Home Blog Page 1403

हरी नरके यांच्यावर हार्ट ऐवजी अस्थम्याचे उपचार; ‘लीलावती’च्या डॉक्टरांवर अक्षम्य हलगर्जीपणाचा आरोप, कारवाईची मागणी

प्रख्यात साहित्यिक संजय सोनवणी यांनी उठविला आवाज …..

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे बुधवारी निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकारावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. हरी नरके यांनी गत जून महिन्यात आपल्या एका मित्राशी व्हॉट्सॲप संवाद साधला होता. त्यात त्यांनी लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या तब्येतीकडे कसे अक्षम्य दुर्लक्ष केले, हे नमूद केले होते. यामुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणावर टीकेची झोड उडते आहे.

हरी नरके यांनी लेखक संजय सोनवणी यांच्याशी बोलतानाही लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवले होते. संजय सोनवणी बुधवारी ‘माय मराठी’ शी बोलताना म्हणाले की, ‘प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांचा 22 जून 2023 रोजी मला व्हॉट्सॲप संदेश आला होता. त्यात त्यांनी डॉक्टरांच्या बेजबाबदारपणावर शंका घेतली होती.

हरी नरके आपल्या व्हॉट्सॲप संदेशात नेमके काय म्हणाले होते हे खाली जशास तसे वाचा…

“प्रिय भाऊ, नमस्कार
गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन
पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे.

आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता.

ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला.

मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो.

जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते.

हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता.

लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले.

लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला.
regards.
[14:29, 22/06/2023] Hari Narke 2:

हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे .. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता.
आता बरा होतोय.”

माझा हसता खेळता ज्येष्ठ बंधू गेला. काय म्हणू?
-संजय सोनवणी

दोषी डॉक्टरांवर कारवाई करा – सोनवणी

डॉक्टर प्राणदान करण्यासाठी असतात की प्राण घेण्यासाठी यावर गंभीर विचार झाला पाहिजे. डॉक्टरांनी lAB रिपोर्ट्सकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले. जवळपास 10 महिने त्यांच्यावर चुकीचे औषधोपचार झाले. यामुळे मूळ आजार बळावून हरिभाऊ अकाली गेले. यामुळे पुरोगामी विचारपर्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. हरिभाऊ राष्ट्रीय वैचारिक संपत्ती होते. त्यांचा मृत्यू सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे. दोषी डॉक्टर्सवर कायदेशीर कारवाई का होऊ नये?, असे संजय सोनवणी यांनी म्हटले आहे.

खाली फोटोत पाहा नरकेंनी पाठवलेला व्हॉट्सॲप संदेश

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 9 :- “ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतिशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालिन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात वीरांगनांच्या कहाण्यांना दिला उजाळा 

पुणे : येत्या १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्याच्या शहात्तराव्या वर्षात प्रवेश करत आहोत. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक अज्ञात वीरांगनांनी आपलं आयुष्य देशासाठी समर्पित केलं. त्यांच्या या प्रेरणादायी आयुष्यातून प्रेरणा घेत आजच्या प्रश्नांना आपण भिडले पाहिजे असे प्रतिपादन अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्या श्रद्धा रेखा राजेंद्र यांनी केले. निमित्त होते अभिव्यक्ती आयोजित
स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात वीरांगनांच्या कहाण्या या कार्यक्रमाचे  
 महात्मा गांधीं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने भारतीय जनतेने जो अपूर्व लढा दिला त्याचं फळ म्हणजे भारताचे स्वातंत्र्य! जगाच्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा. देशातील जवळपास 20% लोक म्हणजे प्रत्येक 5 पैकी एक जण म्हणजे जवळपास एका घरातून एक जण ह्या लढाईत सामील होती. ह्यात सर्व स्तरातला अतिश्रीमंता पासून ते अत्यंत गरीब महिलांनी योगदान दिले. सर्व जाती-धर्माच्या होत्या. शिक्षित-अशिक्षित..अशा असंख्य महिलांचे नाव तर इतिहासातही नोंदली गेली नाहीये. खरोखर त्यातील अजून बर्‍याच अज्ञात आहेत. त्यांना जे जे शक्य होत ते सर्व काम त्यांनी केले. स्वातंत्र्यलढ्यातील पहिली महिला हुतात्मा झालेली १८ व्य शतकातली  तामिळनाडूमधील शिवगंगाई या संस्थानची राणी कूयिली. इंग्रजांचा शस्त्रसाठा नष्ट  करायचा कट रचला आणि पारही पडला. नानासाहेब पेशवे यांना एकुलती एक मुलगी मैनावती. तिने इंग्रज कुटुंबांना विद्रोही सैनिकांपासून वाचविले मात्र स्वतःच्या वडिलांच्या विद्रोहात मदत केली म्हणून ब्रिटिशांनी तिला झाडाला बांधून पेटवून देण्याची आज्ञा दिली. आणि अत्यंत धडाडीची मौनावती शहीद झाली पण नानासाहेबांचा ठावठिकाणा कळू दिला नाही. याशिवाय गुढीपाडव्याला गुढीबरोबरच तिरंगी झेंडा लावण्याचे आवाहन करणाऱ्या जानकीबाई आपटे. 400 भिल्ल विरांगनांनी ब्रिटिशांना दिलेलं तोंड. बेगम हजरत महल, पेरीनबेन कॅप्टन, मीरा बहेन, कॅप्टन लक्ष्मी सहगल, आझाद हिंद फौजेच्या झांशी रेजिमेंटमध्ये नसिफा नावाची १५ वर्षाची मुलगी, अवघ्या १७ व्या वर्षी शहीद झालेली कनकलता बरूआ, राणी गाइदिन्ल्यू, हौसाबाई पाटील आणि अशा कितीतरी गरीब-श्रीमंत घरातील राणी ते आदिवासी-शेतकरी सर्व जातीधर्माच्या स्त्रियांनी गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आनंदाने आणि कोणत्याही भीतीशिवाय ब्रिटिशांशी वेळप्रसंगी दोन हात केले आणि जितके जास्तीत जास्त देशासाठी करता येईल ते केले. हा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत-पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपलं काम आहे. अशी प्रतिक्रिया बैठीकीला जमलेल्या स्त्रिया-मुलींनी दिल्या. अभिव्यक्तीने या ज्ञात-अज्ञात विरांगणाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर एक पोस्टर प्रदर्शन तयार केले असून विविध कॉलेजमध्ये त्याचे प्रदर्शन मांडले असता त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे श्रद्धा यांनी सांगितले. यासोबतच याचे माहिती सांगणारे विविध स्टॉल सुद्धा विविध मंडळामध्ये लावण्यात येणार आहेत

