Home Blog Page 1556

सह्याद्रि  हॉस्पिटल्स तर्फे पुण्यात प्रथमच पार पडले स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट

पुणे, ०४ मे २०२३: सह्याद्रि हॉस्पिटल्स च्या ट्रान्सप्लांट टीमने पुण्यातील पहिले स्वॅप यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले. या शस्त्रक्रिया नुकत्याच सह्याद्रि  सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे करण्यात आल्या. लिव्हर सिरोसिसने (खराब झालेल्या यकृताने ग्रस्त असलेली परिस्थिती) ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर एकाच वेळी जीवरक्षक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. सह्याद्रि  हॉस्पिटल्स येथील यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ बिपिन विभूते या स्वॅप यकृत प्रत्यारोपणाचे प्रमुख सर्जन होते.

प्रत्येक दाता प्राप्तकर्त्यांपैकी एकाच्या नात्यातला असला तरी त्यांचे यकृत परस्परांशी जुळणारे (कमपॅटीबल) नव्हते म्हणून डॉ. बिपिन विभूते यांनी द्वि-मार्गी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शविली. या स्वॅपच्या हृदयस्पर्शी कथेमध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा येथील शिक्षक अजित (नाव बदलले आहे) आणि अहमदनगर जिल्हयामधील व्यावसायिक अमर (नाव बदलले आहे)  यांचा समावेश आहे. या दोन्ही व्यक्तींचे विधिलिखित सारखेच होते. शस्त्रक्रियेदरम्यान अमर यांच्या पत्नी स्वरा (नाव बदलले आहे) यांनी त्यांचे यकृत अजित यांना दिले. तर अजित यांच्या पत्नी गीता (नाव बदलले आहे) यांनी त्यांचे यकृत अमर यांना दान केले.

२० तासांच्या या कठीण शस्त्रक्रियेने शहरातील पहिले यशस्वी टू-वे यकृत प्रत्यारोपण स्वॅप पार पडले आणि या क्षेत्रातला हा एक मैलाचा दगड ठरला.

सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते म्हणाले, “स्वॅप प्रत्यारोपण यापूर्वी मुंबई आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये झाले आहे, परंतु अलीकडेच झालेले हे प्रत्यारोपण पुण्यातले अशा प्रकारचे पहिलेच आहे. ज्या प्राप्तकर्त्यांचे नातेवाईक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत पण रक्तगट किंवा यकृताचा आकार जुळत नसल्यामुळे ते त्यांचे यकृत दान करू शकत नाहीत अशा प्राप्तकर्त्यांसाठी या प्रकारची देवाणघेवाण जीवनरक्षक सिद्ध झाली आहे. एकाच वेळी दोन दाते आणि दोन प्राप्तकर्त्यांवर शस्त्रक्रिया करून दोन यकृते प्रत्यारोपण करण्यात आली. २५ सदस्यांचा समावेश असलेल्या वैद्यकीय पथकात ११ डॉक्टर आणि इतर कर्मचारी होते. चार ऑपरेटिंग रूममध्ये २० तासांहून अधिक काळ हे अत्यंत कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले.”

अशा शस्त्रक्रियांपूर्वी रुग्णांचे समुपदेशन फार महत्त्वाची भूमिका बजावते यावर त्यांनी भर दिला. भूल देण्यापासून ते प्रत्यारोपण पूर्ण करण्यापर्यंत चारही शस्त्रक्रिया एकाच वेळी चार ऑपरेटिंग रूम मध्ये करणे हे सर्वात मोठे आव्हान होते.

नुकत्याच झालेल्या स्वॅप यकृत प्रत्यारोपणाच्या यशामुळे, सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील डॉक्टरांना भविष्यात आणखी रुग्णांचे जीव वाचवता येतील असा विश्वास प्राप्त झाला आहे.

प्रत्यारोपण टीममध्ये हेपॅटोबिलरी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन – डॉ. बिपिन विभूते, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अभिजीत माने, डॉ. विकास चौधरी, डॉ. शरण नरुटे, डॉ. अनुराग श्रीमल, ट्रान्सप्लांट भूलतज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर राहुल तांबे, अरुण अशोकन आणि अमन बेले तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते शर्मिला पाध्ये आणि अजिंक्य बोराटे यांचा समावेश होता.

नेक्सस सिलेक्ट ट्रस्टचा आयपीओ मंगळवार ९ मे २०२३ रोजी खुला होणार

शेअर बाजारांमध्ये युनिट्सची लिस्टिंग झाल्यानंतर नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट हे भारतातील पहिले पब्लिकली लिस्टेड कन्जम्पशन सेंटर रीट असेल अशी अपेक्षा आहे.

·         प्राईस बँड प्रति युनिट ९५ ते १०० रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आला आहे.

·         अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख – सोमवार८ मे २०२३

·         बोली/ऑफर सुरु होणार – मंगळवार९ मे २०२३

·         बोली/ऑफर बंद होणार – गुरुवार११ मे २०२३

·         अँकर गुंतवणूकदारांखेरीज इतर गुंतवणूकदारांना कमीत कमी १५० युनिट्ससाठी आणि त्यापुढे १५० च्या पटीत बोली लावता येईल.

पुणे- ४ मे २०२३: भारतामध्ये कन्जम्पशन सेंटर्सचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ (स्रोत: सीबीआरई रिपोर्ट, पूर्ण क्षेत्रानुसार) ज्यांच्या मालकीचा आहे त्या नेक्सस सिलेक्ट ट्रस्टने आपला आयपीओ मंगळवार ९ मे २०२३ रोजी खुला करण्याचे ठरवले आहे. नेक्सस सिलेक्ट ट्रस्टच्या पोर्टफोलिओमध्ये १७ श्रेणीतील सर्वोत्तम ग्रेड ए अर्बन कन्जम्पशन सेंटर्स, २ कॉम्प्लिमेंटरी हॉटेल संपत्ती आणि ३ कार्यलय संपत्तींचा समावेश आहे. आयपीओमधील सर्व युनिट्स मिळून किंमत ३२०००.०० मिलियन रुपयांपर्यंत असणार आहे. विनफोर्ड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (ब्लॅकस्टोन फंड्सची पोर्टफोलिओ कंपनी) नेक्सस सिलेक्ट ट्रस्टची प्रायोजक असून नेक्सस सिलेक्ट मॉल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे मॅनेजर आहेत. ऍक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड हे नेक्सस सिलेक्ट ट्रस्टचे विश्वस्त आहेत.

