‘व्हायोलिन गाते तेव्हा’..सुगम संगीत, चित्रपट संगीताची सुरेल मैफल
‘इन सिलको ड्रग डेव्हलपमेंट’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ ‘वेदा’च्या वतीने ‘इंडस्ट्री व्हिजिट’चे आयोजन
महावितरणचे ‘प्रकाशदूत’!
वीजपुरवठा खंडित झाला की सर्वकाही ठप्प पडण्याची स्थिती निर्माण होण्याइतपत आता विजेची गरज निर्माण झाली आहे. नव्हे वीज ही मुलभूत गरजच बनलेली आहे. घरात प्रकाश देणारा एखादा बल्ब असो की मोठमोठ्या कारखान्यातील अहोरात्र चालणारी अजस्त्र यंत्रणा, विजेशिवाय त्यांचे अस्तित्व शून्यवत आहे. केवळ विजेच्या एका बटणावर घर जसे प्रकाशमान होते तसेच कारखान्यातील अजस्त्र यंत्रणाही वेगवान गतीने सुरु होते. पण या बटणामागे असलेली भलीमोठी वीजयंत्रणा आणि या यंत्रणेच्या माध्यमातून विजेचे नियंत्रण करणारे व 24 तास अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करणारी माणसं म्हणजे महावितरणचे ‘प्रकाशदूत’ असलेले अभियंता व जनमित्र.
विजेची निर्मिती व त्यानंतर पारेषण, वितरण अशा तीन टप्प्यांत ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. दाटवस्तीच्या महानगरापासून ते अतिदुर्गम डोंगरदऱ्यांतील सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-बेरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते. वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा प्रतीक्षा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या प्रकाशदुतांची तारेवरची कसरत आणि धडपड ही पावसाळ्यात तर अधिकच आव्हानात्मक असते.
वीज वितरणाच्या क्षेत्रात महावितरण ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक कंपनी आहे. सुमारे 2 कोटी 53 लाख ग्राहकांना वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या सुमारे 62 हजार अभियंता, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर 24 तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह इतर ग्राहकसेवा देण्याची जबाबदारी आहे. यात विविध ग्राहकसेवांसह देयकांची, थकबाकीची वसुली करणे, वीजपुरवठा खंडित करणे, वीजचोऱ्या पकडणे आदी महत्वाची कामे करावी लागतात.
महाराष्ट्रात विजेचे भारनियमन संपुष्टात आल्यानंतर आता उत्कृष्ट तसेच जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची ग्राहकसेवा सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न महावितरणकडून वेगाने सुरु झालेले आहे. वीजबिल भरणा, नवीन वीजजोडणी, ग्राहक तक्रार आदी महत्वाच्या सेवांची सुविधा महावितरणने मोबाईल अॅप किंवा महावितरणच्या वेबसाईटद्वारे एका क्लिकवर उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय ग्राहकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे वीजबिल, वीजबंद व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मोबाईल अॅपद्वारे मीटर रिडींग घेतले जात असल्याने वीजबिलातही अचूकता आलेली आहे.
महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी सुमारे 10 लाखांची भर पडत आहे. सोबतच विजेची मागणीही सुमारे 10 टक्क्यांनी वाढत आहे. सुमारे 10 लाख 14 हजार किलोमीटरच्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या अन् सुमारे 5 लाख 83 हजार वितरण रोहित्रांच्या यंत्रणेतून राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक वीजग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. उन, वारा, पाऊस किंवा अवेळी येणारे वादळ अशा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावरील वीज वितरण यंत्रणा सुस्थितीत आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करावे लागतात. धोकेही असे की, जाणते किंवा अजाणतेपणी झालेली चूक वीज माफ करीत नाही आणि थेट मृत्यूच्या दारात नेते. त्यामुळे अशा वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्याची कामे तसे जिकिरीचे व प्रसंगी जोखमीचे सुद्धा असते.
