पुणे-आज 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर मतदान झाले. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांनाही बहुमतासाठी आवश्यक 145 जागा मिळवणे आवश्यक आहे.मात्र त्या दोघानाही कठीण असल्याचे अनेकांचे मत आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिंदे सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. सरकार स्थापन झाल्यानंतर ती वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.लाडकी बहिण योजना मतांमध्ये कशा पद्धतीने परावर्तीत होईल ते पाहणे रंजक ठरणार आहे.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. याच योजनेच्या जोरावर तिथे विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले सरकार आल्यास महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिले आहे.
भाजपला जास्तीत जास्त 80-90 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविला जातो आहे . 2019 मध्ये भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या.म्हणजे १० ते १५ जागांवर भाजप मायनस होणार आहे. तर काँग्रेस 58-60 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते असे अनेकांना वाटते आहे . गेल्या निवडणुकीत त्यांना 44 जागा मिळाल्या होत्या.म्हणजे १० ते १२ जागा कॉंग्रेस प्लस मध्ये जाणार आहे . निवडणुकीत शरद पवारांची जादू काम करत असल्याचे दिसते. त्यांचा पक्ष NCP (SP), ज्याने 86 उमेदवार उभे केले आहेत, ते 50-55 जागा जिंकू शकतात असाही अंदाज वर्तविला जातो आहे.
या निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मते कापतील. त्यांचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे. ते केवळ मते कापण्याचे काम करतात आणि त्यांना मोठ्या मुश्किलीने 4 जागा मिळू शकतील.’अजित पवार महायुतीचा भाग असला तरी अनेकवेळा त्यांनी जुन्या मित्रपक्षांचे गुणगान किंवा सहकारी पक्षांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावत असल्याने त्यांचे किती उमेदवार विजयी होतील हा प्रश्न आहे. अजित पवारांचे 10-15 पेक्षा जास्त उमेदवार विजयी होणार नाही असे दिसते. अजित पवार आज नाही तर उद्या शरद पवारांकडे परत जातील असाही अनेकांचा कयास आहे.
शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव गट) 30-35 जागा जिंकून बरोबरीत राहू शकतात असे अनेकांचे मत आहे . अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसाठी कमकुवत दुवा ठरत आहे. ते केवळ 15-20 जागा जिंकण्याची शक्यता आहे. लहान पक्ष आणि अपक्षांना 20 ते 25 जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत अपक्ष किंगमेकर बनू शकतात असे काहीजण सांगत आहेत. महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव) यांच्या आघाडीला महायुतीपेक्षा 10 जागा जास्त मिळू शकतात. या आघाडीला बहुमत मिळण्याचीही शक्यता आहे.’दोन्ही आघाड्या बहुमतात कमी पडल्या, तर मात्र अपक्ष आमदार, मनसेचे असले २/३ तर ते प्रकाश आंबेडकरांचा एखादा आमदार असे सरकार स्थापन करण्यास मदत करतील. 1995 मध्ये प्रथमच 45 अपक्ष उमेदवार महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते आणि ते सर्व सरकारमध्ये सामील झाले. तीच गोष्ट पुन्हा दिसू शकेल फक्त आकड्यांचा खेळ बदललेला दिसेल असा हि अंदाज आहे.