खडकी रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

Date:

पुणे : खडकी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रेल्वे फाटकाजवळ नवीन प्रशस्त भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्याची मागणी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली आहे. तसेच या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनाही निवेदन देण्यात आले आहे. 

या बाबत संबंधितांना  दिलेल्या पत्रात उपमहापौर वाडेकर यांनी म्हटले आहे की, खडकी रेल्वे स्थानक हे सध्या महत्त्वाचे जंक्शन झाले असून दररोज अनेक एक्स्प्रेस गाड्या येथे थांबतात. अलीकडे उत्तर भारतात जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या या पुणे स्टेशन ऐवजी खडकी येथून सोडल्या जात आहेत त्यामुळे स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. रेल्वे स्थानकाजवळील जुने रेल्वे फाटक बंद असताना औंध, सांगवी, बाणेर, बोपोडी, खडकी बाजार आदी भागांतून ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

खडकी पोलिस स्टेशनजवळील जुना रेल्वे बोगदा अत्यंत अरुंद असून या मार्गावर सतत पाणी साचत असल्याने वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होतात. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता हा बोगदा दुरुस्त करूनही वाहतुकीची समस्या कायम राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर खडकी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी नवीन प्रशस्त भुयारी मार्ग उभारण्यासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, तसेच रेल्वे प्रशासनास पत्र पाठवून संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी वाडेकर यांनी केली आहे. या कामासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही” — उद्धव ठाकरे

प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची ठाण्यात सांत्वनपर भेट;...

दिवेआगर समुद्रकिनारी भीषण दुर्घटना; आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

विनर्स अकॅडमीची सहल; ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह ४४...

“ज्ञानेश कुमार ‘देशाचे गद्दार’; त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा” — अभिजीत दिपके

२ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा; “तीन महिने तुरुंगात टाकले...