‘इन सिलको ड्रग डेव्हलपमेंट’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
८० प्रतिनिधींचा सहभाग
पुणे : ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘इन सिलको ड्रग डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘नोवार्टिस हैदराबाद’च्या संयुक्तविद्यमाने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत ८० प्रतिनिधी सहभागी झाले होते.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ लक्ष्मण चेरकुपली (नोवार्टिस) आणि डॉ. राम सिवसुब्रमणिअन (संचालक, क्लिनिकल ट्रिअल्स, नोवार्टिस) यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ किरण भिसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यशाळेच्या संयोजनात डॉ शर्वरी हर्डीकर, अमृता यादव आणि रजत सय्यद यांचा सहभाग होता.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ लक्ष्मण चेरकुपली यांनी उत्पादना विकासाच्या टप्प्यातील विविध औषध वर्गीकरण प्रणाली, मॉडेलिंग आणि सिम्युलेशन टूल्सची उपयुक्तता या विषयी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात बायोवायइव्हर्स, आय व्ही आय व्ही सी (in-vitro in-vivo correlatio)आणि पी बी पी के (Physiologically based Pharmacokinetic) मॉडेलिंग या विषयी माहिती देण्यात आली. डॉ. राम सिवसुब्रमणिअन यांनी या सत्रात पीके सिस्टम्सच्या ‘नॉन-कंपार्टमेंट’ आणि ‘कम्पार्टमेंट अॅलॅलिसिस’चे स्पष्टीकरण दिले. पीके सॉल्व्हर सॉफ्टवेअर बद्दल माहिती दिली.