खिडकी तुटली का नाही? 10 किलोचा गोटा पडल्यानंतर बोनेटला साधी स्क्रॅच देखील का आली नाही? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहे. एकच गोटा गाडीत दिसला असून तो गोटा कारच्या मागील बाजुने मारलेला आहे. मागील बाजुने दगड मारला, तर तो मागे लागायला पाहिजे. तो समोर कसा लागला? मागून फेकलेला दगड गोल फिरून समोरुन लागणे, अशाप्रकारचा दगड फक्त रंजनीकांतच्या चित्रपटात फेकला जाऊ शकतो, असा टोला फडणवीसांनी लगावला.

एक किलोचा दगड लागल्यानंतर केवळ टाके पडले आहेत. त्यात कोणतेही मोठी जखम दिसत नाही. निवडणुकीत मुलाचा पराभव दिसू लागल्याने हा सर्व प्रकार घडवण्यात आला आहे. भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशाप्रकारच्या स्टोरीला काल पवार साहेबांसह सर्वांनी जाणीवपूर्वक इकोसिस्टम उपलब्ध करून दिली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुन्हा एक मराठा नेतृत्व संपवले, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप – सुषमा अंधारे

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवले, असा थेट आरोपच सुषमा अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर टीका केली. भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला… ! पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवले, असे म्हणत देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? असा सवाल सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना विचारला.

आजच तुमचे सरकार झाले हे जाहीर करा
कशाला निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या? उमेदवारी अर्ज, चिन्ह, स्क्रूटनीचे नाटक कशाला ..? आचारसंहितेच धाक फक्त विरोधकांना दाखवायचा? आजच तुमचे सरकार झाले हे जाहीर करा आणि लगेचच फडणवीस विनोद तावडे यांचा शपथविधी करून टाका. उद्याचे मतदान, परवाच्या निकालाची वाट बघू नका, असा घणाघातही अंधारे यांनी केला.

मतदान साहित्यासह पथके मतदान केंद्रांकडे रवाना-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार

पुणे,दि.१९ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेंबर, २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी चिंचवडमधील मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक साहित्य वितरण आज पार पडले असून सर्व पथके विहीत वेळेत मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार १३० अधिकारी, कर्मचारी नियुक्त आणि ४८ सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक करण्यात आली आहे. आज थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यापूर्वी सर्व मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना तिसरे अंतिम प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रियेबद्दल तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार असून ५६४ मतदान केंद्रे आहेत. यासाठी आवश्यक असणारे १३५३ बॅलेट युनिट, ६७६ कंट्रोल युनिट आणि ७३३ व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. ५६४ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी २ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून २२५ बॅलेट युनिट, ११२ कंट्रोल युनिट आणि १६९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. यासोबतच विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह प्रथमोपचारपेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य देखील यावेळी सुपूर्द करण्यात आले. या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी बसेस, जीप तसेच इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावर केंद्र क्रमांकाची माहिती दर्शविण्यात आली होती.

यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने साहित्याचे वितरण करून पथकांना नेमून दिलेल्या वाहनांमध्ये बसवून विहीत वेळेत केंद्रस्थळी पोहोचविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले होते. साहित्य वाटपाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच प्रत्येक पथकासोबत स्वतंत्र पोलीस पथके देण्यात आली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
०००

गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, मी मरणार नाहीआणि तुम्हाला सोडणारही नाही, डिस्चार्ज मिळताच अनिल देशमुखांचा इशारा

0

नागपूर-राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर काल हल्ला करण्यात आला होता. अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपुरातील उपचार करण्यात आले. अनिल देशमुख यांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. अनिल देशमुखावर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही. मी सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात अज्ञात चार युवकांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास काटोलचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते. काटोल येथील तीनखेडा-भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला. याचा फायदा घेत काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि दगड थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. या घटनेत अनिल देशमुख हे जखमी झाले होते. त्यांच्यावर काटोलच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.

रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

पुणे दि.१९: पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने दमछाक होत हे पथक पोहोचले. मात्र लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्याला एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाल्याच्या उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

भोर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथील मतदान साहित्य वाटप केंद्रावरून आज मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७ वाजता मतदान साहित्य वाटपास सुरूवात झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.

भोर येथे सर्वप्रथम रायरेश्वर पठारावर असलेल्या मतदान केंद्रासाठी साहित्य वाटप करण्यात आले. या मतदान केंद्रावर लोखंडी शिडीच्या सहाय्याने पोहोचावे लागत असल्याने भारत निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या बॅकपॅकचे वितरण डॉ. खरात यांच्या हस्ते मतदान कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

रायरेश्वर हे पुण्यातील सर्वांत उंचावर असलेले मतदान केंद्र असून १६० मतदारांसाठी या मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. भोरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते. रायरीमार्गे रायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत १८ किलोमीटर प्रवास करावा लागतो. त्यानंतर एक तास पायी वाटचाल करून लोखंडी शिडीच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येते.

मतदान कर्मचाऱ्यांनी हे अंतर पूर्ण करून मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविले. देशाच्या प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावे यासाठी या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. जिल्ह्यासह राज्याच्या इतरही भागात मतदान कर्मचारी अशा विविध आव्हानांचा सामना करीत नागरिकांना या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात, असेही डॉ. खरात म्हणाले.

