पुणे- आज स्थायी समितीत विषय मंजुरीसाठी आला पण सभा पतंगराव कदमांच्या निधनामुळे श्रद्धांजली वाहून तहकूब झाली … त्यामुळे पार्किंग पॉलीसी चा निर्णय पुढच्या बैठकीत ढकलला गेला . पण पुणेकरांनो जागे व्हा .. सावध व्हा… काय आहे हे पार्किंग चे धोरण जे स्थायी समितीने प्रशासनाकडून दाखल करवून घेतले आहे . ? हे समजून घ्या .. दुचाकी ,रिक्षा , चारचाकी .. तुमच्या स्वताच्या जागेत असेल तेव्हाच हा अघोरी कर तुम्हाला द्यावा लागणार नाही ..मात्र तुमची दुचाकी , रिक्षा , आणि चार चाकी जेव्हा जेव्हा तुमच्या मालकीच्या जागेत नसेल .. अगदी रात्रभर सुद्धा … तेव्हा तुम्हाला त्याबाबतचे पार्किंग शुल्क भरावेच लागेल आस अघोरी प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत दाखल झालेला आहे . अजून तो फेटाळून लावण्याचे धाडस सत्ताधारी भाजपने दाखविलेले नाही ..
या प्रस्तावातील पार्किंगशुल्काच्या रकमा पाहिल्या तर अनेकांचे डोळे विस्फारतील…अनेकांना धक्का बसेल .. हा जिझिया कराचा महाबाप ठरेल .. असा टॅक्स पुण्याच्या घराघरातून वसूल करावा असा प्रस्ताव ठेवण्याची हिम्मतच कशी होते ?असा प्रश्न उभा राहील .
आज याबाबत आम्ही चर्चा केली आहे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याशी .. पहा आणि ऐका ते काय म्हणतात ….