Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Industrialist

आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सतर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि विमा जनजागृती शिबिराचे आयोजन

पुणे, १८नोव्हेंबर २०२३ : आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (“ABSLI/ कंपनी”), आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (“ABCL”) ने जीवन विमा उपकंपनी, लाइफ इन्शुरन्सबाबत जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने एक विशेष उपक्रम...

फेडएक्समुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर 80 अब्ज डॉलरहून अधिक थेट प्रभाव

~ डन आणि ब्रॅडस्ट्रीट यांच्याशी सल्लामसलत करून तयार केला अहवाल ~ पायाभूत सुविधा, शाश्वतता आणि नाविण्यता यात गुंतवणूक केल्याने भारतातील नेटवर्क झाले मजबूत मुंबई १८ नोव्हेंबर २०२३ – फेडएक्स कॉर्प (NYSE:FDX) ने २०२३ या आर्थिक वर्षात कंपनीच्या जगभरातील नेटवर्कचे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम वाढवण्याच्या भूमिकेचे विश्लेषण करून वार्षिक आर्थिक प्रभाव अहवाल जारी केला. डन अँड ब्रॅडस्ट्रीट (NYSE: DNB) यांच्याशी सल्लामसलत करून अभ्यास करत फेडएक्समुळे जगभरातील सर्वसामान्यांवर आणि समाजावर काय परिणाम झाला याचा अहवाल सादर केला असून, त्याल फेडएक्स इफेक्ट असे संबोधले जाते. “फेडएक्सने ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा लक्षात घेत व्यवसायांच्या वस्तू, सेवा आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन करून पाच दशकांमध्ये जागतिक पुरवठा साखळी आणि ई-कॉमर्स क्रांती घडवून आणण्यास मदत केली आहे,” असे फेडएक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ  राज सुब्रमण्यम म्हणाले. "हा अहवाल अर्थव्यवस्थेतील आमचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करतो आणि आम्ही जिथे काम करतो त्या ठिकाणी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समर्पण करतो, हेही या अहवालातून स्पष्ट होते" अहवालात असे दिसून आले आहे की, जगभरात आर्थिक परिस्थिती कठिण असतानाही फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणारे ८० अब्ज डॉलरपेक्षा जास्त योगदान दिले. यातून हेच दिसून येते की फेडएक्सने उत्तम नेटवर्क तयार केले आहे आणि नाविण्यपूर्ण प्रयत्नांमुळे व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत जलद गतीने सेवा पोहोचवता येत आहेत. या अहवालात भारतावर झालेल्या परिणामांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात कंपनीने २९०० पेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे आणि कंपनी तीन आंतरराष्ट्रीय गेटवे चालवते. फेडएक्सने १७ एप्रिल २०२३ रोजी ऑपरेशनची ५० वर्षे साजरी केली. कंपनीकडे जगातील सर्वात विस्तृत वाहतूक नेटवर्क आहे, ज्याद्वारे २२० पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये सेवा पुरविली जाते. याव्यतिरिक्त, फेडएक्स ५,००० पेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये ५,००,००० लोकांना रोजगार देते आणि दररोज अंदाजे १४.५ दशलक्ष पॅकेजेस इकडून तिकडे पाठवते.  