नेक्सस सिलेक्ट ट्रस्टच्या आयपीओमध्ये १४०००.०० मिलियन रुपयांपर्यंतचे युनिट्स नव्याने जारी केलेले असतील (फ्रेश इश्यू) आणि १८०००.०० मिलियन रुपयांपर्यंतचे युनिट्स, युनिट्सची विक्री करू इच्छिणाऱ्या युनिटधारकांकडून विक्रीसाठी प्रस्तुत केले जातील (ऑफर फॉर सेल) (ऑफर फॉर सेल व फ्रेश इश्यू यांना एकत्रितपणे “ऑफर” असे संबोधण्यात येईल)

ऑफरसाठी प्राईस बँड प्रति युनिट ९५ ते १०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. बोली/ऑफर गुरुवार ११ मे २०२३ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदार बोली/ऑफर खुली होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे सोमवार ८ मे २०२३ रोजी बोली लावू शकतील.

ब्लॅकस्टोनचे एशिया पॅसिफिकचे चेअरमन आणि रिअल इस्टेट एशियाचे हेड ख्रिस हेडी यांनी सांगितले, भारतातील पहिले रिटेलवर लक्ष केंद्रित करणारे रीट नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट लॉन्च करत असल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारताप्रती ब्लॅकस्टोनची वचनबद्धता यामुळे अधोरेखित झाली आहे, गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून आम्ही भारतात आमचे मजबूत स्थान निर्माण केले आहे आणि भारतातील पहिले दोन रीट लॉन्च करण्यात आमचा सहभाग आहे.”

नेक्सस सिलेक्ट मॉल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर दलिप सेहगल यांनी सांगितले, “नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट हा भारतातील सर्वात मोठा मॉल प्लॅटफॉर्म असून भारतामध्ये उत्पादनांचा वापर व खरेदीमध्ये होत असलेल्या वाढीचे लाभ घेण्यासाठी सुसज्ज आहे. भारताच्या रिटेल वाटचालीत आघाडीवर असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स पुढीलप्रमाणे आहेत – बीओएफए सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, जे पी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड.

अॅलेन करियर इंस्टीट्यूटचे नितीन कुकरेजा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त

कंपनीच्या गेल्या ३५ वर्षांच्या इतिहासात पहिले व्यावसायिक व्यवस्थापक; सध्याच्या ३ लाख विद्यार्थ्यांपासून ते २.५ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत प्रभाव वाढविण्याचे लक्ष्य

पुणे-४ मे, २०२३: भारतातील एक अग्रगण्य शिक्षण कंपनीअॅलेन करियर इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेडने (“अॅलेन करियर इंस्टीट्यूट” किंवा “अॅलेन”) श्री. नितीन कुकरेजा यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. श्री. नितीन कुकरेजा यांच्याकडे भविष्यातील एक जागतिक दर्जाची शैक्षणिक कंपनी तयार करण्याचे आणि भारतातील शैक्षणिक तुट भरून काढण्याचे कार्य सोपविले आहे. श्री. नितीन आणि त्यांची टीम अॅलेनच्या खोलवर रुजलेल्या शैक्षणिक उत्कृष्टतेला तंत्रज्ञानाची जोड देऊन ही उद्दिष्ट्ये मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करतील.

          या नियुक्तीबाबत भाष्य करताना अॅलेन करियर इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन श्री. ब्रजेश माहेश्वरी  म्हणाले, नितीन कुकरेजा हे अॅलेनसोबत बोर्डचे सदस्य म्हणून आधीपासून जुडलेले आहेत आणि त्यांनी अॅलेनचा धोरणात्मक रोडमॅप परिभाषित करण्यात अमूल्य असे योगदान दिलेले आहे. आता आमचे  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचे स्वागत आणि समर्थन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. श्री. कुकरेजा हे असाधारण धोरणात्मक क्षमता आणि व्यवसाय वाढविण्याचा मजबूत अनुभव असलेले मूल्यांना जपणारे असे लीडर आहेत. विद्यार्थ्यांना परिणाम देणारे शिक्षण देण्यासाठी ते ‘टेक्नॉलजी (तंत्रज्ञान) आणि टिचिंग (शिकवणे) हे दोन ‘टी’ एकत्र करतील. या क्षेत्रातील आद्यप्रवर्तक असल्याच्या अॅलेनच्या स्थानाची  पूर्ण क्षमता आणि अॅलेनचा ३५ वर्षांचा वारसा लक्षात घेऊन त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यात श्री. नितीन यांना मदत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

          श्री. नितीन कुकरेजा यांच्या नेतृत्वाखाली अॅलेन करियर इंस्टीट्यूट मोठ्या प्रमाणावर डिजिटल-प्रथम ग्राहक अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि अॅलेनची व्याप्ती सध्याच्या ३ लाख विद्यार्थ्यांपासून ते २.५ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत वाढवेल. बोधी ट्रीसोबत धोरणात्मक भागीदारीची एप्रिल २०२२ मध्ये घोषणा केल्या पासून अॅलेनने मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमधील कौशल्य व प्रतिभेसह आपली अनोखी अशी शैक्षणिक टीम वाढवली आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत अॅलेनची आपली बंगळूरमधील डिजिटल टीम २०० पर्यंत वाढवण्याची योजना आहे.

