Home Blog Page 1557

लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या हस्ते खडकी येथे लष्करी रुग्णालयात पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

पुणे, 3 मे 2023

पुण्यातील  खडकी येथील लष्करी रुग्णालयात, पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतींवर उपचार करणारे सर्वात मोठे केंद्र आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या पॅराप्लेजिक आणि टेट्राप्लेजिक सैनिकांना सेवा देणारे हे केंद्र आता रूग्णांना अद्ययावत सेवा देत आधुनिकीकरणाच्या नवीन टप्प्यात दाखल झाले आहे. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख (जीओसी-इन-सी सदर्न कमांड) लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह एव्हीएसएम,वायएसएम, एसएम, व्हीएसएम यांनी आज एका विशेष सोलर वॉटर हीटिंग प्लांटचे आणि संगणकीकृत डायनॅमिक स्टेअर ट्रेनरचे उद्घाटन केले.

या केंद्रासाठी विशेष सोलर वॉटर हीटिंग प्लांटची संकल्पना सोल्जर्स इंडिपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन (सिर्फ) या अग्रगण्य स्वयंसेवी आणि कल्याणकारी संस्थेची आहे.सैनिकांचे अधिकाधिक हित साधण्यासाठी उभ्या राहिलेल्या या संस्थारूपी चळवळीचे नेतृत्व सिर्फच्या सह-संस्थापक सुमेधा चिथडे अव्यहतपणे करत आहेत. त्यांचे पती दिवंगत योगेश चिथडे हे माजी सैनिक होते. त्यांनीच सुरू केलेल्या या भव्य कल्याणकारी कार्याला सुमेधा यांनी तितक्याच दूरदर्शीपणे आणि उत्कृष्टपणे पुढे नेले आहे. पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे आयुष्य आमूलाग्र बदलून गेलेल्या शूर सैनिकांच्या जीवनात पुन्हा आनंद यावा आणि त्यांना आराम मिळावा यासाठी सुमेधा यांनी खर्च केलेली शक्ती आणि त्यांचा दृढनिश्चय त्यांच्याशी संवाद साधताना दिसून येतो. विशेष वॉटर प्लांटच्या उभारणीमुळे रुग्णांच्या या विशेष गटासाठी रुग्ण सेवेचा एक नवीन टप्पा  सुरू झाला आहे.

सिर्फ टीमचा लक्ष केंद्रित दृष्टिकोन आणि अथक समर्पणाची भावना याची प्रशंसा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी केली. त्यांनी पॅराप्लेजिक सैनिकांना कॉम्प्युटराइज्ड डायनॅमिक स्टेअर ट्रेनर समर्पित केले. या ट्रेनरमुळे गंभीर अपंगत्व आलेल्या रूग्णांना पुन्हा उभे राहण्याचे आणि चालण्याचे प्रशिक्षण देणे शक्य होईल. अत्याधुनिक उपकरणे पॅराप्लेजिक रूग्णांच्या कमकुवत झालेल्या स्नायूंची क्षमता वाढवतात. त्यामुळे त्यांना पायऱ्या चढणे, उतारावर चालणे आणि कमीतकमी आधार घेत उभे राहणे यासारख्या क्रिया पुन्हा सुरू करता येतात.संगणकीकृत स्टेअर ट्रेनर अनेक महिने रुग्णामध्ये झालेल्या सुधारणेचे वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करून प्रशिक्षण आणि मूल्यांकन करतो. या केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांना अद्ययावत आणि सर्वोत्तम आधुनिक सुविधा पुरविण्याच्या गरजेचा सिंह यांनी पुनरुच्चार केला. सुमेधा चिथडे आणि सिर्फच्या टीमचा त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल आणि सैनिकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या समर्पणाबद्दल सिंह यांच्या हस्ते यावेळी सत्कार झाला.

 भारतीय सशस्त्र दले युद्ध आणि शांतता या दोन्ही काळात स्वतःची काळजी स्वतः घेतात. पुण्यातील खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या सैनिकांवर उपचार केले जातात आणि स्पाइनल कॉर्ड इज्युरी सेंटरमध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाते. जखमी आणि त्यांची काळजी घेणाऱ्या सर्वांसाठी ही प्रक्रिया वेदनादायक आणि निराशाजनक असते, पण हळूहळू का होईना त्यांना त्यांच्या चिकाटीचे फळ मिळते. रुग्णांच्या जीवनात नवीन आशा निर्माण करून त्यांच्या जीवनाला नवा अर्थ देण्यासाठी या अत्याधुनिक केंद्रातील समर्पित चिकित्सक, नर्सिंग कर्मचारी, पुनर्वसन तज्ञ चोवीस तास काम करतात. या रूग्णांसाठी अत्यावश्यक असलेले पुनर्वसन करून त्यांना समाजाचा पुन्हा एक भाग बनवणे यासाठी हे केंद्र प्रयत्नशील आहे. हे दृढनिश्चयी सैनिक रूग्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरा-ऍथलेटिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा व्हायला आवडेल

मुंबई, 3 मे 2023

प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा व्हायला आवडेल. भारतातील प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र खूप झपाट्याने प्रगती करत असतानाच जागतिक दर्जा गाठण्यासाठी त्यांना खूप पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी त्यांना आपला दर्जा वाढवावा लागेल. जगाला भारतीय कथा, किस्से आणि भारतीय संस्कृतीत रस आहे, असं केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले. मुंबईत आयोजित फिक्की फ्रेम्सच्या 23 व्या सोहळ्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमाला संबोधित करताना ते आज बोलत होते. मनोरंजन व्यवसायाशी निगडीत, आशियातील सर्वात मोठ्या आणि नियमित अधिकृत वार्षिक जागतिक संमेलनापैकी एक असलेल्या फिक्की फ्रेम्सचा हा 23 वा सोहळा, 3 ते 5 मे 2023 या कालावधीत, मुंबईत पवई इथे हॉटेल वेस्टिन मध्ये होत आहे.

या उद्योगासमोर असलेल्या मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या आव्हानांवर मात करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की उद्योग जगताला मनुष्यबळाचा पुरवठा होण्यासाठी, सरकार अधिकाधिक संस्था स्थापन करण्यासाठी वचनबद्ध आहे.

अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ग्राफिक्स या क्षेत्रांमध्ये भारतापाशी प्रचंड क्षमता आहे. ए व्ही जी सी  कृती दलाची स्थापना आणि ए व्ही जी सी साठी राष्ट्रीय धोरण तयार केल्यामुळे, भारत ए व्ही जी सी उद्योगात जागतिक नेतृत्व करण्याच्या मार्गावर आहे, असं सचिव म्हणाले. विद्यार्थ्यांना बालवयातच वेगाने वाढणाऱ्या या मनोवर्धक क्षेत्राची ओळख व्हावी, यासाठी शालेय अभ्यासक्रमात ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ग्राफिक्स आणि कॉमिक्स कशाप्रकारे समाविष्ट करता येतील, हे सरकार बघणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.  मुंबईत पुढील वर्षी, राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्र कार्यान्वित होईल अशी सरकारला अपेक्षा आहे, असही त्यांनी नमूद केलं.

नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन (राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहीम) बद्दल बोलताना सचिव म्हणाले की चित्रपट रसिक आणि सामान्य नागरिक त्यांच्या आवडत्या चित्रपटांचे डिजिटलीकरण आणि पुनर्नवीकरण करण्यासाठी निधी देऊ शकतील असा उपक्रम सरकार लवकरच सुरू करणार आहे. ते पुढे असही म्हणाले की, सरकारने, पाच हजारांहून अधिक विशिष्ट चित्रपट आणि लघुपटांचे डिजिटलीकरण आणि पुनर्नवीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी 1400 चित्रपट आणि लघुपटांचे डिजीटलीकरण आधीच पूर्ण झालं आहे.

एन एफ डी सी ची भूमिका अधोरेखित करताना सचिव म्हणाले की एरवी निधी न मिळू शकणाऱ्या प्रकल्पांना  वित्तपुरवठा करायला हवा आणि तरुण चित्रपट निर्मात्यांना आर्थिक पाठबळ पुरवायला हवे. 

मनोरंजनाच्या बाजारपेठेत प्रदर्शनासाठी संधी न मिळणाऱ्या चित्रपटांना प्रदर्शित करण्यासाठी NFDC चे स्वतःचे OTT व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची आमची इच्छा आहे. यामुळे तरुण प्रतिभावंतांना त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी मिळेल, असही त्यांनी सांगितलं.

अलीकडच्या धोरणात्मक निर्णयांमुळे चित्रपट विषयक चाचेगिरीला आळा बसेल अशी आशा व्यक्त करत सचिव म्हणाले की कलाकृतींच्या चाचेगिरीवर (पायरसी) कठोर कारवाई करता येण्यासाठी, केंद्रीय  मंत्रिमंडळाने अलीकडेच चित्रिकरण कायद्यात दुरुस्तीला मंजुरी दिली आहे.  हा कायदा संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाण्याची अपेक्षा आहे. तो लवकरच मंजूर होईल अशी आशा आहे. यामुळे, परवानगीविना मूळ #films ची नक्कल करुन (पायरेटेड) अवैध प्रसारण करणाऱ्या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचे थेट अधिकार सरकारला मिळतील, असं त्यांनी सांगितलं.

संधीची कवाडे: सर्वत्र विस्तारत असणारे भारताचे प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्र, या FICCI- EY प्रसारमाध्यमे आणि उद्योग अहवालाचे, अपूर्व चंद्रा, यांनी यावेळी अनावरण केले. या अहवालानुसार या उद्योगाने दोन लाख कोटी रुपयांच्या ऊलाढालीचा टप्पा पार केला आहे. या उद्योगांने 2021 या वर्षाच्या तुलनेत 20 टक्के वृद्धीची नोंद केली आहे.

तसेच यावेळी फिक्कीचे अध्यक्ष आणि, इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुभ्रकांत पांडा,  फिक्कीच्या मीडिया आणि मनोरंजन समितीच्या अध्यक्ष आणि वायकॉम 18 मीडिया च्या कार्यकारी प्रमुख, ज्योती देशपांडे, सुप्रसिद्ध अभिनेते आयुष्मान खुराना मीडिया आणि मनोरंजन, ईवाय चे भागीदार आशिष फेरवानी आणि फिक्कीचे सरचिटणीस  शैलेश पाठक हे ही उपस्थित होते.

यावेळी आयुष्मान खुराना यांनी सांगितले की, “ तुम्ही जेवढे स्थानिक गोष्टींवर लक्ष देता,  तेवढेच तुम्ही अधिकाधिक वैश्विक होत जाता. आपली चित्रपटसृष्टी आज ह्या क्षेत्रातील वैश्विक महत्तेच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि आज जेव्हा जगभरातल्या संस्कृती एकमेकांत विरघळून काही नवे सृजन होत आहे, अशा काळात माझा जन्म झाला आहे, हे मी माझं भाग्य समजतो. ह्या सृजनशीलतेच्या जगन्नाथाचा रथ ओढण्याचे नेतृत्व भारताकडे आले आहे, आणि आज जगभरात भारतीय चित्रपट सृष्टीचे स्वागत होत आहे.”

आपल्या स्वागतपर भाषणात, फिक्कीचे अध्यक्ष सुभ्रकांत पांडा यांनी भारतीय मीडिया आणि मनोरंजन विश्वात दिवसेंदिवस उन्नत होत जाणाऱ्या विकासाची गाथा उलगडून सांगितली. भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग गेल्या अनेक वर्षांमध्ये 10.5% च्या CAGR वर पोहोचला आहे. 2022-2023 मध्ये हा उद्योग 11.4% च्या सरासरी दराने वाढला. या उद्योग क्षेत्रात असलेली लवचिकता, टिकून राहण्याची वृत्ती, आणि सातत्याने नवनवीन बदल होत जाणाऱ्या या क्षेत्रात असलेली नव्या संधी निर्माण करण्याची क्षमताच यातून सिद्ध झाली आहे. भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग डिजिटल क्रांतीच्या कालखंडातून वाटचाल करत असताना,  परिवर्तनाचा हा एक महत्त्वाचा क्षण आहे,”  असे ते म्हणाले.

हे तीन दिवसीय फिक्की फ्रेम्स संमेलन, विविध व्यक्ती, देश आणि समूह यांच्यातील कल्पना आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरेल. या वर्षीच्या संमेलनाची संकल्पना ‘प्रेरित करा- अभिनव कल्पना साकारा आणि त्यात मग्न व्हा’ अशी आहे. चित्रपटउद्योग क्षेत्रात होत असलेल्या उत्क्रांतीचा उत्सव साजरा करत, या उद्योगाच्या भवितव्यावर पडणाऱ्या प्रतिबिंबाविषयी इथे विचारमंथन केले जात आहे. संमेलनाच्या कार्यक्रमात पॅनेल चर्चा, परिषदा, प्रदर्शने, गप्पा-संवाद, मास्टरक्लास आणि कार्यशाळा यांचा समावेश आहे. यात  चित्रपट, टेलिव्हिजन, ॲनिमेशन, गेमिंग, संगीत आणि डिजिटल मीडिया आणि मीडिया आणि मनोरंजन उद्योगाशी संबंधित इतर उपक्षेत्रे अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.

फिक्की फ्रेम्स मधील कार्यक्रमांची सविस्तर माहिती आणि वेळापत्रक –  https://www.ficci-frames.com/assets/download/FICCIFRAMES2023-Programme.pdf वर बघता येईल.

