संवाद पुणे आणि कावरे आइस्क्रिम आयोजित बाल चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 

Date:

पुणे- नाटक आणि चित्रपट यांत नेमका काय फरक आहे, या दोन्हीच्या निर्मितीमधील  दिग्दर्शक, संगीतकार, अभिनेते या सगळ्यांच्या भूमिका काय असतात, याची जाणीव मुलांच्या मनामध्ये आपण निर्माण करुन दिली पाहेजे. चित्रपट म्हणजे केवळ दृश्यचित्र किंवा हालचाल ही नाही,तर चित्रपट पाहिल्यानंतर  कोणतीही विशेषणे न वापरता मुलांशी पालकांनी चर्चा केली पाहिजे. या चित्रटपटातली कुठली फ्रेम तुला आवडली, कुठला संवाद आवडला, कुठले पाश्वसंगीत आवडले, हे सर्व नसते तर काय झाले असते असे प्रश्न मुलांसमोर ठेवा असे सांगत बालसाहित्यीक राजीव तांबे यांनी पालकांसह मुलांना चित्रपट रसस्वादाचे धडे दिले.

निमित्त होते संवाद पुणे आणि कावरे आयस्क्रिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल चित्रपट महोत्सावाचे. नारायण पेठेतील विजय टॉकीज येथे आयोजित बाल चित्रपट महोत्सावाचे यंदा या  22 वे वर्ष असून त्याचे आैपचारिक उद्घाटन बालसाहित्यीक राजीव तांबे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महांडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, कावरे आयस्क्रिमचे संचालक राजूशेठ कावरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महांडळाच्या संचालिका निकीता मोघे, व्यवस्थापक नारायण मोकाशी, अरूण शेवते आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रपट महोत्सावाच्या उद्घाटनानंतर बच्चे कंपनीने  बालशिवाजी या चित्रपटाचा आस्वाद घेतला. या महोत्सावात उद्या दिनांक 15 रोजी चार्ली चॅपलिन हा इंग्रजी चित्रपट हिंदी सबटायटलसह दाखविण्यात येणार आहे. तर दिनांक 16 रोजी श्यामची आई हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. रोज सकाऴी 10.30 वाजता मुलांना या  चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.

यावेळी बोलताना राजीव तांबे म्हणाले की, मुलांना चांगला पर्याय उपलब्ध नसल्याने मुले नको ती कार्टूर्नस पाहतात. याबाबत आपण मुलांना दोष देऊ शकत नाही. त्यांना अस्सल काय आहे हे सांगण्यासाठी असे चित्रपट दाखवले पाहिजे. त्याच्यावर गप्पा मारल्या पाहिजेत, या माध्यमाचे वेगळे पण काय आहे हे इतरांवर टिका न करता सांगितले पाहेज. मुलांची शोध घेण्याची प्रवृत्ती वाढवली पाहिजे,त्यास खतपाणी घातले पाहिजे. अशा चित्रपट महोत्सावांच्या माध्यमातून त्यांची चांगली अभिरुची विकसीत झाली तर मुले असे दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी हट्ट करतील. खरे तर महिन्यातील किमान दोन रविवार ठरवून मुलांना असे चांगले चित्रपट दाखवले पाहिजे. मराठी चित्रपटांपासून सुरु करुन आंतरराष्ट्रीय स्तरवारील चांगले चित्रपट आपण त्यांना दाखविले पाहिजे. या मर्यादा हळुहळु अोलांडल्या तर त्याला व्यापक स्वरूप प्राप्त होईल. मराठी चित्रपट, भारतातले ग्रेट चित्रपट आणि जागतीक पातळीवरील चित्रपट या तीन स्तरावर काम झाले पाहिजे. अश्या पद्धतीने काम झाले तर मुले मॅड बाॅक्स समोर बसणार नाहीत. आपणच मुलांपर्यंत चांगले चित्रपट घेऊन जायला कमी पडतो. हा पालक म्हणुन आपलाच पराभव आहे. येथे आपणच नव्याने कंबर कसून सुरवात करायला पाहिजे. हा बालचित्रपट महोत्सव त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे,असे म्हटल्यास अतिषोक्ती होणार नाही.

या बाल चित्रपट महोत्सावाच्या आयोजनाची संकल्पना संवाद, पुणेचे सुनील महाजन यांची असून यावेळी बोलताना सुनील महाजन म्हणाले की, मुले दरवर्षी आतुरतेने या चित्रपट महोत्सवाची वाट पहात असतात. चांगले चित्रपट मुलांपर्यंत पोहचावे, हा या चित्रपट महोत्सावाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असून त्याद्वारे संस्कार करण्याचा हा प्रयत्न आहे. पालकांचा उत्तम प्रतिसाद मिऴतो. पालक आवर्जुन मुलांना हे चित्रपट  दाखविण्यासाठी घेऊन येतात. ही एक परंपरा असून दरवर्षी साहित्य, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आवर्जुन या  चित्रपट महोत्सावाला भेट देतात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या एकलव्य या सामाजिक संस्थेतील 50 मुलांना आजचा चित्रपट मोफत दाखविण्यात येत आहे. दरवर्षी दिव्यांग, अनाथ किंवा उपेक्षित मुलांना मोफत चित्रपट  दाखविले जातात. चित्रपट बघायला येणाऱ्या मुलांना मोफत कावरे आइस्क्रिम देण्यातआले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट – कात्रज बीआरटी मार्गावरील मेट्रो कामामुळे पीएमपीएमएल बससेवेत तात्पुरते बदल

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ने प्रसिद्धीसाठी दिलेल्या...

