लीवोने पुण्यामध्ये नवीन स्किन अॅण्ड अॅण्टी-एजिंग सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी आयझॅक ल्यूक्ससोबत सहयोग केला, ब्रॅण्ड क्लायण्ट्सना उच्च दर्जाची सेवा व निष्पत्ती देण्याप्रती त्याच्या कटिबद्धतेसाठी ओळखला जातो. नवीन सेंटरच्या उद्घाटनासह ते त्यांच्या क्लायण्ट्सना अद्वितीय व लक्झरीअस अनुभव देत राहतील.
पुणे, : कोरेगाव पार्क, पुणे येथील प्रीमियर लक्झरी स्पा लीवो सलोनला प्रतिष्ठित स्किनकेअर व अॅण्टी-एजिंग ब्रॅण्ड आयझॅक ल्यूक्ससोबत सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. सहयोगाने आम्ही लीवो सलोनच्या परिसरात नवीन आयझॅक स्किन अॅण्ड अॅण्टी-एजिंग सेंटरचे उद्घाटन करत आहोत, जे क्लायण्ट्सना सौंदर्याप्रती सर्वसमावेशक तृतीय श्रेणीचा दृष्टिकोन देत आहे. ते दीर्घकालीन निष्पत्ती व एकूण स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यासह उपचार, प्रतिबंध व देखभाल यावर भर देतात.
नवीन सेंटरमध्ये दोन विश्वांच्या सर्वोत्तम गोष्टींचा समावेश आहे – आयझॅक ल्यूक्सची अपवादात्मक सेवा आणि लीवो सलोनची लक्झरीअस सेटिंग. हे सेंटर सिग्नेचर फेशियल्स, प्रगत स्किन रिज्यूवेनेशन ट्रीटमेंट्स, लेझर हेअर रिमूव्हल, स्लिमिंग ट्रीटमेंट्स अशा अनेक सेवा देईल. आयझॅक ल्यूक्सची अनुभवी व पात्र एस्थेटिशियन्स व टेक्निशियन्सची टीम अद्वितीय निष्पत्ती देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व टेक्निक्सचा वापर करेल. आयझॅक सोबतचा सहयोग त्यांच्या क्लायण्ट्सना त्यांच्या अपवादात्मक सेवेशी पूरक लक्झरीअस सेटिंग देईल, ज्यामधून क्लायण्ट्सना सर्वांगीण व संस्मरणीय अनुभवाची खात्री मिळेल.
आयझॅक ल्यूक्स ही क्लिनिक्सची ब्युटी व एस्थेटिक्स साखळी आहे, जिची भारतभरात उपस्थिती असण्यासोबत सेलिब्रिटी कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. गीतिका मित्तल गुप्ता यांनी स्थापना केली आहे. क्षेत्रात दशकाहून अधिक काळाचा अनुभव असलेल्या डॉ. गीतिका यांनी क्लायण्ट्सना अत्याधुनिक उपचार देण्यासह त्यांच्या सर्व डर्माटोलॉजी व केसासंबंधित गरजांकरिता सर्वसमावेशक व सर्वांगीण सोल्यूशन्स देण्यासाठी आयझॅक ल्यूक्सची स्थापना केली. आयझॅक ल्यूक्सला सर्वोत्तम झी नॅशनल हेल्थकेअर लीडरशीप अवॉर्ड मिळाला आहे आणि आधुनिक विशेष तंत्रज्ञानाचा वापर करते, जे एफडीएद्वारे मान्यताकृत आहे.
परिभाषित लक्झरीसाठी गंतव्य लीवो सलोनने २०२२ मध्ये स्थापनेपासून पुण्यात आपले नावलौकिक केले आहे. प्रणिता बावेजा यांच्या नेतृत्वांतर्गत लीवो हे अद्वितीय लक्झरी स्पा व सलोन आहे, जे सौंदर्य, स्टाइल व आकर्षकतेच्या साराला परिभाषित करते. लीवो एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय हेअर डिझाइनिंगसह मेक-अप, नेल आर्ट, आय-लॅश एक्स्टेन्शन्स, मायक्रो-ब्लेडिंग आणि सेमी-परमनंट मेक-अप अशा इतर संबंधित सेवा देते, ज्यांची उच्च प्रशिक्षित, अनुभवी व समर्पित स्टायलिस्ट्स, टेक्निशियन्स व थेरपीस्ट्सद्वारे हाताळणी केली जाते.