युवापिढीने आदिवासींसाठी देवदूत बनावे : डॉ. श्रीपाल सबनीस

एटापल्ली’च्या ४० विकासदूतांसाठी त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनतर्फे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

पुणे : “दुर्गम भागात, जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाला रस्ते, वीज, पाणी आदी चांगल्या पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे. शिक्षण, आरोग्याच्या सुविधा देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात येण्याची संधी द्यायला हवी. युवापिढीने शिक्षण घेऊन विकासाचा मार्ग आदिवासींपर्यंत घेऊन जावा व त्यांच्यासाठी देवदूताप्रमाणे विकासदूत म्हणून काम करावे,” असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
सुरजागड (गडचिरोली) येथील लॉयड्स मेटल अँड एनर्जी प्रा. लि. आणि त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसीय व्हीलेज आउटरीच सेंटरमधील विकासदूत प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाला. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमावेळी माजी प्रधान सचिव डॉ. उज्ज्वल उके, लॉयड्स मेटल अँड एनर्जीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एल. साईकुमार, त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या संस्थापक प्रज्ञा वाघमारे, राज्य समन्वयक प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
एटापल्लीच्या २०-२२ गावांतून आलेल्या तरुणांना विकासदूत म्हणून प्रशिक्षित केले आहे. व्यक्तिमत्व विकास, सार्वजनिक वर्तणूक, तंत्रज्ञान आदींचे प्रशिक्षण त्यांना मिळाले. दहा दिवसांत या ४० विकासदूतांना बालेवाडी क्रीडासंकुल, पुणे मेट्रोची सफर, आदिवासी विभागाचे कार्यालय व संग्रहालय, वर्तमानपत्राचे कार्यालय, छापखाना आदी गोष्टी दाखवण्यात आल्या. 
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “आदिवासी संस्कृती समृद्ध आहे. या समाजाने अनेक क्रांतिकारक, लेखक, साहित्यिक दिले आहेत. संस्कृतीचा, पर्यावरणाचा वारसा जोपासणारा हा समाज आहे. शासन, राजकीय पुढाऱ्यांकडून मात्र, या समाजाकडे म्हणावे तितके लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आदिवासी पट्ट्यात अजूनही विकास पोहोचलेला नाही. पायाभूत सुविधांसह शिक्षणाच्या, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर आदिवासींचे जीवनमान उंचावेल. आदिवासींच्या भल्यासाठी त्रिशरण फाउंडेशनने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.”
डॉ. उज्वल उके म्हणाले, “मूलभूत शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी, दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणे हा विकास आहे. या सोयीसुविधा आपापल्या गावात नेण्याचे काम विकासदूत म्हणून तुम्हाला करायचे आहे. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचा आवाज बना. आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे भले झाले, तर जगण्याचे सार्थक झाले, असे समजावे.”
एल. साई कुमार म्हणाले, “गडचिरोलीत लोहखनिज आहे, तसे जनतारूपी हिरेही आहेत. या हिऱ्यांना थोडे पॉलिश केले, तर तेही इतरांप्रमाणे चमकतील, या विचारातून ‘लॉयड्स’चे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांनी आउटरीच सेंटर सुरु असून, या माध्यमातून शासकीय योजना व ‘लॉयड्स’च्या सीएसआर योजना गावागावात पोहोचतील. लवकरच येथे शाळा आणि आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे.”
प्रज्ञा वाघमारे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या मुलांमध्ये खूप काही करण्याची जिद्द आहे. त्यांना स्वप्ने दाखवली, तर ते त्याच्या पूर्ततेसाठी समर्पित भावनेने काम करतात. गाव-तालुक्याबाहेर आपण जाऊ शकतो, इतरांप्रमाणे आपण जगू शकतो, याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला आहे. विकासदूताचा प्रयोग आपल्यात आणि त्यांच्यात असणारे अंतर कमी करून त्यांना जोडणारा हा पूल आहे.
प्रशिक्षणादरम्यान आदिवासी विभागाचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, कृषी आयुक्तालयातील अधिकारी विश्वजित सरकाळे, वरिष्ठ पत्रकार अरुण खोरे, सम्राट फडणीस, स्वप्नील पोरे, पुणे मेट्रोचे हेमंत सोनावणे आदींनी मार्गदर्शन केले. प्रशांत वाघमारे यांनी आउटरीच सेंटर व तेथील प्रशिक्षणाविषयी सांगितले. जिल्हा समन्वयक मंगलदास मशाखेत्री यांनी सूत्रसंचालन केले. रचना कांबळे यांनी आभार मानले.

‘जल जीवन मिशन’अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. 3: जल जीवन मिशन या केंद्रशासनाच्या महत्वकांक्षी योजनेत जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत; त्यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित कामांबाबत कृती आराखडा तयार करुन प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असून केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामे करावीत. संबंधित अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी करावी. मान्सूनच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत.

अभियानातील कामांसाठी जलसंपदा, महसूल, वन, रेल्वे, आणि इतर विभागाकडील जागेच्या प्रलबिंत भूसंपादनाचे प्रस्ताव मार्गी लावावेत. प्रलंबित सरकारी जागांबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी लवकरात लवकर पाठवावे. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात १ हजार २२४ पाणीपुरवठा योजना मंजूर असून १ हजार १३६ योजनांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. १ हजार २१ योजनांची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रकल्पाअंतर्गत रस्ते आदी कामे सुरु असून पाणीपुरवठा योजनांची कामे करताना या बाबीचाही विचार करावा. कामे करतांना प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करावा. कंत्राटदारांनी मे महिन्याअखेर दिलेली कामे पूर्ण करावीत. याकरीता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

श्रीमती कडू यांनी तालुकानिहाय योजनांच्या माहितीचा आढावा घेतला.

कार्यकारी अभियंता श्री. खताळ यांनी जल जीवन मिशन (हर घर जल) अंतर्गत सुरु असलेल्या कामाबाबत माहिती दिली. प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट

पुणे दि. ३: केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांनी येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेस भेट देऊन शाळेचा परिसर, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक लॅब, निवास व्यवस्था, भोजनगृह, खेळाचे मैदान तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयी सुविधांची माहिती घेतली. शाळेतील सुविधांविषयी समाधान व्यक्त करून शाळेला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

श्री. वावा हे आयोगाच्या कामकाजासाठी पुणे दौऱ्यावर आले असून प्रारंभी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी त्यांची शासकीय विश्रामगृह पुणे येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना भारतीय राज्यघटनेची प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रमय चरित्र हा ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले.

बार्टी संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, ‘घर घर संविधान’ उपक्रम आदींची माहिती दिली. बार्टी द्वारा संचलित येरवडा येथील निवासी शाळेत सफाई कामगारांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण शालेय उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती श्री.वारे यांनी दिली .

