गणेश बिडकर ‘ग्रीन क्रुसेडर’ पुरस्काराने सन्मानित

Date:

सामाजिक व पर्यावरणीय कार्याची दखल; सभागृह नेते गणेश बिडकर ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६’ने सन्मानित

पुणे : पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांना प्रतिष्ठेच्या ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भामला फाउंडेशन आणि पंचशील फाउंडेशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे चॅप्टर अंतर्गत हा सन्मान सोहळा पार पडला.

गेली अनेक वर्षे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष, स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच सभागृह नेते अशा विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या गणेश बिडकर यांनी सक्षमपणे सांभाळल्या आहेत. या जबाबदाऱ्या पार पाडताना केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता समाजाशी असलेली बांधिलकी जपत प्रत्यक्ष कृती, लोकसहभाग आणि दीर्घकालीन सकारात्मक बदल घडविण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.

शहराच्या दूरगामी आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे विविध विकास प्रकल्प मार्गी लागावेत, तसेच पुणे शहराच्या जीवनवाहिन्या असलेल्या नद्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने प्रयत्न केले आहेत. नागरी सुविधा, पायाभूत विकास आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर काम करताना विकास प्रक्रियेत लोकसहभागाला महत्त्व देण्याची भूमिका त्यांनी कायम जपली आहे.

भामला फाउंडेशन आणि पंचशील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे चॅप्टरचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यातून सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याची दखल घेण्यासाठी ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड’ प्रदान करण्यात येतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

15 सप्टेंबरपासून घाऊक विक्रेत्यांसाठी साखरेच्या साठ्याच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून 2000 क्विंटल इतकी कपात

नवी दिल्‍ली- केंद्र सरकारने साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखरेच्या साठ्याची मर्यादा...

पुणे-जर्मनी शहरांमध्ये धोरणात्मक भागीदारीची तयारी; MSME, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानावर भर

पुण्यातील उद्योगांसाठी 12 महिन्यांचा युरोपियन मार्केट अॅक्सेस कार्यक्रम प्रस्तावित;...

१९वे खासदार जनसंपर्क सेवा अभियान कोथरुडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादात

कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चौथ्या टप्प्याला प्रारंभ ⁠नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रशासन...

ब्लास्टिंगबाबत नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा-पालकमंत्री ॲड आशिष शेलार

इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई महानगरपालिका...