Home Blog Page 1125

भगिनी निवेदिता सहकारी बँकेने  सहकार क्षेत्राचे नेतृत्व  केले पाहिजे : विद्याधर अनास्कर

पुणे : सहकार क्षेत्राला आणखी सक्षम करण्यासाठी भगिनी निवेदिता सहकारी बँकेने  सहकार क्षेत्राचे नेतृत्व  केले पाहिजे. सर्व सहकारी बँका, संस्था आपल्या मार्गदर्शनाने सहकार क्षेत्रात भरारी घेतील, असे प्रतिपादन करण्यासाठी सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कार यांनी केले. भगिनी निवेदिता बँकेने खातेदारांचा विश्वासाचा ठेवा मिळवला आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यात बँकेने यश मिळवले असून पुढील अमृत महोत्सवी वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.       

भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ रविवारी टिळक स्मारक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कार यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यावेळी उपस्थित होते. बँकेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. याप्रसंगी भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण भरारी स्मरणिकेच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन व बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते यावेळी पार पडला. यावेळी बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ व सेवक वर्ग, बँकेचे सभासद, खातेदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बँकेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी बँकेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. ग्राहकांच्या संवादाबरोबर  ठेवी व आकर्षक योजना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ५० वर्षे पूर्ण झाली असून ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. बॅंकेची विश्वासाची परंपरा आहे. बॅंकेने काळानुरूप  ग्राहकांना अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या आहेत. शिक्षण कर्ज योजनासह विविध योजना सादर केल्या आहेत.अनास्कार म्हणाले, सहकार संस्था व बँकांना राज्य सरकारने मदत केली पाहिजे. राजकारणापासून भगिनी निवेदिता बँक अलिप्त राहून सहकार क्षेत्रात विकास केला आहे.  महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही बँक चालवली आहे, हे कौतुकास्पद आहे.प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, भगिनी निवेदिता बँकेची ग्राहकांशी महत्वाची भावना आहे. सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवून महिलांना सहकार क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली आहे. भगिनी निवेदिता यांचे सामाजिक कार्य व त्यांचे विचारांशी आपण एकरूप आहे. ही एकरूपता आपण टिकवून ठेवली आहे. भगिनी निवेदितानाने सहकार क्षेत्रात महिलांना संधी दिली आहे. आज काळ झपाट्याने बदलत आहे काळानुसार बँकेने बदल करून ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी केले. तर उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेती व प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांचा ‘हिंदी-मराठी’ गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यकामला उत्स्फुर्त दाद  यावेळी दिली.फोटो ओळ : भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभात सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कार व मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा हस्ते सहकारी बँकेच्या सुवर्ण भरारी स्मरणिकेच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन व बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यावेळी उपस्थित होत्या.

ब्राह्मण एकांडे शिलेदार ही खंत-विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर

याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार २०२४  
पुणे : चित्रपटात जे पाहायला मिळते ती भारताची संस्कृती नाही. आपली संस्कृती बुरख्यातील नाही तसेच ती अर्धनग्न देखील नाही. भारतीय संस्कृतीत शालीनता आहे आणि याचे विशेष उत्तरदायित्व ब्राह्मणांवर आहे. चांगली वाट आणि नैतिकता ब्राह्मण सोडत नाहीत. आपण वारसा जपला पाहिजे तर पुढची तो वारसा पुढे घेऊन जाईल. ब्राह्मण स्वाभिमानी असला पाहिजे. तो चारित्र्याने ओळखला गेला पाहिजे. परंतु ब्राह्मण हे एकांडे शिलेदार आहेत, एकट्याने काम करतात. यांची खंत वाटते, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात  करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या स्त्री रोग तज्ञ डॉ.सुप्रिया पुराणिक, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, प्रतिभा संगमनेरकर, कार्यवाह श्रीकांत जोशी, मंजुषा वैद्य, स्वाती कुलकर्णी, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, किरण कुलकर्णी, तन्वी लोंढे आदी उपस्थित होते.

या सोहळ्यांतर्गत स्वयंसिद्धा पुरस्कार नाशिकच्या अमोल इंडस्ट्रिज च्या संचालिका नलिनी कुलकर्णी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार क्वालिटी पेंटस् अँण्ड कोटींग्ज प्रा.लि. च्या संचालिका दिप्ती चंद्रचूड यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नुकत्याच निवड झालेल्या व महिलांचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या शुभहस्ते सत्कार झाला.