येरवडा खुले कारागृहाचे बंद्याद्वारा संचालित श्रृंखला उपहारगृहाचे उद्घाटन

पुणे (दिनांक 09 ऑगस्ट)

कारागृह हे बयाना फक्त शिक्षा भोगण्याचे ठिकाण नसून त्यांच्या मध्ये असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणे व त्यांचे समाजात योग्य ते पुनर्वसन होणे आवश्यक असते या उद्देशाने अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा खुले कारागृहाच्या जागेवर कॉमर झोनच्या समोर बंद्याद्वारा संचालित श्रृंखला उपहागृहाचे उद्घाटन दिनांक 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.

या उपहारगृहात खालीलप्रमाणे पदार्थ नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

वडापाव, समोसा, पावभाजी, मिसळ, भजी, चहा, कॉफी, पुलाव, पोळी-भाजी इत्यादी पदार्थ उपलब्ध

राहतील.

उपहारगृहाचे बांधकाम, निर्मिती बंदी यांचे द्वारे

उपहारगृहाचे बांधकाम, रंगकाम, बैठक व्यवस्था, रचना इत्यादी सर्व बंदी यांनी स्वतः तयार केलेले आहे. त्याकामी अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कोकणे, तुरुंगाधिकारी व इतर अधिकारी/कर्मचारी यांनी मेहनत घेऊन बंद्यांना प्रोत्साहन दिले.

सदर उपहारगृह हे बंदी यांचे मार्फत चालविले जाणार आहे. बंदी सुधारणा पुनर्वसन या हेतूने ही उपहारगृह सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली असल्याने बंदी यांचे पुनर्वसन करण्यासाठी याचा उपयोग होणार असून या उपहारगृहाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला ‘क्रांतीज्योत’ यात्रा काढून शहिदांना अभिवादन.

पुणे-भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते हुतात्मा बाबूगेणू स्तंभ, तुळशीबाग पर्यंत ‘क्रांतीज्योत यात्रा’ काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले.

     क्रांतीज्योत यात्रेचा मंडई येथील हुतात्मा बाबूगेणू स्तंभास पुष्पहार अर्पण करून समारोपीय भाषणात शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधीच्या ‘‘अंग्रेज चले जाव’’ या घोषणेमुळे लाखो सत्याग्रही देशाच्या विविध भागात ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात चले जाव चे आंदोलन करायला लागले. त्यावेळेस लाखो देशवासियांच्या मनात एकच ध्येय होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. १९४२ च्या मुंबईला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारत आंदोलनाचा ठराव संमत झाला. काँग्रेसने या देशामध्ये अखंडत्व, सार्वभौमत्व ठेवले याचे स्मरण देशवासियांनी करायला पाहिजे. १९४० ला वर्ध्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पूर्ण स्वराज्याचा विषय मांडण्यात आला त्यानुसार पं. जवाहरलाल नेहरूंची एकतेची, अखंडतेची परंपरा त्यांच्या मुलीने, नातवाने अखंडपण चालू ठेवली याचे स्मरण करणे गरजेचे आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, सुडाची भावना न ठेवता हा देश अखंड राहिला पाहिजे. मी त्या लाखो हुतात्म्यांना शतश: प्रणाम करून आदरांजली अर्पण करतो.’’

