मुंबईत सीबीआयने एफएसएसएआय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना केली अटक

Date:

मुंबई, 6 मे 2024

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने सहाय्यक संचालक, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय), प्रादेशिक कार्यालय, मुंबई आणि खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तीन व्यक्तींसह चार जणांना अटक केली आहे. यामध्ये ठाणे स्थित एका खाजगी कंपनीचा संचालक,  एक वरिष्ठ व्यवस्थापक आणि आणखी एक प्रतिनिधी यांचाही समावेश आहे.  या  खाजगी कंपनीची प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी 1.20 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. 

सीबीआयने सहाय्यक संचालक (तांत्रिक विभाग) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्यासह तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये ठाणे स्थित खाजगी कंपनीचे संचालक आणि एक वरिष्ठ व्यवस्थापक, खाजगी कंपनी, आणि आणखी एक अज्ञात व्यक्ती यांचाही समावेश आहे.  सहाय्यक संचालक एफएसएसएआय, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, हे अनेक मध्यस्थांच्या संगनमताने, सार्वजनिक सेवक या नात्याने सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यात अप्रामाणिकपणा अन्न पदार्थ व्यवसायिक  आणि इतर इच्छुकांकडून लाच मागणे आणि स्वीकारणे या बेकायदेशीर आणि भ्रष्ट पद्धतींमध्ये गुंतलेले आहेत अशा आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.  आरोपी अधिकाऱ्याने खाजगी कंपनीच्या आरोपी वरिष्ठ व्यवस्थापकाकडून लाच घेण्यास सहमती दर्शवली होती.

सीबीआयने सापळा रचून आरोपी सहाय्यक संचालक, एफएसएसएआय याला सदर वरिष्ठ व्यवस्थापक आणि खाजगी कंपनीच्या दुसऱ्या प्रतिनिधीकडून 1,20,000/- रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.  लाचेच्या पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली.  त्यानंतर खासगी कंपनीच्या आरोपी संचालकालाही अटक करण्यात आली.

आरोपींच्या कार्यालयात आणि निवासी परिसरात झडती घेण्यात आली असून, त्यामध्ये सुमारे  37.3 लाख रुपये रोख रकमेच्या स्वरूपात तर सुमारे 45 ग्रॅम सोने आणि विविध स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे आढळली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना  न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 08.05.2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रिव्हर फ्रंट, रोपवे, काचेचा पूल प्रकल्पांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहाणी

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : महानगरपालिकेच्या या वर्षीच्या...

बाप्पू मानकर, रंजना टिळेकर,मंजुश्री खर्डेकराना प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी संधी…

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज विचारात घेऊन बहृत आराखडा तयार करा

वीज उपकेंद्राच्या जागेसाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना सोकारे-बोर्डीकर...

लोणीकंदमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा; अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिक्रमण...