युवा उपक्रमांतर्गत कै. सावित्री नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै. मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत उद्योजिका पुरस्काराने अपूर्वा कुलकर्णी, ईशा देशपांडे, ज्योत्स्ना आपटे, स्मृती कुकडे यांना सन्मानित करण्यात आले.

शंकर अभ्यंकर म्हणाले, नरेंद्र मोदी रत्नपारखी आहेत, त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने पुण्यातील रत्न निवडले. आज महाराष्ट्राचा राजकारणाचा आलेख घसरला आहे. नेते काय बोलतात हे पाहिल्यावर खंत वाटते. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या तोंडातून बाहेर येणारी हिडीस भाषा पाहून खंत वाटते. घटस्फोटाचे सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्रात आहे. ही आपली संस्कृती नाही आणि इतिहासही नाही. मी माझ्या बुद्धीला पटेल असे वागणार, असा विचार राष्ट्रासाठी घातक आहे. असेही त्यांनी सांगितले.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मला जे मिळाले ते मी नागरिकांना अर्पण करते. एका विशिष्ट समाजाचे आपण असलो तरी सगळ्यांसाठी काम करतो. सगळ्या समाजाला पुढे नेत देश विकसित करायचा आहे. पक्ष आणि विचारांशी निष्ठा आहे, त्याच पद्धतीने पुढील काम  करायचे आहे. अन्याय सहन करू नका, एकी ठेवा. मी खासदार झाले, हा ब्रम्हांडाने दिलेला आशीर्वाद आहे, असे म्हणत त्यांनी नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

नलिनी कुलकर्णी म्हणाल्या, महिलांनी चार भिंतीच्या बाहेर पडून काम करायला पाहिजे. काहीतरी करण्याची जिद्द असेल तर सगळं शक्य होते. फक्त जे करतोय त्यात सातत्य पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. दीप्ती चंद्रचूड म्हणाल्या, आई वडिलांचा माझ्यावर असणारा विश्वास हा आज पर्यंतच्या प्रवासात महत्वाचा ठरला आहे.  सतत नावीन्यपूर्ण आणि प्रयोगशील असणे याचा यशामध्ये खूप मोठा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले. स्मिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मंजुषा वैद्य यांनी आभार मानले.

हिंदूंकरिता भारत हे एकच घर -कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांचे विचार

राजे शिवराय प्रतिष्ठान, कर्वेनगर तर्फे हुतात्मा जवान केशव गोसावी, तृतीयपंथी समाजसेविका आम्रपाली मोहिते यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे व ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार
पुणे : इराण, इराक, इजिप्त, इंडोनेशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बर्मा, श्रीलंका हे आपले होते, ते का गेले? याचा विचार करायला हवा. आता काश्मिर ते कन्याकुमारी हा भारत तरी आपण वाचवायला हवा. मुस्लिमांना ५७ तर ख्रिचनांना ११३ देश आहेत. मात्र, हिंदूंना भारत हे एकच घर आहे. त्यामुळे हिंदू संघटन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले.

कर्वेनगरमधील राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे हुतात्मा जवान केशव गोसावी यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आणि सावली सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करणा-या आम्रपाली मोहिते यांना स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार कर्वेनगर येथील जय शिवराय चौकात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, स्व-रुपवर्धिनीचे विनोद बिबवे, ह.भ.प. एकनाथ महाराज हगवणे, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष शिवाजी खरात, उत्सव प्रमुख विशाल लोयरे, सजावट प्रमुख महेश रांजणे आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रमोद मुतालिक म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील भाषावाद प्रांतवादामुळे शहाजीराजे यांची कर्नाटक मधील समाधी दुर्लक्षित आहे. त्याठिकाणी शहाजी महाराजांची प्रतिमा उभारून ते वीरक्षेत्र म्हणून प्रचलित होण्यास प्रयत्न करायला हवेत. भारताने मोठ्या प्रमाणात आपली भूमी गमावलेली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. केरळमध्ये केवळ ४० टक्के हिंदू शिल्लक आहेत. या परिस्थितीचा विचार करून आपण संघटित होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विक्रमसिंह मोहिते म्हणाले, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अशा अनेक अंगांनी आपली अधोगती होत होती, तेव्हा शिवरायांनी कशा प्रकारे स्वराज्य निर्माण केले, याचा विचार आपण करायला हवा. शिवरायांनी केलेल्या अनेक गोष्टींचे कार्य आपल्यापर्यंत अजूनही पोहोचायचे आहे, त्याकरिता आपण सखोल अभ्यास केला पाहिजे.

