पुणे– बाइक शेयरिंग मध्ये अग्रेसर अशी विश्वस्तरिय कंपनी मोबाइक ने आज पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सीटी मध्ये अापल्या डॉकलेस बाइक शेयरिंग सेवेची सुरुवात केली आहे, ज्यात नारंगी रंगाच्या १०० पेक्षा अधिक सिग्नेचर मोबाइक बाइक (सायकल) आता ३००० विद्यार्थी आणि कॉलेजच्या फॅकल्टी मेंबर्ससाठी मागणीनुसार उपलब्ध असतील.
एमआयटी हे पहीले असे कॅम्पस आहे ज्यामध्ये अश्या प्रकारची मोबाइक सेवा सुरु केली गेली आहे. ही सेवा भविष्यात खुप उपयोगी ठरेल. मोबाइकचा उद्देश कमीत-कमी कालावधी मध्ये पुण्यात आपल्या सेवेचा विस्तार करणे आणि पर्यायाने प्रदुषण कमी करण्यास मदत करणे हा आहे. अश्या प्रकारची सेवा पर्यावरण,प्रदुषण ह्या पुण्यातीत गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यास मदगार ठरेल .
मोबाइकचे हे अॅप्लीकेशन वारण्यात अतिशय सुटसुटित आहे, ह्या सेवेचा लाभ घेण्याचे विकल्प देखील सुटसुटित आहेत.[वॉलेट, नेट बॅॅकिंग, क्रेडिट कार्ड आणि यूपीआई] द्वारे मोबाइक अॅप डिजिटल बनले आहे. ह्याचबरोबर अतीशय वाजवी दरात ९९ रुपयांच्या मासिक पासाची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे.
मोबाइक इंडियाचे सीईयो विभोर जैन म्हणाले की, एमआयटी परिसरात मोबाइक उपलब्ध करुन देण्यामागिल आमचा उद्देश विद्यार्थी,प्राध्यापक आणि कर्मचार्यांस सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. ह्याचबरोबर पुण्यास एक आदर्श शहर बनविणे, सुलभ आणि किफायती विकल्प प्रदान करणे हा मानस आहे.
एमआईटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड म्हणाले, आम्ही मोठ्या आनंदाने मोबाइकचे स्वागत करत आहोत आमच्या विद्यार्थी आणि प्राध्यपकांसाठी ही सेवा खुपच सुलभ ठरेल.
मोबाइक ने नगर निगमची महत्वाकांक्षी ‘पुणे साइकिल योजनेच्या’ समर्थनात पुणे नगर निगम बरोबर एका समझौता करारावर हस्ताक्षर केले आहे, ह्याचा उद्देश्य सयकल संस्कृती स चालना देने आणि पुढील ३ वर्षांमध्ये ७०० पेक्षा अधिक किमी सायकल ट्रॅक बनविने हा आहे.