        श्री. नितीन कुकरेजा याबाबत बोलताना म्हणाले, अॅलेनच्या या नवीन परिवर्तनीय प्रवासाचे नेतृत्व करण्यासाठी मी उत्सुक आणि खूप रोमांचित आहे. शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार प्रभाव पडतो आणि शिक्षण राष्ट्र उभारणीत महत्वाचे योगदान देते. गेल्या ३५ वर्षांत २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रभाव पोहोचवण्याचा वारसा अॅलेनकडे आहे. माझा ठाम विश्वास आहे कीअॅलेनच्या सकारात्मक प्रभावाला तंत्रज्ञान हे अनेक पटींनी वाढवू शकते. मी भविष्यासाठी सज्ज असलेले अॅलेन तयार करण्यास आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास उत्सुक आहे. माला विश्वास आहे कीबोर्डाची दृष्टी, अॅलेनचा ब्रॅंड आणि आमची मजबूत टीम  आम्हाला या प्रवासात प्रचंड मदत करेल.

          श्री. नितीन कुकरेजा यांना विविध क्षेत्रातील नेतृत्व, रणनीती, आणि गुंतवणूक भूमिका यांचा दोन दशकांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते या आधी भारतातील आघाडीचे कन्झ्यूमर टेक कंपन्यांमधील गुंतवणूकदार असलेले मॅरिगोल्ड पार्क कॅपिटल अॅडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक होते. (पूर्वीचे लुप सिस्टम्स, भारत). त्याआधी ते स्टार स्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, जेथे त्यांनी भारतातील क्रीडा प्रसारणाचे चित्रच बदलले आणि स्टार स्पोर्ट्सला भारतीय क्रीडा चाहत्यांसाठीचे प्रमुख पर्याय बनवले. श्री. नितीन २००७ ते २०१७ दरम्यान स्टार इंडियाशी निगडीत होते आणि ते स्टार इंडियाला अशियातील सर्वात मोठ्या मिडिया कंपन्यांपैकी एक बनवणाऱ्या प्रमुख नेतृत्व टीमचे एक भाग होते. २०१५ मध्ये श्री. कुकरेजा यांना इकॉनॉमिक टाइम्सद्वारे सन्मानित केले गेले आणि स्पेन्सर स्टूअर्टच्या “४० वर्षांखालील ४०: भारतातील ४० वर्ष वयाखालील सर्वात लोकप्रिय व्यावसायिक अग्रणी’ या यादीत सामील करून सन्मानित करण्यात आले. स्टारच्या आधी श्री. नितीन मॉर्गन स्टॅनलीच्या खासगी इक्विटी विभागात काम करत होते. ते चार्टर्ड अकाऊंटंट असून श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स व आयआयएम अहमदाबादचे माजी विद्यार्थी आहेत.

मुंबई केंद्रशासित करण्याचा मुद्दा, उद्धव ठाकरे-शरद पवारांची परस्परविरोधी भूमिका

मुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंचे शरद पवारांना उत्तर

मुख्यमंत्री ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर शरद पवारांची नापसंती, पण उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया संयमी..

मुंबई-भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाकडून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, अशी भूमिका कायमच ठाकरे गटाने घेतलेली आहे. मात्र नुकत्याच शरद पवारांच्या प्रसिद्ध झालेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, असे पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावर ठाकरे-पवारांची परस्परविरोधी भूमिका पाहायली मिळाली आहे.मुंबई महाराष्ट्रात राहू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव याआधी देखील होता, अशी टीका आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात प्रसिद्ध केलेल्या मजकुरात हा दावा खोडून काढला आहे. लोक माझे सांगातीत शरद पवारांनी घेतलेल्या अनेक भूमिका या उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी तूर्तास एवढेच बोलेल मी माझ्या या मुद्द्यावर ठाम आहे, आणि राहिल, असे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे जगजाहीर आहे. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना उत्तर दिले.

लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यास शिवसेनेमध्ये वादळ माजेल याचा अंदाज आपल्याला नव्हता. हा उद्रेक शांत करण्यात शिवसेना नेतृत्व कमी पडले, असा उल्लेख करत इतर अनेक मुद्यावर भाष्य केले आहे. त्याला उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

बिहारचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी आज ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार कपिल पाटील उपस्थित होते. ठाकरे आणि ठाकूर यांच्यात बराच वेळ विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, बारसूत मी भाजप, शिवसेनेची हिंमत बघायला जात नाही. नाणार प्रकल्प रद्द केला. ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री झालो. दिल्लीतून सूचना आल्या. चांगला प्रकल्प आहे, जाऊ देऊ नका, असे सांगितले. मात्र, आता महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले. केवळ माझे पत्र घेऊन नाचू नका. माझ्यात काळात येणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले? महाराष्ट्रात राख, गुजरामध्ये रांगोळी का? त्यासाठी डोक्यावर बंदूक टेकून परवानग्या घेता आणि प्रकल्प चांगले सांगता. याला काही अर्थ आहे का, असा सवाल त्यांनी केला.

बारसूतल्या जमिनी उपऱ्यांनी घेतल्या आहेत. माझ्या भूमिपुत्रांच्या घरादारावर उपऱ्यांचा वरवंटा फिरवणार का? लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या. पालघरमध्ये घरात घुसून आदिवासींना बाहेर काढले जाते. ही कुठली लोकशाही आहे? असा सवालही त्यांनी केला. बारसूच्या जागेसाठी त्यावेळी माझ्यावर दबाव नाही, तर आग्रह होता. प्रकल्प चांगला असेल, तिथल्या लोकांनी होकार दिला, तर तिथे हा प्रकल्प होऊ शकतो. सगळ्यांचे चांगले होत असेल, तर मी मध्ये का यावे? मात्र, सगळ्यांच्या मनात प्रश्न आहेत. सध्या प्रश्न विचारले की, मार, ठोक तुरुंगात टाक. नामशेष कर असे झाले आहे. प्रश्न विचारणे त्यांचा हक्क असल्याचे ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बजरंगबली की जय, असे बोलून मतदान करा, असे सांगतात. मला वाटते आता निवडणूक कायद्यात बदल झाला असेल. बाळासाहेब ठाकरे असे पूर्वी म्हणाले, तर त्यांच्या मतदानाचा हक्क काढल्याची आठवणही ठाकरे यांनी यावेळी करून दिली. आता मी मराठी भाषकांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून मराठी अस्मिता जपणाऱ्या उमेदवाराला कर्नाटकात मतदान करा, असे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय होऊ द्या. त्यावर मग बोलेन. मात्र, शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नसल्याते ते म्हणाले. तसेच आपल्याकडूनही महाविकास आघाडीला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. मोदींचा नाही, तर प्रवृत्तीच्या पराभवासाठी आम्ही एकत्र आल्याचे ते म्हणाले. शरद पवारांना मी काय सल्ला देणार? मी दिलेला सल्ला त्यांना पचनी नाही पडला, तर काय करू? त्यांच्यावर कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले.

