पुणे :‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अॅण्ड आर्ट्स’, आझम कॅम्पस च्या वतीने ‘इंडस्ट्री व्हिजिट ‘ चे आयोजन केले होते.
‘बीएससी मीडिया ग्राफिक आणि ऍनिमेशन’ च्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट ‘स्टार कॉपीअर’ येथे आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांमध्ये आजच्या डिजिटल प्रिंटिंगच्या छपाईबद्दल जागरुकता निर्माण करणे, माहिती होणे हा या भेटीचा प्रमुख हेतू होता, असे ‘वेदा’ महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषी आचार्य यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कागदाचे प्रकार, विविध प्रकारची पुस्तके मुद्रित करण्याची संपूर्ण प्रक्रिया, प्रिंटिंगचे नवीन तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे, पुस्तकबांधणी, पुस्तक सरसाने चिकटविणे, पुस्तक कटिंग, लॅमिनेशन आणि फ्रेमिंग, फ्लेक्स छपाईचे तंत्र, हवामानातील बदल आणि तापमानामुळे होणारे कागदाच्या गुणवत्तेतील बदल, डिजिटल छपाईची क्रांती इत्यादी विषयी माहिती देण्यात आली, असे आयोजक स्वतंत्र जैन यांनी सांगितले.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना कागदाची मूल्ये आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा हे समजले.