हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदम

Date:

पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा; उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

पुणे, : गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळास भेट देऊन उत्पादन विभाग, सर्पालय, अश्व संवर्धन विभाग तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

हाफकिन संस्थेची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा, अँटी-स्नेक व्हेनम सीरमचे उत्पादन वाढवावे तसेच राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार किट उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

हाफकिनच्या प्रलंबित निधीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, यासाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करण्यात येईल. संस्थेच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री कदम यांनी यावेळी दिली.

हाफकिन संस्थेकडे असलेली क्षमता, प्रदीर्घ अनुभव आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा यांचा प्रभावी वापर करून संस्थेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हुकरे, हाफकिनचे महाव्यवस्थापक धीवर, पिंपरी विभाग व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुरहे यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रपित्याच्या  १९४८ मधील स्मृती स्तंभाला विद्यार्थ्यांच्या श्रमाने झळाळी !

श्रमदान करत विद्यार्थ्यांनी केले स्वच्छता अभियान आळंदी :  राष्ट्रपिता महात्मा गांधी...

वरिष्ठ अधिकारी परदेश दौऱ्यावर; पुढील काही दिवस पुणे महापालिकेच्या यंत्रणेची कसोटी

५ ऑक्टोबरपासून आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौरही जर्मनी...

उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

ऑफिसमधून बाहेर पडताच दोघांचा हल्ला; दोन दिवसांपूर्वी खंडणी मागितल्याचा...

रस्त्याच्या कडेला फेकलेल्या बॅगेत नवजात बालिका; रिक्षाचालकाच्या सतर्कतेने वाचला जीव

आव्हाळवाडी-सातववस्ती परिसरातील घटना; पाच-सहा दिवसांच्या बालिकेवर ससून रुग्णालयात उपचार,...