पुणे : सहकार क्षेत्राला आणखी सक्षम करण्यासाठी भगिनी निवेदिता सहकारी बँकेने सहकार क्षेत्राचे नेतृत्व केले पाहिजे. सर्व सहकारी बँका, संस्था आपल्या मार्गदर्शनाने सहकार क्षेत्रात भरारी घेतील, असे प्रतिपादन करण्यासाठी सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कार यांनी केले. भगिनी निवेदिता बँकेने खातेदारांचा विश्वासाचा ठेवा मिळवला आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यात बँकेने यश मिळवले असून पुढील अमृत महोत्सवी वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.
भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ रविवारी टिळक स्मारक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कार यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यावेळी उपस्थित होते. बँकेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. याप्रसंगी भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण भरारी स्मरणिकेच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन व बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते यावेळी पार पडला. यावेळी बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ व सेवक वर्ग, बँकेचे सभासद, खातेदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बँकेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी बँकेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. ग्राहकांच्या संवादाबरोबर ठेवी व आकर्षक योजना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ५० वर्षे पूर्ण झाली असून ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. बॅंकेची विश्वासाची परंपरा आहे. बॅंकेने काळानुरूप ग्राहकांना अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या आहेत. शिक्षण कर्ज योजनासह विविध योजना सादर केल्या आहेत.अनास्कार म्हणाले, सहकार संस्था व बँकांना राज्य सरकारने मदत केली पाहिजे. राजकारणापासून भगिनी निवेदिता बँक अलिप्त राहून सहकार क्षेत्रात विकास केला आहे. महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही बँक चालवली आहे, हे कौतुकास्पद आहे.प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, भगिनी निवेदिता बँकेची ग्राहकांशी महत्वाची भावना आहे. सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवून महिलांना सहकार क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली आहे. भगिनी निवेदिता यांचे सामाजिक कार्य व त्यांचे विचारांशी आपण एकरूप आहे. ही एकरूपता आपण टिकवून ठेवली आहे. भगिनी निवेदितानाने सहकार क्षेत्रात महिलांना संधी दिली आहे. आज काळ झपाट्याने बदलत आहे काळानुसार बँकेने बदल करून ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी केले. तर उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेती व प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांचा ‘हिंदी-मराठी’ गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यकामला उत्स्फुर्त दाद यावेळी दिली.फोटो ओळ : भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभात सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासक विद्याधर अनास्कार व मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा हस्ते सहकारी बँकेच्या सुवर्ण भरारी स्मरणिकेच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन व बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेच्या अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यावेळी उपस्थित होत्या.