सद्यस्थितीत सुरु असलेल्या पावसाळ्याने तर महावितरणच्या अभियंते अन् कर्मचाऱ्यांसाठी खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी चांगलेच आव्हान उभे केले. पुण्याचा ग्रामीण भाग, वसई विरार, कोल्हापूर जिल्ह्यात संततधार अतिवृष्टीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरु करण्यासाठी महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने जिगरबाज काम केले. कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात गेलेली वीजयंत्रणा, वसई विरारमध्ये वीजयंत्रणेसह उपकेंद्रांत शिरलेले पुराचे पाणी किंवा पुण्याच्या मावळ भागातील दऱ्याखोऱ्यात वादळी पावसाने तुटलेल्या तारा या सर्व प्रतिकूल परिस्थितीत वीजयंत्रणेची दुरुस्ती व वीजपुरवठा सुरु करण्याचे अत्यंत आव्हानात्मक काम यशस्वीपणे करून दाखविले.
यापूर्वीही सन 2016 मधील कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेच्या महापुरात बोटीने जाऊन वीजपुवरठा सुरळीत करण्याचे कर्तव्य महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चोखपणे बजावले होते. 2014 मधील महाराष्ट्रभर झालेल्या प्रचंड गारपीटीने तर वीजयंत्रणेचे अभूतपूर्व नुकसान झाले होते. परंतु अहोरात्र काम करून ही यंत्रणा उभारण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कार्य ‘प्रकाशदुतां’नी यशस्वी केले. शिवाय नोव्हेंबर 2009 मधील कोकणातील ‘फयान’ वादळ असो किंवा किल्लारी परिसरातील भूकंप, नैसर्गिक आपत्तीला तोंड देत काळोखात गेलेल्या वीजग्राहकांसाठी ‘प्रकाश’ खेचून आणण्याचे काम महावितरणचे अभियंते व कर्मचारी करीत आहेत. महाराष्ट्रात वीज यंत्रणेचा भलामोठा पसारा असणाऱ्या महावितरणमध्ये अभियंता व जनमित्र यांना वेळी-अवेळी, रात्र असो की दिवस, उन असो, वादळ असो की पाऊस या सर्वच परिस्थितीमध्ये खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संभाव्य धोके टाळून कर्तव्य पणाला लावावे लागते.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठीची जिगरबाज धडपड ही ‘प्रकाशदुतां’ना नवीन वीजजोडणीसाठी सुद्धा करावी लागते. पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम चांदर (ता. वेल्हे) व लगतच्या दोन वस्त्यांमधील वीजपुरवठ्यासाठी डोंगरदऱ्यात यंदाच्या मे महिन्यातील उन्हात अवघ्या 7 दिवसांत 65 वीजखांब व एक वितरण रोहित्र उभारण्यात आले. नैसर्गिक प्रतिकुलतेला आव्हान देत महावितरणच्या ‘प्रकाशदुतां’नी 46 कुटुंबांसाठी डोंगरदऱ्यातून अक्षरशः प्रकाश खेचून आणला हे विशेष.
वीजपुरवठा खंडित झाला की तक्रारकर्ते वीज कधी येईल याची प्रतीक्षा करतात. पण त्यादरम्यान महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना विजेच्या धोकादायक आव्हानात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कसे काम करावे लागते, याची माहिती बऱ्याचदा नसते. पण वीज अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वीजसेवा देण्याची धडपड आणि अविश्रांत प्रयत्न समजून घेतले तर त्यांच्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना न्याय मिळेल, एवढे निश्चित.
पीएमआरडीएच्यावतीने म्हाळुंगे- सूस हिंजवडी परिसरात रस्ते दुरुस्तीचे कामकाज सुरु
पुणे -महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने (पीएमआरडीए) पायाभूत सुविधा
भक्कम करण्यासाठी म्हाळुंगे- सूस हिंजवडी परिसरात रस्ता दुरुस्तीचे कामकाज पीएमआरडीएच्यावतीने हाती
घेण्यात आले आहे. प्रथमदर्शनी खड्डे बुजविण्याचे महत्वपूर्ण कामकाजाला सुरुवात केली आहे.
