सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने एसबीए कप सुपर – ५०० बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : चैतन्य खरात, निक्षेप कात्रे, जयंत कुलकर्णी यांनी सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत शरयू रांजणे, अनुष्का जयस्वाल यांनीही आगेकूच कायम राखली.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित चैतन्य खरातने अरहम रेदासानीवर २१-१५, २१-१२ असा विजय मिळवला. आता चैतन्यची उपांत्य लढत निक्षेप कात्रेविरुद्ध होईल. निक्षेपने विवेक चंद्रवंशीवर २१-१६, १८-२१, २१-१८ असा विजय मिळवला. यानंतर जयंत कुलकर्णीने आदित्य शर्माला २१-१७, २१-१७ असे नमविले. जयंतची उपांत्य लढत द्वितीय मानांकित प्रणव गावडे विरुद्ध होईल. प्रणवने हर्षिल ललवाणीवर २१-१७, २१-१८ अशी मात केली. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत शरयू रांजणेने मनाली देशपांडेवर २१-७, २१-५ असा, अनुष्का जयस्वालने दुस-या मानांकित श्रुती कुलकर्णीवर २१-५, २१-१७ असा, प्रिया शेळकेने नेहा गाडगीळवर २१-१०, १२-२१, २१-१४ असा, तर अग्रमानांकित सिया बेहेडेने गायत्री केंजळेवर २१-१२, २१-१५ असा विजय मिळवला.
जिया, शर्वरीची आगेकूच
स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित यशस्वी काळेने पद्मश्री पिल्लईला २१-१८, २१-७ असे नमविले. यशस्वीची लढत जिया उत्तकेरविरुद्ध लढत होणार आहे. जियाने लाभा मराठेवर २१-११, २१-७ असा विजय मिळवला. शर्वरी सुरवसेने सिया बेहेडेला २१-१६, २१-९ असे नमविले. शरयू रांजणेला राधा गाडगीळ विरुद्ध पुढे चाल मिळाली.
उपांत्यपूर्व फेरीचे निकाल – १७ वर्षांखालील मुले – वरद लांडगे वि. वि. अथर्व गोस्वामी २१-१७, २१-१६, सोहम धामे वि. वि. पार्थ झालवाडिया १९-२१, २१-१४, २१-१८, श्रेयस मासळेकर वि. वि. तनिष्क आडे १२-२१, २१-१७, २१-१८, निक्षेप कात्रे वि. वि. सुदीप खोराटे २१-१९, १३-२१, २१-१६.
१३ वर्षांखालील मुले – अर्जुन श्रीगडीवार वि. वि. मीर शाहझर अली २१-१२, २२-२०, अतिक्ष अगरवाल वि. वि. जतिन सराफ २१-५, २१-१३, हृदान पाडवे वि. वि. आरुष प्रसाद सापळे २१-११, २१-८, रझा सोमजी वि. वि. विहान कोल्हाडे १४-२१, २१-७, २१-१२.
१३ वर्षांखालील मुली – आराध्या ढेरे वि. वि. रावी म्हेत्रे २१-१३, २१-६, स्वरा मोरे वि. वि. जॅस्नम कौर चहल २१-१०, २१-१४, समन्वया धनंजय वि. वि. वल्लारी वाटाणे २१-१४, २१-८, कायरा रैना वि. वि. अदिती गिरी २१-१०, २१-६.
१९ वर्षांखालील मुले – निक्षेप कात्रे वि. वि. आरुष अरोरा २१-११, २१-१७, सिद्धांत कोल्हाडे वि. वि. पार्थ झालवाडिया १७-२१, २६-२४, २१-१२, सुदीप खोराटे वि. वि. अद्वैत नेवले २१-९, २१-८, ओजस जोशी पुढे चाल वि. कृष्णा जसूजा.
१९ वर्षांखालील मुली – यशस्वी काळे वि. वि. संस्कृती जोशी २१-१५, २१-१९, जिया उत्तेकर पुढे चाल वि. राधा गाडगीळ, सिया बेहेडे वि. वि. पीयूषा फडके २१-१३, २१-१३, एस. डाखणे वि. वि. सयुरी थोकल २१-१८, २१-१९.
१५ वर्षांखालील मुले – विराज सराफ वि. वि. आरुष सापळे २१-१२, २१-१२, तनिष्क आडे वि. वि. अर्जुन श्रीगडीवार २१-१६, २१-७, चिन्मय फणसे वि. वि. अक्षर झोपे २१-१३, २१-१०, रझा सोमजी वि. वि. ध्रुव बर्वे १८-२१, २१-१८, २१-१६.
१५ वर्षांखालील मुली – शरयू रांजणे वि. वि. कायरा रैना २१-५, २१-६, सानिका बागळे वि. वि. वेनिशा कोल्हे १८-२१, २१-१७, २१-१५, सान्वी पाटील वि. वि. अरुंधती कन्वर १८-२१, २१-१३, २१-१७, शर्वरी सुरवसे वि. वि. लाराण्या नलावडे २०-२२, २१-१०, २१-१५.
११ वर्षांखालील मुले – अद्वैत फेरे वि. वि. वरद आठल्ये २१-१५, २१-१२, वेदांत मोरे वि. वि. अरहम अछलिया २१-११, २१-१०, ईशान रॉय वि. वि. कृष्णा सावंत २१-९, २१-१३, अर्चित खांदेशे वि. वि. अमन वर्मा २१-९, २१-१५.
११ वर्षांखालील मुली – दिविशा सिंग वि. वि. तेजस्वी दरेकर २१-९, २१-७, राजलक्ष्मी थेउरकर वि. वि. रनैशा शाह २१-१२, २१-१०, अग्रिमा राणा वि. वि. पूर्वा हांडे २१-१७, २१-६, निधी गायकवाड वि. वि. वल्लरी वाटाणे १८-२१, २१-१९, २१-१९.