काय लिहिलेय पवारांनी?

शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात पान क्रमांक 417 वर लिहिले आहे, मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, असे शरद पवारांनी ठामपणे लिहित या मुद्दयावरुन ठाकरेंना एकटे पाडल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. ‘लोक माझे सांगाती’, या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेले पाऊल अत्यंत गैर होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनेच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.

शरद पवारांचे मन वळविण्यात सर्वांना अपयश :उद्या ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष

मुंबई-राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. केवळ दोन दिवसांची मुदत मागून त्यांनी कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आता समितीची ५ मे रोजी बैठक होईल. तीत नव्या पक्षाध्यक्षांचा निर्णय होऊ शकतो. निवड समितीतील अनेक नेत्यांची सुप्रिया सुळे यांच्या नावास पसंती आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी पक्षातील नाराजीनाट्यही समोर आले. मुंबईत बैठकांचे सत्र सुरू असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुण्यात होते. पत्रकारांनी विचारले असता “मला बैठकीचे काहीच माहिती नाही. कदाचित मला बोलावण्याची गरज वाटली नसेल,’ अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. ही बातमी पसरल्यावर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी सारवासारव केली. बैठका नियोजित नव्हत्या, मन वळवण्यासाठी पवारांशी फक्त चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

भुजबळांनी सांगितले … सुप्रियांना द्या राष्ट्रीय जबाबदारी

छगन भुजबळ : सुप्रिया सुळेंना केंद्रात व अजितदादांना राज्यात जबाबदारी द्यावी, असे माझे वैयक्तिक मत आहे.

प्रफुल्ल पटेल : अध्यक्षपदाच्या स्पर्धेत यांचेही नाव आहे. पण पत्रकार परिषदेत त्यांनी या शक्यतेचा स्पष्ट इन्कार केला.

अजित पवार : राष्ट्रीय राजकारणात रस नाही. पवारांच्या निवृत्तीचे समर्थन करताना आपण नव्या नेत्याला जबाबदारी देऊ पाहतोय, असे सांगत होते. याचा अर्थ ते इतर कुणाबद्दल तरी बोलत होते.

सुप्रिया सुळे : दोन दिवस खूपच शांत. नेतृत्वाबाबत बोलणे टाळले. वेळोवेळी कार्यकर्त्यांची चौकशी करताना दिसल्या.

‘वातावरण बदलल्याने’ महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना ब्रेक!
महाविकास आघाडीचे आधारस्तंभ शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करताच आघाडीत बिघाडीचे वारे वाहू लागले आहे. भाजपविरोधात आघाडीने आतापर्यंत नागपूर, छत्रपती संभाजीनगर व मुंबईत भव्य वज्रमूठ सभा घेतल्या. मात्र आता पवारांच्या निर्णयामुळे पुणे, कोल्हापूर, नाशिक, अमरावती येथील सभांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पुण्यात होणारी सभा वाढत्या उन्हामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मात्र त्यामागचे खरे कारण या सभेची जबाबदारी राष्ट्रवादीवर होती, त्यांनीच अंग काढून घेतलेय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अवकाळी पावसाचे कारण देत पुढच्या सभा होतील की नाही याबाबत साशंकता असल्याचे मान्य केले.

  • ‘साहेब, निर्णय मागे घ्या..’ दुसऱ्या दिवशीही घोषणाबाजी
  • वाय.बी. सेंटरमधून बाहेर पडताना कार्यकर्त्यांनी पवारांना घेराव घातला होता.
  • पवारांना चूक मान्य, पण समितीचा आग्रह कायम.

शरद पवार…

  • वरिष्ठ नेते, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निवृत्तीचा निर्णय घेणे ही माझी चूक होती, हे शरद पवारांनी ज्येष्ठ नेत्यांकडे मान्य केले. पण जर तुम्हाला विचारले असते तर साहजिकच मोठा विरोध झाला असता. त्यामुळे थेट घोषणा करावी लागली, असे समर्थनही त्यांनी केले. आता ५ व ६ मे रोजी निवड समितीची बैठक बोलवा. तीत नेतृत्वाचा निर्णय घ्या. समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.

नवीन अध्यक्षाचे स्वागत

संजय राऊत म्हणाले, राजकारण वेगळे असते. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. शिवसेनेत असंतोष असल्याचा उल्लेख शरद पवारांनी आपल्या पुस्तकात केला आहे. यावर राऊत म्हणाले, शिवसेनेच्या असंतोषाविषयी माहित नाही मात्र राष्ट्रवादीत असंतोष दिसत आहे. अध्यक्षपद कोणाला द्यावे हा सर्वस्वी त्या पक्षाचा निर्णय आहे. नवीन अध्यक्षाचे स्वागत करणे हे आपले काम आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० मे पर्यंत मुदतवाढ

डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आवाहन

पुणे दि.३: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेस ३० मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

राज्यातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सन २०२२-२३ यावर्षासाठी प्रलंबित असलेले मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी- परीक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदीसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरता येणार आहेत.

प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्याकरीता यापूर्वी ३० एप्रिल २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आलेली होती, परंतु प्रतिवर्षीची नोंदणीकृत अर्ज संख्या लक्षात घेता या वर्षाची अर्ज संख्या तुलनेत कमी असून विद्यार्थ्यांची अर्ज नोदणी प्रलंबित असल्याने सन २०२२-२३ चे नवीन अर्ज व नुतनीकरण व सन २०२१-२२ चे नोंदणीकृत केलेले अर्ज पुन्हा भरण्याची मुदत ३० मे २०२३ पर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सर्व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी व शिष्यवृत्ती धारक पात्र विद्यार्थी यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी विहीत मुदतीत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहनही आयुक्त डॉ. नारनवरे यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुन्हा नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण केल्यास व एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार करुन अर्ज रद्द झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील.

