केशव माधव विश्वस्त निधी तर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनीता गोडबोले दांपत्याचा सत्कार व गुणगौरव.

Date:

पुणेः( प्रतिनिधी)
वनवासी बांधवांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या व भारत सरकारने २०२६ वर्षासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनीता गोडबोले यांचा सत्कार समारंभ केशव माधव विश्वस्त निधी तर्फे कर्वेनगर येथील “शैलेश” सभागृहात संपन्न झाला.
छत्तीसगड मधील अतिदुर्गम भागात बस्तर येथे गेले पस्तीस वर्षापासून निस्वार्थी भावनेने वनवासी बांधवांच्या आरोग्यसेवेसाठी कार्य करणारे आयुर्वेदाचार्य डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनिता गोडबोले यांना त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले त्याप्रीत्यर्थ सत्कार आयोजित करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर संघचालक उदयन पाठक यांचे हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केशव माधव विश्वस्त निधीतर्फे गोडबोले दांपत्याचा सत्कार करण्यात आला.ह्या प्रसंगी केशव माधव विश्वस्त निधीचे अध्यक्ष रविंद्र जावळे,एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त),सचिव अरविंद देशपांडे यांची मुख्य उपस्थिती होती.
डॉ गोडबोले दांपत्याच्या सेवा यज्ञाच्या प्रेरणादायी प्रवास,वनवासी समाजातील अनुभव,आणि समाजकार्यासाठी त्यांची असलेली प्रेरणा व संघर्षाची गाथा ह्या प्रकट मुलाखतीतून स्पष्ट दिसून आली.नाट्यकलावंत प्रशांत कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली.मुलाखतीनंतर उपस्थित नागरिकांनी त्यांना काही प्रश्न विचारले डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनीता गोडबोले यांनी समर्पक उत्तरे दिली.
सत्काराला उत्तर देतांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आयुर्वेदाचार्य डॉ रामचंद्र गोडबोले म्हणाले,वनवासी बांधवांसाठी कार्य करण्याची प्रेरणा दामूअण्णा दाते,भास्करराव कळंबी,बाळासाहेब दिक्षीत,यांचेकडून मिळाली.आदिवासी समाज खूप मेहनती आहे,प्रामाणिक आहे त्यांच्यामध्ये प्रचंड सहनशक्ती आहे तसेच त्यांच्यामध्ये
साधेपणा,प्रामाणिकपणा आढळतो. “कुपोषण मलेरिया,क्षयरोग व रक्तक्षयमुक्त बस्तर हे माझे स्वप्न आहे.वनवासी समाज बांधवांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे तसेच त्यांना निरोगी ठेवणे व समाजामध्ये आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू”
या वनवासी बांधवांसाठीच्या सामाजिक कार्यामध्ये समाजातील सर्वांनी प्रत्यक्ष मदत करावी असे आवाहनही डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनीता गोडबोले यांनी या वेळी केले.
सौ सुनीता गोडबोले यांनी “आदिवासी समाजबांधवांनी दुःखे समजवून घेण्यासाठी संवेदनशीलता असावी लागते तसेच त्यांची स्थानिक भाषा अवगत करावी लागते.वनवासी क्षेत्रातील कार्य करण्याची प्रेरणा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रचनात्मक कार्यातून मिळाली.त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यांच्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देण्याचे काम गेले पस्तीस वर्षापासून करत आहोत.त्यामुळे बस्तर भागात अधिक कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत आहे”असे यावेळी प्रतिपादन केले.

याच कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय बुद्धिबळपटू व नामांकित बुद्धिबळ प्रशिक्षक मकरंद वेलणकर यांनी बुद्धिबळ या विषयामध्ये (PH. D) बालाजी विद्यापीठाची पीएच. डी.मिळविल्याबद्दल केशव माधव विश्वस्त निधीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला केशव माधव ह्या संस्थेमार्फत चालणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती संस्थेच्या विश्वस्त कविता शेंडे यांनी दिली.सूत्र संचालन नाट्यकलावंत प्रशांत कुलकर्णी यांनी केले.प्राची पाठक ह्यांनी संपूर्ण “वंदे मातरम्” गायिले.आभार विश्वस्त प्रकाश देशपांडे यांनी मानले.कार्यक्रमास नागरिक,विद्यार्थी,वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी,”वनवासी कल्याण आश्रम”चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साध्या-साध्या गोष्टींतून विनोद टिपता आला पाहिजे

ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांचे मत; आदिश जैन...

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात लक्ष दुर्वा गणेशयाग संपन्न

मंदिरात मंत्रजागराचे आयोजन पुणे : श्रावण शुद्ध चतुर्थी अर्थात विनायकी...

२,५०० कोटींच्या सीमा शुल्क चुकवेगिरीचे जाळे DRI कडून उद्ध्वस्त

बांगलादेशी असल्याचे भासवून आग्नेय आशियाई सुपारीची आयात;SAFTA अंतर्गत शुल्कमाफीचा...

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने नगररचना संचालनालयात रक्तदान शिबिर संपन्न

पुणे, दि. १६: भारताच्या ८० व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून,...