हिंजवडीतील वाढती गर्दी व वाढते नागरीकरण लक्षात घेता या भागात स्थयिक आयटीयन्स व जेष्ठ
नागरिकाची वारंवार मागणी लक्षात घेऊन पीएमआरडीएने कामकाज हाती घेतले आहे. तसेच सार्वजनिक
बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांच्याकडेही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या
होत्या. एमआयडीसीला रस्त्याच्या कामकाजासाठी टीपी स्कीमच्या माध्यमातून ३६ मीटरची जागा
बांधकामासाठी उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित २.५ किलोमीटरमध्ये पीएमआरडीएने काम हाती घेतले
आहे. पीएमआरडीएकडून २.५ किमी रस्त्याच्या कामकाजासाठी ७ कोटी ६७ लाख रुपये खर्च येणार आहे.
तसेच म्हाळुंगे सूस या शिव रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती देखील पीएमआरडीएच्यावतीने करण्यात येत आहे.
सध्य स्थितीत पावसामुळे प्रत्यक्ष काम करता येणार नाही. स्थानिक पातळीवरून खड्डे दुरुस्तीची मागणी
वारंवार करण्यात आली होती. प्रथमत: अतिवृष्टीने झालेल्या पावसाचे खड्डे सुरुवातीला बुजविण्याचे काम
तातडीने हाती घेतले आहे.
पीएमआरडीए मा. आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले की, “म्हाळुंगे-नांदे मधील वाहतूक सुसह्य करण्यासाठी
व ग्रामस्थांना रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी पीएमआरडीएने पुढाकार घेऊन स्थानिक
ग्रामपंचायत, पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता दुरुस्तीचे कामकाज
सुरु केले आहे. सदरील रस्ता पुढील सात दिवसात करण्याचे नियोजन आहे. या भागातील ग्रामस्थांनी टीपी
स्कीमसाठी देखील मोलाचे सहकार्य केले आहे. हिंजवडीचा विकास पाहता भविष्यात म्हाळुंगे गावाचा विकास होणे
म् हत्वाचे आहे.
एफसी पुणे सिटी संघाकडून किनन अल्मेडा करारबद्ध
पुणे– राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आपली बचावाची फळी अधिक भक्कम करण्यासाठी किनन अल्मेडा याचा 2018-19 या मौसमाकरिता करारबद्ध केले असून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, किनन हा उत्कृष्ट खेळाडू असून त्याच्या समावेशामुळे आमच्या बचावफळीत अधिक अत्याधुनिकता येणार आहे. याआधीच्या क्लबने त्याच्या मार्गदर्शनाखालील विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे त्याची मानसिकता हि क्लबसाठी महत्वाची ठरेल.
अल्मेडाने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची गोव्याच्या साळगावकर, स्पोर्टींग क्लब दि गोवाकडून केली आणि त्यानंतर इंडियन सुपर लीग 2015मध्ये एफसी गोवा संघात सहभागी झाला. दोन मौसम गौरसकडून खेळल्यानंतर अल्मेडा 2017-18 आयएसएलमध्ये चेन्नई एफसी संघाकडून खेळत होता.
यावेळी अल्मेडा म्हणाला कि, क्लबने माझ्याकरिता एक खास योजना तयार केली होती आणि या योजनेला मी ताबडतोब मान्यता दिली. उत्कृष्ट संघाकडून खेळण्यास मिळणे हि एखाद्या खेळाडूसाठी दुर्लभ संधी असते आणि हीच संधी मला एफसी पुणे सिटी संघात सहभागी होऊन मिळणार आहे.
सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन – स्पर्धेत क्लबमधील 166 खेळाडू सहभागी
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यांत सुधांशु मेडसीकर, अमित देवधर, तन्मय चोभे व केदार नाडगोंडे हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 2 ते 5 ऑगस्ट 2018 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे आणि ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून स्पर्धेला ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत 15 वर्षाखालील गट, महिला गट, 45 वर्षावरील गट आणि खुला गट अशा विविध गटातून 166 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने करण्यातआली असून 8 संघांमध्ये याची विभागणी करण्यात आली आहे.