अर्ज भरण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास आपण प्रवेशीत असणाऱ्या महाविद्यालयाशी, तसेच संबंधित महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या समान संधी केंद्रांशी संपर्क साधावा किंवा सदरच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्यात यावी. विहीत मुदतीत कार्यालयास अर्ज प्राप्त न झाल्यास / व विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील व त्यास सामाजिक न्याय विभाग जबाबदार राहणार नाही असेही कळविण्यात आले आहे.
0000

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ३४ नागरिक भारतात दाखल

नवी दिल्ली, 03: सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे.  या मोहिमेअंतर्गत रात्री 12.00 वाजता  दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लष्कराच्या विशेष विमानाने 328 भारतीय नागरिकांची विसावी तुकडी  भारतात परतली.  यात महाराष्ट्रातील  34  नागरिकांचा समावेश आहे.

सुदान येथुन परत आणलेल्या नागरिकांना राज्य शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून सुखरूप स्वगृही पाठविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी  आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  हे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र सरकारसमवेत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य…

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वयाचे कार्य होत आहे. विमानतळावर स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे.

सुदानमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील नागरिकांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहोचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने सुरु केले हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक

भारतात कर्करोगाच्या रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या वैयक्तिक देखभाल सेवांमध्ये नवपरिवर्तन घडवून आणण्यासाठी उचलले पुढचे पाऊल

प्रिसिजन ऑन्कोलॉजी अँड पर्सनलाइज्ड मेडिसिन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले.

ज्यांना कर्करोग होण्याचा धोका आहे अशा कुटुंबियांच्या प्रोऍक्टिव जेनेटिक स्क्रीनिंग्समुळे कर्करोग लवकरात लवकर लक्षात येईल आणि त्याला प्रतिबंध घातला जाऊ शकेल.

रुग्णांना वैयक्तिक देखभाल पुरवण्यासाठी या क्लिनिकमध्ये सर्वसमावेशक जेनेटिक कौन्सेलिंग  टेस्टिंग सेवा उपलब्ध करवून दिल्या जातील.

मुंबईकर्करोगावरील उपचार आणि देखभालीमध्ये अद्ययावत वैद्यकीय प्रगती व अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात नेहमी आघाडीवर असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक सुरु केल्याची घोषणा केली आहे. हॉस्पिटलने आयोजित केलेल्या प्रिसिजन ऑन्कोलॉजी अँड पर्सनलाइज्ड मेडिसिन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत या क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले. संपूर्ण भारतभरातील रुग्णांना कर्करोगामध्ये वैयक्तिक देखभाल पुरवण्याची हॉस्पिटलची वचनबद्धता या क्रांतिकारी क्लिनिकमुळे अधिक मजबूत झाली आहे, प्रत्येक रुग्णाला अत्याधुनिक प्रिसिजन ऑन्कोलॉजी देखभाल उपलब्ध व्हावी यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल करत असलेल्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक गरजा प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या नाविन्यपूर्ण थेरपी उपलब्ध करवून देण्याच्या प्रिसिजन मेडिसिनच्या शक्तीचा उपयोग करून कर्करोगावरील वैयक्तिक आणि विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करण्यात येणारे उपचार उपलब्ध करवून देण्याच्या प्रयत्नांबरोबरीनेच कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने हे पुढचे पाऊल उचलले आहे.

भारतात दरवर्षी कर्करोगाच्या जवळपास १.४ मिलियन नवीन केसेसचे निदान केले जाते.  कर्करोगावरील उपचारांच्या प्रभावामध्ये सुधारणा घडवून आणून या आजाराचे ओझे लक्षणीय प्रमाणात कमी करण्याची क्षमता प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये आहे. आनुवंशिक चाचणी हा प्रिसिजन ऑन्कोलॉजीचा एक महत्त्वाचा घटक आहे, याच्या साहाय्याने व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील जीन म्युटेशन्स ओळखता येतात, हा आजार होण्याची शक्यता आहे अथवा नाही हे कर्करोगाची लक्षणे दिसून येण्याच्याही आधी समजून येऊ शकते. कर्करोगासाठी उपचार धोरणे विकसित करण्यात हे खूप उपयुक्त आहे.  

या परिषदेमध्ये जगभरातील आघाडीचे ऑन्कोलॉजिस्ट्स, संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिक एकत्र आले होते, त्यांनी केलेल्या पॅनल चर्चांमध्ये कॅन्सरवरील देखभालीतील नवी प्रगती आणि अभिनव उपचार धोरणे आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजीचे भवितव्य याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

कॅन्सरवरील उपचारांमध्ये प्रिसिजन ऑन्कोलॉजी हा एक अभिनव दृष्टिकोन आहे. यामध्ये ट्युमर मॉलिक्युलर लेवलला असताना प्रोफाइल केले जातात आणि बदल ओळखू येतात, यामुळे व्यक्तीच्या कॅन्सरचा प्रकार कोणता आहे त्यानुसार वैयक्तिक उपचार विशेष डिझाईन केले जाऊ शकतात. प्रत्येक रुग्णाला योग्य वेळी, योग्य डोस देऊन, कॅन्सरवरील योग्य उपचार देणे प्रिसिजन मेडिसिनमुळे शक्य होते. कॅन्सरवरील वैयक्तिक उपचारांसह प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सखोल जेनेटिक माहितीचा वापर केला जातो आणि प्रत्येक रुग्णाच्या जेनेटिक जडणघडणीनुसार आणि कॅन्सरच्या वैशिष्ट्यांनुसार उपचार योजना तयार केल्या जातात. हा दृष्टिकोन अवलंबिण्यामध्ये आणि रुग्णाच्या कॅन्सर प्रवासातील प्रत्येक घटकाचा समावेश असेल अशी सर्वसमावेशक देखभाल पुरवण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आघाडीवर आहे. हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक हा या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे, याठिकाणी व्यापक जेनेटिक कौन्सेलिंग आणि टेस्टिंग सेवा पुरवल्या जातात, ज्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांशी संबंधित जेनेटिक धोके ओळखता येतात, त्यावर उपचार करता येतात.