शिवजयंती महोत्सवानिमित्त राजसदरेची कलाकृती प्रसिध्द कलाकार महेश रांजणे यांनी साकारली. तर श्री शिवराज्याभिषेक ३५० वर्षपूर्ती प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष शिवाजी खरात, उत्सवप्रमुख विशाल लोयरे, सजावट प्रमुख महेश रांजणे, अमित जाधव, बंटी शिरोळे, केयुर बहिरट, स्वप्नील महाडीक, सागर ढमे, सुरेश ठाकुर, रोहित थरकुडे व अमित कदम यांसह कार्यकर्त्यांनी केले.

पाणी बचतीसाठी जनजागृतीची गरज : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

जागतिक जल दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ

पुणे : पृथ्वीवरील पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायला हवा. भावी पिढीला पाणीटंचाईपासून रोखायचे असेल, तर पाणी बचत करायलाच हवी. ‘पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा’ हा नारा प्रत्येकाने अमलांत आणावा. त्यासाठी जनजागृतीची गरज असून, प्रत्येकाने पाणीबचत करायला हवी. तसेच वाया जाणारे पाणी वाचवायला शिकावे, असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.

जागतिक जल दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पाणी बचतीची शपथ घेतली. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त नॅशनल स्कुल, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज, सूर्यदत्त लॉ कॉलेज, सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन अँड रिसर्च, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजी, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेकनॉलॉजी आदी संस्थाच्या वतीने जागतिक जल दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

संचालक शीला ओक, प्राचार्य मिथिलेश विश्वकर्मा, प्राचार्य अजित शिंदे, प्राचार्य किरण राव, प्राचार्य वंदना पांड्ये, प्रा. अतुल देशपांडे, उपप्राचार्य दीपक सिंग, उपप्राचार्य रेणुका घोसपुरकर, मुख्याध्यापिका मारिया वर्मा, प्रा. मोनिका सेहरावात, प्रा. शीतल भुसारे, प्रा. राज कांकरिया, डॉ. विद्या गवेकर, प्रा. मेघा माने आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असून, शहराना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बोअरवेल खोदण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. नागरिकांच्या दिनचर्येत पाण्याची गरज सर्वांना असते. बेंगळुरूसारख्या शहरात पाणी कमतरता असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना अजूनही पाणी पुरवठा नाही अथवा दूरवरून पाणी आणावे लागते. असे असूनही हेच पाणी वाचविण्यासाठी, त्याचे प्रदूषण रोखण्यासाठी, ते जतन करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.”

“सरकार कायदे आणि नियम बनवते. पण, त्यांचे पालन प्रत्येक जण करत नाही. भारतातही पर्जन्यमान चांगले असूनही अनेक राज्यात उन्हाळ्यात पाणी विकत घ्यावे लागते. शेतकरी आणि शेती हा भारताचा आधारभूत पाया मानला जातो. परंतु शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत पाणी बचतीसाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. यंदाच्या जागतिक जल दिनाची ‘शांततेसाठी पाण्याचा वापर’ अशी संकल्पना आहे,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला जागतिक जल दिन अर्थात ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी २२ मार्च रोजी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक जल दिन साजरा करत आहे. जागतिक जल संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक जल दिनामुळे प्रेरणा मिळते. त्याचा मुख्य उद्देश २०३० पर्यंत शाश्वत विकास लक्ष्य गाठण्याचे आहे. याचाच अर्थ २०२३ पर्यंत सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता साध्य करणे असा आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

वनविभागाचे आणि महापालिकेचे आवाहन विद्यार्थ्यांना संस्थेकडून करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून पाणी बचतीसाठी शपथ ही घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून पाणी योग्य वापर आणि बचतीसंदर्भात संदेश प्रदर्शित केले.