पुणेकरांना दिलेल्या वचनांचे पालन करत प्रणिता यांना लीवो सलोन व आयझॅक ल्यूक्स या दोन बाजारपेठ प्रमुखांच्या सहयोगाचा आनंद होत आहे. या सहयोगाचा गाहक अनुभव वाढवण्याचा मनसुबा आहे. ‘‘लीवोमध्ये आम्ही विशिष्ट एलानसह रिफाइनमेंट, रिस्टोरेशन व पोषणाचे वचन देतो. आमचा २०१३ पासून आयझॅक ल्यूक्ससोबत दीर्घकालीन संबंध आहे आणि पुण्यातील हे लाँच हा अनोखा सामंजस्य करार आहे, ज्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे,’’ असे प्रणिता म्हणाल्या.
‘‘आयझॅक ल्यूक्सला क्लायण्टसना किमान किंवा विना डाऊनटाइमसह सर्वोत्तम कॉस्मेटिक व नॉन-इन्वेसिव्ह प्रक्रिया देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असण्याचा अभिमान आहे. आमचे लक्ष्य ग्राहक प्रामुख्याने व्यस्त महिला व पुरूष आहेत, जे त्यांच्या गतीशील जीवनाशी सामावून जाणाऱ्या वैयक्तिकृत, गुणकारी व सुरक्षित स्किनकेअर आणि हेअर सोल्यूशन्सना महत्त्व देतात,’’ असे डॉ. गीतिका म्हणाल्या. ‘‘आयझॅक ल्यूक्स वैयक्तिकृत केअर, नवोन्मेष्कारी तंत्रज्ञान, दीर्घकालीन ब्युटी ट्रीटमेंट्स आणि आम्ही आमच्या ग्राहकांना देत असलेला तणाव-मुक्त अनुभव यावर लक्ष केंद्रित करण्याच्या माध्यमातून प्रतिस्पर्धींपेक्षा वरचढ आहे,’’ असे त्या पुढे म्हणाल्या.
लीवो सलोनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता बावेजा
आंत्रेप्रीन्युअर ऑफ द इअर २०२२ प्रणिता बावेजा या हुशार उद्योजिका, कुशल प्रशासक आणि उद्योग व्यावसायिक आहेत. नवोदित उद्योजिका असलेल्या त्या ट्रॅव्हल सर्विसेस इंटरनॅशनलच्या सीओओ म्हणून त्यांच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये सामील झाल्या आणि कंपनीच्या ऑफलाइन व्यवसायाला त्यांनी ऑनलाइन मॉडेलमध्ये बदलले. त्यांच्या अथक प्रयतनांमुळे कंपनीने भारत, मध्य पूर्व व आग्नेय आशियामध्ये लक्षणीय विकास संपादित केला. प्रवास व्यवसायामध्ये व्यापक अनुभव प्राप्त करत त्यांनी सौंदर्य उद्योगामधील आपल्या क्षमता वाढवल्या. त्यांनी २०१९ मध्ये लीवो सलोनचा भार सांभाळण्यापासून त्याची लोकप्रियता व नफा वाढला आहे, तसेच हा सलोन अग्रणी लक्झरी ब्रॅण्ड बनला आहे.
आयझॅक ल्यूक्सच्या संस्थापक डॉ. गीतिका मित्तल गुप्ता
डॉ. गीतिका मित्तल गुप्ता या अनुभवी सेलिब्रिटी कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट आणि दिल्ली-एनसीआरमधील कॉस्मेटिक डर्माटोलॉजीच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. कॉस्मेटिक डर्माटोलॉजीच्या क्षेत्रात १० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेल्या त्या २०१० मध्ये स्थापना करण्यात आलेले प्रीमियम स्किन क्लिनिक ‘आयझॅक ल्यूक्स – स्किन अॅण्ड अॅण्टी-एजिंग सेंटर’च्या वैद्यकीय संचालक आहेत. हे सेंटर डर्माटोलॉजी, अॅण्टी-एजिंग, बॉडी शेपिंग व अॅण्टी-हेअर लॉसच्या क्षेत्रात सेवा देते, ज्यामुळे हे उत्कृष्टतेचे कॉस्मेटोलॉजी सेंटर आहे.
आणि झर्ना धर, आयझॅक ल्यूक्सचे CEO, 20 वर्षांहून अधिक अनुभवासह, इंडस्ट्रीबद्दल भरपूर ज्ञानाचा खजिना टेबलवर आणतात आणि लोकांना त्यांचे सर्वोत्कृष्ट दिसण्यात आणि अनुभवण्यात मदत करण्याची आवड आहे. पुण्यातील त्यांचे नवीन क्लिनिक त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नावीन्य, गुणवत्ता आणि उत्कृष्टतेची बांधिलकी दर्शवते.