बार्टी संस्थेच्या निबंधक इंदिरा अस्वार यांच्या हस्ते आयोगाच्या सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री चेंडके, प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे, शाळेतील शिक्षक व कर्मचारी सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000

निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपातीबाबतचा विकल्प भरून देण्याचे आवाहन

पुणे दि. ३: निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपात जुन्या कर प्रणालीनुसार करावयाची असल्यास याबाबतचा विकल्प २५ मे २०२३ पर्यंत सादर करावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी पुणे यांनी केले आहे.

शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या पुणे शहर व जिल्ह्यातील वार्षिक निवृत्तीवेतन रुपये ७ लाख ५० हजार पेक्षा जास्त असलेल्या सर्व आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातून आयकर नियमान्वये दरवर्षी व दरमहा आयकर कपात करण्यात येते. सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षापासून आयकर विभागाकडून आयकर नियमात बदल झाले असून दोन पद्धतीने आयकर कपात करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये जुनी कर प्रणाली स्वीकारण्यामध्ये आयकर स्लॅबमध्ये बदल झाले असून जर जुन्या कर प्रणाली नुसार आयकर गणना करावयाची असल्यास निवृत्तीवेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे येथे विकल्प भरून देणे आवश्यक आहे.

आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांना आपला आयकर कपात जुन्या कर प्रणालीनुसार करावयाचा असल्यास याबाबतचा विकल्प २५ मे पर्यंत सादर करावा. विहित मुदतीत विकल्प सादर न केल्यास त्याचा २०२३-२०२४ करीता नवीन कर प्रणालीनुसार आयकर कपात करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे कोषागार कार्यालय पुणेतर्फे कळविण्यात आले आहे.
0000

जावा येझ्दी मोटरसायकल्सचे रायडिंग आणखी असामान्य करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची जोड

·         जावा आणि येझ्दी मोटरसायकल्स श्रेणीमध्ये अधिक चांगली रायडिंग क्षमता आणि कामगिरीसाठी नव्या अपडेट्सचा समावेश

पुणे, ३ मे २०२३ – नव्याने तयार करण्यात आलेल्या जावा येझ्दी मोटरसायकल्सच्या श्रेणीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून त्यायोगे रायडिंगचा अनुभव आणखी उंचावणार आहे. यामुळे या मोटरसायकल्सची रायडिंग क्षमता तसेच बारकावे आणखी ठळक होणार असून श्रेणीचे एकंदर मूल्यही वाढणार आहे. नव्या मोटरसायकल्स ब्रँडच्या पॅन भारतातील सर्व डीलर्सकडे उपलब्ध केल्या जातील. या बदलांबरोबरच या मोटरसायकल्स बीएस- सिक्स फेज २ नुसार (ओबीडी२) उत्सर्जनाच्या नियमांचे पालन करतील.

या घोषणेविषयी जावा येझ्दी मोटरसायकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणाले, ग्राहकांना दर्जेदार कामगिरी आणि रायडिंगचा जबरदस्त अनुभव मिळावा म्हणून सुरुवातीपासूनच जावा येझ्दी मोटरसायकल्सने तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले आहे. ओबीडी२ नियमांचे पालन करणे महत्त्वाचे होते व त्याचबरोबर आम्ही रायडर्सचा अभिप्राय लक्षात घेत संपूर्ण श्रेणीमध्ये विविध सुधारणा केल्या आहेत. नव्या मोटरसायकल्स दैनंदिन प्रवास जास्त सोपा करणाऱ्या, सफाईदार आणि रायडरची एकंदर कामगिरी उंचावणाऱ्या आहेत. किंमतीमध्ये जराशीच वाढ करण्यात आली असून त्यामुळे या मोटरसायकल्स चांगले मूल्य देणाऱ्या सर्वोत्तम पर्याय ठरत आहेत.

मोटरसायकल्स जास्त सफाईदार करण्यासाठी व त्यातली थरारकता टिकवून ठेवण्यासाठी सर्व बदल जावा आणि येझ्दी मॉडेल्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

४२ स्पोर्ट्स स्ट्राइप, ४२ बॉबर आणि पेराक यांचा समावेश असलेल्या जावा श्रेणीमध्ये अधिक चांगल्या एनव्हीएच पातळीसाठी महत्त्वाच्या इंजिन घटकांची अधिक चांगल्या प्रकारे सांगड घालण्यात आली आहे. इंजिन पुन्हा तयार करण्यात आले आहे व रायडिंगचा दर्जा सुधारावा तसेच उत्सर्जन नियंत्रणाखाली राहावे म्हणून जास्त मोठी थ्रॉटल बॉडी आणि एक्झॉस्ट पोर्ट्स देण्यात आले आहेत.

नव्या जावा ४२ मध्ये क्लच हलका वाटावा आणि तो सहजपणे वापरता यावा यासाठी असिस्ट अँड स्लिप क्लच देण्यात आला आहे. जास्त चांगल्या एक्झॉस्ट नोटसाठी मफलरची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याशिवाय बाइकमध्ये सुधारित डिजिटल स्पीडोमीटर आणि नियमाप्रमाणे हॅझर्ड लाइट्सही देण्यात आले आहेत.

येझ्दी श्रेणीत समाविष्ट असलेल्या रोडस्टर, स्क्रॅम्बलर आणि अडव्हेंचर यांच्यातही सुधारित एनव्हीएच आणि रायडिंग क्षमतेसाठी हे बदल करण्यात आले आहेत. तिन्ही मॉडेल्समध्ये अधिक चांगल्या कामगिरीसाठी मोठे रियर स्प्रॉकेट देण्यात आले आहे. मोटरसायकल्समध्ये चांगल्या एक्झॉस्ट नोटसाठी नव्याने तयार करण्यात आलेले मफलर्स बसवण्यात आले आहेत.

वर नमूद केलेल्या सुधारणांबरोबरच नव्या जावा आणि येझ्दी मोटरसायकल्सची कामगिरी, थरारकता कायम राखण्यात आली आहे, शिवाय क्लासिक मोटरसायकल्स वेगाने धावू शकत नाहीत हा समज परत खोडून काढण्यात आला आहे.