यानंतर विचारवंत संजय सोनवणी यांनीही आपले विचार मांडले.

     यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, अजित दरेकर, संगीता तिवारी,हेमंत राजभोज, विशाल जाधव, सुजित यादव, अनिल पवार, विनोद रणपिसे, अशोक जैन, भोला वांजळे, राहुल शिरसाट, हनुमंत पवार, रजिया बल्लारी, सुंदरा ओव्हाळ, अजित थेरे, बाबा तांबोळी,विकास कांबळे, विठ्ठल आरडे,अमित अगरवाल, शोभा अरडे, सुनीता खरात, युवराज कदगे, अनिल कांकरिया, राहुल ढाले, नंदलाल धिवार,लोळगे, विजय कांबळे, प्रसाद खराटे, राजू घेलोत, सचिन भोसले, चैतन्य पुरंदरे, राजेंद्र पडवळ, लतेंद्र भिंगारे, विशाल गुंड, सादिक कुरेशी, बळीराम डोळे, हसन शेख, मुनाफ शेख, मेहबूब नदाफ, सतीश पवार, रवी पाटोळे, अक्षय जैन,सादिक शेख,संगीता पवार,अशोक लांडगे, राजेंद्र पेशने आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनचा उपक्रम

महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनचा उपक्रम

पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश देण्याकरिता  आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनतर्फे रविवार, दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळात जास्तीत जास्त संख्येत महिला व पुरुषांना सर्वाधिक महाराष्ट्रीयन फेटे बांधून  इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये विक्रम प्रस्थापित करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या संस्थापिका अभिलाषा बेलुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला अपूर्वा पाटकर, विजया वाटेकर, गायत्री अकोलकर, सविता पवार, आरती कुटुंबे आदी उपस्थित होते. 
अभिलाषा बेलुरे म्हणाल्या, सर्वात जास्त फेटे एकाच  ठिकाणी  बांधण्याचा  संकल्प महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनने केला आहे. त्यानुसार जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हा विक्रम  होणार आहे. पुण्यासह मुंबई, सातारा, उस्मानाबाद, नगर यांसह विविध शहरांतून नागरिक सहभागी होणार आहेत. 
प्रत्येकाला ११ ते १३ फूट लांबीचा फेटा घालण्यात येणार असून त्यानंतर एकत्रितपणे राष्ट्रगीताचे समूहगान होणार आहे. आतापर्यंत ६०० होऊन अधिक सहभागींची नोंदणी झाली असून प्रवेश विनामूल्य आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी नोंदणी करून फेटा बांधण्यात येणार असून त्यानंतर एकत्रिपणे समूहगान होणार असल्याने सर्व सहभागी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. 
ज्यांना उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रभक्तीचा संदेश द्यायचा असेल त्यांनी सहभागाकरिता ७७९८७९६१९९ क्रमांकावर संपर्क साधावा. दिनांक १२ व १३ ऑगस्ट रोजी हॉटेल सेंट्रल पार्क येथे राखी व फेस्टिव एक्झिबिशनचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध स्टॉल्स आहेत. तेथे देखील प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

भारतात साखळी बॉम्बस्फोट, पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; पुण्यातील व्यक्तीला विदेशातून आला ईमेल

पुणे-

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला याबाबतचा मेल आला आहे. पुणे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे.

विदेशातून हा धमकीचा मेल आल्याची माहिती आहे. पोलिसांकडे दाखल गुन्ह्यानुसार या मेलमध्ये म्हटले आहे की, मी भारतामध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन. आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो

मेलनुसार, भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून हा ईमेल आला आहे. एम. ए. मोखीम असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने मेलमध्ये म्हटले आहे की, मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी अनेकांचे मृत्यू घडवून आणणार आहे.

दरम्यान, ज्यांना हा धमकीचा मेल आला त्यांनी तातडीने पुणे शहर पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. पोलिसांनी याची तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनूस साकी या संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. आजच पुणे सत्र न्यायालयाने हे आदेश दिले. हे दोघेही दहशतवादी एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असल्याची माहिती आहे.

तुम्ही भारत मातेचे रक्षक नाही, तुम्ही भारत मातेचे हत्यारे आहात; मोदी सरकारवर राहुल गांधींचा थेट प्रहार

मणिपूरमध्ये मोदी सरकारकडून भारत मातेची हत्या, राहुल गांधींचा घणाघात; लोकसभेत गदारोळ

मोदींना दिली रावणाची उपमा , रावण २ लोकांचे ऐकत मेघनाथ आणि कुंभकर्ण : मोदी हे अमित शहा आणि अदानींचे ऐकतात

रावणाची लंका हनुमानाने नाही तर रावणाच्या अहंकाराने जाळली

रावणाला रामाने नाही तर त्याच्या अहंकारानेच मारले .