या परिषदेमध्ये एका सत्कार समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्ष श्रीमती टीना अनिल अंबानी यांनी भारत आणि जगभरातील ऑन्कोलॉजी क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व यशवंतांचा सत्कार केला.  श्रीमती टीना अनिल अंबानी यावेळी म्हणाल्या, तंत्रज्ञान  प्रतिभा या दोन्हींमध्ये नेहमीच आघाडीवर असणाऱ्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने कॅन्सरमधील देखभालीला व्यापक प्राथमिकता दिली आहे.  प्रिसिजन ऑन्कोलॉजी आणि वैयक्तिक वैद्यकीय उपचार हे कॅन्सरमधील देखभालीतील नवे दृष्टिकोन आहेत.  भरपूर माहितीदेवाणघेवाणसहयोग  समन्वयासाठी प्रभावी मंचसंवादाची संधी आणि उत्कृष्टतेचा सत्कार करण्यासाठी फोरम उपलब्ध करवून देणाऱ्या या परिषदेचे आयोजन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  आनुवंशिक कॅन्सर क्लिनिक सुरू करून आम्ही अचूक ऑन्कोलॉजी आणि वैयक्तिक औषधांवर लक्ष केंद्रित करत आहोत, ज्यामुळे कर्करोगाच्या कौटुंबिक जोखमीचा अंदाज लावण्यात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात मदत होईल. कन्टेनकॉम्बॅट अँड काँकर कॅन्सर‘ या आमच्या मिशनमध्ये आम्ही आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.”

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, कॅन्सरवरील देखभालीमध्ये सर्वोत्तम जागतिक प्रथांचे पालन करत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आघाडीवर आहेअत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनामध्ये गुंतवणूक करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीमध्ये कॅन्सरमध्ये वैयक्तिक देखभालीत प्रगती घडवून आणण्यासाठीची आमची समर्पित वृत्ती स्पष्टपणे दिसून येते.  प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये उत्कृष्टता साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांमधून हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक सुरु करण्यात आले आहेकुशल तज्ञअत्याधुनिक सुविधा आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांच्यासह नवे क्लिनिक सुरु करणे हे एका संस्थेची कॅन्सरमधील देखभालीत प्रगती घडवून आणण्यासाठीची सर्वात मोठी वचनबद्धता दर्शवतेयामुळे कॅन्सर देखभालीमुळे घडून येणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे.”

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल भारतामध्ये प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये आघाडीवर आहे, कॅन्सर रुग्णांना जागतिक दर्जाची देखभाल पुरवली जावी यासाठी अभिनव तंत्रज्ञान व उपचार पर्याय हे हॉस्पिटल सातत्याने उपलब्ध करवून देत असते. महाराष्ट्रात अकोला, गोंदिया आणि सोलापूर याठिकाणी कॅन्सर केयर सेंटर्स सक्रिय असून या इन्स्टिट्यूटमध्ये ऑन्कोलॉजी टीममध्ये ४५ पेक्षा जास्त कन्सल्टन्ट आणि २२५ सदस्यांची कुशल टीम आहे. आजवर या टीमने १७५००० पेक्षा जास्त केमोथेरपी, ६ लाख रेडिएशन सायकल्स आणि ६३००० शस्त्रक्रिया केल्या आहेत. भारतातील कॅन्सर रुग्णांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवनवीन शोधांचे लाभ उपलब्ध करवून देण्यात एज रेडियोसर्जरी सिस्टिम सुरु करून या हॉस्पिटलने एक मोठे योगदान दिले आहे. ट्रू बीम इक्विपमेंटचे इन्स्टॉलेशन हा प्रिसिजन ऑन्कोलॉजीविषयी आणखी एक अत्याधुनिक दृष्टिकोन आहे. याठिकाणी अनेक पूर्णकालीन सबस्पेशलिस्ट्स आहेत जे अनेक विविध प्रकारचे कॅन्सर हाताळण्यात तज्ञ आहेत. सार्वजनिक स्तरावर प्रकाशित करण्यात येणारी माहिती, स्क्रीनिंग, निदान, उपचार, वेदनांवरील उपचार आणि पॅलिएटिव्ह केयर यांच्या माध्यमातून ते कॅन्सर देखभालीत उपयुक्त ठरतील अशा अनेक सेवा पुरवतात.

हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिकने या वचनबद्धतेला अधिक मजबूत करत, उच्चतम दर्जाची देखभाल पुरवण्याची आणि कॅन्सरचा सामना करण्यासाठी रुग्णांना जी साधने हवी असतात ती पुरवून त्यांना सक्षम करण्याची कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलची बांधिलकी प्रस्थापित केली आहे.

परवडणाऱ्या दरात आजारांचे निदान आणि उपचारपद्धतीसाठी शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांदरम्यान चर्चा

नवी दिल्ली, 3 मे 2023

भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीतील, औषधनिर्माण विभागाने शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशातील , निरीक्षक आणि संवाद भागीदारांची, ‘ सहकार्य’ या विषयावरील बैठक, 2 मे 2023 रोजी आयोजित केली होती. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी, औषधनिर्माण विभागाचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार अवधेश कुमार चौधरी  होते. परिषदेदरम्यान खालील तज्ञांनी अतिशय तपशीलवार आणि दर्जेदार सादरीकरणे केली:

  • कोलकात्याच्या राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक, प्रा. व्ही. रविचंदीरण आणि भारतीय औषधनिर्माण सहकार्य संघटनेचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार डॉ. श्रीधर नारायणन,  यांनी या विषयावर ” उष्णकटिबंधीय प्रदेशातील दुर्लक्षित आजार आणि दुर्मिळ रोगांच्या संदर्भात उपचार पद्धती विकसित करुन त्यांची उपलब्धता व्यापक करणे, तसेच  उत्पादन दुर्मिळ अनुवांशिक रोगांसाठी नवीन उपचार पद्धतींवर संशोधन.
  • वैज्ञानिक तसेच, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मधील साथीचे आजार आणि संसर्गजन्य विभागप्रमुख डॉ. निवेदिता गुप्ता, या विषयावर “संसर्गजन्य रोगांसाठी नवीन निदानतंत्र विकसित करणे आणि प्रमाणीकरण करणे” या विषयावर सादरीकरण.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ मनीषा श्रीधर आणि डॉ. मधुर गुप्ता तसेच जैवतंत्रज्ञान विभागाच्या डॉ. कलावाणी गणेशन, यांचे, ‘ निदान तंत्र आणि उपचार पद्धती यावर नव्या मंचावरील तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रमाणीकरण” या विषयावर सादरीकरण.

फाउंडेशन फॉर इनोव्हेटिव्ह न्यू डायग्नोस्टिक्स (FIND)च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मार्टा फर्नांडेझ सुआरेझ, आणि भारतीय निदानशास्त्र विषयक उत्पादक संघटनेचे भास्कर मल्लाडी,यांनी ‘प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर अवस्थेतील दुर्मिळ रोगांसह रोगांच्या चाचणीसाठी किफायतशीर निदान पॅनेल/किट्सचा विकास” या विषयावर सादरीकरण केले.

इंडिया स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट ग्लोबल अँटिबायोटिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट पार्टनरशिप्सचे  प्रमुख सल्लागार डॉ. वाय.के. गुप्ता,  आणि यान फेरीस यांनी “API साठी हरित तंत्रज्ञान  आणि प्रक्रिया कार्यक्षमता” या विषयावर चर्चा केली.

जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकारी परिषदेचे प्रतिनिधी, आणि तांत्रिक विभागाचे प्रमुख तसेच महाव्यवस्थापक डॉ.पी.के.एस. सरमा, यांनी “प्रयोगशाळा ते बाजारपेठ यात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी” या विषयावर सादरीकरण केले.

ह्या सादरीकरणांची अनेकांनी प्रशंसा केली आणि शांघाय सहकार्य संघटनेतील काही सदस्यांनी त्यांच्या देशात या क्षेत्रात सध्या काय अद्ययावत स्थिती आहे याची माहिती दिली आणि  भारतासोबत सहकार्यातून कुठे काम करण्यास वाव आहे, हे ही सांगितले. कोविड 19 आणि आरोग्य क्षेत्रातील, इतर आपत्कालीन संकटांमुळे सर्वच देशांना विविध संशोधन आणि विकास क्षेत्रात परस्पर सहकार्याचे महत्त्व समजले आहे. यात, लस, उपचारपद्धती आणि निदान अशा क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच भारत आज या उत्पादनांचे महत्वाचे केंद्र ठरला आहे. सर्व सार्वजनिक आजारांच्या काळात विविध देशांना मदत करण्यात भारत कायमच आघाडीवर राहिला असून पुढेही असेच सहकार्य कायम राहील.

या परिषदेमुळे, भारतातील विविध विभागात सुरु असलेल्या अत्याधुनिक कामांची सखोल आणि विस्तृत माहिती मांडता आली. तसेच, या संशोधन कार्याचा, शांघाय सहकार्य संघटनेतील इतर सदस्य देशांना कसा लाभ मिळू शकेल, यावरही चर्चा झाली.

येरवडा जेलमध्ये चौघा कैद्यांकडून एका कैद्यास मारहाण

पुणे-कैद्यांमधील मारामाऱ्या हिंदी सिनेमात आपण नेहमी पाहतो …पण हि वास्तव घटना आहे येरवडा कारागृहात एका कैद्याला चार कैद्यांनी मारहाण केल्याची घटना काल दुपारी घडली आहे . दयाळू असे मारहाण झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहातील तुरुंग अधिकारी रेवनाथ कानडे वय ५४ यांनी या संदर्भात येरवडा पोलिसात तक्रार नोंदविली आहे.त्यानुसार पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी एकास मारहाण केल्याचे म्हटले आहे. मात्र या कैद्यांची नावे देण्यात आलेली नाहीत.फौजदार अशोक काटे 8805179775 अधिक तपास करत आहेत .

इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीकडून मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई, दि. 3 : राज्यातील अतिमहत्त्वाच्या इमारती, रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल, शाळा, देवस्थान यांवर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून इमारतींना संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.

मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात तज्ज्ञ समितीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, सदस्य अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता सुनील राठोड, वास्तुविशारद संदीप ईश्वरे, एन. आर. शेंडे यावेळी उपस्थित होते.

दहशतवादी हल्ले, मानवनिर्मित आपत्तींमुळे जीवित आणि मालमत्तेची लक्षणीय हानी होऊ शकते आणि आर्थिक विकासाला त्याचा फटका बसतो. ही जोखीम कमी करण्याच्या उपायांद्वारे आपत्ती टाळता येऊ शकते. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये योग्य त्या तरतुदी करण्याचे आदेश दिले होते.

या अहवालात महत्त्वाच्या मोठ्या सार्वजनिक आणि अतिउंच इमारतींच्या सुरक्षिततेचे विश्लेषण करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

शेती, आरोग्य क्षेत्रासाठी सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी बँकेने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 3 : राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी आशियाई एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मंत्रालयात एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित यावेळी उपस्थित होते.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, उपलब्ध आहे. राज्याच्या शाश्वत विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषिपंपांच्या योजनेसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करावे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णालयांसाठी सौर ऊर्जा, माहिती व तंत्रज्ञान, शेतीसाठी सौर ऊर्जा आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. बँकेमार्फत सुरू असलेल्या एमयूटीपी प्रकल्पाच्या कामाबद्दल शिष्टमंडळाने यावेळी समाधान व्यक्त केले.

