पुणे- गिरीश बापटांचा निवडणुकीसाठी आधार घेणार्यांनी त्यांना हयातीत किती त्रास दिला हे सर्वांना ठाऊक आहे या टोल्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार मोहोलाना दुसरा टोला लगावला आहे. पैलवानांची फौज घरोघरी जाऊन मोहोलांचा प्रचार करण्याची घोषणा काल झाली यावर धंगेकर म्हणाले ,’ मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? बिल्डर लोकांना दूध पाजले, हे क्षेत्र हे ‘जय बजरंगबली’चे क्षेत्र आहे. पैलवान हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. पैलवान हा सगळ्यांचाच असतो. मुरलीधर मोहोळ यांनी गोखले, व्यास यांना दूध पाजले, त्यांनी आमच्या गरीब पैलवानांना अर्धा लीटर दूध पाजले नाही. जर त्यांच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहेत, असा टोला रवींद्र धंगेकर यांनी लगावला.
आज सकाळी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली.यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीबाबत माहिती दिली. तसेच भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका केली.
पुण्यात शरद पवार यांच्या सहा सभा होणार असल्याची माहिती देताना रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बापट साहेबांना मुरलीधर मोहोळ यांनी किती त्रास दिला, त्यांना किती छळले, हे सगळ्यांना माहिती आहे, असे सांगत, होळी आहे, वाईट प्रवृत्ती यांचा नाश होवो. शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला, मार्गदर्शन घेतले. शेती ते आयटीपर्यंत शरद पवार यांचे काम आहे. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्यासंदर्भात चर्चा केली, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.