मुंबई-
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीतच राहणार आहेत. महायुतीच्या वतीने रासपला एक जागा दिली जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महादेव जानकर यांची देखील उपस्थिती होती. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महादेव जानकर यांनी महायुतीतच राहणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या निर्णयाची घोषणा तटकरे यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुती विशेष करून भाजपवर सातत्याने टीका करत होते. परंतु आज अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.