महावितरणच्या संचालक(वाणिज्य)पदी योगेश गडकरी 

मुंबईदि मे २०२३ : महावितरणचे संचालक (वाणिज्य)  म्हणून श्री. योगेश गडकरी  यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. आज त्यांनी संचालक (वाणिज्य)  या पदाचा पदभार स्वीकारला आहे.  यापूर्वी श्री. योगेश गडकरी  हे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) म्हणून कार्यरत होते.

नागपूर येथील मूळचे रहिवासी असलेले श्री. योगेश गडकरी यांनी अमरावती येथून  अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (कॉम्पूटर इंजिनिअरिंग) केले आहे.   एप्रिल १९९४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत  मंडळात  कनिष्ठ अभियंता म्हणून वर्धा येथे रुजू झाले. त्यांनी  मुंबई मुख्यालयात विविध पदावर काम केले आहे. त्यांची पदोन्नती्द्वारे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) या पदावर नियुक्ती करण्यात आली.

श्री. गडकरी यांचा वीज क्षेत्रातील अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून लौकीक आहे. तसेच त्यांनी महावितरणच्या केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले असून त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या असून महावितरणच्या महसुलात वाढ झाली आहेत.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांकडून सफाई कामगारांच्या समस्यांचा आढावा

पुणे दि. ३: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विविध विभागांकडील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सल्लागार गिरेंद्र नाथ, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधीष्ठाता डॉ. नरेश झांजड आदींसह सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे ग्रामीण हद्दीत मागील काळात झालेल्या सफाई कर्मचारी मृत्यू प्रकरणातील आर्थिक मदतीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, असे निर्देष श्री. वावा यांनी दिले.

काम करत असताना मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेळेत नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यासाठी संवेदनशीलपणे काम करावे, वारसांना घरकुल योजनेतून पक्का निवारा उपलब्ध करुन देणे, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा. विविध योजनांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांची कर्जप्रकरणे बँकेतून गतीने मार्गी लावावीत, असे निर्देशही श्री. वावा यांनी दिले.

सफाई कर्मचाऱ्यांची प्रकरणे, त्यांच्या समस्या गतीने मार्गी लावण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल असा विश्वास विभागीय आयुक्त श्री. राव यांनी व्यक्त केला.

डॉ. कुणाल खेमनार यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय विमा योजना, सुरक्षा साधनांचा पुरवठा, पाल्यांना शैक्षणिक सहाय्य आदी कल्याणकारी योजनांची माहिती दिली. दोन्ही महानगरपालिका तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी याविषयीदेखील बैठकीत आढावा घेण्यात आला.

बैठकीस विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त सचिन इथापे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, समाज कल्याण आयुक्तालयाचे उपायुक्त प्रशांत चव्हाण, सहायक आयुक्त समाजकल्याण संगीता डावखर आदी उपस्थित होते.
0000

अभिनय शिकवीला जात नाही, तर तो आतून यावा लागतो- नाना पाटेकर

एमआयटी डब्ल्यूपीयूत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलचे उद्घाटन

पुणे, दि.३ मे: “ अभिनय शिकविला जाऊ शकत नाही तर तो आतून यावा लागतो. पुस्तकांपेक्षा रोज भेटणार्‍या लोकांना वाचायला शिका. जीवनात आलेले अनुभव व्यक्तीला उत्कृष्ठ अभिनय शिकवू शकतो. परंतू अभिनय हा सतत अंध:कारात टाळ्या शोधत असतो. त्यामुळे यातून स्वतःला सावरा.”असे विचार प्रसिद्ध अभिनेता पद्मश्री नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे येत्या शैक्षणिक वर्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल’ चे उद्घाटन अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, संजय कामटेकर, प्र कुलगुरू डॉ. तपन पांडा, कुलसचिव गणेश पोकळे, प्रसिद्ध क्रिएटीव्ह डायरेक्टर अभिजित पानसे, धिरज सिंंग व दूरदर्शनचे माजी संचालक मुकेश शर्मा उपस्थित होते.
या प्रसंगी एनएसडीचे प्रमुख पद्मश्री वामन केंद्रे यांनी स्कूलला शुभेच्छा दिल्या. तसेच नाना पाटेकर यांनी वेबसाईड लॉन्च केली. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या आशीर्वादाने व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या स्कूलची स्थापना करण्यात आली आहे.
नाना पाटेकर म्हणाले,“ कलाकार होणे म्हणजे आयुष्यभर दु:खी राहणारा. कारण रोजच्या अभिनयात सुख व दु:ख उधार घ्यावे लागते. यामध्ये आपण स्वतः बरोबरच कुटुंबालाही  विसरत जातो.  पुढे सर्व गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हा हातातून सर्व काही निसटलेले असते. रोजच्या जीवनात सुख दु:खाची व्याख्या बदलली तरच सुखी रहाल. कठिण परिश्रमाच्या आजू बाजूला यश असते. जीवनात काहीच कठिण नाही त्यासाठी फक्त विचार सकारात्मक ठेवा.”
अभिजित पानसे म्हणाले,“ संघर्षाशिवाय कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत नाही. परंतू भारतीय चित्रपटांवर आजही हॉलिवूडचा खूप मोठा प्रभाव दिसतो. बॉलिवूडवर पडलेली विदेशी छाप पुसावयाची आहे. त्यासाठी योग्य फिल्म स्कूलची आवश्यकता आज पूर्ण झाली आहे. येथील प्रॅक्टिकल हे मातृभाषेत असणार आहे. तसेच १० टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देऊन मोफत शिक्षण दिले जाईल. येथे प्रथम सेमिस्टर पासून विद्यार्थ्यांना प्रोफेशनल स्टेज वर शिकायला मिळाणार आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“सध्याच्या काळात फिल्म इंडस्ट्रीत  खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे यात टिकण्यासाठी योग्य शिक्षणाची गरज आहे. या इंडस्ट्रीमध्ये आपला जम बसविण्यासाठी कौशल्य, समर्पण, कठिण परिश्रम, पेशन्स आणि स्वतःचे काही तत्व गरजेचे आहे. ज्या आधारे प्रगती करू शकाल.”
धिरज सिंग यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. प्रीती  जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.