शिरूर -मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावलले जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली. शरद पवार आमचे दैवत आहे, यामध्ये कोणातेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, आता 80 वर्षांनंतर कुठेतरी थांबले पाहिजे. माझे वय देखील 60 च्या पुढे गेले आहे. आता किती दिवस थांबायचे? असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.आता माझे वय देखील 60 पेक्षा जास्त झाले आहे. आता किती दिवस थांबायचे? आम्हाला देखील संधी नको का? त्यामुळे भावनिक होऊ नका, पवार साहेब आमचे दैवत आहे, त्यामध्ये दुमत नाही. पण 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी. मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती की नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. केवळ मी त्यांचा मुलगा नाही, त्यामुळे मला संधी नाही? हा कोणता न्याय? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.शरद पवार यांच्याकडे जिल्हा बँक नव्हती. मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक ताब्यात घेतली. आणि आजपर्यंत जिल्हा बँक, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे. असा दावा अजित पवार यांनी केला आहे. बारामतीचा विकास कसा केला हे येऊन पहा. अनेक लोक आम्हाला निवडून द्या आम्ही बारामती सारखा विकास करू, असे आश्वासन देतात. यावरूनच आमच्या बारामतीचा विकासाचा प्रत्यय येतो, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.