कंपनीच्या गेल्या ३५ वर्षांच्या इतिहासात पहिले व्यावसायिक व्यवस्थापक; सध्याच्या ३ लाख विद्यार्थ्यांपासून ते २.५ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत प्रभाव वाढविण्याचे लक्ष्य
पुणे-४ मे, २०२३: भारतातील एक अग्रगण्य शिक्षण कंपनीअॅलेन करियर इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेडने (“अॅलेन करियर इंस्टीट्यूट” किंवा “अॅलेन”) श्री. नितीन कुकरेजा यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. श्री. नितीन कुकरेजा यांच्याकडे भविष्यातील एक जागतिक दर्जाची शैक्षणिक कंपनी तयार करण्याचे आणि भारतातील शैक्षणिक तुट भरून काढण्याचे कार्य सोपविले आहे. श्री. नितीन आणि त्यांची टीम अॅलेनच्या खोलवर रुजलेल्या शैक्षणिक उत्कृष्टतेला तंत्रज्ञानाची जोड देऊन ही उद्दिष्ट्ये मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करतील.
या नियुक्तीबाबत भाष्य करताना अॅलेन करियर इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन श्री. ब्रजेश माहेश्वरी म्हणाले, “नितीन कुकरेजा हे अॅलेनसोबत बोर्डचे सदस्य म्हणून आधीपासून जुडलेले आहेत आणि त्यांनी अॅलेनचा धोरणात्मक रोडमॅप परिभाषित करण्यात अमूल्य असे योगदान दिलेले आहे. आता आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचे स्वागत आणि समर्थन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. श्री. कुकरेजा हे असाधारण धोरणात्मक क्षमता आणि व्यवसाय वाढविण्याचा मजबूत अनुभव असलेले मूल्यांना जपणारे असे लीडर आहेत. विद्यार्थ्यांना परिणाम देणारे शिक्षण देण्यासाठी ते ‘टेक्नॉलजी (तंत्रज्ञान) आणि टिचिंग (शिकवणे) हे दोन ‘टी’ एकत्र करतील. या क्षेत्रातील आद्यप्रवर्तक असल्याच्या अॅलेनच्या स्थानाची पूर्ण क्षमता आणि अॅलेनचा ३५ वर्षांचा वारसा लक्षात घेऊन त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यात श्री. नितीन यांना मदत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
श्री. नितीन कुकरेजा यांच्या नेतृत्वाखाली अॅलेन करियर इंस्टीट्यूट मोठ्या प्रमाणावर डिजिटल-प्रथम ग्राहक अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि अॅलेनची व्याप्ती सध्याच्या ३ लाख विद्यार्थ्यांपासून ते २.५ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत वाढवेल. बोधी ट्रीसोबत धोरणात्मक भागीदारीची एप्रिल २०२२ मध्ये घोषणा केल्या पासून अॅलेनने मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमधील कौशल्य व प्रतिभेसह आपली अनोखी अशी शैक्षणिक टीम वाढवली आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत अॅलेनची आपली बंगळूरमधील डिजिटल टीम २०० पर्यंत वाढवण्याची योजना आहे.
श्री. नितीन कुकरेजा याबाबत बोलताना म्हणाले, “अॅलेनच्या या नवीन परिवर्तनीय प्रवासाचे नेतृत्व करण्यासाठी मी उत्सुक आणि खूप रोमांचित आहे. शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार प्रभाव पडतो आणि शिक्षण राष्ट्र उभारणीत महत्वाचे योगदान देते. गेल्या ३५ वर्षांत २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रभाव पोहोचवण्याचा वारसा अॅलेनकडे आहे. माझा ठाम विश्वास आहे की, अॅलेनच्या सकारात्मक प्रभावाला तंत्रज्ञान हे अनेक पटींनी वाढवू शकते. मी भविष्यासाठी सज्ज असलेले अॅलेन तयार करण्यास आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास उत्सुक आहे. माला विश्वास आहे की, बोर्डाची दृष्टी, अॅलेनचा ब्रॅंड आणि आमची मजबूत टीम आम्हाला या प्रवासात प्रचंड मदत करेल.”
श्री. नितीन कुकरेजा यांना विविध क्षेत्रातील नेतृत्व, रणनीती, आणि गुंतवणूक भूमिका यांचा दोन दशकांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते या आधी भारतातील आघाडीचे कन्झ्यूमर टेक कंपन्यांमधील गुंतवणूकदार असलेले मॅरिगोल्ड पार्क कॅपिटल अॅडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक होते. (पूर्वीचे लुप सिस्टम्स, भारत). त्याआधी ते स्टार स्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, जेथे त्यांनी भारतातील क्रीडा प्रसारणाचे चित्रच बदलले आणि स्टार स्पोर्ट्सला भारतीय क्रीडा चाहत्यांसाठीचे प्रमुख पर्याय बनवले. श्री. नितीन २००७ ते २०१७ दरम्यान स्टार इंडियाशी निगडीत होते आणि ते स्टार इंडियाला अशियातील सर्वात मोठ्या मिडिया कंपन्यांपैकी एक बनवणाऱ्या प्रमुख नेतृत्व टीमचे एक भाग होते. २०१५ मध्ये श्री. कुकरेजा यांना इकॉनॉमिक टाइम्सद्वारे सन्मानित केले गेले आणि स्पेन्सर स्टूअर्टच्या “४० वर्षांखालील ४०: भारतातील ४० वर्ष वयाखालील सर्वात लोकप्रिय व्यावसायिक अग्रणी’ या यादीत सामील करून सन्मानित करण्यात आले. स्टारच्या आधी श्री. नितीन मॉर्गन स्टॅनलीच्या खासगी इक्विटी विभागात काम करत होते. ते चार्टर्ड अकाऊंटंट असून श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स व आयआयएम अहमदाबादचे माजी विद्यार्थी आहेत.