पाणीबचतीचे हे करावे

– पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करावा

– पाण्याचा स्रोत प्रदूषित करू नये

– पिण्याचे पाणी वाहने धुणे, अंगण, जिने, फरशी धुण्यासाठी वापरू नका

– गळणारे नळ तत्काळ दुरुस्त करा

– घरासमोरील रस्त्यावर पाणी मारू नका किंवा रस्ते धुऊ नका

– कुंड्यांतील झाडे, बागकामासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करू नका

सनातनी आणि वारकरी  यातील एकच विचार स्वीकारावा लागेल: ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने आयोजित  वारकरी संप्रदाय परिचय अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला.सोमवार,दि.२५ मार्च रोजी  दुपारी ४ वाजता एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे हा अभ्यासवर्ग झाला.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी मार्गदर्शन केले.संयोजन समितीच्या वतीने विवेक काशीकर,संदीप बर्वे आणि नीलम पंडित यांनी स्वागत केले.शालिनी पंडित,मनीष देशपांडे, सुदर्शन चखाले, नितीन चव्हाण , श्रीरंग गायकवाड,तेजस भालेराव उपस्थित होते.नीलम पंडित यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
ह. भ. प. बंडगर म्हणाले, ‘ भारतात चार्वाक, बुद्ध यांच्या परिवर्तनवादी परंपरांनंतर नाथ पंथ, लिंगायत आणि वारकरी संप्रदायाचा विचार पुढे आला. त्यातून स्त्री आणि शुद्र मानल्या गेलेल्यांचा कैवार, वेदप्रामाण्यवादाचा विरोध,लोकभाषांतून प्रबोधन, योग विद्येचा पुरस्कार केला गेला.वेद कितीही ज्ञान संपन्न असला तरी तो कंजुष आहे, असे ज्ञानेश्र्वर महाराजांनी म्हटले आहे. कारण वेदात शूद्र, अती शूद्र आणि महीलाना अधिकार नाहित.वारकरी संतांनी जाती भेदाविरुद्ध काम केले.वारकरी संप्रदायातील काल्याचा विधी हा जातीभेद मिटविणारा आहे.सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचे मूळ कबीर यांच्या विचारात आहे.वारकरी संप्रदाय हा सर्वांना सामावून घेणारा सर्व समावेशक संप्रदाय आहे.

आता वर्णवर्चस्ववादी मंडळी सनातनी विचार मांडत आहेत.बुद्धी भेद करीत आहेत.हा तथाकथित सनातन विचार आणि वारकरी विचार यातील एकच विचार स्वीकारावा लागेल, असेही बंडगर महाराज यांनी सांगितले.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात द्राक्षांची आरास

 कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात होळीपौर्णिमेनिमित्त आयोजन 
पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात होळीपौर्णिमेनिमित्त सुमधूर व रसाळ द्राक्षांची मनमोहक आरास करण्यात आली होती. पंढरपूर येथील दत्तभक्त व द्राक्ष बागायतदार  प्रकाश कुलकर्णी यांनी सुमारे १५१ किलो द्राक्षे श्री दत्त महाराजांचरणी अर्पण केली.
दत्त मंदिरासमोरील प्रांगणात विश्वस्तांचे हस्ते होलिकापूजन झाले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त राजू बलकवडे उपस्थित होते. होलिकापूजनानंतर दत्त महाराजांची सायं आरती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष  ॲड. संतोष खामकर व त्यांच्या पत्नी स्मिता खामकर, विराज खामकर तसेच विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांचे हस्ते संपन्न झाली. पौर्णिमेनिमित्त श्री दत्तयाग ॲड. शरद तुकाराम बांदल यांच्या तर्फे संपन्न झाला.