मणिपूरमधील दोन महिलांची आपबिती सांगितली
सुरुवातीला बोलताना राहुल गांधींनी मणिपूरमधील भेटीदरम्यान, दोन महिलांनी सांगितलेली आपबितीचे वर्णन केले. “मी मणिपूरमध्ये रिलीफ कॅम्पमध्ये महिलांशी बोललो, मुलांशी बोललो ते पंतप्रधानांनी आजवर नाही केले. मी एका महिलेला विचारले तुमच्याबरोबर काय घडले. त्यावर त्या म्हणाल्या माझा एकच मुलगा होता, माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी घालण्यात आली. मी पूर्ण रात्र त्याच्या मृतदेहाबरोबर लोटलेली होते, नंतर मला भिती वाटली मी घर सोडले सर्वकाही सोडले. फक्त कपडे घेऊन मी निघून आले, असे त्यांनी सांगितले. नंतर एक फोटो काढला आणि तो दाखवत म्हणाल्या फक्त हेच शिल्लक आहे. दुसऱ्या कॅम्पमध्ये एका महिलेची विचारपूस केली, तेव्हा लगेच त्यांचा थरकाप होऊ लागला त्यांना घडले त्याची आठवण झाली आणि लगेचच त्या बेशुद्ध झाल्या,” असे राहुल गांधींनी सांगितले.

ओम बिर्ला यांचे आभार मानले
राहुल गांधी यांनी सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे खासदारकी बहाल केल्याबद्दल आभारही मानले. मी गेल्यावेळी प्रामुख्याने अदानींवर बोललो होतो, त्यामुळे तुमच्या प्रमुख नेत्यांना वेदना झाल्या. त्याचा तुमच्यावरही परिणाम झाला म्हणून, मी तुमची माफी मागतो. पण आज भाजपच्या माझ्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही, कारण मी आज वेगळ्या विषयावर बोलणार आहे. मी आज प्रामुख्याने अदानींवर बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही शांत राहू शकता, असे राहुल गांधी म्हणाले. मी आज तुमच्यावर फार टीका करणार नाही. एक दोन हल्ले नक्की करेल पण फार करणार नाही, त्यामुळे तुम्ही निवांत राहू शकता, असा टोलाही त्यांनी मारला.

देश सगळ्यांचा अहंकार संपवतो
राहुल गांधी म्हणाले मी 130 दिवस चालत भारत जोडो यात्रा केली. मला देश समजून घ्यायचा होता. मी रोज 8 किमी चालतो तर 25 किमी चालू शकतो हा अहंकार सुरुवातीला मला होता. पण भारत अहंकार संपवतो. कारण दोन तीन दिवसांत माझे गुडघे दुखू लागले. त्यामुळे अहंकार लगेच संपला. अहंकाराच्या लांडग्याची मुंगी झाली. मला भीती वाटत होती की मी चालू शकेल का? पण काहीतरी शक्ती माझ्याबरोबर होती. लोकांची शक्ती मला मिळत होती आणि मी पुढे जात राहिलो, असे राहुल गांधी म्हणाले.

मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली

राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना म्हटले की, भारतमाता आपली आई आहे, त्यामुळे आपल्याला सभागृहात बोलताना संयम बाळगायला हवा. त्यावर उत्तर देत राहुल गांधी म्हणाले, मी मणिपूरमध्ये आईच्या हत्येबाबत बोलत आहे, मी आदरानेच बोलत आहे. माझी एक आई इथे बसली आहे, तर दुसऱ्या आईची तुम्ही मणिपूरमध्ये हत्या केली आहे. हिंसाचार संपत नाही तोपर्यंत तुम्ही रोज माझ्या आईची तिथे हत्या करत आहात.

लष्कराला का पाचारण करत नाही?
राहुल गांधींनी यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले. मणिपूरमध्ये भारतीय लष्कर एका दिवसात हिंसाचार संपवू शकते. पण भारत सरकारला हिंसाचार थांबवायचा नाही, म्हणून ते लष्कराचा वापर करत नाहीत, असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.

रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण!
राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी भारताचा आवाज ऐकत नाहीत, तर कुणाचे ऐकतात. ते फक्त दोन लोकांचे ऐकतात. रावणही दोन लोकांचे ऐकायचा मेघनाद आणि कुंभकर्ण तसेच नरेंद्र मोदी दोघांचे ऐकतात अमित शहा आणि अडाणी, असे राहुल गांधी म्हणाले.

रावण अहंकाराने मारला गेला!
राहुल गांधी पुढे म्हणाले, लंका हनुमानाने जाळली नव्हती, तर लंका रावणाच्या अहंकाराने जळाली होती. रामाने रावणाला मारले नव्हते, तर रावणाच्या अहंकारानेच त्याला मारले होते. तुम्ही संपूर्ण देश जाळण्याचा प्रयत्न करत आहात. आधी तुम्ही मणिपूरमध्ये केरोसीन टाकले आणि आग लावली आणि आता तुम्ही हरियाणा जाळण्याचा प्रयत्न करत आहात, असेही राहुल गांधी म्हणाले.


