माणसांना विभाजित ठेवण्याचा देशात प्रयत्न- ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची टीका ; सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे उद्घाटन

Date:

पुणे : ”समाजामध्ये महापुरूषांची पळवापळवी सुरू आहे़ त्यामुळे महापुरुषांच्या कार्याचे महत्त्व मर्यादित रहात आहे़ असे वातावरण विषारी असून येणाºया काळात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील़ देशात माणसांना विभाजित ठेवण्याचे काम नियोजितपणे सुरू असून याबाबत सर्वसामान्यांना जागे करण्याची आवश्यकता आहे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले़.

कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृहात सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ़. प्र.चिं. शेजवलकर, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, वीरेंद्र किराड, इंटकचे कैलास कदम, सचिन तावरे, संजय बालगुडे, शिवा मंंत्री आदी यावेळी उपस्थित होते़.

नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, ”कोणत्याही विचार आणि पक्षाशी एकनिष्ठ असणे महत्त्वाचे असते़ अन्यथा त्या विचारांना काहीही अर्थ उरत नाही़ जागतिकीकरणानंतरच्या काळात स्वत:ला विकून घेण्यासाठी अनेकजण तयार झाले आहेत़ माध्यमांमध्येही कोणता विचार राहिलेला नाही़ फक्त निवडणूक म्हणजे लोकशाही नाही़ आपल्या भावना, सर्वसामान्यांना विचार मांडण्याची मोकळीक असली पाहिजे़ सर्वसामान्यांना धाडसाने बोलता आले पाहिजे, तर लोकशाही यशस्वी होते़ पण, आताच्या काळात जनता बोलायला घाबरते, ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक आहे़ सध्या पत्रकार, व्यापारी यांच्यापासून सर्वसामान्यांपर्यंत कोणालाही सरकारवर टीका करता येत नाही किंवा मत मांडता येत नाही़ अशाप्रकारे, सध्या देशात परिस्थिती हुकूमशाहीकडे जात असून, ख्रिश्चन, मुस्लिम, कम्युनिस्ट यांना शत्रू ठरविले जाते़ ”

डॉ़. प्र.चिं. शेजवलकर म्हणाले, ”अर्थशास्त्र हे गतिमान असते़ त्यामुळे त्याबाबत अनेकांचे एकमत लवकर होत नाही़ सध्या देशात उद्योगांमध्ये तीव्र मंदी आहे़ मात्र सरकारला याबाबत सल्ला देणारे खरी परिस्थिती सांगत नाहीत़ कमी झालेली रेल्वेची मालवाहतूक, वीजेचा कमी झालेला वापर, घटलेले औद्योगिक उत्पादन, डिझेलची कमी झालेली मागणी या लक्षणांवरून मंदीचे भाकित करता येते़ गेल्या तेरा महिन्यांपासून निर्यात शून्यापर्यंत घसरली आहे़ रोजगार वाढविणे हाच मंदीवरचा सर्वोत्तम उपाय आहे़ जनतेच्या हातात पैसा आला पाहिजे़ त्यावर राजकीय उपाययोजनाही करता येतात, मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नाही़”

उल्हास पवार म्हणाले, ”केंद्र सरकारच्या धोरणांमुळे लोकशाहीचा आशय नष्ट होत चालला आहे़ सेवा, कर्तव्य, त्याग या गोष्टींचे महत्त्व कमी झाले आहे़ समजून-उमजून राजकीय धबडग्यात घोडेबाजाराची भाषा वापरली जाते़ महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यापूर्वी काँग्रेसन आठरा दिवस विचार केला़ मात्र, राजकीय आपद्धर्म म्हणून सत्तेत सहभाग घेतला़ आपद्धर्माचे नंतर सद्धर्मात रुपांतर करता येते़ त्यामुळे काही गोष्टींना काँग्रेसने मुरड घातली़ महाराष्ट्रातील हे सरकार टिकेल आणि सुरळीत चालेल तसेच राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सुटतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़.

मोहन जोशी म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला नाकारले़ मात्र दोन महिन्यात जनतेच्या ही चूक लक्षात आली़ त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येउन सत्ता स्थापन केली़ येत्या दोन वर्षात पुणे शहरात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यात येईल़” डॉ. विकास आबनावे यांनी सूत्रसंचालन केले़ कैलास कदम यांनी आभार मानले़

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....