बँकिंग ऑडिटमध्ये सनदी लेखापालांचे योगदान महत्वपूर्ण-आशिष पांडे

-आयसीएआय’च्या वतीने ‘बँक ब्रँच ऑडिट’वर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
पुणे : “मार्च-एप्रिल महिन्यात लेखापरीक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असते. बँकांचे लेखापरीक्षण गुणवत्तापूर्ण व पारदर्शक होण्यात सनदी लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असते. बँकिंग क्षेत्रात नवीन लोकांचा, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि नियमात होणारे बदल लक्षात घेता अशा स्वरूपाच्या परिषदांचे आयोजन उपयुक्त ठरते,” असे बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी व्यक्त केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) ऑडिटिंग अँड अश्युरंस स्टँडर्ड बोर्ड आणि आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने ‘बँक ब्रँच ऑडिट’वर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी आशिष पांडे बोलत होते. प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, आयसीएआय पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, खजिनदार सीए मोशमी शहा, कार्यकारिणी सदस्य सीए अजिंक्य रणदिवे आणि सीए राजेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आशिष पांडे म्हणाले, “लेखापरीक्षणात दृश्य व अदृश्य गोष्टींचा समावेश असतो. लेखापरीक्षण लवकर व अचूक होण्यासाठी बॅंक कर्मचारी आणि लेखापालन कर्मचारी यांच्यात समन्वय असावा. नवीन तंत्रज्ञान, क्लोझिंग सॉफ्टवेर आदी गोष्टी प्रशिक्षणावेळी सांगितल्या जातात. ब्रँच मॅनेजर नवीन किंवा दुसऱ्या बँकेतून आलेले असतील, तर त्यांनीही आधीच्या गोष्टी समजून घ्याव्यात, प्रशिक्षण घ्यावे. सनदी लेखापालांची आजची पिढी हुशार व तंत्रज्ञानाभिमुख आहे.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “मार्चमध्ये संपूर्ण देशातील बँकांचे लेखापरीक्षण होत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नवीन नियम, परिपत्रक काढत असते. या बदललेल्या नियम व तांत्रिक गोष्टींविषयी लेखापालांना माहिती व्हावी, यासाठी देशभर ‘आयसीएआय’कडून असे परिसंवाद घेतले जातात.”

सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “सनदी लेखापालाकडून बँकांना असलेल्या अपेक्षांची पूर्तता, नवतंत्रज्ञान वापरून वेळेत लेखापालन करण्याच्या दृष्टीने ही परिषद उपयुक्त ठरेल. नवीन नियम, लेखापालन करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना यावर सनदी लेखापालांना मार्गदर्शन मिळेल.”

सूत्रसंचालन सीए मोशमी शहा यांनी केले. सीए ऋषिकेश बडवे यांनी आभार मानले.

संगीत साधना गुरूकुल आश्रमाच्या ‘अनुभूती संगीत सभेत’ श्रोते झाले मंत्रमुग्ध

पुणे, दि. २४ मार्च : तबल्याच्या विश्वात उदयास आलेले प्रसिद्ध ओजस अढीया, फारूकाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी कर्नाटक शाळेच्या शकुंतला शेट्टी सभागृहात नेत्रदीपक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे सादरीकरण इतके मनमोहक होते की प्रेक्षक त्यात हरवून गेले.
प्रसिद्ध तबलावादक अनुप जोशी व प्रज्ञा देव यांनी स्थापन केलेल्या संगीत साधना गुरूकल आश्रम संस्थेतर्फे आयोजित दोन दिवसीय अनुभूती संगीत सभेत एकल तबला वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध तबलावादकांनी प्रस्तुतीकरण करून हा दोन दिवसीय कार्यक्रम संस्मरणीय बनविला. यामध्ये अनेक लोकप्रिय आणि अप्रचलित बंदिशींचे सादरीकरण झाले. त्यांच्या सादरीकरणाची जादूच अशी होती की श्रोतांच्या बोटांना थिरकण्यापासून कोणीच थांबवू शकले नाही. मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर उत्तम साथ संगत केली.
तबलावादकांनी तबल्याला स्पर्श करताच श्रोते मंत्रमुग्ध होऊन आत्म अनुभूती घेत होते. या सर्व तबलावादकांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी तबला वाजवतांना श्रोत्यांशी आत्मिक नाते निर्माण केले. या कलाकारांसाठी सर्वात मोठे बक्षीस म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट.
प्रसिद्ध तबलावादक ओजस अढीया यांच्याकडे तबल्याची भाषा जिवंत करण्याची क्षमता आहे. अव्वल तबलावादक असण्याबरोबच त्यांनी त्यांच्या घराणाच्या वादनाच्या शैलीनुसार इतर घराण्यातील बंदिशीही सादर केल्या. उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाची सुरूवात अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग अलूरकर यांच्या एकल तबला वादनाने झाली. कल्पतरू ठाकरे ंयानी त्यांना हार्मोनिअमवर साथ संगत केली. तबला वादनाची सुरूवात पेशकारने झाली व त्यानंतर कायदा, रेला आणि बंदिशीने कार्यक्रमाच शेवट झाला.
कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात म्हणजे रविवारच्या सकाळी फारूखाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी तबल्यावर अनुभवी हातानी थाप मारली तेव्हा प्रेक्षक भावनेने भरून गेले. अगदी अवघड गोष्टी सुद्धा त्यांनी अगदी सहज वाजविल्या. त्यांच्या तबला वादनाने श्रोत्यांवर जादू केली. त्यांच्या वादनात तबल्याचे बारकावे होते.
यावेळी ज्येष्ठ तबलावादक पं. ओंकार गुळवाडी, पं. रामदास पळसुले, पुरातत्वविद्या शास्त्रज्ञ गो. बं. देगलुरकर, गोविंद बेडेकर, सुरेंद्र मोहिते, मनीष गुप्ता आणि टेनएक्सचे हरीश भाबड आणि नेक्सजेन एज्युकेशनचे संभाजी चवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संगीत साधना गुरूकुल आश्रमाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनुप जोशी, प्रज्ञा देव, अमित दरेकर, अमोल भट हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे पुण्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.