किंमतवाढ अतिशय कमी आणि मॉडेल व व्हेरिएंटनुसार ०.८ – २ टक्के करण्यात आली आहे. नव्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत –

मॉडेलनवी किंमत (एक्स शोरूम दिल्ली)
जावा ४२ ड्युएल चॅनेल (ओरियन रेड, सिरीयस व्हाइट)1,96,142
जावा ४२ ड्युएल चॅनेल (ऑलस्टार ब्लॅक)1,97,142
जावा ४२ बॉबर (मिस्टिक कॉपर)2,12,500
जावा ४२ बॉबर(जॅस्पर रेड + व्हाइट)2,13,500
जावा पेराक2,15,187
येझ्दी स्क्रॅम्बलर2,13,187
येझ्दी रोडस्टर (स्मोक ग्रे)2,09,900
येझ्दी रोडस्टर (क्रिमसन, इनफर्नो रेड, ग्लेशियल व्हाइट)2,11,900
येझ्दी अडव्हेंचर (स्लिक सिल्व्हर)2,06,142
येझ्दी अडव्हेंचर (मॅम्बो ब्लॅक व्हाइटआउट)2,08,829

*****

पुणे विद्यार्थी गृहाचा मुद्रणातील भरीव कामगिरीबद्दल नवी दिल्लीतील ‘टेकफोरडी’ शैक्षणिक प्रदर्शनात सन्मान

पुणे, दि. ३: नवी दिल्ली येथे २८ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये झालेल्या ‘टेकफोरडी’ शैक्षणिक प्रदर्शनात पुणे विद्यार्थी गृह संस्थेला मुद्रण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल गौरवचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार डॉ. महेश शर्मा यांच्या हस्ते संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कुलसचिव अमोल जोशी, प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे यांनी हा सन्मान स्वीकारला.
यावेळी संयोजक कमल छात्रा आणि महाराष्ट्र पॅव्हेलियनचे भुवनेश कुलकर्णी, सुजीत नाईक, रणजित मयंगबाम उपस्थित होते. पुणे विद्यार्थी गृहातर्फे डॉ. कल्याणी कुलकर्णी, प्रा. मधुरा महाजन, पुणे व नाशिक येथील प्राध्यापक अंकुश पवार, चेतन पाटील, संतोष सरोदे, सोनाली काळे, आरती पिंगळे व आठ विद्यार्थी सहभागी झाले होते.
भविष्यात अनेक विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नवीन अभ्यासक्रम, शैक्षणिक स्तर श्रेणी पद्धती, प्रवेश परीक्षा यासारख्या असंख्य गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने प्रदर्शनामध्ये नामांकित व्यक्तींची व्याख्याने आयोजिली होती. पहिल्या दिवशी अकॅडमिक संदर्भात चर्चासत्र झाले. दुसऱ्या दिवशी भारतातील उद्योग संस्थांचे प्रतिनिधी यांचे विचार तसेच तिसऱ्या दिवशी स्टार्टअपच्या संबंधित विषयावर चर्चा झाली.
सुनील रेडेकर म्हणाले, “शिक्षणाचा मुख्य हेतू प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर होण्यासाठी असावा. आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप्स स्टार्ट इन इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. ११३ वर्षांचा शैक्षणिक इतिहास असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाने प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. नवनवीन अभ्यासक्रम, स्टार्टअप, मुद्रणातील १९२६ पासून संस्थेचे कार्य आणि संशोधन यासह संस्थेच्या इतर शाखामधील शैक्षणिक सुविधांची माहिती प्रदर्शित करण्यात आली.”

लवकरच पुणे विद्यार्थी गृहामध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या मदतीने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) येथील रिसर्च फॉर फाऊंडेशनच्या सहयोगाने भारतातील पहिले डिजीटल ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या वतीने व ‘एआयसीटीई’च्या सहयोगाने नवीन शिक्षण धोरणावर संस्थांसाठी चर्चासत्र आयोजित केले जाणार असल्याचे रेडेकर यांनी सांगितले.
चार सामंजस्य करारतीन दिवसांच्या प्रदर्शनात भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे, दहा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी भाग घेतला. वीसपेक्षा अधिक सहकारी प्रतिनिधी यांनी हजेरी लावली. सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि इंग्लंड देशांच्या प्रतिनिधीसोबत पुणे विद्यार्थी गृह संस्थेने सामंजस्य करार केल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. तसेच भारतातील बेंगलोर, दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद येथील ट्रीपल आयटी या शासकीय विद्यापीठाशीही सामंजस्य करार करण्यात आल्याचे रेडेकर म्हणाले.

आमदार संग्राम थोपटे यांची धान्य तुला.

पुणे –       काँग्रेस भवन शिवाजीनगर पुणे येथे पुणे जिल्ह्याचे आमदार संग्रामदादा थोपटे यांची धान्य तुला करण्यात आली. तसेच विश्वाचे शांततेचे प्रतिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची सोन्याची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले.  कार्यक्रमाचे आयोजन मुकेश मधुकरराव धिवार यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष द. स. पोळेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हे होते. तसेच सौ. राधिका मखामले , सौ. कल्पना उनावने , इंटकचे इंटकचे ॲड. फैयाज शेख, भोसले सर, अजय कांबळे, माजी नगरसेविका निता राजपूत,  यासीन शेख, साबिस्तीन अडगळे, सुजीत म्हस्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर यांची निवड

मुंबईदि मे २०२३ : महावितरणचे संचालक (मानव संसाधन)  म्हणून श्री. अरविंद भादीकर यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे.  त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे.  यापूर्वी श्री. अरविंद भादीकर हे कार्यकारी संचालक वितरण आणि मानव संसाधन (प्रभारी) म्हणून कार्यरत होते व त्यांनी या दोन्ही पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे.

अमरावती येथील मूळचे रहिवासी असलेले श्री. भादीकर हे अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. झाले आहेत. मार्च-१९९२ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत  मंडळात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे कनिष्ठ अभियंता म्हणून ते रुजू झाले.

 खडका येथील ४०० किव्हो उपकेंद्रात सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता म्हणूनही त्यांनी काम केले. २००५ मध्ये वाशीम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच  मुख्यालयातील पायाभूत आराखडा, नागपूर ग्रामीण मंडल व अमरावती मंडल येथे अधीक्षक अभियंता आणि अकोला व चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते कार्यरत होते.

देशभरात अवयव प्रत्यारोपण संख्या तिप्पट; 5000 (2013) वरून 2022 मध्ये 15,000 पेक्षा अधिक अवयव प्रत्यारोपण

नवी दिल्ली, 3 मे 2023

अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी, दूरदृष्टीने संरचनात्मक बदल घडत आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्लीत आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत  अवयवदान आणि अवयव  प्रत्यारोपणाच्या स्थितीचा आढावा घेतला , यावेळी  आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार उपस्थित होत्या.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमाच्या 99 व्या भागात देशवासियांना अवयवदानाच्या उदात्त हेतूसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.