या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो याचा आम्हाला आनंद असल्याचे आश्विन त्रिमल यांनी सांगितले.
स्पर्धेमध्ये पुरूष खेळाडूंसह महिला व 45 वर्षावरील गटातील प्रत्येकी 3 खेळाडूंचा प्रत्येक संघात समावेश असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सामन्यासाठी गटानुसार 1 गुण दिला जाणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने होणार असून दोन गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीस पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पीबीएलचे आयुक्त विवेक सराफ व क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांक हळबे यांनी सांगितले.
या वर्षीच्या स्पर्धेचे वौशिष्ट म्हणजे या वर्षी स्पर्धेत सर्वाधीक 166 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पध्दतीने स्पर्धेचे स्वरूप करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. संघातील प्रत्येक स्पर्धकाने किमान एक सामना खेळल्यास या वर्षी प्रत्येक संघाला शंभर टक्के सहभागासाठी 3 बोनस गुण देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत कॉंमेटस्(पराग चोपडा), फाल्कन्स्(मधुर इंगळहाळीकर), इम्पेरिअल स्वान्स(आदित्य काळे), किंगफिशर्स (तन्मय चोभे), ब्लॅक हॉक्स: आलोक तेलंग, ईगल्स(अमित देवधर), स्पुटनिक्स(बाळ कुलकर्णी), रायझिंग रावेन्स(केदार नाडगोंडे) हे 8 संघ झुंजणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमुद केले.
8 संघांची अ व ब अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ खेळेल. अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सुवर्ण खुला दुहेरी, रौप्य खुला दुहेरी, सुवर्ण मिश्र दुहेरी, रौप्य मिश्रदुहेरी,रौप्य खुला दुहेरी, लहान वयोगटातील सामना, सुवर्ण 45 वर्षावरील दुहेरी व सुवर्ण खुला दुहेरी अशा गटांमध्ये सामने होणार आहेत.
स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये शशांक हळबे, विवेक सराफ, उदय साने, गिरिश करंबेळकर, देवेंद्र चितळे, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, बिपिन चोभे, रणजित पांडे, तुषार नगरकर, सिध्दार्थ निवसरकर, अभिजीत खानविलकर, कपिल खरे यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल रेफ्री श्री उदय साने हे चीफ रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत.
स्पर्धेतील सहभागी संघांची व संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे
कॉमेट्स- सुधांशू मेडसीकर, पराग चोपडा, आदिती रोडे, संग्राम पाटील, विवेक जोशी, अविनाश दोशी, हर्षवर्धन आपटे, विनित रुकारी, अनिकेत सहस्त्रबुध्दे, राजशेखर करमरकर, जनक वाकणकर, आनंद शहा, विमल हंसराज, अवनी देशमुख, भाग्यश्री देशपांडे, अभय राजगुरू, कुणाल भुरट, राहुल गांगल, अवनी देशमुख, अर्जुन पाटील, संजना पाटील
इगल्स- अमित देवधर, अंकित दामले, मिहिर पाळंदे, सारंग आठवले, तुषार नगरकर, मिहिर केळकर, अनिष राणे, गिरिष मुजुमदार, रवी बापट, राजेंद्र नाखरे, विनायक करमरकर, शिवकुमार जावडेकर, रवी कासट, गौरी कुलकर्णी, ईशा साठे, शमिका एरंडे, सौरभ शिरोडकर, रोहन छाजेड, आर्य नगरकर, अनन्या राजवाडे, आदित्य लाखे.
