पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यांत सुधांशु मेडसीकर, अमित देवधर, तन्मय चोभे व केदार नाडगोंडे हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 2 ते 5 ऑगस्ट 2018 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे आणि ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून स्पर्धेला ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत 15 वर्षाखालील गट, महिला गट, 45 वर्षावरील गट आणि खुला गट अशा विविध गटातून 166 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने करण्यातआली असून 8 संघांमध्ये याची विभागणी करण्यात आली आहे.
या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो याचा आम्हाला आनंद असल्याचे आश्विन त्रिमल यांनी सांगितले.
स्पर्धेमध्ये पुरूष खेळाडूंसह महिला व 45 वर्षावरील गटातील प्रत्येकी 3 खेळाडूंचा प्रत्येक संघात समावेश असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सामन्यासाठी गटानुसार 1 गुण दिला जाणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने होणार असून दोन गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीस पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पीबीएलचे आयुक्त विवेक सराफ व क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांक हळबे यांनी सांगितले.
या वर्षीच्या स्पर्धेचे वौशिष्ट म्हणजे या वर्षी स्पर्धेत सर्वाधीक 166 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पध्दतीने स्पर्धेचे स्वरूप करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. संघातील प्रत्येक स्पर्धकाने किमान एक सामना खेळल्यास या वर्षी प्रत्येक संघाला शंभर टक्के सहभागासाठी 3 बोनस गुण देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत कॉंमेटस्(पराग चोपडा), फाल्कन्स्(मधुर इंगळहाळीकर), इम्पेरिअल स्वान्स(आदित्य काळे), किंगफिशर्स (तन्मय चोभे), ब्लॅक हॉक्स: आलोक तेलंग, ईगल्स(अमित देवधर), स्पुटनिक्स(बाळ कुलकर्णी), रायझिंग रावेन्स(केदार नाडगोंडे) हे 8 संघ झुंजणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमुद केले.
8 संघांची अ व ब अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ खेळेल. अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सुवर्ण खुला दुहेरी, रौप्य खुला दुहेरी, सुवर्ण मिश्र दुहेरी, रौप्य मिश्रदुहेरी,रौप्य खुला दुहेरी, लहान वयोगटातील सामना, सुवर्ण 45 वर्षावरील दुहेरी व सुवर्ण खुला दुहेरी अशा गटांमध्ये सामने होणार आहेत.
स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये शशांक हळबे, विवेक सराफ, उदय साने, गिरिश करंबेळकर, देवेंद्र चितळे, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, बिपिन चोभे, रणजित पांडे, तुषार नगरकर, सिध्दार्थ निवसरकर, अभिजीत खानविलकर, कपिल खरे यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल रेफ्री श्री उदय साने हे चीफ रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत.
स्पर्धेतील सहभागी संघांची व संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे
कॉमेट्स- सुधांशू मेडसीकर, पराग चोपडा, आदिती रोडे, संग्राम पाटील, विवेक जोशी, अविनाश दोशी, हर्षवर्धन आपटे, विनित रुकारी, अनिकेत सहस्त्रबुध्दे, राजशेखर करमरकर, जनक वाकणकर, आनंद शहा, विमल हंसराज, अवनी देशमुख, भाग्यश्री देशपांडे, अभय राजगुरू, कुणाल भुरट, राहुल गांगल, अवनी देशमुख, अर्जुन पाटील, संजना पाटील
इगल्स- अमित देवधर, अंकित दामले, मिहिर पाळंदे, सारंग आठवले, तुषार नगरकर, मिहिर केळकर, अनिष राणे, गिरिष मुजुमदार, रवी बापट, राजेंद्र नाखरे, विनायक करमरकर, शिवकुमार जावडेकर, रवी कासट, गौरी कुलकर्णी, ईशा साठे, शमिका एरंडे, सौरभ शिरोडकर, रोहन छाजेड, आर्य नगरकर, अनन्या राजवाडे, आदित्य लाखे.
फाल्कन्स – अतुल बिनिवाले, तेजस किंजवडेकर, निखिल शहा, विक्रांत पाटील, देवेंद्र चितळे, अजिंक्य मुठे, मधुर इंगळहाळीकर, चैत्राली नवरे, गिरीश करंबेळकर, प्रशांत वैद्य, सचिन जोशी, मृदुला राठी, राधा चिरपुटकर, अशिष देसाई, सलील गुप्ते, रोहित बर्वे, अमित धर्मा, सचिन अभ्यंकर, अर्जुन खानविलकर, यश चितळे.
हॉक्स- सुमेध शहा, आलोक तेलंग, अश्विन शहा, सुरेश वाघेला, बिपिन देव, हर्षद बर्वे, दिपा खरे, राजश्री भावे, हरिष गलानी, हेमंत पाळंदे, अमर श्रॉफ, आकाश सुर्यवंशी, संदिप तपस्वी, आनंद घाटे, शैलेश बोथरा, शिला कोपर्डे, आशुतोष देशपांडे, सचिन काळे, मिथाली कुलकर्णी, विष्णु गोखले, सारा ठाकुर
किंगफीशर- तन्मय चोभे, वृषी फुरीया, गायत्री वर्तक, करण पाटील, अव्दैत जोशी, मकरंद चितळे, संतोष पाटील, मिहिर विंझे, नकुल दामले, नीरज दांडेकर, प्रशांत कुलकर्णी, अभिषेक ताम्हाणे, अभिजीत राजवाडे, अनया तुळपुळे, अनिल आगाशे, चारूदत्त साठे, अश्विन त्रिमल, शुभंकर मेनन, निखिल चितळे, रिद्धिमा रुकारी, विश्वा रूकारी.
रावेन्स- केदार नाडगोंडे, श्रीयश वर्तक, तन्मय आगाशे, कुणाल पाटील, चेतन व्होरा, अनिकेत शिंदे, दिप्ती सरदेसाई, मंदार विंझे, वेदांत खतोड, आयुष गुप्ता, संदिप साठे, विश्वेश कटक्कर, प्रांजली नाडगोंडे, तनया केळकर, जयकांत वैद्य, कौस्तुभ वाळींबे, केदार देशपांडे, सोहम गांधी, आनंदीता गोडबोले, इशान गुप्ते, मुग्धा पाटील.
स्पुटनिक्स- सिध्दार्थ निवसरकर, सिध्दार्थ साठे, रणजीत पांडे, अनिरुध्द आपटे, बाळ कुलकर्णी, गोपीका किंजवडेकर, प्रिती फडके, अनिल देडगे, शैलेश लिमये, जयदीप कुंटे, अमोद प्रधान, तुषार मेंगाळे, आशुतोष सोमण, विरल देसाई, दिया मुथा, मिहिर आपटे, आशिष राठी, तन्मय चितळे, माया निवसरकर, आरुषी पांडे.
स्वान्स- तेजस चितळे, आर्य देवधर, आदित्य काळे, सारा नवरे, अमोल मेहेंदळे, बिपिन चोभे, सारंग लागु, प्रिती सप्रे, नरेंद्र पटवर्धन, निलेश केळकर, सुदर्शन बिहानी, देबश्री दांडेकर, दत्ता देशपांडे, विक्रम ओगले, चिन्मय चिरपुटकर, कर्णा मेहता, यश बाहुलीकर, ईशान लागु, अमेय कुलकर्णी, पार्थ केळकर.