~ शहरातील पहिले बिल्ट-इन- अप्लायन्सेस एक्सपिरीएंटल सेंटर ~
पुणे: व्हर्लपूल ऑफ इंडिया ही व्हर्लपूल कॉर्पोरेशन या जगातील अग्रगण्य होम अप्लायन्सचीसहयोगी कंपनी असून पुणे, महाराष्ट्र येथे विशेष बिल्ट-इन शोरूम ‘व्हर्लपूल हौटे-किचन’चा शुभारंभ करण्यातआला. 9 शहरांमध्ये विशेष बिल्ट-इन अप्लायन्स शोरूम सादर केल्यानंतर या ब्रँडने विस्तारीकरणाच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे. पुण्यातील दोराबजी हेरीटेज मॉल येथे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन (एमईसी) सोबत भारतातील सर्वात मोठे बिल्ट-इन- अप्लायन्सेस एक्सपिरीएंटल सेंटर सादर केले.
व्हर्लपूलच्या अत्याधुनिक बिल्ट-इन- अप्लायन्सेस एक्सपिरीएंटल सेंटरच्या उदघाटनाला सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर, नामांकीत आर्किटेक्ट अमला सेठ, एमईसीचे मालक अमर छाब्रा तसेच इंटीरियर आणि आर्किटेक्ट क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेफ कुणाल कपूर यांनी उपस्थितांना अप्लायन्सेस (उपकरणांचा) लाइव डेमो दिला. जिथे सेलेब्रिटी शेफने सारखे पदार्थ पाहुण्यांकरिता बनवले. सर्वसाधारण जनतेसाठी खुल्या झालेल्या, अलीकडे स्थापना करण्यात आलेल्या बिल्ट-इन- अप्लायन्सेसएक्सपिरीएंटल सेंटरमध्ये सर्वोत्तम युरोपियन स्टाईलिंग आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत व्हर्लपूल बिल्ट-इन अप्लायन्सेसची संपूर्ण श्रेणी घेऊन आले आहे. त्यात हुड्स, हॉब्ज, कॉफी मशीन, ओवन, मायक्रोव्हेव ओवन,
रेफ्रिजरेटर, वाईन कुलर्स, वॉटर प्युरीफायर्स, स्टीम ओवन, डिशवॉशर आणि स्टकेबल वॉशर आणि ड्रायर्सचा समावेश आहे. याठिकाणी लोकांना येता येईल आणि कंपनीकडून त्यांना सर्व बिल्ट-इन- अप्लायन्सेसचा अनुभव
घेता येईल, तसेच हौटे-किचन’ मधील लाईव कुकिंग एक्सपीरियन्स घेता येईल. कोणालाही उपकरणांचे लाईव प्रात्यक्षिकासाठी नोंदणी करता येईल. त्यानंतर व्हर्लपूलकडून शेफ पाठविण्यात येईल. जो तुमच्यासाठी चवदार
पदार्थ तयार करेल. आहे की नाही उत्तम!
व्हर्लपूल ऑफ इंडियाचे न्यू बिझनेस हेड श्री. ए नटराजन हे शुभारंभाला उपस्थित होते, ते म्हणाले की, “भारतात बिल्ट-इन- अप्लायन्सेसकरिता पुणे कायमच एक महत्त्वाची बाजारपेठ होती. पुणेकरांच्या बहुढंगी स्वभावाने कायम व्हर्लपूलला आकर्षित केले. त्यामुळे त्यांनी चाहत्यांसाठी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न
केला. आधुनिक वापरकर्त्यांच्या नवीन गरजा ओळखून आम्ही आमच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या बिल्ट-इन-अप्लायन्सेस सेंटरसह पुण्यात प्रवेश करताना अतिशय उत्साही आहोत. भारतात बिल्ट-इन- अप्लायन्सेसची
मागणी वाढत असून एक विशेष स्टँड अलोन स्टोअर असणे आमच्याकरिता गरजेचे होते. ज्याठिकाणी ग्राहक येऊन आमच्या सर्व प्रकारच्या उपकरणांचा स्वत: अनुभव घेऊ शकणार आहेत. या शहरातील आमचे ग्राहक
आता स्वत:चे किचन अत्याधुनिक आणि प्रगत सुविधांनी सजवतील. व्हर्लपूलची सर्व बिल्ट-इन- अप्लायन्सेस 6 सेन्स टेक्नोलॉजीने युक्त आहेत.”
सेलेब्रिटी शेफ कुणाल कपूर यांना विशेष पाहुणे म्हणून यावेळी आमंत्रित करण्यात आले होते. ते म्हणाले की,“व्हर्लपूलची श्रेणी केवळ उच्च सादरीकरण करत नसून स्मार्ट आणि विश्वासार्ह डिझाईनने युक्त आहे. या उत्पादनांमुळे जेवण बनविणे सोपे, जलद आणि आरोग्यदायी होते. व्हर्लपूल हा कायमच माझा पसंतीचा ब्रँड
आहे. आपण स्वयंपाकघरातील उपकरणांविषयी बोलतो, जेव्हा एखाद्याला स्वयंपाकघराचा कायापालट करायचा आहे किंवा स्टाईल बदलायची आहे, तेव्हा मी प्रत्येकाला याची शिफारस करेन. व्हर्लपूलने पुण्यात सर्वात मोठे बिल्ट-इन- अप्लायन्सेस स्टोअर सुरू केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”