फाल्कन्स – अतुल बिनिवाले, तेजस किंजवडेकर, निखिल शहा, विक्रांत पाटील, देवेंद्र चितळे, अजिंक्य मुठे, मधुर इंगळहाळीकर, चैत्राली नवरे, गिरीश करंबेळकर, प्रशांत वैद्य, सचिन जोशी, मृदुला राठी, राधा चिरपुटकर, अशिष देसाई, सलील गुप्ते, रोहित बर्वे, अमित धर्मा, सचिन अभ्यंकर, अर्जुन खानविलकर, यश चितळे.
हॉक्स- सुमेध शहा, आलोक तेलंग, अश्विन शहा, सुरेश वाघेला, बिपिन देव, हर्षद बर्वे, दिपा खरे, राजश्री भावे, हरिष गलानी, हेमंत पाळंदे, अमर श्रॉफ, आकाश सुर्यवंशी, संदिप तपस्वी, आनंद घाटे, शैलेश बोथरा, शिला कोपर्डे, आशुतोष देशपांडे, सचिन काळे, मिथाली कुलकर्णी, विष्णु गोखले, सारा ठाकुर
किंगफीशर- तन्मय चोभे, वृषी फुरीया, गायत्री वर्तक, करण पाटील, अव्दैत जोशी, मकरंद चितळे, संतोष पाटील, मिहिर विंझे, नकुल दामले, नीरज दांडेकर, प्रशांत कुलकर्णी, अभिषेक ताम्हाणे, अभिजीत राजवाडे, अनया तुळपुळे, अनिल आगाशे, चारूदत्त साठे, अश्विन त्रिमल, शुभंकर मेनन, निखिल चितळे, रिद्धिमा रुकारी, विश्वा रूकारी.
रावेन्स- केदार नाडगोंडे, श्रीयश वर्तक, तन्मय आगाशे, कुणाल पाटील, चेतन व्होरा, अनिकेत शिंदे, दिप्ती सरदेसाई, मंदार विंझे, वेदांत खतोड, आयुष गुप्ता, संदिप साठे, विश्वेश कटक्कर, प्रांजली नाडगोंडे, तनया केळकर, जयकांत वैद्य, कौस्तुभ वाळींबे, केदार देशपांडे, सोहम गांधी, आनंदीता गोडबोले, इशान गुप्ते, मुग्धा पाटील.
स्पुटनिक्स- सिध्दार्थ निवसरकर, सिध्दार्थ साठे, रणजीत पांडे, अनिरुध्द आपटे, बाळ कुलकर्णी, गोपीका किंजवडेकर, प्रिती फडके, अनिल देडगे, शैलेश लिमये, जयदीप कुंटे, अमोद प्रधान, तुषार मेंगाळे, आशुतोष सोमण, विरल देसाई, दिया मुथा, मिहिर आपटे, आशिष राठी, तन्मय चितळे, माया निवसरकर, आरुषी पांडे.
स्वान्स- तेजस चितळे, आर्य देवधर, आदित्य काळे, सारा नवरे, अमोल मेहेंदळे, बिपिन चोभे, सारंग लागु, प्रिती सप्रे, नरेंद्र पटवर्धन, निलेश केळकर, सुदर्शन बिहानी, देबश्री दांडेकर, दत्ता देशपांडे, विक्रम ओगले, चिन्मय चिरपुटकर, कर्णा मेहता, यश बाहुलीकर, ईशान लागु, अमेय कुलकर्णी, पार्थ केळकर.
पुनर्वसन होऊनही टीडीआरसाठी पुन्हा झोपडपट्टी पुनर्वसनाचा घाट ! अधिकारी -बिल्डर्सच्या संगनमताने म्हाडाच्या जागेवर कोट्यवधींचा भ्रष्टाचार
धनगर समाजाकडूनही आरक्षणाचा लढा तीव्र करणार ….(व्हिडीओ)
पुणे-राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना आता धनगर समाजाकडूनही आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे. यासंदर्भात पुण्यात सोमवारी आयोजित धनगर समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ही माहिती देण्यात आली. दरम्यान, समाजाच्या नेत्यांकडून १ ऑगस्टला पुण्यातील कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
पुण्यात होणाऱ्या बैठकीनंतर राज्यात तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तसेच १ सप्टेंबर २०१८ रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील धनगरांना अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गाचा दाखला द्यावा अन्यथा भविष्यात तीव्र लढा उभारला जाणार आहे. त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.