‘गोदरेज’कडून ‘फोर्कलिफ्ट’ साठी भारतातील पहिले मल्टीआयन बॅटरी तंत्रज्ञान सादर

उत्पादन आणि वेअरहाउसिंग क्षेत्रातील पुरवठा साखळीसाठी स्वच्छ, कार्यक्षम आणि शाश्वत ऊर्जा उपायांचा नवा मापदंड निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई, १४ मे २०२६ : भारतातील मटेरियल हँडलिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’ने (जीईजी) आपल्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट (एमएचई) व्यवसायाअंतर्गत ‘इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’साठी भारतातील पहिले मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञान सादर केले आहे. भारतामध्ये उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग या क्षेत्रांचा वेगाने विस्तार होत असताना अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा उपायांची गरज वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या बॅटरीमुळे मालकीचा एकूण खर्च २५ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास, उपकरणांचा कार्यरत कालावधी वाढण्यास आणि औद्योगिक कामकाज अधिक स्वच्छ व पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे. तसेच ही बॅटरी फोर्कलिफ्टच्या संपूर्ण कार्यकालापर्यंत टिकेल, अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. भारतात औद्योगिक आणि वेअरहाउसिंग यांचा बाजार वेगाने वाढत आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये १.१ कोटी चौरस फुटांहून अधिक जागेचे लीजिंग झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात दुहेरी अंकातील वाढ नोंदवली गेली आहे. थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्री-पीएल), ई-कॉमर्स आणि उत्पादन या क्षेत्रांमुळे पुरवठा साखळीच्या आधुनिकीकरणाला मिळालेली चालना हे यामागचे प्रमुख कारण आहे. गोदामांची संख्या आणि त्यांच्या कामकाजाचा वेग वाढत असताना, ऊर्जा कार्यक्षम, सुरक्षित आणि भविष्यासाठी तयार असलेल्या मटेरियल हँडलिंग उपायांची गरज आता उत्पादकता आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. ‘मल्टी आयन बॅटरी’मध्ये जलद आणि ऑपर्च्युनिटी (कामाच्या मधल्या वेळेत) चार्जिंग, शून्य देखभाल खर्च आणि ऊर्जेची उच्च कार्यक्षमता यांसारख्या सुविधा एकत्रितपणे देण्यात आल्या आहेत. तसेच, यामध्ये दुर्मिळ धातूंवरील अवलंबित्व कमी करण्यात आले असून बॅटरीच्या विल्हेवाटीशी संबंधित अडचणीही कमी होतील, याची काळजी घेण्यात आली आहे. भारतामधील आघाडीच्या ‘डीप-टेक बॅटरी इनोव्हेटर्स’पैकी एका कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान तब्बल ५,००० लाईफ सायकल्स देते. हे प्रमाण सामान्य लिथियम-आयन बॅटरींपेक्षा जवळपास ६० टक्के अधिक आहे. त्यामुळे उपकरणाच्या संपूर्ण कार्यकाळासाठी हीच बॅटरी वापरता येते आणि खर्चही कमी होतो. ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तपमानातही विश्वासार्हरीत्या कार्य करण्यासाठी ही मल्टी आयन बॅटरी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील उष्णकटिबंधीय हवामानासाठी ती विशेष उपयुक्त ठरते. ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट विभागाचे बिझनेस हेड अनिल लिंगायत म्हणाले, “भारतामधील पुरवठा साखळी अधिक व्यापक आणि गुंतागुंतीची होत आहे. अशा वेळी मटेरियल हँडलिंग क्षेत्राला विश्वासार्ह, दीर्घकालीन मूल्य देणारे आणि शाश्वत ऊर्जेचे उपाय आवश्यक आहेत. मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही औद्योगिक उपकरणांना ऊर्जा देण्याची पद्धत अधिक आधुनिक आणि कार्यक्षम बनवत आहोत. प्रगत अभियांत्रिकीच्या मदतीने उपकरणे अधिक काळ कार्यरत राहणे, मालकीचा खर्च कमी होणे आणि एमएसएमईंसह संपूर्ण मूल्यसाखळीत अधिक स्वच्छ कामकाज करणे यांवर आमचा भर आहे. डिझाइन-आधारित नवकल्पना, संशोधन व विकास आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवून आणण्याच्या आमच्या प्रयत्नांचे हे उदाहरण आहे.” मटेरियल हँडलिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या मते, अशा नव्या तंत्रज्ञानामुळे पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम, वेअरहाउसिंग अधिक उत्पादक आणि औद्योगिक कामकाज अधिक स्थिर बनण्यास मदत होते. या नव्या उत्पादनाच्या लाँचमधून ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’चा प्रगत अभियांत्रिकी आणि डिजिटल एकत्रीकरणावर असलेला भर दिसून येतो. ५,००० तासांहून अधिक प्रत्यक्ष वापरातील चाचण्यांच्या आधारे विकसित करण्यात आलेल्या या मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञानास ७ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘गोदरेज’च्या औद्योगिक उपायांवर ग्राहकांचा दीर्घकालीन विश्वास अधिक दृढ होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

चाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करावे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

"पुनर्वसन प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सर्व बैठकींचा...

महिला पोलिस अधिकारी ज्योती तांबे 50 हजारांच्या लाचखोरीच्या प्रकरणी अटकेत

पुणे-पिंपरी-चिंचवडमधील बावधान पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला सहाय्यक...