यामुळे देशात अवयवदानाला नवे प्रोत्साहन मिळाले आहे. देशातील एकूण अवयव प्रत्यारोपणाची संख्या 2013 मधील 5000 वरून वाढून  2022 मध्ये 15000 पेक्षा अधिक  झाली आहे. आता, राष्ट्रीय (राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था.), प्रादेशिक (  प्रादेशिक  अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था) आणि राज्य स्तरावरील  (राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था)   अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थांच्या जाळ्याच्या माध्यमातून  चांगल्या समन्वयामुळे एका   मृत दात्याच्या अधिकाधिक   अवयवांचा वापर केला जात आहे उदा. सन 2016 मध्ये 930 मृत  दात्यांच्या 2265 अवयवांचा वापर करण्यात आला तर 2022 मध्ये 904 मृत दात्यांच्या  2765 अवयवांचा वापर करता आला.

रूग्णालयांमध्ये अवयव दान आणि प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शक म्हणून प्रत्यारोपण  नियमपुस्तिका  बनवण्यासाठी राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था, काम करत आहे आणि प्रत्यारोपण समन्वयकांच्या प्रशिक्षणासाठी मानक अभ्यासक्रमावर देखील काम करत आहे.  दस्तऐवजांची  पूर्तता करून लवकरच या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध केल्या जातील. कार्यक्रमाच्या योग्य  अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेमध्ये  समन्वय,माहिती, शिक्षण आणि संप्रेषण, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ /लेखा  यासाठी चार स्तंभ  तयार केले आहेत. अलीकडेच, भारत सरकारने सार्वजनिक हितासाठी विशेष कल्याणकारी उपाय म्हणून, दुसर्‍या मनुष्याला अवयव दान करणार्‍या केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांना 42 दिवसांपर्यंतची विशेष नैमित्तिक रजा  रजा मंजूर केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय देशातील अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या संख्येत वाढ करण्यासाठीच्या   आगामी  संरचनात्मक  सुधारणांसाठी आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतीं आत्मसात करत आहे. 

आयझॅक ल्‍यूक्‍सकडून पुण्‍यामध्‍ये लीवो सलोनचे उद्घाटन

लीवोने पुण्‍यामध्‍ये नवीन स्किन अॅण्‍ड अॅण्‍टी-एजिंग सेंटरचे उद्घाटन करण्‍यासाठी आयझॅक ल्‍यूक्‍ससोबत सहयोग केलाब्रॅण्‍ड क्‍लायण्‍ट्सना उच्‍च दर्जाची सेवा व निष्‍पत्ती देण्‍याप्रती त्‍याच्‍या कटिबद्धतेसाठी ओळखला जातो. नवीन सेंटरच्‍या उद्घाटनासह ते त्‍यांच्‍या क्‍लायण्‍ट्सना अद्वितीय व लक्‍झरीअस अनुभव देत राहतील.

पुणेकोरेगाव पार्कपुणे येथील प्रीमियर लक्‍झरी स्‍पा लीवो सलोनला प्रतिष्ठित स्किनकेअर व अॅण्टी-एजिंग ब्रॅण्‍ड आयझॅक ल्‍यूक्‍ससोबत सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. सहयोगाने आम्‍ही लीवो सलोनच्‍या परिसरात नवीन आयझॅक स्किन अॅण्‍ड अॅण्‍टी-एजिंग सेंटरचे उद्घाटन करत आहोतजे क्‍लायण्‍ट्सना सौंदर्याप्रती सर्वसमावेशक तृतीय श्रेणीचा दृष्टिकोन देत आहेते दीर्घकालीन निष्‍पत्ती व एकूण स्‍वास्‍थ्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यासह उपचारप्रतिबंध व देखभाल यावर भर देतात.

नवीन सेंटरमध्‍ये दोन विश्‍वांच्‍या सर्वोत्तम गोष्‍टींचा समावेश आहे – आयझॅक ल्‍यूक्‍सची अपवादात्‍मक सेवा आणि लीवो सलोनची लक्‍झरीअस सेटिंग. हे सेंटर सिग्‍नेचर फेशियल्‍सप्रगत स्किन रिज्‍यूवेनेशन ट्रीटमेंट्सलेझर हेअर रिमूव्‍हलस्लिमिंग ट्रीटमेंट्स अशा अनेक सेवा देईल. आयझॅक ल्‍यूक्‍सची अनुभवी व पात्र एस्‍थेटिशियन्‍स व टेक्निशियन्‍सची टीम अद्वितीय निष्‍पत्ती देण्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व टेक्निक्‍सचा वापर करेल. आयझॅक सोबतचा सहयोग त्‍यांच्‍या क्‍लायण्‍ट्सना त्‍यांच्‍या अपवादात्‍मक सेवेशी पूरक लक्‍झरीअस सेटिंग देईलज्‍यामधून क्‍लायण्‍ट्सना सर्वांगीण व संस्‍मरणीय अनुभवाची खात्री मिळेल. 

आयझॅक ल्‍यूक्‍स ही क्लिनिक्‍सची ब्‍युटी व एस्‍थेटिक्‍स साखळी आहेजिची भारतभरात उपस्थिती असण्‍यासोबत सेलिब्रिटी कॉस्‍मेटोलॉजिस्‍ट डॉ. गीतिका मित्तल गुप्‍ता यांनी स्‍थापना केली आहे. क्षेत्रात दशकाहून अधिक काळाचा अनुभव असलेल्‍या डॉ. गीतिका यांनी क्‍लायण्‍ट्सना अत्‍याधुनिक उपचार देण्‍यासह त्‍यांच्‍या सर्व डर्माटोलॉजी व केसासंबंधित गरजांकरिता सर्वसमावेशक व सर्वांगीण सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी आयझॅक ल्‍यूक्‍सची स्‍थापना केली. आयझॅक ल्‍यूक्‍सला सर्वोत्तम झी नॅशनल हेल्‍थकेअर लीडरशीप अवॉर्ड मिळाला आहे आणि आधुनिक विशेष तंत्रज्ञानाचा वापर करतेजे एफडीएद्वारे मान्‍यताकृत आहे.  

परिभाषित लक्‍झरीसाठी गंतव्‍य लीवो सलोनने २०२२ मध्‍ये स्‍थापनेपासून पुण्‍यात आपले नावलौकिक केले आहे. प्रणिता बावेजा यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत लीवो हे अद्वितीय लक्‍झरी स्‍पा व सलोन आहेजे सौंदर्यस्‍टाइल व आकर्षकतेच्‍या साराला परिभाषित करते. लीवो एकाच छताखाली आंतरराष्‍ट्रीय हेअर डिझाइनिंगसह मेक-अपनेल आर्टआय-लॅश एक्‍स्‍टेन्‍शन्‍समायक्रो-ब्‍लेडिंग आणि सेमी-परमनंट मेक-अप अशा इतर संबंधित सेवा देतेज्‍यांची उच्‍च प्रशिक्षितअनुभवी व समर्पित स्‍टायलिस्‍ट्सटेक्निशियन्‍स व थेरपीस्‍ट्सद्वारे हाताळणी केली जाते.