पर्वतीत भाजपकडून पैसे वाटपाचा आरोप करत मविआ उमेदवाराचा पोलीस ठाण्यापुढे ठिय्या

पुणे-पर्वती मतदारसंघात इंदिरानगर भागात भाजपचा एक कार्यकर्ता मतदानाच्या स्लिप व पैसे वाटत असल्याचा आराेप आघाडीच्या उमेदवार अश्वीनी कदम यांचे पती नितीन कदम यांनी केला आहे. याप्रकरणी दाेषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी पाेलिस ठाण्यासमाेर ठिय्या आंदाेलन केले.

नितीन कदम यांनी असे म्हटले आहे कि,’आपल्याला माहिती मिळाली कि भाजपा चा एक कार्यकर्ता इंदिरानगर परिसरात पैसे वाटप करत आहे. संबंधित व्यक्ती हा मतदानाची स्लिप साेबत पैसे नागरिकांना देत असल्याने आपण सदर ठिकाणी गेलो . त्यावेळी सदर व्यक्तीकडे त्यांनी विचारपूस करत, खिशातील पैसे दाखव असे सांगत त्याला अडवून धरले. त्यानंतर सदर व्यक्ती आपल्याला धक्काबुक्की करून पळून गेला.

याबाबत आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम म्हणाल्या, निवडणुक ही लाेकशाहीचा उत्सव असून ती पारदर्शकपणे झाली पाहिजे. पैसे वाटप सुरु असेल तर पाेलिस यंत्रणा कमकुवत पडल्याचे दिसून येते. ही निवडणुक चांगल्याप्रकारे पार पडावी यासाठी निवडणुक अधिकारी यांच्याकडे आम्ही पूर्वसूचना देऊन लेखी पत्र देखील दिले हाेते. गुंडशाही वापर, पैसे वाटप करुन निवडणुक हाेत असेल तर ते चुकीचे आहे. पाेलिस कुठे गस्त घालताना दिसत नाही. पाेलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर पैसे वाटप सुरु असेल तर पाेलीसांनी कितपत काम केले दिसून येत आहे. पर्वती मतदारसंघात पाेलिस यंत्रणा गस्त घालताना दिसले पाहिजे कारण हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अाहे. मतदानाचे प्रचंड कामकाज असताना भाजपकडून गुंड दहशत करुन पैसे वाटप करत असेल तर हा संविधान व लाेकशाहीचा अपमान अाहे.

राज्यात सत्ताधारी भाजपाकडून खुलेआम पैसे वाटप होत असताना निवडणूक आयोग काय झोपला आहे का?: सचिन सावंत.

निवडणुकीत भाजपा युतीकडून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर, प्रचार संपल्यानंतरही भाजपा नेते विरारमध्ये काय करत होते.

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर २०२४
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद तावडेंवर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे धरू, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी दिला आहे.

विरार प्रकरणी टिळक भवनमध्ये बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व युतीने विधानसभा निवडणुकीत लाजलज्जा सर्वकाही सोडली असून खुलेआमपणे पैशांचे वाटप केले जात आहे. शिंदेसेनेच्या एका आमदाराशी संबधित वाहनात मोठी रक्कम वाहनात सापडली पण त्याचे पुढे काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघातही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटत केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता विरारमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याचे पैसे वाटण्याचे प्रकरण उघड झाले आहे. सत्तातुराणां न भय न लज्जा! अशी भारतीय जनता पक्षाची वर्तणूक आहे. पराभवाची चाहूल लागल्याने भाजपा व सत्ताधारी पक्ष पैशाचा वापर करून लोकशाहीचे धिंडवडे काढत आहेत.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार प्रचार संपल्यानंतर मतदार संघाबाहेरील कोणताही नेता दुसऱ्या मतदारसंघात राहू शकत नाही असे असताना विनोद तावडे काल संध्याकाळ पासून विरारमध्ये काय करत होते, हा प्रश्न आहे. तावडेंवर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२६ नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे, या कायद्यानुसार दोषीला २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. राज्यात निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक अधिकारी स्वतंत्र व निष्पक्षपाती भूमिका घेत नाहीत हा आमचा आक्षेप आहे. लोकशाहीचा हा उत्सव पारदर्शक, निर्भय व निष्पक्षपातीपणे पार पडावा यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची असून तसे त्यांनी कृतीतून दाखवावे, असेही सचिन सावंत म्हणाले.

फडणवीस यांची ही “लाडका विनोद” योजना आहे का? – कॅांग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा उपरोधक सवाल ?

पुणे-ना मै खाउंगा ना किसीको खाने दूंगा अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान मोदीजींच्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार येथे पैसे वाटताना पकडण्याची बातमी ऐकताच फडणवीस यांनी “ लाडका विनोद “ अशी काही योजना सुरू केली आहे का अशी खोचक प्रतिक्रिया गाडगीळ यांनी दिली आहे. १९८७ साली स्व. बाळासाहेब ठाकरे व रमेश प्रभू यांना धर्माचा प्रचारात वापर केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षाकरीता काढून घेतला होता. तसा तावडे यांचा अधिकार काढून घेत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवून देणार की हे प्रकरणही वॅाशींग मशीनमधे घालून क्लिन चिट देणार? असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. स्व. अ. बि. बाजपेयी, शा. प्र. मूखर्जी , दि.द. उपाध्याय यांची परंपरा असलेल्या भाजप ला सध्याच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी “चिक्की पासून नाचक्की “ ची सुरवात करत कुठे नेवून ठेवला आहे हा भाजप असे आता त्यांचेच कार्यकर्ते बोलू लागले आहेत.