सोन्याने प्रथमच आपला सार्वकालिक उच्चांक बनवत 59 हजारांच्या जवळ पोहोचले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, आज म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सराफा बाजारात सोने 779 रुपयांनी महाग होऊन 58 हजार 689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. काल सोन्याचा भाव 57 हजार 910 रुपयांवर बंद झाला होता.चांदीबद्दल सांगायचे तर आज किमतीत मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात चांदी 1 हजार 805 रुपयांनी महागून 71 हजार 250 रुपये किलो झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी ती 69 हजार 445 हजारांवर होता.आजपासून एक वर्ष आधी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 रोजी सोने 48 हजार 8 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके होते, ते आता 58 हजार 689 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच गेल्या 1 वर्षात त्याची किंमत 10,681 रुपयांनी (20%) वाढली आहे.केंद्रीय बँकांकडून सोन्याची वाढती खरेदी हे सकारात्मक लक्षण आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीला आधार मिळेल. 2023 मध्ये सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
आता जाणून घ्या, बजेटनंतर किमतीत वाढ का झाली?
सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क 20% वरून 25%, चांदीवर 7.5% वरून 15% पर्यंत वाढली आहे. शुल्क वाढल्याने भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढू लागल्या आहेत. याशिवाय, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात RBI सारख्या जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याचा साठा वाढवला आहे.