महादेव जानकर महायुतीतच राहणार,रासपला १ जागा

मुंबई-

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीतच राहणार आहेत. महायुतीच्या वतीने रासपला एक जागा दिली जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महादेव जानकर यांची देखील उपस्थिती होती. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महादेव जानकर यांनी महायुतीतच राहणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या निर्णयाची घोषणा तटकरे यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुती विशेष करून भाजपवर सातत्याने टीका करत होते. परंतु आज अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

पवारांची झुंडशाही, घराणेशाही संपविण्यासाठी 12 एप्रिलला भरणार बारामती लोकसभेचा अर्ज

बारामती-शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी 12 तारखेला 12 वाजता उमेदवारी अर्ज भरत विरोधकांचे 12 वाजवणार असा निर्धार केला आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली अखेरची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच बारामतीत पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी माझे धर्मयुद्ध आहे असा हल्लाही त्यांनी केला.

यावेळी बोलतांना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मी जिंकण्यासाठी लढत असून माझी लढाई पवारांविरोधात असल्याचे विजय शिवतारे म्हणाले. पुढे ते म्हणाले, ”अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प राहिला. शरद पवार यांना देखील माहित आहे शिवाजी विजय शिवतारे कोण आहे. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम असल्याची घणाघाती टीका शिवतारे यांनी केली.तसेच यावेळी ते म्हणाले की, ”राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगितले जातं आहे. मात्र मला फक्त अजित पवार यांचा पराभव करायचा आहे. मी लढतोय ते जिंकण्यासाठी. त्यामुळे 1 तारखेला पालखी तळावर सभा घेणार आणि 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार”, अशी माहिती शिवतारे यांनी दिली.

त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. शिवतारे यांनी ग्रामीण दहशतवादी शब्दही वापरला. ते म्हणाले की ”ग्रामीण दहशतवाद शरद पवारांनी केला. माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला ग्रामीण दहशतवाद शब्द माहिती पडेल. ईस्ट इंडिया कंपनी आहे ती गेली आणि पवारांची कंपनी आली. अजित पवार आणि शरद पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस अशा दोघांचा खात्मा करायचा आहे”, असा तिखट हल्ला शिवतारे यांनी केला आहे

मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा शरद पवार पसरवतात-बावनकुळे

पुणे- मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा शरद पवार पसरवतअसल्याचा आरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विटर वर पोस्ट केली आहे त्यात काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात वाचा …

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे.भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेस मध्ये एकेकाळी होते तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले, याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार.उलट मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदीजींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. पवार साहेबांच्या तर अजिबातच नाही.
जय संविधान !

होळीपौर्णिमेनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

पुणे : होळीपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

द्राक्षाच्या हंगामात सलग तिसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांच्या आयोजनातून मतदान जनजागृती

बारामती, दि. २२: बारामती लोकसभा मतदारसंघात स्वीप उपक्रमाअंतर्गत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, याकरीता मतदान व मतदार जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मानवी साखळी, रांगोळी स्पर्धा, मतदान प्रतिज्ञा, प्रभातफेरी, भजन आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघात राधेश्याम एन अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट अँड कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदारांना मतदान जनजागृतीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदानाचा संदेश दिला. तसेच रांगोळी, घोषवाक्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात भवानीनगर येथील गोविंदराव पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालच्यावतीने प्रभातफेरीचे आयोजन करुन मतदारांची जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्याद्वारे नागरिकांना मतदान करण्याबाबत संदेश दिला. सरडेवाडी येथे वोटर हेल्पलाईन ॲपबाबत मतदारांना माहिती देण्यात आली.