मेडिकल कॉलेजची इमारत,तेथील सुविधा,पगार महापालिकेच्या पैशातून: व्यवस्थापनासाठी मात्र ट्रस्ट..भ्रष्टाचार पुणे महापालिकेचा

पुणे-महापालिकेचे मेडिकल कॉलेज गरीब विद्यार्थ्यांसाठी अशी हाकोटी पिटून सुरु करण्यात आले मात्र तेथील फीज आणि वरचे पैसे पाहून हे कॉलेज खरोखर गरीब विद्यार्थ्यासाठी काढले गेले कि अन्य कारणासाठी काढले गेले काय ? या प्रश्नाचे उत्तर मिळू लागले आहे.या कॉलेजच्या इमारती साठी, तेथील सुविधांसाठी,पगार पाण्यासाठी सारा खर्च महापालिका करत असून तेथील व्यवस्थापनासाठी मात्र ट्रस्ट नेमण्यात आला,तिथेच खरे तर चौकशीची गरज होती व आहे.या कॉलेजच्या व्यस्थापनासाठी ट्रस्ट नेमून, त्यात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश राहणार होता.या ट्रस्टच्या माध्यमातून कॉलेज चालविले जात असून,सध्या महापालिकेत प्रशासक राज असल्याने आणि ठराविक राजकीय पुढाऱ्यांचीच मर्जी चालत असल्याने विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात आहेत.असे दिसते आहे.

२०१७ मध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज या नावाच्या कॉलेजलला मंजुरी दिली गेली. त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल साडेसहाशे कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलच्या जागेत या मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधण्यात येत आहे. प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर दोन वर्षापूर्वी शंभर विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू झाली.

कॉलेजच्या व्यवस्थापनासाठी ट्रस्ट असल्याने या कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’च्या प्रवेशासाठी दोन टप्पे आहेत. ज्यात नियमित प्रवेशासाठी ७ लाख रुपये आणि संस्थात्मक (इन्स्टिट्यूटनल) कोट्यातील प्रवेशासाठी २२ लाख रुपये शुल्क आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे नियमित कोट्यात ८५ आणि संस्थात्मक कोट्यातून १५ जागा आहेत. सरकारी कॉलेजमध्ये एक ते दीड लाख रुपये शुल्क आहे. मात्र, हे कॉलेज ट्रस्टच्या माध्यमातून चालविले जात असल्याने दोन्ही टप्प्यांसाठी शुल्क निश्‍चित केले आहेत. दुसरीकडे हे कॉलेज महापालिकेच्या पैशांतून उभारले जात आहे. तेथील सेवा-सुविधांवरचा सर्व खर्च आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पगारही महापालिकाच करणार आहे. त्यामुळे शुल्काव्यतिरिक्त एक नवा पैसाही जास्त घेणे अपेक्षित नाही. तरीही,अधिष्ठाताच पैसे मागत असल्याची तक्रार आहे.

महापालिकेच्या वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी कोट्यावधींची लाच, डीनला अटक केल्यावर आता राजकीय सहभागाच्या चौकशीची मागणी

पुणे-गरीब, हुषार विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी (एमबीबीएस) पुणे महापालिकेने उभारलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये पात्र विद्यार्थ्यांकडूनच बेकायदेशीरपणे प्रत्येकी वीस लाख रुपयांची वसुली होत आहे. न परवडणाऱ्या नियमित शुल्काचे साडेबावीस लाख रुपये भरूनही त्यावर पुन्हा एवढी रक्कम देण्याचा तगादा कॉलेजने लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. जादा वीस लाख, तेही एकरकमी, रोखीने भरल्याशिवाय प्रवेश न देण्याची भूमिका कॉलेजने घेतल्याने अशाप्रकारे शंभर विद्यार्थ्यांकडून वीस कोटी रुपये उकळले कि काय याचा तपास आता करावा लागणार आहे . दरम्यान या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष श्रीनाथ बनगिनवार (५४) यास एमबीबीएसच्या एका प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.आता या भ्रष्टाचारात केवळ अधिष्ठाता हेच एकटे सहभागी होते कि त्यांच्याभोवती राजकीय आणि प्रशासकीय अन्य व्यक्तींचे रॅकेट होते याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

४९ वर्षीय तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परिक्षा – २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राउंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टअंतर्गत वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे संस्थात्मक कोट्यातून निवड झाली होती. या निवड यादीच्या आधारे एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयाचे तक्रारदार यांनी अापल्या मुलाच्या प्रवेशासाठी अधिष्ठाता बनगिनवार यांची भेट घेतली. त्या वेळी बनगिरवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहित फी २२ लाख ५० हजार रुपयांव्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख रुपये लाच देण्याची मागणी केली. तडजोडीअंती पहिला हप्ता १० लाख रुपयांचा ठरला होता. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ गुन्हा दाखल झाला आहे.

अधिष्ठाताच्या कार्यालयातच पोलिसांनी लावला ट्रॅप

अधिष्ठातांनी लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने तक्रारीची खातरजमा करून मंगळवारी महाविद्यालयातील अधिष्ठाताच्या कार्यालयात ट्रॅप लावला. बनगिनवार याने पहिल्या हप्त्याचे १० लाख रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या.

ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी मुंबईत एशियन हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी मुंबईत एशियन हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

हरी रामचंद्र नरके असे त्यांचे पूर्ण नाव असून एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी त्यांची ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या आणि तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस करतो.

प्रा. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील आहेत. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.

दोन पुस्तके प्रसिद्ध

प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ या दोन पुस्तकांचा समावेश आहे.

एटीएम मशीन साेबत छेडछाड करुन पैसे काढणाऱ्या युपीच्या तरुणांना पुणे पोलिसांनी केले गजाआड

पुणे- शहरातील विविध ठिकाणावरील एटीएम मशीन साेबत छेडछाड करुन पैसे काढत असलेल्या चाेरटयांना अटक करण्याची कामगिरी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी धर्मंद्र श्रीशिवलाल सराेज (वय-30,रा.प्रतापगड,उत्तरप्रदेश) व साेनुकुमार जगदेव सराेज (वय-28,रा.उत्तरप्रदेश) या आराेपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना त्यांना महाराणा प्रताप चाैक, भारती विद्यापीठ,पुणे येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन जवळ दाेन संशयित व्यक्ती मिळून आले. त्यानुसार धर्मंद्र सराेज व साेनुकुमार सराेज या दाेन आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात ते एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन टेम्परींग करुन त्यावर पट्टी लावून ग्राहकांचे पैसे काढत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन त्यांचे विराेधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यातून सहा हजार रुपये राेख, टेम्परींग करण्यासाठी वापरलेली पट्टी, माेबाईल फाेन असा १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलिस उपायुक्त र्स्मातना पाटील, एसीपी नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीशकुमार दिघावकर यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय अमाेल रसाळ, पोलिस अंमलदार दिनेश वीर, याेगेश घाेडके, सचिन सरपाले, मितेश चाेरमाेले, अशिष गायकवाड, राहुल तांबे, अवधुत जमदाडे, मंगेश पवार यांचे पथकाने केली आहे.

घरफोडी : सराईत गुन्हेगारास केले ४८ तासात जेरबंद

दि.०४.०८.२०२३ रोजी निरंकार अपार्टमेंट, दुसरा मजला, एफ. सी. रोड, मॉडेल कॉलनी पुणे येथील एका ऑफीसचे दार तोडुन आत प्रवेश करुन ऑफीस मधील एकुण ०४ लॅपटॉप चोरी केले बाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६३ / २०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८० गुन्हा दाखल झाला होता.

या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना युनिट कडील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज पाहुन सीसीटिव्ही फुटेज मधील संशयीत आरोपीचा फोटो गुप्त बातमीदारास दाखवुन अधिक तपास करीत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सीसीटिव्ही फुटेज मधील संशयीत इसमासारखा दिसणारा इसम हा दारुवाला पुल चौक नाल्यालगत, सार्वजनिक शौचालया लगत, रास्ता पेठ पुणे येथे थांबलेला आहे.खात्रीशीर बातमी प्राप्त झालेने युनिट कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे बातमीतील नमुद ठिकाणाचे थोडे अलिकडे आड बाजुला थांबुन व्यवस्थीत पाहणी केली असता दारुवाला पुल चौक, येथील सार्वजनिक शौचालया लगत असलेले नाल्याजवळ रास्ता पेठ पुणे येथे सीसीटिव्ही फुटेज मधील वर्णनाचा एक इसम थांबलेला दिसला. लागलीच वरील नमुद पोलीस स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचा पुर्ण नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव पत्ता मंगेश विजय चव्हाण वय २६ वर्षे, रा. एस. एम. जोशी हॉल जवळ, नाल्यालगत, दारुवाला पुल चौक, रास्ता पेठ, पुणे ( फिरस्ता). असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वरील नमुद दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हयाची कबुली दिली असुन त्याचे ताब्यातुन दाखल गुन्हयातील ३४,०००/- रु किं. चे एकुण ०४ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. आरोपीस पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर . सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वपोनि शब्बीर सय्यद, सपोनि आशिष कवठेकर, पोउनि रमेश तापकीर पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, निलेश साबळे, आण्णा माने, अमोल पवार, आय्याज दड्डीकर, शंकर कुंभार यांनी केली आहे.

