पुणे-भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते हुतात्मा बाबूगेणू स्तंभ, तुळशीबाग पर्यंत ‘क्रांतीज्योत यात्रा’ काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले.
क्रांतीज्योत यात्रेचा मंडई येथील हुतात्मा बाबूगेणू स्तंभास पुष्पहार अर्पण करून समारोपीय भाषणात शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधीच्या ‘‘अंग्रेज चले जाव’’ या घोषणेमुळे लाखो सत्याग्रही देशाच्या विविध भागात ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात चले जाव चे आंदोलन करायला लागले. त्यावेळेस लाखो देशवासियांच्या मनात एकच ध्येय होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. १९४२ च्या मुंबईला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारत आंदोलनाचा ठराव संमत झाला. काँग्रेसने या देशामध्ये अखंडत्व, सार्वभौमत्व ठेवले याचे स्मरण देशवासियांनी करायला पाहिजे. १९४० ला वर्ध्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पूर्ण स्वराज्याचा विषय मांडण्यात आला त्यानुसार पं. जवाहरलाल नेहरूंची एकतेची, अखंडतेची परंपरा त्यांच्या मुलीने, नातवाने अखंडपण चालू ठेवली याचे स्मरण करणे गरजेचे आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, सुडाची भावना न ठेवता हा देश अखंड राहिला पाहिजे. मी त्या लाखो हुतात्म्यांना शतश: प्रणाम करून आदरांजली अर्पण करतो.’’
यानंतर विचारवंत संजय सोनवणी यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, अजित दरेकर, संगीता तिवारी,हेमंत राजभोज, विशाल जाधव, सुजित यादव, अनिल पवार, विनोद रणपिसे, अशोक जैन, भोला वांजळे, राहुल शिरसाट, हनुमंत पवार, रजिया बल्लारी, सुंदरा ओव्हाळ, अजित थेरे, बाबा तांबोळी,विकास कांबळे, विठ्ठल आरडे,अमित अगरवाल, शोभा अरडे, सुनीता खरात, युवराज कदगे, अनिल कांकरिया, राहुल ढाले, नंदलाल धिवार,लोळगे, विजय कांबळे, प्रसाद खराटे, राजू घेलोत, सचिन भोसले, चैतन्य पुरंदरे, राजेंद्र पडवळ, लतेंद्र भिंगारे, विशाल गुंड, सादिक कुरेशी, बळीराम डोळे, हसन शेख, मुनाफ शेख, मेहबूब नदाफ, सतीश पवार, रवी पाटोळे, अक्षय जैन,सादिक शेख,संगीता पवार,अशोक लांडगे, राजेंद्र पेशने आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.