पडळकर म्हणाले, मागील तीन वर्षापासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, आदिवासी मंत्रालयाकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड आढळून आला नाही. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचीत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून ९३ हजार धनगड, तर एकूण १९ लाख ५० हजार बोगस आदिवासी दाखविले आहेत. यावर आदिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे ३० टक्के अनुदान, ३० टक्के नोकऱ्या या इतर समाजाने बोगसगिरी करुन हडपल्या आहेत, त्यामुळे सर्व आदिवासी मंत्री, आमदार व बोगस लाभधारक व नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
२०१४ साली राज्यातील धनगर समाजाने अारक्षणाच्या मुद्द्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून सरकार आणले. परंतू, मुख्यमंत्र्यांनी अारक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा टिसच्या माध्यमातून धनगरांना अारक्षण मिळूच नये, अशी भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. जर त्यांनी १ सप्टेंबरपूर्वी निर्णय न घेतल्यास हे सरकार चालवणे कठीण होईल आणि तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्याना त्यांनी यावेळी दिला.
मोबाइक तर्फे एमआयटी बरोबर डॉकलेस बाइक शेयरिंग सेवाची सुरुवात
एक पाऊल परिवर्तनाचे!
आता ..उगलेंविरोधात ..शिक्षकांचे आमरण उपोषण सुरु
पुणे-महापालिका कर्मचारी यांच्या ग्रेड पे चा विषय अजून मार्गी लागतो लागतो तोच आता पुन्हा महापालिका अतिरिक्त आयुक्त शीतल उगले आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांच्या कामकाजाच्या पद्धती विरोधात पालिकांच्या शाळेतील शिक्षकांनी महापालिकेच्या मुख्य भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे .
सर्व माध्यमांच्या शाळांतील मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक ,प्रशासन अधिकारी यांची प्रमोशन्स या अधिकार्यांनी रोखून धरल्याचा आरोप होतो आहे . तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी ,निवड श्रेणी,पदवीधर वेतन श्रेणी ,लागू केल्या पाहिजेत त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे .या व्यतरिक्त उपोषण कर्त्या शिक्षकांनी अन्य काही मागण्या हि मांडल्या आहेत . ….अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्या कामकाजाच्या पद्धती विरोधात सत्ताधारी नगरसेवकांनी मोहीम उघडली होती .त्याच वेळी कर्मचाऱ्यांनी हि मोठा मोर्चा महापालिकेवर आणला होता . पालिकेच्या मुख्य सभेत हि यावर ‘अप्रत्यक्ष पणे ‘ त्यांची कानउघाडणी करण्यात आली होती .पण हे सारे प्रयत्न निरर्थक ठरलेत कि काय ? असा प्रश्न या आंदोलनामुळे उपस्थित होतो आहे . सत्ताधारी आणि उगले यांच्यातील संघर्षात कर्मचारी देखील आपल्या व्यथा मांडत आहेत . मुंडे आणि देशभ्रतार अशा दोन अधिकाऱ्यांच्या संदर्भात उपस्थित झालेल्या मुद्द्यांमुळे त्या त्या वेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने सत्ताधारी भाजपच्या सुरात सूर मिसळला होता .उगले यांच्या बाबतीत मात्र तसे होताना दिसत नाही . कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी उगले यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे .
पहा हा व्हिडीओ रिपोर्ट…
बांग्लादेश येथील एशियाई स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंनी मिळविली १ सुवर्ण , २ रौप्य व १ कांस्य पदके
पुणे-बांग्लादेश येथील ढाका या शहरात साऊथ एशियाई मार्शल आर्टस् स्पर्धेत आठ देशातील १८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता . त्यामध्ये भारतीय संघाने पुणे येथील श्वेता भोसले ( १ सुवर्ण ,२ रौप्य ), हर्षल गरड (१ कांस्य ) या खेळाडूंनी पदके मिळवून संबंध एशियाई स्पर्धेत आपल्या देशाला दुसरा क्रमांक मिळवून दिला .