फेडएक्स इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्टच्या प्रमुख जागतिक हायलाइट्समध्ये या गोष्टींचा समावेश : ●     अप्रत्यक्ष प्रभाव: फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जागतिक निव्वळ आर्थिक उत्पादनात अप्रत्यक्षपणे ३५ बिलियन डॉलरचे योगदान दिले. ●     पुरवठा साखळी :  फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये अंदाजे १,००,००० पुरवठादारांशी करार केला - त्यापैकी ९०% छोटे व्यवसायिक होते. २०२२ मध्ये अंदाजे ७३,००० युनिक पुरवठादारांसह केलेल्या खर्चाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की कंपनीने या पुरवठादारांसोबत केलेल्या खर्चामुळे ११ लाख नोकऱ्यांना आधार मिळाला. ●     व्यापार: आपल्या ग्राहकांना अधिक बाजारपेठेतील प्रवेश आणि कार्यक्षमता प्रदान करणार्‍या व्यापार धोरणांचे फेडएक्सने कायम समर्थन केले आहे. डी मिनिमिस अलाउंसेस सारख्या तरतुदींचा अंगीकार केल्याने सर्व आकारांच्या व्यक्ती आणि व्यवसायांना शुल्क आणि करांशिवाय कमी-मूल्याच्या वस्तू आयात करणे शक्य होते.  भारताचा प्रभाव एक्सप्रेसने भारतात १९८४ मध्ये कार्य सुरू केले आणि देशाने आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका (AMEA) प्रदेशाशी कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अभ्यासात असे आढळून आले की, फेडएक्स एक्सप्रेसने वित्त वर्ष २३ मध्ये भारतासह AMEA मध्ये विस्तृत नेटवर्कसह वाहतूक, स्टोरेज आणि कम्युनिकेशन्स क्षेत्रातील निव्वळ आर्थिक उत्पादनात ०.३% योगदान दिले आहे. AMEA अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये, फेडएक्स एक्सप्रेसने एकूण निव्वळ आर्थिक उत्पादनात ०.०२% योगदान दिले, जे वित्त वर्ष २०२३ मध्ये अंदाजे ६% वाढून ४४ ट्रिलियन डॉलर झाले. फेडएक्स एक्सप्रेस मिडल ईस्ट, भारतीय उपखंड आणि आफ्रिकाचे अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाले की, “जगातील सर्वात विस्तृत वाहतूक नेटवर्कसह, आम्ही जागतिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या स्मार्ट आणि शाश्वत उपायांद्वारे मूल्य पोहोचवण्यासाठी समर्पित आहोत. भारतातील नाविन्यता आणि वाढीस चालना देण्यासाठी स्थानिक प्रतिभांचे पालनपोषण करणे आणि प्रगत क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विस्तार करणे ही आमची वचनबद्धता आहे. असे केल्याने, आम्ही केवळ जगभरातील व्यवसायांना जोडले जात नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देतो.” फेडएक्स एक्सप्रेस त्यांच्या भारतीय ताफ्यात अलीकडेच ३० हून अधिक इलेक्ट्रिक वाहने (EVs) दाखल केली आहेत. नवी दिल्ली कार्गो कॉम्प्लेक्समधील कंपनीच्या गेटवेला त्यामुळे पूरक सुविधा मिळाली आहे. या सुविधेमध्ये सौर ऊर्जा आणि प्रगत व्हेरिएबल रेफ्रिजरंट व्हॉल्यूम कूलिंग सिस्टीम यासारख्या टिकाऊ वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यामुळे विजेचा वापर अंदाजे १५% कमी होतो. याव्यतिरिक्त, भारताच्या नवकल्पना अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध फेडएक्स एक्सप्रेस आहे. मार्च २०२३ मध्ये, कंपनीने हैदराबादमध्ये आपली पहिली अॅडव्हान्स्ड कॅपॅबिलिटी कम्युनिटी (ACC) उघडण्याची सुरू करण्याची जाहीर केली. फेडएक्स ACC मध्ये तांत्रिक आणि डिजिटल नवकल्पनांच्या विकासास समर्थन देण्यासाठी पूर्ण-वेळ कर्मचारी नियुक्त केले जातील, जे फेडएक्सला जागतिक पुरवठा साखळी इकोसिस्टममध्ये आणखी मोठे मूल्य प्रदान करण्यास सक्षम करतील. भारतातील तसेच विस्तीर्ण प्रदेशात सुरुवातीच्या टप्प्यातील डिजिटल स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनीने मे 2023 मध्ये फेडएक्स इनोव्हेशन लॅब (FIL) लाँच केली.

 स्टार हेल्थचे पूर्णपणे डिजिटल, ग्राहकांना अनुकूल बदल करण्यायोग्य आरोग्य विमा !

