पुणे,10 फेबुवारी 2021: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील दुसऱ्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत मुलांच्या गटात समीहन देशमुख, नमिश हूड, वैभव रानवडे यांनी, तर मुलींच्या गटात मृणाल शेळके, रित्सा कोंडकर, श्रेया पठारे, काव्या देशमुख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत रित्सा कोंडकर हिने तिसऱ्या मानांकितध्रुवा मानेचा 6-2 असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली. अव्वल मानांकित मृणाल शेळकेने वंशिका अगरवालचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. श्रेया पठारेने स्वरा जावळेला 6-1 असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित काव्या देशमुख हिने काव्या पांडेवर 6-2 असा विजय मिळवला.
मुलांच्या गटात अव्वल मानांकित समीहन देशमुखने क्षितीज अमीनचे आव्हान 6-3असे संपुष्ठात आणले. चौथ्या मानांकित वैभव रानवडे याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या बिगरमानांकीत राघव सरोदेचा 6-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: 12 वर्षाखालील मुले:समीहन देशमुख(1) वि.वि.क्षितीज अमीन 6-3; नमिश हूड(3) वि.वि.आर्यन कीर्तने 6-5(4);वैभव रानवडे(4) वि.वि.राघव सरोदे6-0;आयुष पुजारी वि.वि.अर्जुन येलभर 6-2; 12वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:मृणाल शेळके(1) वि.वि.वंशिका अगरवाल 6-0; श्रेया पठारे वि.वि.स्वरा जावळे 6-1; रित्सा कोंडकर वि.वि.ध्रुवा माने(3) 6-2;काव्या देशमुख(2) वि.वि.काव्या पांडे 6-2.