या खेळाडूंचे भारतीय संघाचे प्रशिक्षक शंकर महाबळे यांचे मार्गदर्शन लाभले . याबद्दल वोविनाम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विष्णू साहाय , राष्ट्रीय सचिव प्रविण गर्ग ,भारती विद्यापीठाचे कार्यवाह व कडेगाव पलूसचे आमदार डॉ. विश्वजित कदम , बंडूअण्णा आंदेकर , नगरसेवक वनराज आंदेकर , भवानी पेठ वॉर्ड अध्यक्ष सुनिल घाडगे आणि फिटनेस मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले .
श्वेता भोसले हे आबेदा इनामदार महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे . फिटनेस मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीची तीन संचालिका आहे . गेली पाच वर्षांपासून मार्शल आर्ट्समध्ये प्रशिक्षण घेत आहे . श्वेताने वोविनाम या खेळात राज्यपातळीवर व जिल्हा पातळीवर एक सुवर्ण पदक जिंकले आहे . तिला क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे आहे . मुलींनी स्वसंरक्षणासाठी हा खेळात सहभाग घेतला पाहिजे . घरच्यांच्या पाठिंब्याने आपण हे यश मिळविले आहे . अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळविले आहे . असे श्वेता भोसले हिने सांगितले .
भारतात हजारो वर्षापासून गुरू-शिष्य परंपरा चालत आली प्रा.डॉ. मंगेश कराडः
पुणे- हजारो वर्षापासून भारतात गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपल्या संस्कृतीत गुरू आपल्या शक्तीशाली सूक्ष्म ज्ञानाला अतूट विश्वास व प्रेमभावाने शिष्यांपर्यंत पोहचवितात. असे विचार एमआयटी डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
गुरूपौर्णिमेनिमित्त युवराज मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. शिवलोक प्रतिष्ठानच्या सहकार्याने १०१ रोपे लावण्यात आली. त्यांच्या संवर्धनासाठी सुध्दा युवराज मित्रमंडळाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोथरूड-बावधन प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका सौ.अल्पना गणेश वरपे या होत्या. तसेच, नगरसेविका सौ.वैशाली मराठे, कार्यक्रमाचे संयोजक व युवराज मित्रमंडळाचे संस्थापक रवि दिघे हे उपस्थित होते.
प्रा.डॉ. मंगेश कराड म्हणाले, कोणत्याही अडथळ्याशिवाय चालत आलेली गोष्ट म्हणजे परंपरा आहे. ही ज्ञान देण्याची अतूट श्रृंखला आहे. पुढील वर्षाच्या गुरूपौर्णिमेपर्यंत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने पुणे शहरात व पुणे जिल्ह्यात जिथे जिथे मोकळी जागा उपलब्ध असेल तेथे ५००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
तसेच, शिवतीर्थनगर येथील दत्तमंदिरात भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात उपस्थितांना तुळशीची २५० रोपे वाटण्यात आली.
याप्रसंगी शिवलोक प्रतिष्ठानचे संस्थापक मुरलीधर कुंबरे, युवराज मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय गोडकर, किनारा फ्रेन्डस सर्कलचे अध्यक्ष मोहन घारे, अबोली पार्क मित्रमंडळचे अध्यक्ष दत्ता मारणे,शिवलोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश येनपुरे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच पै. चंद्रकांत मोहोळ, नितिन बोराडे, योगेश दिघे, उमेश कासार आदी उपस्थित होते.
यावेळी अल्पना वरपे, वैशाली मराठे, गणेश वरपे, रवि दिघे व अनिता चव्हाण यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाची प्रस्तावना रवि दिघे यांनी केली. योगेश दिघे यांनी आभार मानले.