पुणेकरांना दिलेल्‍या वचनांचे पालन करत प्रणिता यांना लीवो सलोन व आयझॅक ल्‍यूक्‍स या दोन बाजारपेठ प्रमुखांच्‍या सहयोगाचा आनंद होत आहेया सहयोगाचा गाहक अनुभव वाढवण्‍याचा मनसुबा आहे. ‘‘लीवोमध्‍ये आम्‍ही विशिष्‍ट एलानसह रिफाइनमेंटरिस्‍टोरेशन व पोषणाचे वचन देतो. आमचा २०१३ पासून आयझॅक ल्‍यूक्‍ससोबत दीर्घकालीन संबंध आहे आणि पुण्‍यातील हे लाँच हा अनोखा सामंजस्‍य करार आहेज्‍याचा आम्‍हाला अत्‍यंत अभिमान आहे,’’ असे प्रणिता म्‍हणाल्‍या.

‘‘आयझॅक ल्‍यूक्‍सला क्‍लायण्‍टसना किमान किंवा विना डाऊनटाइमसह सर्वोत्तम कॉस्‍मेटिक व नॉन-इन्‍वेसिव्‍ह प्रक्रिया देण्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्‍ज असण्‍याचा अभिमान आहे. आमचे लक्ष्‍य ग्राहक प्रामुख्‍याने व्‍यस्‍त महिला व पुरूष आहेतजे त्‍यांच्‍या गतीशील जीवनाशी सामावून जाणाऱ्या वैयक्तिकृतगुणकारी व सुरक्षित स्किनकेअर आणि हेअर सोल्यूशन्‍सना महत्त्व देतात,’’ असे डॉ. गीतिका म्‍हणाल्‍या. ‘‘आयझॅक ल्‍यूक्‍स वैयक्तिकृत केअरनवोन्‍मेष्‍कारी तंत्रज्ञानदीर्घकालीन ब्‍युटी ट्रीटमेंट्स आणि आम्‍ही आमच्‍या ग्राहकांना देत असलेला तणाव-मुक्‍त अनुभव यावर लक्ष केंद्रित करण्‍याच्‍या माध्‍यमातून प्रतिस्‍पर्धींपेक्षा वरचढ आहे,’’ असे त्‍या पुढे म्‍हणाल्‍या.

लीवो सलोनच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रणिता बावेजा

आंत्रेप्रीन्‍युअर ऑफ द इअर २०२२ प्रणिता बावेजा या हुशार उद्योजिकाकुशल प्रशासक आणि उद्योग व्‍यावसायिक आहेत. नवोदित उद्योजिका असलेल्या त्‍या ट्रॅव्‍हल सर्विसेस इंटरनॅशनलच्‍या सीओओ म्‍हणून त्‍यांच्‍या कौटुंबिक व्‍यवसायामध्‍ये सामील झाल्‍या आणि कंपनीच्‍या ऑफलाइन व्‍यवसायाला त्‍यांनी ऑनलाइन मॉडेलमध्‍ये बदलले. त्‍यांच्‍या अथक प्रयतनांमुळे कंपनीने भारतमध्‍य पूर्व व आग्‍नेय आशियामध्‍ये लक्षणीय विकास संपादित केला. प्रवास व्‍यवसायामध्‍ये व्‍यापक अनुभव प्राप्‍त करत त्‍यांनी सौंदर्य उद्योगामधील आपल्‍या क्षमता वाढवल्‍या. त्‍यांनी २०१९ मध्‍ये लीवो सलोनचा भार सांभाळण्‍यापासून त्‍याची लोकप्रियता व नफा वाढला आहेतसेच हा सलोन अग्रणी लक्‍झरी ब्रॅण्‍ड बनला आहे.  

आयझॅक ल्‍यूक्‍सच्‍या संस्‍थापक डॉ. गीतिका मित्तल गुप्‍ता

डॉ. गीतिका मित्तल गुप्‍ता या अनुभवी सेलिब्रिटी कॉस्‍मेटिक डर्माटोलॉजिस्‍ट आणि दिल्‍ली-एनसीआरमधील कॉस्‍मेटिक डर्माटोलॉजीच्‍या प्रवर्तकांपैकी एक आहेत. कॉस्‍मेटिक डर्माटोलॉजीच्‍या क्षेत्रात १० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेल्‍या त्‍या २०१० मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेले प्रीमियम स्किन क्लिनिक आयझॅक ल्‍यूक्‍स – स्किन अॅण्‍ड अॅण्‍टी-एजिंग सेंटरच्‍या वैद्यकीय संचालक आहेत. हे सेंटर डर्माटोलॉजीअॅण्‍टी-एजिंगबॉडी शेपिंग व अॅण्‍टी-हेअर लॉसच्‍या क्षेत्रात सेवा देतेज्‍यामुळे हे उत्‍कृष्‍टतेचे कॉस्‍मेटोलॉजी सेंटर आहे.

आणि झर्ना धर, आयझॅक ल्‍यूक्‍सचे CEO, 20 वर्षांहून अधिक अनुभवासह, इंडस्ट्रीबद्दल भरपूर ज्ञानाचा खजिना टेबलवर आणतात आणि लोकांना त्यांचे सर्वोत्कृष्ट दिसण्यात आणि अनुभवण्यात मदत करण्याची आवड आहे. पुण्यातील त्यांचे नवीन क्लिनिक त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नावीन्य, गुणवत्ता आणि उत्कृष्टतेची बांधिलकी दर्शवते.

एअर इंडिया आणि विस्ताराचा इंटरलाइन भागीदारीत प्रवेश

गुरुग्राम, ०३ मे २०२३: भारतातील अग्रगण्य एअरलाइन्सपैकी एक आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने पूर्ण-सेवा कॅरियर विस्तारा (टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त उपक्रम) सोबत इंटरलाइन भागीदारी केली आहे.

या भागीदारीमुळे एअर इंडियाच्या प्रवाशांना विस्ताराच्या रूट नेटवर्कवर एअर इंडियाच्या विस्तृत देशांतर्गत आणि जागतिक नेटवर्कमध्ये ८० पेक्षा जास्त ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येणे शक्य आहे.

दोन एअरलाइन्समधील कराराच्या व्याप्तीमध्ये इंटर एअरलाइन थ्रू चेक-इन (आयएटीसीआय) अंमलबजावणीचा समावेश आहे. त्यामुळे अतिथींना एकाच तिकिटावर सर्व प्रवासी क्षेत्रांसाठी प्रस्थानाच्या पहिल्या टप्प्यावर त्यांचे बोर्डिंग पास मिळू शकतात आणि त्यांच्या प्रवासाच्या अंतिम स्थानापर्यंत त्यांच्या सामानाची तपासणी करता येते. एअर इंडिया आणि विस्तारा भारतातील बहुतांश प्रमुख विमानतळांवर एकाच टर्मिनलवर काम करतात. त्यामुळे इंटरलाइन प्रवास कार्यक्रमांसह पाहुण्यांसाठी प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव सुलभ होतो.