⮚     ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कव्हरेज ⮚     पॉलिसीधारकांना अतिरिक्त संरक्षणासाठी ५ पर्यायी कव्हर्स ⮚      वैयक्तिक कव्हर आणि फ्लोटर कव्हर असे दोन्ही पर्याय उपलब्ध पुणे , 18 नोव्हेंबर २०२३: स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स, भारतातील आघाडीच्या हेल्थ इन्शुरन्सने स्मार्ट हेल्थ प्रो ही डिजिटल-ओन्ली हेल्थ पॉलिसी लॉन्च केली आहे. ही पॉलिसी ग्राहकांना पाच पर्यायी अॅड-ऑन कव्हरमधून त्यांचे कव्हरेज निवडण्याचे पर्याय उपलब्ध करून देते. भारतातील डिजिटलवर असलेल्या लोकांच्या आधुनिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही पॉलिसी सुरू करण्यात आली असून, ही पॉलिसी व्यक्तींना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या विविध विम्याची रक्कम निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. हे नाविन्यपूर्ण उत्पादन आरोग्य विम्याने स्वतःला सुरक्षित करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणार आहे. पॉलिसी ग्राहकांना त्यांचे विमा कवच त्यांना अनुकूल असलेल्या आणि त्यांच्या गरजेनुसार पाच पर्यायी कव्हर निवडण्याची सुविधाही देते. त्यामुळे ग्राहकांचे त्यांच्या पॉलिसींवर अधिक नियंत्रण राहाते. विम्याची रकमेत अमर्यादित वेळा रिस्टोअर होईल. निवडलेली विमा रक्कम प्रत्येक वेळी जास्तीत जास्त 100% पर्यंत रिस्टोअर होईल. त्यासाठी कितीही वेळा ऑटोमॅटिक रिस्टोअर होऊ शकेल.  ही पुनर्संचयित विम्याची रक्कम नंतरच्या हॉस्पिटलायझेशनसाठी वापरली जाऊ शकते. कव्हरच्या मर्यादेचा आंशिक किंवा पूर्ण वापर केल्यावर पुनर्संचयित वैशिष्ट्य ट्रिगर केले जाते. अशी पुनर्संचयित विम्याची रक्कम नंतरच्या हॉस्पिटलायझेशनसह सर्व दाव्यांसाठी वापरली जाऊ शकते. एकत्रित बोनस बूस्टर : प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी विम्याच्या रकमेच्या ५०%  आणि 600% पर्यंत विम्याची कमाल रक्कम असू शकते. श्रेणीतील बदलाला वाव : विमाधारक व्यक्ती खाजगी सिंगल ए/सी रूममधून कोणत्याही खोलीत/सामायिक खोलीत श्रेणी वाढवू अथवा कमी करू शकते. पूर्व-अस्तित्वात असलेल्या रोगांचा प्रतीक्षा कालावधी कमी करणे : विमाधारक व्यक्ती पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांचा प्रतीक्षा कालावधी ४८ महिन्यांवरून ३६/२४/१२ महिन्यांपर्यंत कमी करू शकते. गैर-वैद्यकीय वस्तूंसाठी कव्हरेज : गैर-वैद्यकीय वस्तू म्हणून सूचीबद्ध केलेल्या वस्तू उपभोग्य वस्तूंच्या अंतर्गत येतात आणि सामान्यतः विमा संरक्षणातून वगळल्या जातात. या नवीन पर्यायी कव्हरसह, इनपेशंट किंवा डे-केअर ट्रीटमेंटसाठी पॉलिसी अंतर्गत स्वीकार्हाह हक्क असल्यास गैर-वैद्यकीय वस्तू म्हणून सूचीबद्ध केलेल्या वस्तूवर विमा कवच राहील. स्मार्ट हेल्थ प्रो २ प्रौढ आणि ३ मुलांपर्यंतच्या कुटुंबांसाठी वैयक्तिक आणि फ्लोटर असे दोन्ही कव्हर ऑफर करते. आयुष उपचार, आधुनिक उपचार आणि घरगुती उपचारांसह आजार किंवा अपघातांमुळे कराव्या लागणाऱ्या हॉस्पिटलायझेशनसाठी हे उत्पादन अखंड कव्हरेज सुनिश्चित करते. पॉलिसीमध्ये नवविवाहित, नवजात आणि दत्तक घेतलेल्या मुलांसाठी मध्यावधीत समावेशाचा पर्यायही आहे. पॉलिसीधारकांना स्टार हेल्थच्या २४x७ मोफत टेलिमेडिसिन सल्लामसलतीचाही लाभ मिळेल आणि अनुभवी वैद्यकीय तज्ञांद्वारे वेलनेस प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतात. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री आनंद रॉय म्हणाले की, "स्मार्ट हेल्थ प्रोमध्ये नवकल्पना, वैयक्तिकरण आणि प्रवेशयोग्यतेची स्टार हेल्थची बांधिलकी आहे. आरोग्य विम्याने वैयक्तिक गरजांशी जुळवून घेतले पाहिजे, ही सध्याची गरज आहे. हा डिजिटल-प्रथम उपक्रम केवळ सर्वसमावेशक कव्हरेजच देत नाही तर कुटुंबांना त्यांना हवी तशी पॉलिसी सहजतेने तयार करण्यास सक्षम बनवतो. तरुण आणि ग्रामीण समुदायांसाठी आरोग्य विमा सर्वसमावेशक आणि युजर फ्रेंडली बनवून आम्ही अंतर भरून काढत आहोत. स्मार्ट हेल्थ प्रो सह, आम्ही फक्त विमा देत नाही; आम्ही मनःशांती प्रदान करत आहोत. जेव्हा प्रत्येकाला सर्वात जास्त गरज असते तेव्हा दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकेल, याची आम्ही खात्री करून घेतो. डिजिटल माध्यम आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या युगात, भारताच्या तंत्रज्ञानस्नेही पिढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार केलेले उत्पादन सादर करताना आम्हाला आनंद होत आहे." हा उपक्रम स्टार हेल्थचे ग्राहक-प्रथम वैशिष्ट्य आहे. यामध्ये एकत्रिकरणाची आणि हवा तसा बदल करण्याची सुविधा  देण्यात आली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा स्वीकार करून, कंपनीने आरोग्य विम्याच्या सुलभतेतील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न केला असून, याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे. त्यांच्या आर्थिक कल्याणाचे रक्षण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. स्मार्ट हेल्थ प्रो इन्शुरन्स पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये : ●        १८ वर्षे ते ५० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी उपलब्ध. अवलंबित मुलांसाठी विम्याची रक्कम किमान - 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षांपर्यंत असेल ●        उपलब्ध विम्याचे पर्याय : रु. ५ लाख, रु. १० लाख, रु. १५ लाख, रु. २० लाख, रु. २५ लाख, रु. ५० लाख, रु. ७५ लाख, रु. १ कोटी ●        या गोष्टी होतात कव्हर - रूग्णांना रूग्णालयात दाखल करणे, डे केअर उपचार, रूग्णवाहिका, रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च, डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन, वार्षिक आरोग्य तपासणी, होमकेअर उपचार ●        अतिरिक्त फायदे : टेली-आरोग्य सेवा ●        विम्याची रक्कम संपल्यानंतर १००% ने मूळ विम्याची रक्कम स्वयंचलित पुनर्संचयित करणे आणि पॉलिसी कालावधीत क्लेम बोनस नाही ●        नूतनीकरण प्रीमियमवर सवलत - विमाधारक प्रथम खरेदी आणि त्याच्या नूतनीकरणासाठी १०% सवलत मिळते.

 टेस्लाचा कारखाना गुजरात कि महाराष्ट्रात? दरवर्षी ५ लाख ईव्ही कार तयार करणार

कारची किंमत सुमारे २० लाख रुपये इलॉन मस्क यांनी आपली कंपनी टेस्ला भारतात लाँच करण्याचा रोडमॅप बनवला आहे. टेस्लाने पुढील वर्षी मस्क यांच्या संभाव्य...

टाटा टेक्नॉलॉजीजची प्राथमिक समभाग विक्री २२ नोव्हेंबरपासून सुरू

· टाटा टेक्नॉलॉजीज लि.च्या २ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ४७५ ते ५०० रुपये असा किंमतपट्टा निश्चित. · अँकर गुंतवणूकदारांच्या बोलीचा दिवस – मंगळवार,...

Popular