धुळे येथील योग राज्यस्तरीय स्पर्धेत ‘मानसी’च्या १६ मुलींची दमदार कामगिरी

Date:

ना. चंद्रकातंदादा पाटील यांच्यावतीने सर्व मुलींचे विशेष कौतुक

पुणे : धुळे येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित सहाव्या महाराष्ट्र योगशिक्षक संमेलनांतर्गत पार पडलेल्या योग स्पर्धेत कोथरूडमधील ‘मानसी-प्रेरणा फाऊंडेशन’च्या १६ मुलींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे कोथरूडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व यशस्वी मुलींचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व मुलींचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

कोथरूडमधील विविध वस्त्यांमध्ये अनेक गुणी आणि प्रतिभावान मुले-मुली आहेत. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना योग्य दिशा, प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास ती निश्चितच मोठे यश संपादन करू शकतात, या उद्देशाने ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून मानसी प्रेरणा फाउंडेशनच्या माध्यमातून गुणवंत मुलींना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. त्यांना विविध व्यासपीठांवर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

धुळे येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित सहाव्या महाराष्ट्र योगशिक्षक संमेलनांतर्गत पार पडलेल्या योग स्पर्धेत या मुलींनी योगक्षेत्रात मिळवलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित आहे. या यशामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच इतर मुलींनाही विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

या मुलींना उत्कृष्ट योगप्रशिक्षण देणाऱ्या उल्का अलकुंटे, तन्वी फाटक, गौरी पाटील आणि सविता गोटूरकर यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच मानसी प्रेरणा फाउंडेशनच्या संचालिका मुग्धा भागवत यांचेही मुलींच्या जडणघडणीसाठी आणि त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल ना. पाटील यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

कोथरूडमधील गुणवंत मुलींना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास त्या राज्यस्तरावरच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवू शकतात, हे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या सर्व मुलींच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, त्यांच्या यशामुळे संपूर्ण कोथरूड परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमित शहा साहेब, आलाच आहात पुण्यात तर.. शहरातील टेकड्यांची अवस्था आणि वाहतुकीची समस्याही प्रत्यक्ष पाहून जा!

पुण्याच्या वाढत्या प्रदूषणामागची कारणेही जाणून घ्या; वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

परदेशात भारताची बदनामी करून सत्ता मिळणार नाही; राहुल गांधींना अमित शहांचा पुण्यातून टोला!

‘परदेश दौरे बंद करा, देशातील गावागावांत फिरा’; काँग्रेस आणखी...

पुण्यातून अमित शहांच्या हस्ते एनएचईसी प्रकल्पाचे भूमिपूजन, ‘भारत टॅक्सी’चा शुभारंभ!

तळेगावातील ११० एकरवरील बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पाचे पुनरुज्जीवन; डिसेंबर...

धनकवडीच्या शंकर महाराज मठात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते दैनंदिनीचे प्रकाशन

मठाच्या अन्नदान उपक्रमाचे कौतुक, गरजू विद्यार्थ्यांना शासनाने एक वेळचे...