पुणे – फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. सौरभ धानोरकर यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती मान्य केल्याची घोषणा केली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून ती २१ नोव्हेंबरपासून अमलात येणार आहे.
श्री. धानोरकर १९८३ पासून विविध भूमिकांद्वारे कंपनीशी संबंधित असून २०१२ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. ते चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांनी २ कोटी रुपयांच्या पाइप उत्पादन कंपनीचे विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या मोठ्या पेट्रोकेमिकल्स व प्लॅस्टिक प्रोसेसिंग कंपनीत विस्तार करण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. २०१६ मध्ये ते व्यवस्थापकीय संचालक पदावरून निवृत्त झाले आणि गेल्या आठ वर्षांपासून नॉन- एक्झक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत.
कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रकाश छाब्रिया यांनी नेतृत्वबदलाचे महत्त्व अधोरेखित करत अकाउंटिंग, वित्त, व्यावसायिक, धोरण, विपणन आणि व्यवस्थापन विभागातील श्री. धानोरकर यांच्या कौशल्याची प्रशंसा केली. त्यांनी श्री. धानोरकर यांच्या फिनोलेक्सला विकास व नफ्याच्या नव्या पातळीवर नेण्याच्या क्षमतेविषयी विश्वास व्यक्त केला. त्यांचा ग्राहककेंद्री दृष्टीकोन, विकासावर भर देण्याचे धोरण आणि कंपनीच्या मूल्यांप्रती असलेली बांधिलकी यांमुळे त्यांचे नेतृत्व नवे मापदंड प्रस्थापित करताना पाहाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
२४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नॉमिनेशन आणि रेम्युनरेशन समितीने केलेल्या शिफारसीचा विचार करून श्री. सौरभ धानोरकर यांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील नियुक्तीला मान्यता देण्यात आली. ही नियुक्ती २१ नोव्हेंबर २०२४ पासून अमलात येणार असून त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता स्टॉक एक्सचेंजसह करण्यात आली आहे. श्री. अजित वेंकटरामन २० नोव्हेंबर २०२४ अखेरीस व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार होणार आहेत.