राष्ट्रीय हातमाग दिन धनकवडीत साजरा

पुणे-वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तूंचा संकल्प करुयात, स्वावलंबी भारत, आत्मनिर्भर भारत बनवूया स्वदेशीचा वापर करूया विदेशी वस्तु टाळुया’ असा नारादेत धनकवडी, बालाजीनगरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात आला . राष्ट्रीय हॅण्डलूम डे निमित्ताने प्रबोधन रॅलीच्या माध्यमातून अनेक बचत गटाच्या महिला हातामध्ये स्वदेशीच्या फलक घेऊन संपूर्ण धनकवडी बालाजी नगर परिसरात वातावरण निर्मिती करत स्वदेशीचा नारा दिला

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला असून, या दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सदस्या उषा वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली बालाजीनगर परिसरात प्रबोधन रॅली काढण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश शेरला, राजेश्री ताला, सोनाली सारीपल्ली, मुकुंद वर्मा, चंदन गार्वे, दिगंबर डवरी ,प्रीती खाडे, आरती घुले, महेश साळुंखे, जितेंद्रकुमार सिंह, ओमकार डवरी यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. हातमाग हि कला आहे, हॅण्डलूमची उत्पादने वापरा असे आवाहन भाजपच्या उषा – वाजपेयी यांनी केले.
प्रबोधन रॅली ची सुरुवात बालाजी नगर जळगाव बॅलन्स येथून झाली व घोषणा दे पवार हॉस्पिटल मार्ग धनकवडी मनपा हॉस्पिटल ते बालाजी नगर चौक पर्यंत करण्यात आली

टॉर्क मोटर्सची एचडीएफसी बँकेसोबत हातमिळवणी सहजसोपे फायनान्स पर्याय उपलब्ध करवून देणार

·         भारतभरातील ग्राहकांना आकर्षक दरांना फायनान्शियल सेवासुविधा प्रस्तुत करण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे.

·        ग्राहकांना मिळणार ९.५% आकर्षक व्याज दर आणि कमीत कमी ४९९९रुपये ईएमआय सुविधा.

पुणे८ ऑगस्ट२०२३: भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी टॉर्क मोटर्सने भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी बँकेसोबत हातमिळवणी केल्याची घोषणा केली आहे. आपल्या ग्राहकांना ९.५%* आकर्षक दराने ४८ महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी सहजसोप्या फायनान्स सेवासुविधा पुरवण्याच्या उद्देशाने टॉर्क मोटर्सने हे पाऊल उचलले आहे. दर महिन्याला कमीत कमी ४९९९* रुपयांची, सहज परवडण्याजोगी ईएमआय सुविधा देऊन, जास्तीत जास्त नव्या ग्राहकांना क्रेटॉस-आर विकत घेता यावी, टॉर्क मोटर्स ग्राहकांच्या गरजांना अनुरूप, विशेष तयार करण्यात आलेल्या फायनान्स सुविधा पुरवल्या जाव्यात हा या भागीदारीचा उद्देश आहे. या करारानुसार एचडीएफसी बँकेचे प्रतिनिधी टॉर्क मोटर्सच्या एक्सपीरियन्स सेंटर्सना उपस्थित राहतील आणि तिथे भेट देणाऱ्या ग्राहकांना आर्थिक सेवासुविधा मिळवण्यात मदत करतील.

टॉर्क मोटर्सचे संस्थापक व सीईओ श्री. कपिल शेळके यांनी या भागीदारीबद्दल सांगितले, टॉर्क मोटर्सचे फायनान्स पार्टनर म्हणून एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होत आहे. या भागीदारीमुळे आम्ही आमच्या सर्व डीलरशिप्समध्ये आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करवून दिलेल्या फायनान्शियल असिस्टंस पॅकेजच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ झाली आहे. तातडीच्या आणि सर्वसमावेशक आर्थिक सेवासुविधा उपलब्ध करवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहेज्यामुळे आमच्या सर्व ग्राहकांसाठी ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पडू शकेल. देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला जावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही बांधील आहोतम्हणूनच आम्ही ग्राहकांना आवश्यक असलेल्या सर्व सेवासुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देत आहोत.”

एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड – रिटेल ऍसेट्सश्री. अरविंद कपिल यांनी सांगितले, “ब्रँडच्या ग्राहकांना आकर्षक ऑफर्स उपलब्ध करवून देऊन त्यांच्या ई-मोबिलिटीचा स्वीकार व वापर करण्याच्या वाटचालीचे सहयोगी बनण्यासाठी टॉर्क मोटर्ससोबत हातमिळवणी केल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ई-मोटरसायकल विकत घेणे हा आमच्या सर्व ग्राहकांसाठी एक आनंददायी अनुभव बनावा यासाठी आम्ही आकर्षक व्याज दर प्रस्तुत करत आहोत. आपले पर्यावरण अधिक जास्त हिरवेगार व अधिक स्वच्छ बनवण्यासाठी आम्ही योगदान देत असल्याचा देखील आम्हाला आनंद होत आहे.”

टॉर्क मोटर्सने २०२२ साली आपली पहिली मोटरसायकल क्रेटॉस-आर लॉन्च केली. तेव्हापासून आजतागायत या कंपनीच्या भारतात बनवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्सना ग्राहकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर बुकिंग्सच्या रूपाने प्रचंड प्रतिसाद दिला जात आहे.  यावर्षीच्या सुरुवातीला ऑटो एक्स्पोमध्ये या ब्रँडने नवी क्रेटॉस-आर सादर केली ज्यामध्ये लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. शहरी प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये आता पूर्णपणे काळी मोटर व बॅटरी पॅक, त्यासोबत अधिक जास्त स्टायलिंगसाठी स्टायलिश डिकल्स आहेत.  यामध्ये फास्ट-चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आले आहे.  ही ई-मोटरसायकल पाच ट्रेंडी रंगांमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये ग्रे छटांसह जेट ब्लॅक या नव्या रंग पर्यायाचाही समावेश आहे.