एअर इंडिया आणि विस्ताराने ‘इंटरलाइन कन्सिडरेशन्स ऑन इररेग्युलर ऑपरेशन्स (IROPS)’ किंवा ‘डिसरप्शन हस्तांतरण’ कार्यक्षमता देखील लागू केली आहे. यामुळे विमानाला उशीर होणे, रद्द होणे, दुसरीकडे वळवणे इ. यांसारख्या कार्यात्मक व्यत्ययांच्या बाबतीत दोन्ही विमानकंपन्या प्रवाशांना एकमेकांच्या पहिल्या उपलब्ध पर्यायी फ्लाइटमध्ये विनाअडथळा प्रवेश देऊ शकतात आणि त्यांच्या पाहुण्यांची होणारी गैरसोय कमी करू शकतात.

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले: “आम्ही विस्तारासोबतच्या आमच्या इंटरलाइन भागीदारीबद्दल खूश आहोत. यामुळे आमच्या विस्तारित मार्ग नेटवर्कवर भारतात आणि भारता बाहेर प्रवास करणाऱ्या आमच्या संयुक्त ग्राहकांना अधिक कनेक्टिव्हिटी आणि सुविधा मिळेल. सुरक्षितता आणि ग्राहक सेवेतील उत्कृष्टता याबद्दल आमची समान वचनबद्धता या  भागीदारीमध्ये अग्रस्थानी आहे. आम्ही विस्ताराच्या ग्राहकांना अमेरिका, युरोप, अति पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्वमधील एअर इंडियाच्या गंतव्यस्थानांवर अतिरिक्त प्रवास पर्यायांसह सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत.”

विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कन्नन म्हणाले, “ही भागीदारी भारतातील दोन आघाडीच्या विमानकंपन्यांना आमच्या संयुक्त नेटवर्कवर प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक सुविधा आणि वर्धित कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एकत्र आणते.  जगभर उड्डाण करण्याचा सर्वात चांगला आणि सर्वाधिक सोयीस्कर मार्ग आमच्या ग्राहकांना सादर करण्याच्या आमच्या खोलवर रुजलेल्या बांधिलकीचे हे प्रतिबिंब आहे. एअर इंडियासोबतचे आमचे संबंध अधिक दृढ करताना आणि आमच्या ग्राहकांना त्यांच्या विस्तृत नेटवर्कमध्ये नवीन स्थळांशी जोडताना आम्हाला आनंद होत आहे.”


विस्तारासोबत एअर इंडियाची इंटरलाइन भागीदारी १०० हून अधिक इंटरलाइन करार आणि ५० च्या जवळपास चेक-इन करार यात घातलेली भर आहे. त्यात लुफ्थांसा, युनायटेड एअरलाइन्स, एअर कॅनडा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांसारख्या जागतिक स्तरावर भागीदार विमानकंपन्या आहेत.

अलिकडेच, एअर इंडियाने ‘विहान.एआय’ (एअर इंडियाची ५ वर्षीय परिवर्तन योजना) मध्ये ‘टेक ऑफ’ टप्प्यात प्रवेश केल्याची घोषणा केली असून उत्कृष्टतेच्या दिशेने बांधणी करण्यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्म, प्रक्रिया आणि प्रणाली विकसित करण्यावर केंद्रित आहे.

न्यूजमेकर्स अचिव्हर्स राष्ट्रीय पुरस्कार राजा माने यांना प्रदान!

आशा पारेख, अंजन श्रीवास्तव, डॉ.निलेश साबळे यांचाही गौरव
मुंबई-
संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स राष्ट्रीय पुरस्कार येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या प्रदान करण्यात आला.

अफ्टरनून व्हॉइस माध्यम समुहाच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून समुहाच्या प्रमुख डॉ.वैदेही मातन यांच्या नेतृत्वाखाली देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात.या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख,”वागळे की दुनिया फेम” अंजन श्रीवास्तव,लेखक ईकबाल दुर्राणी यांना जीवनगौरव गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. “चला हवा येऊ द्या” निर्माता दिग्दर्शक डॉ.निलेश साबळे, पद्मश्री गुलाबो पसार, आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डर गौरी, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील साक्षी जोशी, जितेंद्र जोशी, राजकारणातील खा.ईम्तियाज जलील,आ.भारती लव्हेकर यांना भरत दाभोळकर, डॉ.बात्रा,नादिरा बब्बर,अभिनेते प्रदीप वेलणकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी काढण्यात येणारे वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ प्रजातीची_युवराज देशमुखांचा दावा

अधिक्षक अभियंता यांचा व्हिडिओ प्रसारित

पुणे: पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ ते ७ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार असल्याची सध्या चर्चा समाज माध्यमांमध्ये आहे. मात्र, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याच्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित करण्यात आला आहे.


पुणे महानगरपालिकेच्या अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांचा हा व्हिडिओ असून त्यामध्ये नदी सुधार प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. देशमुख यांचा व्हिडिओही महानगरपालिकेने प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये देशमुख यांनी सांगितले आहे की, ‘नदी सुधार प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नाही. नदी सुधार प्रकल्पांतर्गत सुरुवातीला दहा किलोमीटरचा नदी काठ विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये तीन हजार झाडे काढण्यात येणार आहे. पण हे सर्व झाडे झुडूप या प्रकारात येतात,’ असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘या तीन हजार वृक्षांमध्ये ९६ टक्के झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ या प्रजातीमधील आहेत. या वृक्षांची अनियंत्रित वाढ होत असते. नदी सुधार प्रकल्पाच्या कामासाठी जेथे झाडे काढणे आवश्यक आहे, तेथेच ती काढली जाणार आहेत. त्यामध्येही सुबाभूळ आणि कुबाभूळ यांचे प्रमाण जास्त आहे. इतर झाडांची पुर्नरोपण करण्यात येणार आहे.’

पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी झाडे लावणार

‘नदी सुधार प्रकल्पासाठी स्थानिक प्रजातीची कोणतेही झाड काढले जाणार नाही,’ असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले की, ‘उलट पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रजातीची ६० ते ६५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्षारोपण करताना बंगलोर येथील बॉटनीमध्ये अभ्यास असणाऱ्या एका संस्थेची मदत घेतली जाणार आहे. तेथील तज्ज्ञांनी नदीकडेला कुठल्या पद्धतीची झाडे असली पाहिजेत, याचा तांत्रिक अभ्यास केला असून ती झाडे लावली जाणार आहेत. यामध्येही सावली देणारे झाडे, पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी झाडे, नदीला पूरक अशी झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. नदी कडेला ही झाडे लावण्याचे नियोजन सुनियोजित पद्धतीने करणार आहोत. जेणेकरून ही झाडे टिकून राहतील.’