· जावा आणि येझ्दी मोटरसायकल्स श्रेणीमध्ये अधिक चांगली रायडिंग क्षमता आणि कामगिरीसाठी नव्या अपडेट्सचा समावेश
पुणे, ३ मे २०२३ – नव्याने तयार करण्यात आलेल्या जावा येझ्दी मोटरसायकल्सच्या श्रेणीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून त्यायोगे रायडिंगचा अनुभव आणखी उंचावणार आहे. यामुळे या मोटरसायकल्सची रायडिंग क्षमता तसेच बारकावे आणखी ठळक होणार असून श्रेणीचे एकंदर मूल्यही वाढणार आहे. नव्या मोटरसायकल्स ब्रँडच्या पॅन भारतातील सर्व डीलर्सकडे उपलब्ध केल्या जातील. या बदलांबरोबरच या मोटरसायकल्स बीएस- सिक्स फेज २ नुसार (ओबीडी२) उत्सर्जनाच्या नियमांचे पालन करतील.
या घोषणेविषयी जावा येझ्दी मोटरसायकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणाले, ‘ग्राहकांना दर्जेदार कामगिरी आणि रायडिंगचा जबरदस्त अनुभव मिळावा म्हणून सुरुवातीपासूनच जावा येझ्दी मोटरसायकल्सने तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले आहे. ओबीडी२ नियमांचे पालन करणे महत्त्वाचे होते व त्याचबरोबर आम्ही रायडर्सचा अभिप्राय लक्षात घेत संपूर्ण श्रेणीमध्ये विविध सुधारणा केल्या आहेत. नव्या मोटरसायकल्स दैनंदिन प्रवास जास्त सोपा करणाऱ्या, सफाईदार आणि रायडरची एकंदर कामगिरी उंचावणाऱ्या आहेत. किंमतीमध्ये जराशीच वाढ करण्यात आली असून त्यामुळे या मोटरसायकल्स चांगले मूल्य देणाऱ्या सर्वोत्तम पर्याय ठरत आहेत.’
मोटरसायकल्स जास्त सफाईदार करण्यासाठी व त्यातली थरारकता टिकवून ठेवण्यासाठी सर्व बदल जावा आणि येझ्दी मॉडेल्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
४२ स्पोर्ट्स स्ट्राइप, ४२ बॉबर आणि पेराक यांचा समावेश असलेल्या जावा श्रेणीमध्ये अधिक चांगल्या एनव्हीएच पातळीसाठी महत्त्वाच्या इंजिन घटकांची अधिक चांगल्या प्रकारे सांगड घालण्यात आली आहे. इंजिन पुन्हा तयार करण्यात आले आहे व रायडिंगचा दर्जा सुधारावा तसेच उत्सर्जन नियंत्रणाखाली राहावे म्हणून जास्त मोठी थ्रॉटल बॉडी आणि एक्झॉस्ट पोर्ट्स देण्यात आले आहेत.
नव्या जावा ४२ मध्ये क्लच हलका वाटावा आणि तो सहजपणे वापरता यावा यासाठी असिस्ट अँड स्लिप क्लच देण्यात आला आहे. जास्त चांगल्या एक्झॉस्ट नोटसाठी मफलरची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याशिवाय बाइकमध्ये सुधारित डिजिटल स्पीडोमीटर आणि नियमाप्रमाणे हॅझर्ड लाइट्सही देण्यात आले आहेत.
येझ्दी श्रेणीत समाविष्ट असलेल्या रोडस्टर, स्क्रॅम्बलर आणि अडव्हेंचर यांच्यातही सुधारित एनव्हीएच आणि रायडिंग क्षमतेसाठी हे बदल करण्यात आले आहेत. तिन्ही मॉडेल्समध्ये अधिक चांगल्या कामगिरीसाठी मोठे रियर स्प्रॉकेट देण्यात आले आहे. मोटरसायकल्समध्ये चांगल्या एक्झॉस्ट नोटसाठी नव्याने तयार करण्यात आलेले मफलर्स बसवण्यात आले आहेत.
वर नमूद केलेल्या सुधारणांबरोबरच नव्या जावा आणि येझ्दी मोटरसायकल्सची कामगिरी, थरारकता कायम राखण्यात आली आहे, शिवाय क्लासिक मोटरसायकल्स वेगाने धावू शकत नाहीत हा समज परत खोडून काढण्यात आला आहे.
किंमतवाढ अतिशय कमी आणि मॉडेल व व्हेरिएंटनुसार ०.८ – २ टक्के करण्यात आली आहे. नव्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत –
मॉडेल | नवी किंमत (एक्स शोरूम दिल्ली) |
जावा ४२ ड्युएल चॅनेल (ओरियन रेड, सिरीयस व्हाइट) | 1,96,142 |
जावा ४२ ड्युएल चॅनेल (ऑलस्टार ब्लॅक) | 1,97,142 |
जावा ४२ बॉबर (मिस्टिक कॉपर) | 2,12,500 |
जावा ४२ बॉबर(जॅस्पर रेड + व्हाइट) | 2,13,500 |
जावा पेराक | 2,15,187 |
येझ्दी स्क्रॅम्बलर | 2,13,187 |
येझ्दी रोडस्टर (स्मोक ग्रे) | 2,09,900 |
येझ्दी रोडस्टर (क्रिमसन, इनफर्नो रेड, ग्लेशियल व्हाइट) | 2,11,900 |
येझ्दी अडव्हेंचर (स्लिक सिल्व्हर) | 2,06,142 |
येझ्दी अडव्हेंचर (मॅम्बो ब्लॅक व्हाइटआउट) | 2,08,829 |
*****