क्रेटॉस-आर जास्तीत जास्त ग्राहकांना विकत घेता यावी यासाठी टॉर्क मोटर्सने आघाडीच्या फायनान्शियल संस्थांसोबत हातमिळवणी केली आहे. आधी ज्यांनी ही गाडी खरेदी केली आहे ते ग्राहक देखील फरकाची रक्कम भरून आपली सध्याची मोटरसायकल अपग्रेड करून घेऊ शकतात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ग्राहक त्यांची क्रेटॉस-आर ऑनलाईन बुक करू शकतील

मोहन जोशींसह बागवे,शिंदे,धंगेकरांना सोडून आता अभय छाजेड यांच्यावर जबाबदारी.. पुण्याच्या कॉंग्रेसमध्ये हलचल

पुणे लोकसभेसाठी निरीक्षक प्रणिती शिंदे ,समन्वयक उत्कर्षां रूपवते

पुणे- एकीकडे दिल्लीत राष्ट्रवादीच्या मदतीला पुण्यातून जायला कोणी नगरसेवक तयार झाले नसल्याची चर्चा उसळली असताना दुसरीकडे शहर कॉंग्रेस मधील गटबाजीचा तिढा आणखी गुंतागुंतीचा होत चालल्याचे बोलले जाते आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुण्यात आले तेव्हाच पुण्यातील गटबाजी नेत्यांच्या समोर चव्हाट्यावर आली होती. शहर अध्यक्षांनी गाडीतून मधूनच उतरून नेत्यांना संकेत दिले होते.माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,आणि त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी अरविंद शिंदे यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले जात असताना,बागवे यांनी कॉंग्रेस पक्षात आणलेले आणि आता आमदार झालेले रवींद्र धंगेकर,माजी आमदार मोहन जोशी यांचा एक गट निर्माण झाल्याचे बोलले जाते आहे.हे तीन गट असताना आबा बागुल,अभय छाजेड,संजय बालगुडे असे मान्यवर आपापल्या स्थानावर अढळ आहेत.हडपसरला माजी मंत्री शिवरकर त्यांच्या स्थानी आहेत.या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून वडेट्टीवार यांनी पुण्यात आल्यावर आणि हि स्थिती लक्षात आल्यावर त्याच रात्री विश्वजित कदम यांच्या निवासस्थानी रात्री बैठक घेऊन गटबाजीचा तिढा सोडविण्यासाठी चर्चा केल्याचे वृत्त येथे समजले होते. या बैठकीत पुण्यातील तिढा सोडविण्यासाठी दरमहा अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात,नाना पटोले आणि वडेट्टीवार याचौघांनी एक दिवस पुण्यासाठी एकत्र येऊन एक बैठक घेऊन समन्वय साधून कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न करावेत असे ठरल्याचे सांगण्यात आले होते पण प्रत्यक्षात तसे होईल कि नाही याची शाश्वती नसतानाच आता महाराष्ट्रभर यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना, त्याच धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही आपल्या पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार आहे. आणि याबाबतची पुण्यातील जबाबदारी अभय छाजेड यांच्यावर टाकण्यात आली आहे.छाजेड हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत तर पुण्यासाठी प्रमुख नेते म्हणून अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात,नाना पटोले आणि वडेट्टीवार हे कोणीही नसून ज्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची आणि रायगडची जबाबदारी आहे त्याच पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुण्याचे प्रमुख नेते पद सोपविण्यात आले आहे. यामुळे छाजेड यापुढे आता बहुधा कार्यकर्त्यांच्या समुहात दिसू लागतील अशी अपेक्षा काहीजण व्यक्त करत असले तरी त्यांच्यावर समन्वयक म्हणून पुण्यासह कोल्हापूर,सोलापूर, सांगली, साताराचीही जबाबदारी आहे हे विशेष आहे.

प्रदेश च्या पदयात्रे साठी प्रमुख नेते

अशोक चव्हाणांकडे मराठवाडा देण्यात आला आहे तर नाना पटोले नागपूर, ठाणे पाहणार आहेत,वडेट्टीवार अमरावती, सिंधुदुर्ग तर बाळासाहेब थोरात उत्तर महाराष्ट्र आणि पालघर पाहणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूर,सोलापूर, सांगली,सातारा,पुणे आणि रायगड चे प्रमुख नेते म्हणून काम पाहणार आहेत .या प्रमुख नेत्यांसह पदयात्रा समन्वयक म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत त्यात पुण्यासाठी पुण्याचे अभय छाजेड यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

लोकसभेसाठी निरीक्षक व समन्वयक

पुणे लोकसभेसाठी निरीक्षक प्रणिती शिंदे ,समन्वयक उत्कर्षां रूपवते