भोर विधानसभा मतदारसंघात वेल्हे पंचायत समिती येथे तालुकास्तरीय मतदार जनजागृती मोहीमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. त्यांना मतदान जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले.

पानशेत येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने महिला मतदान जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. सोंडेमाथाना आणि पानशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पासली येथे रांगोळी स्पर्धा व मतदान प्रतिज्ञा वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोंढूर येथे भजनाच्या कार्यक्रमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

दौंड विधानसभा मतदारसंघात महिला मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत केडगाव बाजारपेठ येथे जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील दुकानदार, बँकेचे अधिकारी व कर्मचारी, भाजीविक्रेते आदींना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच मतदान करण्याबाबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील विविध आरोग्य केंद्रांवर मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदान व मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून याला नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभत आहे.

आबा बागुल कॉंग्रेसच्या प्रचारार्थ सर्वात पुढे असतील -शरद पवारांच्या भेटीनंतर धंगेकरांचा आत्मविश्वास दुप्पट

पुणे- पुण्यात शरद पवार यांच्या सहा सभा होणार आहेत आणि आता उद्या पासून किंवा फक्त दोनच दिवसात कॉंग्रेसचे पुण्यातील निष्ठावंत , ज्येष्ठ नेते आबा बागुल कॉंग्रेसच्या प्रचारासाठी सर्वात पुढे दिसतील असा विश्वास लोकसभेसाठी कॉंग्रेसने दिलेले उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट होताच माध्यमांना सांगितले. मोहन जोशी, प्रशांत जगताप यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते.

ते म्हणाले ,बागुल ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे मार्गदर्शनाचा खजिना आहे. त्यांची नाराजी रास्त आहे पण पक्षाच्या निर्णयाचा ते सन्मान करतीलच. त्यांचा स्वभाव सर्वांना ठाऊक आहे ते रंगीत आहेत तेवढेच प्रेमळ आहेत , आमचे नेते ,आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत निश्चित काढू आणि पक्षाचा ते सन्मान करतील याचा आम्हाला विश्वास आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले, या भेटीदरम्यान पवारसाहेबांनी मला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नेहमीप्रमाणेच आजचीही भेट अतिशय उर्जादायी होती. पुढील काळात पुणेकरांचा आवाज म्हणून लोकसभेत जाण्यासाठी फार मोठी प्रेरणा या भेटीमुळे मिळाली. लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी, दडपशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला जनता भरभरून आशीर्वाद देईल, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.

मोहोळांनी बिल्डरांना, गोखले,व्यासांना दुध पाजले,पैलवानांना नाही…गरीब पैलवानांसह वस्ताद आमच्याकडे -धंगेकर यांचा मोहोळांना दुसरा टोला

पुणे- गिरीश बापटांचा निवडणुकीसाठी आधार घेणार्यांनी त्यांना हयातीत किती त्रास दिला हे सर्वांना ठाऊक आहे या टोल्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार मोहोलाना दुसरा टोला लगावला आहे. पैलवानांची फौज घरोघरी जाऊन मोहोलांचा प्रचार करण्याची घोषणा काल झाली यावर धंगेकर म्हणाले ,’ मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? बिल्डर लोकांना दूध पाजले, हे क्षेत्र हे ‘जय बजरंगबली’चे क्षेत्र आहे. पैलवान हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. पैलवान हा सगळ्यांचाच असतो. मुरलीधर मोहोळ यांनी गोखले, व्यास यांना दूध पाजले, त्यांनी आमच्या गरीब पैलवानांना अर्धा लीटर दूध पाजले नाही. जर त्यांच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहेत, असा टोला रवींद्र धंगेकर यांनी लगावला.

आज सकाळी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली.यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीबाबत माहिती दिली. तसेच भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका केली.

पुण्यात शरद पवार यांच्या सहा सभा होणार असल्याची माहिती देताना रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बापट साहेबांना मुरलीधर मोहोळ यांनी किती त्रास दिला, त्यांना किती छळले, हे सगळ्यांना माहिती आहे, असे सांगत, होळी आहे, वाईट प्रवृत्ती यांचा नाश होवो. शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला, मार्गदर्शन घेतले. शेती ते आयटीपर्यंत शरद पवार यांचे काम आहे. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्यासंदर्भात चर्चा केली, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.